Posts

Showing posts from July, 2024

#Yavat दौंड च्या सुविधांचा विकास करण्यासाठी मोठा निधी मिळणार - आमदार राहुल कुल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड नगरपालिकेचा समावेश केंद्र शासनच्या अमृत २.० योजनेमध्ये झाला असून या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे. अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत २.०) या योजनेसाठी महाराष्ट्राला सुमारे ३१ हजार ७२२ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी पहिला टप्पा ९ हजार ३१० कोटी वितरीत देखील करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील फक्त दौंड नगरपालिकेचा समावेश अमृत २.० योजनेमध्ये करण्यात आला आहे. या योजनेमुळे शहराचा पुढील २० वर्षाचा डीपी प्लॅन तयार होणार आहे. यामध्ये शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे पाणी, जल वितरण व्यवस्था, पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन, प्रत्येक घरात नळ कनेक्शन, पाण्याचा बॅलन्स टॅंक, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झाडांसाठी सांडपाणी वापरण्याच्या योजना अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. या योजनेतून दौंड शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार असून, शहराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. १५ वा वित्त आ

#Alandi आळंदीत आषाढी यात्रे निमित्त इंद्रायणीची आरती ; नदी घाटाची स्वच्छता

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर महिलांनी घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. आषाढी वारी निमित्त एकादशी दिनी इंद्रायणीची आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.      यावेळी शिवसेना शिरूर लोकसभा उपसंघटक ( उबाठा ) राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, माजी नगरसेविका उषा नरके, स्वाती पजई, मोनिका बिडवे, राणी वाघ, वंदना लोखंडे, सन्याली ठाकूर, कल्याणी माळवे, शोभा कुलकर्णी, उषा नेटके, नमीता चौधरी, उषा ननवरे, अनिता शिंदे, लता शेवते, जिजाबाई भामरे, मीरा कांबळे, शालन होनावळे, नीलम कुरधोंडकर, ईश्वरी शिर्के, सविता कांबळे, विद्या आढाव, लता वर्तुळे, ताई सरोदे, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, गोविंद ठाकूर तौर, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन मराठवाडा विभाग प्रमुख रवींद्र जाधव, वैभव दहिफळे, सुरेश दौण्ड

#Yavat वरवंड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी योगिता दिवेकर बिनविरोध

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप वरवंड ता(दौंड)  ग्रामपंचायतच्या सरपंच पदी सौ. योगिता दत्तात्रय दिवेकर यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवड होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.कात्रज दूध संघाचे माजी उपाध्यक्ष श्री राहुल दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ महाराज ग्रामविकास पॅनलच्या नेतृत्वाखाली योगिता दत्तात्रय दिवेकर यांची सरपंचपदी निवड झाली. वरवंड ग्रामपंचायतच्या सरपंच मीनाक्षी विलास दिवेकर यांनी ठरल्याप्रमाणे  सरपंच पदाचा राजीनामा  दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सोमवारी दि२२रोजी ग्रामपंचायत वरवंड कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.यावेळी सरपंच पदासाठी योगिता दत्तात्रय दिवेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची निवडणूक अधीकारी, तसेच मंडलअधीकारी  नितीन  मक्तेदार यांनी जाहीर केले. यावेळी वरवंड ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आजी माजी सरपंच उपसरपंच बाळासाहेब जगताप व सदस्य उपस्थित होते यावेळी ग्रामसेवक जालिंदर पाटील, गाव कामगार तलाठी राहुल गबाले उपस्थित होते ग्रामस्थांनी आपल्यावर दाखविलेला विश्वासाला कधीही तडा जाऊ

#Pune औंध गाव येथील श्री शिवाजी विद्यामंदिर येथे ४४ वर्षा नंतर इयत्ता १० वी सन १९७९-८० बॅच माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - जनता शिक्षण संस्थेच्या औंधगाव येथील श्री शिवाजी विद्यामंदिर औंध गाव पुणे येथे ४४ वर्षा नंतर  इयत्ता १०वी सन १९७९-८० बॅच माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा वार रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपन्न झाला.       सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी माजी विद्यार्थी  कल्पना गायकवाड सदाकाळ,सुधीर बोर्डे ,अभिमान काळे,सतीश रानवडे व अँड पांडुरंग नारायणराव ढोरे पाटील यांनी प्रयन्त केले. श्री शिवाजी विद्यामंदिर,औंधगाव पुणे  येथील शाळेत प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर राधिका हॉटेल मध्ये गुरुजनांचे स्वागत करून सरस्वती पूजन करण्यात आले. गायत्री मंत्र व गुरुवंदना सुनीता रानवडे काळे व संध्या योहान काळे यांनी केली. सदर कार्यक्रमास गुरुजन श्री प्रभाकर पोकळे,श्री चंद्रकांत घम,श्री ताकवले,श्री विलास किर्दक,विद्यमान प्राचार्य श्री काळे व सौ भारती मुळे बुचके उपस्थित होते.   गुरुजनांचा सत्कार ट्रॉफी,भेटवस्तू व श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी यांना अ

#Indapur आजच्या राज्यकर्त्यांनी अहिल्यादेवींच्या विचारांचा आदर्श घ्यावा - कल्याणी वाघमोडे

Image
जयंतीच्या माध्यमातून सामाजिक चळवळ जागृत राहिली पाहिजे, कल्याणी वाघमोडे यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी - विशाल बी.के कोकरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भवानीनगर येथे जयंती उत्सव उत्स्फूर्तपणे संपन्न. महादरबार न्यूज नेटवर्क - अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती साखर कारखाना भवानीनगर येथील मैदानावर विविध क्षेत्रातील महिलांसह मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष व २९९ वी जयंती उत्सव चे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे केले होते. सर्व महापुरुषांचे स्मारक अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व सत्कार नंतर मनोगते व्यक्त केली. प्रस्ताविक करताना कल्याणी वाघमोडे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा म्हणून असे उत्सव साजरी करणे गरजेचे आहे. यावेळी आज पर्यंत राजकीय पक्ष यांनी फक्त मतांसाठी अहिल्

#Pune सिध्दार्थ भोकरे बिझनेस टायटन्स पुरस्काराने अबुधाबी येथे सन्मानित

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स पुरस्कार संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्टिट्यूटला  सुप्रसिध्द अभिनेता सोनू सूद यांच्याहस्ते अबुधाबी येथे प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना सन्मानित करण्यात आले. रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स हा भारतीय उद्योजकांच्या उत्कृष्टतेचा आणि नवोन्मेषाचा गौरव करण्यासाठी समर्पित एक प्रतिष्ठित उपक्रम आहे. भारतातील विविध क्षेत्रातील व्यवसायिकांना या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. यावेळी प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद आणि चित्रांगदा सिंग तसेच  उद्योग,  मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

#Phaltan आता फलटणला मिळणार बारामतीचे शुद्ध सोने!!

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - 1827 पासून परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता,नाविन्यता, या पंचसूत्रांवर आधारित विश्वास संपादन केलेली व संपूर्ण महाराष्ट्रात 198 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली चंदुकाका सराफ ही सुवर्णपेढी आता आपल्या सेवेसाठी फलटणमध्ये येत असून या सुवर्णपेढीच्या शुभारंभाच्या सुवर्ण क्षणात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि शुद्ध व कलात्मक दागिन्यांची शृंखला पहावी हे असे आग्रहाचे निमंत्रण चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि चे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी केले असून रविवार २८ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक शिंगणापूर रोड येथे सदरील भव्य दालनाचे उद्घाटन होणार आहे. सदरील दालनाचे उद्घाटन मा श्रीमंत रामराजेनाईक निंबाळकर (महाराज साहेब ), मा श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर,मा.श्री आ.दीपक चव्हाण, मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, मा श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर, मा श्री दिलीप सिंह भोसले,मा सौ नीता मिलिंद नेवसे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच दिनांक २८ जुलै पासून एक ऑगस्टपर्य

#Yavat यवत येथे आषाढ महिन्यातील वनभोजन संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथे  रविवार दि.२१ रोजी यवत ग्रामस्थांनी वनभोजनासाठी संपूर्ण गाव बंद ठेवले होते. आषाढ महिन्यात वनभोजनासाठी एक दिवस गाव बंद ठेवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा यानिमित्ताने ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे.  रविवारी दि२१सकाळी ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ आणि महालक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली. यानंतर पारंपारीक पद्धतीने संपूर्ण गावातील अबाल थोर नागरिक, महिला गावाच्या शिवेबाहेर जात वनभोजनाचा आनंद लुटला. दरम्यान गावातील सर्व दुकाने यासह आदी व्यवसाय बंद ठेवत सर्वच या बंदमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या बंदकाळात गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे गावात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना, नागरिकांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली होती.  ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान व श्री महालक्ष्मी मातेचा छबीना सकाळी १० वाजता काढण्यात आला होता. पारंपरिक ढोल ताशे हलगी संबळ वाद्यांच्या धूम धडाक्यात पोतराज गोंधळी यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गाव प्रदक्षिणा दरम

#Chiplun माखजन बाजारपेठेत पुन्हा पुर परिस्थिती; गडनदीचे पाणी बाजारपेठेत शिरले

Image
गडनदीतील गाळ न काढल्याने माखजन बाजारपेठेला बसतोय पुराचा फटका महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसाने गडनदीला पुन्हा पूर आला आहे. गडनदीच्या पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसले आहे. गेले १५ दिवस गडनदीचे पाणी कमी जास्त प्रमाणात माखजन बाजारपेठेत येत आहे. आज देखील या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने माखजन बाजारपेठेतीला अनेक दुकानात हे पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे याची दखल अद्याप शासकीय यंत्रणेकडून घेतली गेली नसल्याने येथील व्यापारी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.     अतिवृष्टीमुळे जी परिस्थिती जिल्ह्यात आहे तीच परिस्थिती माखजन बाजारपेठेची आहे. परंतु इथल्या व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे बघायला शासनाला वेळ नाही का? असा संतप्त सवाल माखजन गावचे सरपंच महेश बाष्टे व  व्यापारी वर्ग यांनी केला आहे. गेले १५ दिवस सतत भरणाऱ्या पाण्यामुळे येथील व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात भिजुन त्यांचे  प्रंचट नुकसान ही झाले आहे. शिवाय  गेले १५ दिवस  बाजारपेठेत बंद असुन धंदाही  झालेला नाही. अशा

#Malshiras माळशिरस च्या वाघमोडे परिवाराने सीमेवरील सैनिकांना पाठविल्या हजारो राख्या

Image
सैनिकांसाठी संसदेत आवाज उठवणार - खासदार धैर्यशील मोहिते पाटील महादरबार न्यूज नेटवर्क - सैनिक म्हटले की आपल्या शरीरात एका अद्भुत शक्तीचा संचार झाल्याचे अनुभूती येते. सैनिकांच्या योगदानातूनच संपूर्ण देश सुखाची झोप घेऊ शकतो. देशप्रेमाचे जिवंत रूप म्हणजे देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत ही खडा पहारा देत देशाच्या सुरक्षेसाठी प्राणाची बाजी लावणारा सैनिक सण असो वा आनंदाचा दिवस देत सेवा हाच मोठा सण मानणारे सैनिक बांधव या सैनिक बांधवांमुळेच आपण ताठ मानेने देशातील महाशक्ती बनण्याचे स्वप्न पाहत असतो. अशा या सैनिक बांधवांच्या योगदानाची जाणीव ठेवून आपणही त्यांच्या प्रति स्नेहभाव जपावा.  त्यांनाही देशातील बहिणींची मायेचा प्रेमळ ओलावा अनुभव ओलावा अनुभवता यावा या जाणिवेतून " एक राखी सैनिकांसाठी" ही संकल्पना मनात रुजवून माळशिरस येथील श्री व सौ शोभा तानाजी वाघमोडे व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या स्वतःच्या हाताने तिरंगा कलर मध्ये राख्या तयार करून आपल्या भारत मातेच्या विविध सीमेवरील सैनिकांना पाठविण्याचा कार्यक्रम  खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते  माळशिरस

#Chiplun मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चिपळूण-संगमेश्वरला ६७ कोटींचा निधी मंजूर

Image
आ. शेखर निकम यांनी केलेल्या प्रयत्नांना यश महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चिपळूण-संगमेश्वरमधील धामापूर जि.प. गटाला १८ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.      मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ (बॅच-१) संशोधन व विकास अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी राज्य सरकारने आमदार शेखर निकम यांच्या मागणीनुसार ६६ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे ग्रामीण रस्त्याचा कायापालट होणार असून साधारणत: ४० किमीपर्यंत एकूण १३ रस्त्यांची कामे पुर्ण होणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ (बॅच-१) संशोधन व विकास अंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये १) कडवई विकास नगर ओकटेवाडी रस्ता – ३.३ किमी, २) गोळवली रोड शेंबवणे म्हादेवाडी तांबेडी रस्ता – ४ किमी, ३) कडवई घोसाळकरवाडी कुंभारखाणी बु. रस्ता – ३ किमी, ४) कर्ली गावठाणवाडी ते देवघर रस्ता – ४.१५० किमी, ५) रामा १७४ ते वायंगणे कोंड्रण रस्ता – ३.०५० किमी, ६) रामा १७ ते गोळवली ब्राम्हणवाडी खामकरवाडी करंडेवाडी देऊळवाडी दुधमवाडी राऊळवाडी रस्ता – ३.१२० क

#Baramati महाराष्ट्रातील अधिकृत दैनिक व साप्ताहिक चे संपादक ,पत्रकार यांना मानधन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याणी वाघमोडे यांचे निवेदन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा मंत्री, माहिती व जनसंपर्क यांना क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी अधिकृत दैनिक व साप्ताहिक संपादक व पत्रकार यांना मानधन मिळणेबाबत निवेदन दिले.       विषयास अनुसरून, लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रिंट व डिजिटल मीडिया मधील दैनिक, साप्ताहिक, मासिक चालवणाऱ्या संपादक व पत्रकारांना अनेक गोष्टींना सामोरे जात शासनाच्या व इतर कार्यक्रमांच्या बातम्या सादर करण्यासाठी कसरत करावी लागते. लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या अशा संपादक व पत्रकारांना दर महिन्याला १०००० रुपये मानधन मिळावे, हि अपेक्षा निवेदन देत कल्याणी वाघमोडे यांनी केली. तसेच शासनमान्य यादीसाठी स्थायी समितीच्या बैठका दरवर्षी वेळेत पूर्ण होऊन तत्काळ निर्णय घेण्यात यावेत. बिगर शासनमान्य यादीवरील दैनिक व साप्ताहिकांना २०१८ पर्यंत दर्शनी ५ जाहिरात मिळत होत्या. परंतु २०१९ पासून हे जाहिरात देणे बंद झाले. त्यामुळे साप्ताहिक व दैनिक चालवणे हे फार आव्हानात्मक झाले आहे. अशा दैनिक साप्ताहिकांना जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या  मागण्या मा

#Yavat २१ जुलै रोजी नोकरी महोत्सवाचे आयोजन, शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन; नामदेव ताकवणे यांची माहिती

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा नोकरी महोत्सव दौंडमध्ये रविवार दि.२१ जुलै रोजी होत असून या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नामदेव ताकवणे यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. हा नोकरी महोत्सव वरवंड येथील सिद्धीराज मंगल कार्यालयात होणार आहे. या नोकरी महोत्सवात दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील नामांकित मोठ्या कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. अपंग तरुणांना देखील या मोहत्सवात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना कंपन्यांच्या वतीने नोकरी मिळणार आहे. दौंड तालुक्यातील, तसेच पुणे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी नोकरी महोत्सवात नाव नोंदणी करून सहभाग नोंदवण्याचे आवाहन नामदेव ताकवणे यांनी केले आहे.

#Natepute जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते व माळशिरस येथील दोन मुक्काम यशस्वी पार पडले - मूख्याधिकारी माधव खांडेकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते नगरपंचायत मुक्कामी नाविन्यपूर्ण सोयी सुविधा सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम हा नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये असतो .नातेपुते परिसरामध्ये चार लाख भाविक मुक्काम करतात त्यासाठी नातेपुते नगरपंचायतीने सर्व सोयी सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करून दिले     स्वच्छता मागील एक महिन्यापासून पालखी तळाची स्वच्छता ,झाडेझुडपे काढणे,मुरुमीकरण करणे, गावामध्ये ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात त्या ठिकाणी स्वच्छता करून देणे, गावामध्ये जंतुनाशक धूर फवारणी करणे इत्यादी स्वच्छता विषय कामे वेळेत पूर्ण करण्यात आले त्यासाठी नगरपालिकेचे ७५ सफाई कर्मचारी पूर्ण वेळ काम करत होते.     मोबाईल टॉयलेट एकूण २० ठिकाणी १८०० मोबाईल टॉयलेट बसविण्यात आले होते, सदर शौचालयाचे वेळोवेळी साफसफाई जेट्टिंग मशीन च्याय सहायने करण्यात आली. शौचालयाचा प्रत्येक ठिकाणी १५ स्वच्छालय मागे एक सफाई कर्मचारी व २५  टॉयलेट मागे एक सुपरवायझर नेमण्यात आला होता. त्यावर नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांचे नियंत्रण ठेवण्यात आले होते. यामुळे सर्व टॉयलेट ठिकाणी पाणी स्वच्छता या सुविधा उपलब्ध

#Yavat उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील बाधिताचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पावसाळी अधिवेशन २०२४ - उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले असून उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित १२८ घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे. तसेच दौंड तालुक्यातील १९७५ पूर्वी पुनर्वसन झालेल्या गावठाणांना विकास कामासाठी निधी मिळण्याबाबत दाखल करण्यात आलेला प्रस्ताव लालफितीत अडकला असून त्यास मान्यता देण्यात यावी, पुनर्वसन झालेल्या जमिनीवर वर्ग २ चे लागलेले शेरे कमी करण्याबाबत शासनाने आदेश दिले असून अद्याप देखील शेरे कमी झालेले नाहीत याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला शासनाने तातडीने याबाबत आवश्यक कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी केली याबाबत मंत्री हसन मुश्रीफ  यांनी खानोटा, ता. दौंड येथील पुनर्वसन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे व याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

#Chiplun कोकणातील पात्र महाविद्यालयांना अनुदान द्यावे व महिलांच्या शेतीविषयक मागण्या पूर्ण कराव्यात

Image
आ. शेखर निकम यांची पावसाळी अधिवेशनात मागणी महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील जी अनुदान पात्र महाविद्यालये आहेत त्यांना अनुदान द्यावे व आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या महिलांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आ. शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात केली.      यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कोकणामध्ये शेती असेल, शेतीपूरक व्यवसाय असेल, फूड प्रोसेसिंग असेल किंवा अन्य व्यवसाय असेल या व्यवसायामध्ये शासनाच्या उमेद उपक्रमाच्या माध्यमातून अनेक उपयोगी आणि चांगल्या पद्धतीच्या घडामोडी राबवल्या जातात. आझाद मैदानात गेले तीन दिवस महिला उपोषणाला बसलेल्या आहेत. यासंबंधी तातडीने निर्देश द्यावेत आणि हे उपोषण मागे घेण्यासाठी त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. तसेच सन २००१ पासून जी महाविद्यालये अनुदानास पात्र आहेत परंतु त्या महाविद्यालयांना अनुदान देण्यास खूप टाळाटाळ केली जाते त्यांचे प्रश्न या अधिवेशनात मंत्रिमंडळासमोर घेऊन निकाली लावावे. कारण यातले बरेचसे कर्मचारी आता निवृत्तीच्या जवळ आलेले आहेत त्यामुळे याही विषयाकडे गांभीर्याने पा

#Natepute माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात हरी नामाच्या गजरात भव्य स्वागत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरी नामाच्या गजरात आज दि.११रोजी सोलापूर जिल्ह्यात   धर्मपुरी  येथे १० वाजुन५८ मि आगमन झाले.  जिल्हा प्रशासनाच्यावतीने  पालकमंत्री चंद्रकांत पाटील , खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, हनुमंत (बापू) सुळ ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,  प्रांताधिकारी माळी , अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, माळशिरसचे तहसीलदार शेजूळ , गट विकास अधिकारी मनोज राऊत,मा. पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,मा.जिल्हा परिषद सदस्या ऋतुजाताई मोरे , सरपंच नीता नवनाथ झेंडे, उपसरपंच नितीन निगडे , महावितरण अधिक

#Baramati चंदुकाका सराफच्या बारामती एमआयडीसी शाखेत १०००+ डायमंडच्या व्हरायटीज उपलब्ध

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - आज दिनांक ११/०७/२४ रोजी एमआयडीसी बारामती शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या इन हाऊस डायमंड एक्जीबिशनचे उद्घाटन करण्यात आले. सदरील प्रदर्शनामध्ये डायमंडच्या १०००+ व्हरायटीज ग्राहकांना पाहता येणार आहेत. सदरील प्रदर्शन ११,१२,१३ व १४ जुलै पर्यंत उपलब्ध  असून ग्राहकांना डिस्काउंट ऑफर देखील लागू आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि च्या संचालिका सौ नेहा किशोरकुमार शहा यांनी केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड च्या संचालिका नेहा (भाभी) किशोरकुमार शहा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेल्स हेड श्री दीपक वाबळे सर यांनी केले. डायमंड एक्झिबिशन चे उद्घाटन साठी उपस्थित असलेले मान्यवर उद्योजिका जयश्री भाभी सातव मॅडम, उद्योजिका श्रद्धा सोमानी भाभी मॅडम, उद्योजिका निधी मोता मॅडम, पल्लवी कोकरे व रोहिणी कोकरे, विभावरी साळुंखे मॅडम, रोहिणी अनिल कदम मॅडम, शुभांगी कुलकर्णी (केसकर) मॅडम, भारती कुलकर्णी मॅडम, अश्विनी पाटील मॅडम व प्रगतशील शेतकरी नारायण

#Phaltan चंदुकाका सराफच्या फलटण शाखेच्या वतीने वारकऱ्यांना मोफत पाणी व बिस्किट वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड च्या फलटण येथील नुकत्याच सुरू होत असलेल्या सुवर्णपेढीमध्ये संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांची सेवा म्हणून मोफत पाणी व बिस्कीट वाटप करण्यात येत असून यामुळे वारकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण दिसून आले. अवघा वैष्णवांचा मेळा  फलटण नगरीमध्ये विसावला जाणार असून या सुवर्णपेढीचा शुभारंभ अजून होणे बाकी आहे त्या अगोदरच आपल्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून  वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली असल्याची माहिती या सुवर्णपेढीचे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी सांगितले. तसेच हडपसर, चंदन नगर, बारामती,अकलूज व पंढरपूर शाखेच्या वतीने देखील असा उपक्रम राबवला जात आहे. सध्या या सुवर्णपेढीच्या हडपसर, चंदननगर, बारामती, एमआयडीसी बारामती,अकलूज, पंढरपूर,सोलापूर, अहमदनगर, नाशिक,संगमनेर या ठिकाणी शाखा असून फलटण या शाखेचा शुभारंभ जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुवर्णपेढीला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी या

#Natepute नातेपुते येथील प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने २१ जुलैला वृक्षारोपण करण्याचे नियोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रबुद्ध मागासवर्गीय बहुउद्देशीय  संस्थेच्या वतीने २१ जुलै रोजी नातेपुते येथील शासनाच्या जागेवरती तसेच अंगणवाडी इमारतींच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे नियोजन चार जुलै रोजी पालखी मैदाना जवळील संस्थेच्या कार्यालयात बैठक घेऊन करण्यात आले, सध्या मान्सूनचा हंगाम सुरू असून या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे संस्थेचा पहिलाच राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून  २१ जुलैला  संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्याचे ठरले  बैठकीचे अध्यक्ष म्हणून खजिनदार  युवराज वाघमारे यांनी कामकाज पाहिले आणि सर्व संचालकांच्या मंजुरीने एक मताने या राष्ट्रीय कार्यक्रमास मंजुरी देऊन या नवसंस्थेच्या बहुउद्देशीय कार्याचा शुभारंभ संपन्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माणिक देठे, उपाध्यक्ष राहूल भोसले, सचिव  सुनिल साळवे,सहसचिव बौद्धाचार्य प्रकाश साळवे, संचालिका लक्ष्मी देठे,  श्रीम.सुजाता भोसले.श्रीम.योजना निकाळजे, सौ.सुवर्णा  नलवडे. माजी मुख्याध्यापक तथा संचालक पांडुरंग सोरटे,शिवाजी साळे,. नितीन सोरटे, निनाद

#Yavat नांदूर,सहजपूर गावातील युवकाचे अर्धनग्न आंदोलन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील नांदूर - सहजपुर भागातील विविध कंपन्यांकडून स्थानिक नागरिकांवर कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी सातत्याने अन्याय होत आहे. या विरोधात गावच्या काही प्रमुख मागण्या घेऊन योगेश बोराटे, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे, सोमनाथ बोराटे, राजेश पारवे हे युवक दि.१ जुलै पासून नांदूर येथील फिल्डगार्ड कंपनी समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा सहावा दिवस असून या आमरण उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून तसेच कंपनी प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणाकडे न फिरकल्याने कंपन्याच्या  कारभारा बद्दल जनतेत रोष निर्माण झाल्यामुळे व दोन उपोषण कर्त्यांनी प्रकृती डासाळल्यामुळे नांदूर आणि सहजपुर गावातील युवकांनी उपोषणस्थळी जाऊन आज शनिवारी अर्धनग्न आंदोलन केले. यामध्ये फ्लिट-गार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड,फेनस ऑटो लिमिटेड, पुष्पम फुड्स प्रायव्हेट लिमिटेड, वैष्णवी देवी दूध कंपनी, प्रामुख्याने या कंपन्यातून होणाऱ्या जल प्रदूषण वायू प्रदूषण आणि कायमस्वरुपी कामावर घेण्यासाठी स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होत आहेत. तसेच किमान वे

#Chiplun चिपळूणची लाल-निळी पूररेषा काढून शहराचा खोळंबलेला विकास मार्गी लावावा

Image
आ. शेखर निकम यांची पावसाळी अधिवेशनात मागणी महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   चिपळूण शहराला लावण्यात आलेली लाल-निळी रंगाची पुररेषा त्वरीत काढून चिपळूण शहराचा खोळंबला विकास मार्गी लावावा. याविषयी गेले वर्ष-दीड वर्षे पाठपुरावा करून देखील कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात करून चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील अनेक प्रश्न उपस्थित केले.     सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात गेल्या दोनच दिवसांपूर्वी आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहरासाठी कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीची नळपाणी योजनेसाठी सुमारे १६० कोटी रुपयांच्या तांत्रिक मान्यता मिळाल्याने सरकारचे आभार मानले व याला लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळावी अशी मागणी केली. तसेच देवरुख शहरासाठी देखील नळ पाणी योजनेला मंजुरी मिळावी, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.      गेल्या १२ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या कामात सातत्याने अडचणी येत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामांमध्ये विशेष लक्ष घातले असल्याने काही कामे मार्गी ला

#Yavat बदलत्या हवामानामुळे तरकारी चे दर वाढले

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप बदलत्या हवामानामुळे जून महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाच्या सरी जोरदार पडायला सुरुवात झालेली आहे. पडणाऱ्या पावसामुळे पालेभाज्या व तरकारीचे नुकसानच सर्वत्र झाले तरकरी चे बाजार वाढत चाललेले आहेत.भेंडी ,कारले,चे  बाजारत यांचे  आहेत .फ्लावर, कोबी, शेवगा,बाजारात भाव वाढलेत बाजारात १२०ते १५०रुपये किलोचे पुडील १किलोचे दर आहेत टोमॅटो, मिरची,गवार,    पाऊस कोठे पडतो तर काही ठिकाणी पडत नाही उष्णता जास्त ऊन  त्यामुळे शेतकऱ्यांनाचे नुकसान झालेले आहे. पिकांवर डाग पडणे,पिकं नासने ,असे होत आहे, आवक कमी  मागणी जास्त त्यामुळे  दर वाढले आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी कमी जास्त पाऊस पडला तर काही ठिकाणी ऊन त्यामुळे हे बाजार वाढत चालले आहेत असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहेत.शेतकरी वर्गाला  यात नुकसान जास्त आहे जेवढे श्रम शेतकरी करतो तेवढा मोबदला मिळत नाही. सर्वसामान्यांच्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. कारण रोजच्या स्वयंपाकात ह्या आवश्यक वस्तू आहेत. बाजारात  तरकरी मालाचे दर वाढल्याने ग्राहक एक किलो लागत असेल तर अर्ध्या किलो च तरकारी घेता

#Indapur श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे ११ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान

Image
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून  भक्तांची उपस्थित ; पालखी सोहळ्याचे एकोणिसावे वर्ष महादरबार न्यूज नेटवर्क - इंदापूर तालुक्यातील रेडा गावामधून  सालाबादप्रमाणे श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळा श्री क्षेत्र गुलाबनगर (रेडा) ते श्री क्षेत्र पंढरपूर हा आषाढ शुद्ध गुरुवार (दि.११) जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता. पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये भारतातील विविध राज्यातून श्री संत गुलाबबाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.अॅड.गोपाल उमक, अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा समाधी मंदिर ट्रस्ट श्री क्षेत्र टाकरखेड (मोरे) ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती व श्री संत गुलाबबाबा यांचे वंशज तसेच प्राध्यापक नरेंद्र पलांदुरकर, अध्यक्ष  श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल धाम ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा  यांच्या हस्ते या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे . या पालखी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकुमार अग्रवाल अध्यक्ष श्री संत गुलाबबाबा प्रतिष्ठान पंढरपूर, विश्वस्त समाधी मंदिर टाकरखेड मोरे, उद्योजक विश्वासराव पवार,गोपाल रोकडे (पुणे), रमेश हिरे,डॉ. शिवाजीराव पाटील सचिव श्री

#Chiplun सरस्वती कोचिंग क्लासेस व टीडब्ल्यूजे फाउंडेशन यांच्या विद्यमाने टेरव येथे कृषी दिनी वृक्षारोपण

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   कोचिंग क्लासेस मुंबई व टीडब्ल्यूजे फाउंडेशन चिपळूण यांच्या विद्यमाने टेरव येथे कृषी दिनी १ जुलै रोजी काजू, चिंच, पिंपळ, फणस, सोनचाफा, वड, कोकम, आपटा व बेल अश्या ६२०  पर्यावरण पूरक झाडांच्या रोपांचे  निःशुल्क वाटप व लागवड करण्यात आली. वाढलेले तापमान, पावसाची अनियमितता याचा  सारासार विचार करून टेरव येथे पर्यावरण पूरक झाडांची रोपे लावून ती जागविण्याचा निश्चय सर्व ग्रामस्थांनी केला. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत टेरव, सुमन विद्यालय, जिं. प.शाळा, मंदिर व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ टेरव यांचे सहकार्य लाभले. सरस्वती कोचिंग क्लासेसच्या  मुंबईहून आलेल्या १० सदस्यांनी  रोपांचे वाटप व लागवडीचे उत्तम नियोजन केले होते. मराठी मित्र मंडळ वापी यांनीही या कामी सहकार्य  केले. कोकणात  होत असलेली  अमर्याद वृक्ष तोड, वणवे  यामुळे जलसिंचन, भूगर्भातील जलसाठा वाढणारे कार्बनडाय ऑक्साईड,  मोठ्या प्रमाणात होणारा ऑक्सीजन  निर्मितीवर परिणाम, जमिनीची धूप, होणारे भूस्खलन, अनियमित पर्जन्यवृष्टी, ढगफुटी व जैवविविधतेची हानी अश्या अनेक गंभिर परिस्थितीला  आपल्या सर्वांन

#Chiplun सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प म्हणत आ. शेखर निकम यांनी केली कोकणसाठी विकासनिधीची मागणी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   कोकणवासीयांचे लाडके आणि कार्यक्षम आमदार शेखर निकम यांनी अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला पाठींबा देत त्यांचे कौतुक केले व पुन्हा एकदा कोकणवासीयांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निधीची मागणी करत संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले.     महायुतीच्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी बोलत असताना हा सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प असून यामध्ये माता-भगिनी, बालक-युवा, शेतकरी-उद्योजक वर्गासोबत बचत गट, पशुसंवर्धन, पर्यावरण, जलसिंचन, युवा प्रशिक्षण त्याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्याबाबतीत घेतलेले महत्त्वकांक्षी निर्णय तसेच उच्च शिक्षण, पर्यटन, दिव्यांग, तृतीयपंथी, जन आरोग्य, गिरणी कामगार, शहरातील पायाभूत सुविधा, अध्यात्म व सांप्रदाय अशा अनेक घटकांना या अर्थसंकल्पामध्ये स्थान दिल्याचे व खूप चांगले लाभ देणारे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. महायुतीच्या सरकारने महिलांसाठी 'माझी लाडकी बहीण' ही कल्याणकारी योजना आणली त्याबद्दल निकम यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा अर्थसंकल्प सर्वधर्म समावेशक असून विरोधक

#Yavat दौंड तालुक्यातील महसूल प्रश्नांसंदर्भात राज्याचे महसूल मंत्री यांच्याकडे बैठक

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील महसूल विभागासंबंधित विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे महसूल मंत्री,. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे बैठक पार पडली, या बैठकीमध्ये पुढील प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली - तालुक्यातील नाट्यगृहासाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव महसूल विभागात प्रलंबित असून सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात यावा अशी मागणी केली, तसेच अधिकारी निवासस्थाने बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची देखील मागणी केली याबाबत  १५ दिवसाच्या आत जागा मागणीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा असे आदेश मा. मंत्री महोदयांनी दिले. दौंड तालुका स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व अधिकारी वाहनांची व्यवस्था करण्यात यावी याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मा. मंत्री महोदयांनी दिले. उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले असून उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित घरांचे संपादन व पुनर्वसन