Posts

Showing posts from March, 2023

#Chiplun:चिपळूण येथे जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव राष्ट्रीय कृषि विभाग भात लागवड गुणवत्ता सुधार प्रकल्पाअंतर्गत चिपळूण शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रिडासंकूलात जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्‍घाटन बुधवार दिनांक.२९/०३/२०२३.रोजी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी व उपविभागीय कृषि अधिकारी, चिपळूण यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या कृषि प्रदर्शनात विविध कृषि उत्पादने, यंत्रसामुग्री, खते, बी-बियाणे, महिला बचत गटांची उत्पादनांचे विविध ५५  स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये महिला बचत गटांनी तृणधान्यापासून तयार केलेल्या विविध पदार्थांचे स्टॉल्स असून पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील भातपिकांचे विविध वाण, भातपिकासाठी यांत्रिकीकरण तसेच लागवड कापणी, मळणी, काढणीपश्चात तंत्रज्ञान यांची विविध कंपन्यांचे अवजारे उपलब्ध केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक भागातील शेतकरी बांधव विविध उत्पादनांसह प्रक्रिया उद्योगांवरही आता भर देऊ लागला आहे. महिला बचत गटांची उत्

#Akluj:शोभा वाघमोडे यांची पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरसच्या निर्भीड पत्रकार म्हणून ओळख असणाऱ्या शोभा तानाजी वाघमोडे यांची नुकतीच ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल (ए जे एफ सी) या राष्ट्रीय पत्रकार संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी  निवड झाल्याबद्दल कृषी क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अकलूज येथील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन  शिवाजी देशमुख, व्हाईस चेअरमन   सुजित तरंगे, संचालक शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील, संभाजी विश्वासराव कदम, संदीप सुरेश घाडगे, आनंद भिकलिंग तोडकरी, दत्तात्रय भिमराव मुंडफणे, पुष्पलता दिलीप पाटील, सागर सावता यादव, महादेव मुरलीधर साबळे आदि नूतन संचालक मान्यवर उपस्थित होते.

#Akluj:रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शिवाजी देशमुख तर व्हाईस चेअरमन पदी सुजित तरंगे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्था अकलूज च्या चेअरमन पदी शिवाजी  देशमुख तर व्हॉइस चेअरमन पदी सुजित  तरंगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील व मा.श्री. राजसिंह मोहिते पाटील यांनी 1जून 2006 रोजी स्थापन केलेल्या रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीजोत्पादक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये  संचालक मंडळ  निवड बिनविरोध झाली तर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूकसाठी  चेअरमन पदासाठी शिवाजी देशमुख यांचा एकमेव  तर व्हाईस चेअरमन पदासाठी सुजित तरंगे यांचा  एकमेव अर्ज आल्याने  निवडणूक निर्णय अधिकारी जी .बी. जाधव यांनी बिनविरोध घोषित केले. संस्थेचे मार्गदर्शक माजी मा.उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,मा.राजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,संचालक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने कृषी क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे.  या संस्थेमार्फत  बीजोत्पादन  कार्यक्रमाशिवाय आडत विभाग फलोत्पादन विभाग बियाणे प्रक्रिया विभाग

#Natepute:एजेएफसी च्या माळशिरस तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी शोभा वाघमोडे तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब कदम यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल  (ए जे एफ सी) या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यासिन पटेल यांच्या मार्गदर्शना खाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष अभिमन्यू आठवले यांच्या उपस्थितीत माळशिरस तालुका अध्यक्षपदी पत्रकार शोभा तानाजी वाघमोडे तर उपाध्यक्षपदी पत्रकार बाळासाहेब महादेव कदम यांची निवड नातेपुते येथील बैठकीत करण्यात आली असून नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अभिमन्यू आठवले व तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आला. यावेळी पत्रकार विलास भोसले श्रीराम भगत महाराज आबा भिसे संजय पवार बशीर शेख हनुमंत माने एडवोकेट नंदकुमार पिसे अमोल साठे आदी पत्रकार उपस्थित होते. निवडीनंतर नूतन अध्यक्ष शोभा वाघमोडे म्हणाल्या ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल भारत सरकार मान्य प्राप्त संघटना असून  वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून सहकाऱ्यांना बरोबर घेऊन संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात सामाजिक उपक्रमाबरोबर सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार असून संघटनेने माझ्यावर टाकलेले तालुका अध्यक्ष पदाची टाकलेली जबाबदारी मी प्रमाणिकपणे निभवण्याचा  प्रयत्न करणार असल्याचे सां

#Mumbai:पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांच्या निधीवरील स्थगिती उठवा

Image
आ. शेखर निकम यांची विधानसभेत मागणी महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव अर्थसंकल्प २०२३  चालू अधिवेशनामध्ये आपल्या चिपळूण संगमेश्वर मतदार संघातील प्रश्न विधीमंडळामध्ये मांडताना  आमदार शेखर निकम   पर्यटन विषयी प्रश्न मांडताना कोकणातील पर्यटनाला चालना देताना समुद्र किना-यावरील पर्यटन विचारात न घेता द-या खो-यात असणा-या तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले यांचा विचार पर्यटन दृष्टीने प्राधान्याने होऊन कोणतेही पक्षीय राजकारण न करता या कामांकरीता वितरीत निधीवरील स्थगिती उठवण्यात यावी. श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे रोप वे व अभयारण्य उभारावे जेणेकरुन जागतिक पर्यटनाला वाव मिळेल त्याचबरोबर कसबा येथील कर्णेश्वर मंदीराकडे पर्यटनाच्या दृष्टीने विचार व्हावा, कसबा  येथील छ. संभाजी महाराज येथे वास्तव्य असलेल्या देसाईवाडा शासनाने त्यांना मोबदला देऊन ताब्यात घेऊन संग्रहालय उभारावे तसेचे छ. संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणीसाठीचा निधीवरील शासनाने स्थगिती उठवावी. कोकणातील खाडी किनारी असणा-या जैव पर्यटनाच्यादृष्टीने गोवळकोटच्यात खाडीमध्ये केरळच्या धरतीवर बॅक वॉटर पर्यटनाला चालना द्यावी. पर्शुराम देवस्थान

#Mumbai:चिपळूणच्या पूररेषा संदर्भात आ.शेखर निकम यांनी अधिवेशनात वेधले लक्ष

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण नगर परिषद व शहरातील क्षेत्रातील निळी रेषा व लाल रेषा या पुररेषा आखण्याचे काम शासनाच्या जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. सदरच्या रेषाची आखणी झालेने शहराचा  सुमारे ९०  टक्के भाग बाधीत झाला आहे. त्यामुळे विकासात्मक कामे करता येत नाहीत त्यामुळे गुजरात राज्य सरकारने पूर रेषा बांधकाम निर्बंध कायद्यामध्ये अमेंडमेंट करून अटी व शर्ती वरती बांधकाम परवानगी देण्याचे नियम व धोरण अवलंब आहे. याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने सुद्धा विचार करावा. चिपळूण शहरालगत असलेल्या वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी आवश्यक असणारा निधी सरकारकडून मिळाला पाहिजे तो न मिळाल्यामुळे गाळ काढण्याचे रखडले आहे तरी आवश्यक निधी वितरीत करावा.(EP) प्लानमुळे बांधकामे रखडलेली आहेत. ज्यामध्ये कायदेशीर पद्धतीने व रितसर परवानग्या घेवून सुरू असलेल्या व पूर्णत्वास गेलेल्या इमारतींवर ही आरक्षण टाकण्यात आल्याने नागरिकांची व बांधकाम व्यावसायिकांची मोठी कुचंबना झाली आहे. तरी तो (EP) प्लान लवकरात लवकर मंजूर करावा. कोळकेवाडी धरणातून चिपळूण शहरासाठी ग्रॅविटी योजनेतून तांत्रिक मंजूरी मिळाल

#Natepute: राजकुमार हिवरकर पाटील यांच्या प्रयत्नामुळे नातेपुते ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका दाखल

Image
नगराध्यक्षांच्या हस्ते रुग्णवाहिकीचे पूजन महादरबार न्यूज नेटवर्क - हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नातेपुते ग्रामीण रुग्णालयास माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील  यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या सहकार्याने नातेपुते ग्रामीण रुग्णालयास अद्यावत अशी रुग्णवाहिका मिळाली आहे या नवीन रुग्णवाहिकीचे पूजन नातेपुते नगरपंचायत च्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, नगरसेवक बी वाय राऊत, पंचायत समितीचे सदस्य माऊली पाटील, नगरसेवक रावसाहेब पांढरे, रणजीत पांढरे आदी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी डॉ. नरेंद्र कवितके, डॉ.सातव, समीर शेख, फोंडशिरसचे सरपंच पोपट बोराटे, हनुमंत शिंदे, सतीश बरडकर, मनोज जाधव, पोपट शिंदे आदि उपस्थित होते अद्यावत रुग्णवाहिकेमुळे या परिसरातील गरीब रुग्णांना तसेच अपघात ग्रस्त रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोह

#Mumbai:आ. शेखर निकम यांनी कोकणातील जलसंपदा विभागाविषयी अधिवेशनात मांडले विषय

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी  अर्थसंकल्प २०२३ अधिवेशनामध्ये आपल्या भागातील शासन दरबारी प्रश्न मांडताना जलसंपदा विभाग संदर्भात विषय मांडताना चिपळूण मधील गाळ काढण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित करुन दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील निधी उपलब्ध करुन गाळ काढण्याला गती द्यावी याची मागणी सभागृहामध्ये केली. गडगडी प्रकल्पातील धरणांची ठेकादरांच्या फायद्यासाठी उंची न वाढवता पाणी पुरवठा करण्याचे पाण्याचे कालवे मातीने भरले जातात तसे होऊ नये यासाठी योग्य नियोजन करुन पाणी पाईप कॅनॉल ने आणून ग्रॅव्हटी परिसरीताल गावातील शेतीसाठी व पिण्यासाठी देण्याबाबत भर द्यावा ऊर्जा विभागातील प्रश्न मांडताना रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना Ag Othar than ने बिल आकारून भरमसाठ बिल आकारत आहेत तो बंद करावा हा हा प्रश्न सभागृहात उचलून धरला कामगार विभागाबाबत बोलताना ESIC ची अधिसूचना असूनसुद्धा कामगारांसाठी ESIC ची हॉस्पिटल नसल्याने व खाजगी हॉस्पिटले ESIC ला संलग्न नसल्याने याचा लाभ कामगारांना मिळत नाही तरी शासनाने कामगारांसाठी जिल्ह्यामध्ये मध्ये ESI

#Natepute:धर्मपुरी जि.प. शाळेच्या स्नेहसंमेलनात बाल गोपाळांच्या कलागुणांचे संस्कृती सातपुते यांनी केले कौतुक

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - धर्मपुरी तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या स्नेहसंमेलनात बालकलाकारांच्या आविष्काराने पालकांना मंत्रमुग्ध केले स्नेहसंमेलनाला आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी भेट देऊन बाल गोपाळांच्या कलागुणांचे कौतुक केले. स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून धर्मपुरी गावचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी लोकगीते, हिंदी गीते, पारंपारिक गीते बहारदारपणे सादर करण्यात आली बालचमुंच्या  कलागुणांनी प्रेषकांना शेवटपर्यंत  खेळवून  ठेवले होते. यावेळी गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख, माजी सरपंच बाजीराव काटकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय मसुगडे, उपाध्यक्ष छाया पाटील, सदस्या तृप्ती मसुगडे, मेजर मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पाटोळे, माजी अध्यक्ष छगन पाटील, ग्रामपंचायत चे माजी सदस्य शहाजी मदने, मुख्याध्यापक दत्तात्रय झेंडे, सहशिक

#Indapur:स्वाती शिंदे यांची इंदापूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - इंदापूर तालुक्यातील पवारवाडी येथील स्वाती शिंदे यांची भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या इंदापूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी निवड . स्वाती शिंदे यांना सामाजिक कामाची आवड असून त्या सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या कामाची दखल घेत भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेने शिंदे यांची तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी निवड केली आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे ,  संपर्कप्रमुख महाराष्ट्र प्रदेश संतोष मनोहर कांबळे यांनी शिंदे यांना इंदापूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी निवडीचे पत्र दिले आहे. स्वाती शिंदे यांच्या निवडीने इंदापूर तालुक्यातील मित्र परिवार व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

#Baramati:जैनकवाडी गावामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - जागृती माने    बारामती तालुक्यातील जैनकवाडी या गावांमध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तसेच तेथे भगवे वादळ बघायला मिळाले. तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लक्ष वेधून घेत होता. या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्राम संघाचे अध्यक्ष ललिता सूर्यवंशी यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विश्वजीत पवार यांनी महाराजांच्या गुणांचे अनुकरण केलेले पाहिला मिळाले. महिला दिनाचे औचित्य साधून खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच विजय त्यांना पारितोषिके हे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत माने व कल्याण ननवरे यांनी केलेले असून सूत्रसंचालन शंकर सूर्यवंशी व विजय माने यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला मुली व मुले तसेच तरुण मंडळी उपस्थित होते.

#Indapur:ऊसतोड कामगार महिलांच्या बाबतीत सरकारने गांभीर्याने विचार करावा - कल्याणी वाघमोडे

Image
जागतिक महिला दिनी छत्रपती साखर कारखाना येथे महिलांचा सन्मान ,आरोग्य विषयक मार्गदर्शन महादरबार न्यूज नेटवर्क - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या व क्रांति शौर्य सेनेच्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी ऊसतोड कामगार महिलांचा  सन्मान करून त्यांना डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य विषयक मार्गदर्शन देऊन कार्यक्रम उत्साहात संपन्न केला. यावेळी सर्व ऊसतोड कामगार महिलांना खण नारळाने ओटी भरून हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला.यावेळी सॅनिटरी पॅड्स महिलांना देऊन महत्व पटवून दिले .तसेच डॉक्टर शुभांगी सपाटे व डॉक्टर तनुजा शितोळे यांनी आपले आरोग्य कसे सांभाळावे ,ऍनिमिया ची कारणे ,पोषणयुक्त आहार ,मासिक पाळीत होणाऱ्या अडचणी ,स्वच्छता,गर्भाशय कॅन्सर व  महिलांनी वेळेच्या पूर्वी गर्भाशय न  काढता पुढील शारीरिक हानी पासून स्वतःला वाचवावे व सुखी आरोग्यदायी आयुष्य जगावे यासाठी मोलाचे  मार्गदर्शन केले. कल्याणी वाघमोडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना  ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष्य केले . देशातील जवळपास 40% साखर कारखाने महारा

#Solapur:राज्यस्तरीय आदर्श गौरव महासंमेलनास प्रस्ताव पाठवा - आकाश पुजारी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - श्री.महादेव आण्णाप्पा पुजारी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्या मधून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक/ डिजीटल मीडिया), युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्राम विकास आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस असेच उल्लेखनिय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा विषेश गौरव महासंमेलन आयोजित केले आहे आपण वरील क्षेत्रात काम करीत असाल तर आपला प्रस्ताव 15 मार्च 2023 पूर्वी फोटोसह व अल्पपरिचय पत्रामध्ये योग्य कागदपत्रांसह किंवा ऑनलाईन  9860949600 , 7219601902 या व्हॉट्सॲप नंबर वर पाठवावेत पुरस्कार प्राप्त व्यक्ती व आदर्श कार्य गौरव देऊन विषेश मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी इच्छुकांनी वेळेत सविस्तर व थोडक्यात माहिती पाठवावी असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आमचे  संयोजक मंडळ यांच्याशी संपर्क साधावा. श्री.आकाश पुजारी (महाराष्ट्र राज्य

#Natepute:राजकुमार हिवरकर पाटील यांच्या प्रयत्नाने नातेपुते नगरपंचायतीस निधी मंजूर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांच्या निधीसाठी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,सार्व.बांधकाम सभापती अतुल पाटील,स्वच्छता व पाणी पुरवठा सभापती रणजीत पांढरे,नगरसेविका सविता बरडकर यांनी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडील थेट विकास निधीची मागणी केली. यावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी या मागणी सोबत शिफारस जोडून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख,शिवसेना नेते शिवाजी सावंत यांच्याकडे मागणी केली त्यांनी तात्काळ शिफारस देऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे विकास निधीसाठी मागणी केली.आरोग्यमंत्री तानाजी सावंत,प्रा.शिवाजी सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून नातेपुते नगरपंचायतीला २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. प्रभाग ५ श्रीराम हाऊसिंग सोसायटी काँक्रीटरस्ता,शंकराव कॉम्प्लेक्स ते सचिन ठोंबरे,आपोलो टायर शोरूम,माळी बिल्डिंग ते पदमन वर्कशॉप अंतर्गत गटार व काँक्रीट रस्ता,प्रभाग ७,८,९भाजी मंडई बाजारतळ सुशोभीकरण,काँक्रिटीकरण,भोजराव हिवर

#Natepute:आईचे अंनत उपकार — ह.भ.प. आरती महाराज भूजबळ

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - जगात अनेक नाती असतात पण निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करणारी आईच असते, म्हणून तूकाराम महाराज म्हणतात मला देवाशी आईचे नाते जोडावयाचे आहे.असे ह.भ.प आरती महाराज भूजबळ यांनी कारूंडे ता.माळशिरस येथील कै.सौ. लक्ष्मीबाई जगन्नाथ मस्कर याच्या प्रथम पूण्यस्मरणानिमित्त आयोजित किर्तन सेवेत व्यक्त केले. त्यांनी आपल्या किर्तन सेवेत आईचे महत्व सांगितले.                    दिलिप जगन्नाथ मस्कर व सूनिल जगन्नाथ मस्कर यांनीआईच्या प्रथम पूण्यस्मरणानिमित्त  ही किर्तन सेवा  आयोजित केली होती.       या किर्तन सेवैसाठी कांरूडे परीसरातील पैपाहूणे,आप्टेष्ट ,ग्रामस्थ,महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.       माळशिरस पाटबंधारे उपअभियंता अमोल मस्कर यांची कै.सौ.लक्ष्मीबाई या आजी होत्या.

#Natepute:राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले यांची नियुक्ती

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भारतातील पहिले मित्र संघटन म्हणजे ऑल जर्नालिस्ट अॅण्ड  फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी दि.०४/०३/२०२३ रोजी या संघटनेचे संस्थापक मा.यासीन पटेल साहेब व केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी साहेब, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार साहेब या केंद्रीय कार्यकारणी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.श्री.ईश्वर हुलवान यांनी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय उपाध्यक्ष मा.श्री. गणेश गोडसे साहेब तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.श्रीकांत बाविसकर साहेब यांनी शिफारस केली होती. मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी आठवले हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण वृत्तपत्राचे, सडेतोड, निर्भीड, जहालवादी, मवाळवादी, विचारवंत संपादक पत्रकार म्हणून महाराष्ट्रात ओळखले जात आहेत.  हे "शोधपत्रिका" करीत असून जे दिसेल, जे अनुभवले, जे पाहिले यावरतीच रोखठोक लिहीत असतात. त्यांनी यापूर्वी अनेक सामाजिक, राजकीय पक्षात काम केले आहे. त्यांची ही स्वत:ची बहुजन राष्ट्

#Natepute:मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या वरील भ्याड हल्याचा माळशीरस तालुका मनसेच्या वतीने जाहीर निषेध

Image
महादरबार न्यूज नेटवर्क : - मनसेचे नेते संदीप देशपांडे हे सकाळी मॉर्निग वॉक ला छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर येथे गेलेले असताना अज्ञात लोकांनी त्यांच्या वर हल्ला चढवला त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते त्यांना बाकी लोकानी हॉस्पीटला नेहले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे. सदर घटनेचा जाहीर निषेध मनसे माढा लोकसभा मतदारसंघ मनसे माळशिरस तालुका व मनसे नातेपुते शहरच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध नातेपुते पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन करण्यात आला. सदर निवेदन नातेपुते पोलीस स्टेशनचे  पोलीस अधीकारी प्रवीण संपागे साहेब यांनी स्वीकारले व त्यावेळेस त्यांनी सांगीतले मी आपल्या सर्व पदाधीकारी यांच्या भावनाचा आदर ठेवत शासनाला तातडीने संपुर्ण अहवाल पाठवतो. यावेळी निवेदन देताना मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, मनसे तालुका सचीव लक्ष्मण नरुटे, मनसे नातेपुते मनसे शहर अध्यक्ष संतोष देवकाते पाटील, विध्यार्थी सेना अक्षय बावकर, नातेपुते शहर प्रसिद्धी प्रमुख दादा भांड, गिरवी शाखा अध्यक्ष सुभाष नरुटे, सचीन नरुटे इत्यादी उपस्थीत होते.