#Malshiras:वाघमोडे कुटुंबाचा गेली दोन वर्षा पासुन अनोखा उपक्रम
वाघमोडे परिवाराने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवल्या राख्या बालचिमुच्या राख्या निघाल्या सिमेवर महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस शहरातील वाघमोडे कुटुंबाच्या वतीने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतः राख्या तयार करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक स्तुत्य उपक्रम नुकताच राबवला आहे. गेली दोन वर्षा पासुन हा उपक्रम राबविला जात आहे . स्वतः हाताने तिरंगा कलर मध्ये राख्या तयार करून देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहून सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना त्यांच्या बहिणीची उणीव भासू नये या हेतूने राख्या व शुभेच्छा पत्र पाठवले. या उपक्रमाचे उद्घाटन डॉटर्स अँड मॉम्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते व एपीआय नितीन घोळकर ,वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे ,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य,