Posts

Showing posts from February, 2022

#Solapur:पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी आप्पासाहेब कर्चे यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथील शासकीय विश्रामग्रह येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक दत्तात्रय पवार होते या बैठकीत प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना, यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण राज्यातील सर्व पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब पोर्टल ला शासकीय मान्यता कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत यासह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी आप्पासाहेब कर्चे यांची एकमताने निवड करण्यात आली. आप्पासाहेब कर्चे यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी शाल पुष्पगुच्छ नियुक्ती पत्र ओळखपत्र देऊन सत्कार केला. पत्रकारांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार यावेळी नूतन पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन कर

#Pune:मौजे तिवरे गंगेचीवाडी विकास मंडळ व महिला मंडळाचा वर्धापनदिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  मौजे तिवरे गंगेचीवाडी विकास मंडळ आणि मौजे तिवरे गंगेचीवाडी भगिनी महिला मंडळ, पुणे यांच्यामार्फत मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त कौटुंबिक मेळावा, हळदीकुंकू व तिळगुळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. रविवार (दि.२७) रोजी उद्यान प्रसाद कार्यालय, एस.पी. कॉलेज जवळ, पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम हे उपस्थित होते. पुण्यातील मौजे तिवरे गंगेचीवाडी विकास मंडळाचा ५०वा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. गंगेचीवाडीतील पूर्वज कामधंद्यानिमित्त गाव सोडून पुणे येथे येऊन स्थायिक झाले. पुण्यामध्ये राहणारी मंडळी सुखदुःखाच्या वेळी एकत्र येऊन गावच्या सार्वजनिक विकासासाठी एकत्र कशी येतील याचा विचार करून १९७२ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक व शैक्षणिक कामे राबविण्यात आली. तसेच वाडीतील पुणे शहरात राहणाऱ्या महिला व भगिनींना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी 'चूल आणि मूल' यातून बाहेर पडून सामाजिक प्रवाहात भाग घ्यावा यासाठी अनंत रांगणे यांच्या

#Tuljapur:श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिन साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -   दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला.  या प्रमुख दोन्ही  दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमास हटके स्वरूप देण्यासाठी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित होते ते म्हणजे ज्यांनी एका छोट्याशा गावची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली ते काक्रंबावाडी गावचे सुपुत्र पत्रकार, लेखक, कवी, दिग्दर्शक, कलाकार,  युवा समाजसेवक , भ्रष्टाचार निर्मुलन समिती अध्यक्ष, युवारक्षक भारत सामाजिक संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अध्यक्ष, पोलीस जाणीव सेवा संघ तुळजापूर चे सदस्य, मराठवाडा साहित्य परिषद चे सदस्य  अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे महेश बजरंग कोळेकर हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विज्ञानप्रेमी  कोरे सर ही उपस्थित होते. यावेळी महेश बजरंग कोळेकर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांवर तसेच कविता कशी असावी, कवी कोण असतो, शब्दांची ताकत काय असते , मराठी भाषेचे महत्व आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणे

#Malshiras:राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेल्पलाईन चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोककल्याणकारी शासकीय योजना कार्यालय माळशिरस येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी रविवार दि. २७ रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा कार्यालयाचे मार्गदर्शक उत्तमराव जानकर साहेब यांनी कार्यालयाबद्दल त्यांना माहिती दिली.  कोणतेही शासकीय काम होणार फक्त एकच कॉलवर तेही घरात बसून व आपले समस्या सोडवणे हेच आमचे काम... फक्त कॉल करा आणि मिळवा शासकीय कागदपत्रे आता आपल्या घरी अशी संकल्पना घेऊन तालुक्यातील गोरगरिबांना हेलपाटे कमी करून लवकरात लवकर कामे करून देणार असल्याचे यावेळी जानकर यांनी सांगितले.  यावेळी चेअरमन तुम्ही अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे याचा फायदा नक्कीच तालुक्यातील जनतेला होईल असे मत पालकमंत्री भरणे यांनी व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील जनतेसाठी हेल्पलाईन क्रमांकाचे अनावरण पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माणिकराव वाघमोडे, तुकाराम देशमुख, डॉक्टर मारुती पाटील, उपनगराध्यक्ष शिवाजी

#Pune:पुणे बार असोसिएशन नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड पांडुरंग थोरवे पाटील यांचा ॲड कैलास पठारे पाटील व ॲड पांडुरंग ढोरे पाटील यांनी केला सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - पुणे बार असोसिएशन २०२२-२३ च्या निवडणुकीत भरघोस मताधिक्याने निवडून आलेले नवनिर्वाचित अध्यक्ष व उद्योजक ॲड पांडुरंग ज्योतीभाऊ थोरवे पाटील यांचा शिवाजीनगर कोर्ट येथील त्यांच्या ऑफिसमध्ये दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को ऑप सोसायटीचे मा.चेअरमन विद्यमान संचालक व भारतीय पत्रकार संघ(AIJ) पश्चिम महाराष्ट्र चे कायदेशीर सल्लागार ॲड. पांडुरंग नारायणराव ढोरे पाटील व भारतीय पत्रकार संघ(AIJ) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे ॲड. कैलास विश्वनाथ पठारे पाटील यांच्याकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार ॲड थोरवे पाटील यांच्या ऑफिसमध्ये करण्यात आला. यावेळी पुणे बार आसोसियशन चे मा.उपाध्यक्ष ॲड श्री रूपेश कलाटे पाटील, उद्योजक ॲड.समीर बेलदरे पाटील, ॲड श्री किर्ती कुमार श्रॉफ,पुणे बार असोसिएशन चे मा.सदस्य ॲड.समीर भुंडे,ॲड.अमोल भुजबळ, ॲड ऋषीकेश गावडे आणि इतर वकील उपस्थित होते. सर्व मान्यवरांकडून नवनिर्वाचित पुणे बार असोसिएशन अध्यक्ष ॲड पांडुरंग थोरवे पाटील यांस पुढील कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे बार अ

#Pune:पडद्यामागचे सूत्रधार माझे 'बाबा' वनाझ परिवार विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयतर्फे आगळावेगळा उपक्रम साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव वनाझ परिवार विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय नेहमीच आगळेवेगळे उपक्रम साजरे करण्यात उत्साही असते. शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा कायमच अग्रेसर असते. प्रत्येकवेळी नवनवीन संकल्पना राबवून मुलांच्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून त्या साकारून त्यातूनच भावी पिढी हुशार व सुसंस्कृत निर्माण करण्यात वनाझ परिवार विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचा प्रयत्न असतो. याचाच एक भाग म्हणून सोमवार (दि.१४) रोजी व्हॅलेंटाइन डे निमित्त शाळेमध्ये मुलांच्या बाबांविषयी असलेल्या भावना व प्रेम व्यक्त करण्यासाठी पडद्यामागचे सूत्रधार माझे 'बाबा' हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच 'बाबा', त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बाबांना विद्यालयातर्फे आमंत्रित केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी बाबांसाठी छान छान संदेश लिहिलेली भेटकार्ड, फुले, विविध वस्तू तयार करून आणल्या. बाबांविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. बाबांनीही कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आई आणि मुलां

#Chiplun:संरक्षण भिंत उभारल्याशिवाय परशुराम घाट काम न करण्याची आमदार शेखर निकमांची सुचना

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  दोन दिवसांपूर्वी परशुराम घाटात दरड कोसळून पोकलेन मशिनमधील एक कामगाराचा मृत्यू झाला होता.याबाबत आमदार शेखर निकम यांनी परशुराम घाटातील कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.यावेळी पेढे गावच्या बाजूला जेवढा धोकादायक भाग आहे तिथे ५ मीटर उंचीची भिंत उभारल्याशिवाय सदर महामार्गाचे काम न करण्याच्या सूचना आमदार निकम यांनी केल्या. यावेळी कल्याण टोलवेज कंपनीचे ठेकेदार ,तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचे मुख्य अभियंता  बांगर,अधीक्षक अभियंता  माडकर,चिपळूण बांधकामचे रॉजर मराठे,नायब तहसीलदार तानाजी शेजाळ,पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे ,माजी जि प सदस्य विश्वास सुर्वे,पेढे सरपंच प्रवीण पाकळे,राष्ट्रवादी युवक सरचिटणीस तुषार गमरे,मोहन शिंदे,सुधीर भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.                सदर प्रसंगी आमदार निकम यांनी मृत्यू पावलेल्या कामगाराची माहिती घेतली.मागील आठवड्यात घाटातून भलामोठा दगड पेढे गावात कोसळला होता.सुदैवाने जीवितहानी टळली होती.त्याचवेळी आमदार निकम यांनी संबधित यंत्रणेला ग्रामस्थांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन नंतरच घाटातील काम

#Natepute:कारुंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - सोलापूर जिल्ह्याच्या एका टोकावर ,सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेलं कारुंडे तालुका माळशिरस हे अतिदुर्गम गाव , सोलापूर पासून दीडशे किलोमीटर अंतरावर पण या गावाची ओळख निर्माण झाली ती जिल्हा परिषदेच्या शाळेने ,सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान संपूर्ण जिल्हाभर मोठ्या उत्साहात राबविण्यात आले यामध्ये अनेक विविध उपक्रम राबवित  इयत्ता पहिली ते आठवीच्या गटांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारुंडे या शाळेला मिळाला.  या स्पर्धेचा निकाल दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण सभाग्रह सोलापूर याठिकाणी घोषित करण्यात आला. जिल्ह्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पहिला क्रमांक आलेल्या शाळांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजित दादा पवार साहेब व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री दत्ता मामा भरणे साहेब यांचे उपस्थितीत विधान भवन मंत्रालय मुंबई या ठिकाणी हा मानाचा पुरस्कार प्रदान क

#Tuljapur:महेश कोळेकर यांची युवारक्षक (भारत) या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथील छोटयाशा गावातील तरुण महेश बजरंग कोळेकर यांची युवारक्षक (भारत) या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.           युवारक्षक (भारत) या संघटनेचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जगन्नाथ बेंगळे आणि प्रमुख पदाधिकारी  राहुल भैय्या मासाळ यांच्या प्रमुख अध्यक्षते खाली महेश बजरंग कोळेकर यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. महेश बजरंग कोळेकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, देशाबद्दल असणारी त्यांच्या मनातील देशहित भावना ओळखून  तसेच त्यांचे असणारे सामाजिक भान लक्षात घेऊन युवारक्षक (भारत) संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.            यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष विनोद भाऊ बेंगळे म्हणाले, की युवारक्षक या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे युवकांना स्वतःच्या पायावर उभे करणे, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यात त्यांना मदत करणे, आणि उद्याच्या विकसित भारत देशासाठी सेवा बजावणारा नवतरुण घडवणे, त्यांना रोजगारा

#Pune: "राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून एक अनोखा गुलाब दिवस(Rose Day) साजरा"

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - येणारा प्रत्येक क्षण हा आनंद देणारा क्षण  प्रेमळ व आनंदी व्यक्तिंसमवेत साजरा करावा याचाच प्रत्यय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कसबा मतदार संघ पुणे उपाध्यक्ष यश सोमनाथ वाघमारे यांच्याकडून आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराकडून आला. फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना असे म्हणतात त्याची सुरुवात पहिल्या आठवड्यात ७ तारखेपासून आपल्या valentine ला गुलाब देऊन म्हणजे रोज डे साजरा करून होते.आणि असाच गुलाब डे या युवकांनी काही आगळ्या वेगळ्या पद्धत्तीने साजरा केला.त्यांनी माय माऊली वृध्दआश्रम कात्रज येथे भेट दिली आणि तेथील वृद्धाश्रमात खाऊ आणि धान्य वाटप तर केलेच पण सोबतच तेथील वृध्द आजींना गुलाब देऊन त्यांच्या सोबत गुलाब दिवस साजरा करत सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवले.आणि या कृतीतून या सर्व युवकांनी समाजापुढे एक समाजसेवेचे नवीन उदाहरण ठेवले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कसबा पुणे चे उपाध्यक्ष यश वाघमारे सोबत त्यांचे राकेश लखारा, अनिकेत चिंचवले, कपिल घोरपडे, बाळासाहेबमामा ढमाले, पंकज जैन , इ मित्रपरिवार या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम पार पाडला.

#Tuljapur:कवी महेश बजरंग कोळेकर यांनी मांडली ग्रामसभेची आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यथा....

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी काक्रंबावाडी येथील युवा कवी महेश बजरंग कोळेकर यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडली ग्रामसभेची व्यथा.                       ग्रामसभा अरे काय कामाची ही असली ग्रामसभा, आपण खायची सालपट आणि ते खाणार गाभा... अरे कोण कोणाचं नसत जाऊद्या त्यांना उडत, कोण पाहिलंय का ग्रामपंचायत किती आलीय बुडत... अरे काय ठेवलंय त्या अध्यक्ष पदात, खरी ताकद असते थोरामोठ्यांच्या विचारात.... कोण गरीब कोण श्रीमंत मुळात कोणी नसतोच इथे, माणुसकीचा निर्मळ झरा वाहतो जिथे.... अरे कोणी तरी बनायला शिका शांती दूत, का पाडताय एकाच गावातल्या माणसां माणसांमध्ये ग्रामसभेच्या नावाखाली फूट.... हात जोडून सांगतो साहेब आतातरी गावच्या विकास कामांवर द्या लक्ष, मरताना कोण येत नसत ओ सोबत शेवटी येतो तो फक्त माणुसकी नावाचा पक्ष... शेवटी एकच सांगणं साहेब माझं तुमच्या पवित्र आत्म्याला, थोरामोठ्यांचे विचार सोबत घेऊन या येताना पुढच्या ग्रामसभेला...         अशाप्रकारे ग्रामसभेची व्यथा त्यांनी मांडली आहे व सामाजिक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे.

#Natepute:शालेय व्यवस्थापन समिती सत्कार समारंभ थाटामाटात

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - चंदू खिलारे जि.प.प्राथमिक केंद्र शाळा कळंबोली येथे नवीन शैक्षणिक कमिटी यांची सहविचार सभा घेण्यात आली .सर्व सदस्य उपस्थित होते .सर्वाचा सत्कार करण्यात आला. व विद्यार्थी पट वाढवणे याविषयी सर्वांना विभाग देऊन संपर्क करण्यास सांगण्यात आले.शिवाय गुणवत्ता वाढण्यासाठी काय केले पाहिजे यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली . यावेळी साळवे सर यांनी पट वाढवण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले .प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कलशेट्टी मॅडम यांनी केले.गुणवत्ता वाढवण्यासाठी कसे प्रयत्न करतायेतील हे घाडगे मॅडम यांनी सांगितले.  विकास वामन खिलारे हे अध्यक्ष यांनी शालेय सुविधा व गुणवत्ता चांगलीच वाढली पाहिजे यावर विवेचन करून  कमिटीचे सर्व सहकार्य १०० टक्के असणार कोणतीही अडचण येणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित मान्यवर विकास वामन खिलारे (अध्यक्ष),सौ.आशा उद्धव नलवडे (उपाध्यक्ष),संजय भानुदास वाघमोडे (सदस्य),रुपाली संतोष चोरमले (सदस्य),विजय भाऊराव शिंदे (सदस्य),रेश्मा सचिन सोरटे (सदस्य),दादा सिताराम कर्चे (सदस्य),किशोर पोपट कांबळे (शिक्षणतज्ञ),सौ.उमा दिनकर खिलारे (प्रति

#Chiplun:आमदार शेखर निकम यांच्या हस्ते धामापूर जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचा उद्घाटन, भूमिपूजन सोहळा संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  मौजे नारडुवे गावातील सडेवाडी गणेश मंदिर ते नारडुवे मधली वाडी रस्ता करणे ग्रामस्थांची कित्तेक वर्षाची मागणी आमदार निकम सरांनी केली पूर्ण २ टप्प्यात तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून भूमीपूजन करण्यात आले,नारडुवे जोगले वाडी ते मधली वाडी खडीकरण करणे रस्ता जनसुविधा अंतर्गत ५ लाख निधी पूर्ण कामाचे उदघाटन करण्यात आले. नारडुवे  सडेवाडी कडे जाणार रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे २५/१५ अंतर्गत ६ लाख भूमिपूजन करण्यात आले  मौजे कळंबुशी गावातील  केतकवणे वाडी रस्ता डांबरीकरण करणे आमदार स्थानिक निधी ६ लाख उद्घाटन ,गायकर वाडी रस्ता करणे कोयना भूकंप निधी ५ लाख भूमिपूजन करण्यात आले,म्हापरले वाडी अंतर्गत पाखडी बांधणे आमदार स्थानिक निधी २लाख भूमिपूजन करण्यात आले. विकास कामांचा उद्घाटन भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी उपाध्यक्ष  सुशिल भायजे, रत्नागिरी जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा श्रीमती अंकिता चव्हाण,विभाग अध्यक्ष महेश बाष्टे,माजी जी.प.सदस्य श्री दीपक शेठ जाधव,नारडुवे सरपंच कृष्णा जोगळे, गणपत चव्हाण,उपसरचं विजय जोग

#Malshiras:निरा उजवा कालव्यास समांतर बंद नलिका होणेसाठी सर्व्हेक्षण करा - आ.रणजितसिंह मोहिते पाटील

Image
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली आ.मोहिते पाटील यांच्या मागणीची दखल सर्व्हेक्षणाबाबत संबधित विभागाला दिल्या सुचना  महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे निरा उजवा कालव्यावर खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर असे एकूण ५ तालुक्यांचे कार्यक्षेत्र येत असून सुमारे २.५० लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचीत होते. उन्हाळा हंगामामध्ये तापमान वाढल्यामुळे सदर पाच तालुक्यातील पिके एकाचवेळी पाण्याला येतात. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असून देखील निरा उजवा कालव्याची वहन क्षमता केवळ १५५० क्युसेक्स असल्याने व सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याने आवर्तनाचा कालावधी दोन ते अडीच महिन्यावर गेला आहे त्यामुळे सर्व तालुक्यांना एकाचवेळी पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होती. तसेच जलसंपदा विभागावर अतिरिक्त ताण येतो. निरा उजवा कालव्यावर वीर धरणापासून तिसंगी तलावापर्यंत बंद नलिका केल्यास एकाचवेळी सर्व तालुक्यांना पाण्याचे वितरण होऊ शकते. तरी समांतर बंद नलिकेची व्यवहार्यता तपासणेसाठी कालव्याच्या हेड पासून टेल पर्यंत सर्वेक्षण होणे गरजेचे अ

#Chiplun:आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते पाली ग्रामपंचायत चे उदघाटन संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  आमदार शेखरजी निकम सर यांच्या प्रयत्नातून पाली ग्रामपंचायत साठी जनसुविधा योजनेतून तब्बल १६ लाख निधी मंजूर झाला होता. आमदार शेखरजी निकम यांचे प्रमुख उपस्थितीत उदघाटन पार पडले. सरपंच अजय महाडिक यांनी मनापासून गावच्या वतीने आभार मानले सर आमदार झाल्यानंतर पहिला निधी आमच्या ग्रामपंचायत देण्याचे कबूल केले होते आणि शब्दही पूर्ण केला आमदार साहेबाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रखडलेला स्मशानभूमी रस्ता हि पूर्ण त्याबद्दल देखील कौतुक केले.  पाली गावाला ग्रामपंचायत नसल्याने कुठे बसायचे याची समस्या होती त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सभांचे व कार्यालयीन कामकाज चालू असायचे शेखरजी निकम म्हणाले कि, माझ्या राजकीय कारकिर्दीतील हि सुसज्ज इमारत कायमस्वरूपी लक्षात राहील सरपंच महाडिक यांनी नियोजनबद्ध ग्रामपंचायतीचे काम केले त्याबद्दल कौतुक केले.  या उदघाटन सोहळ्यासाठी आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक , पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, ऋतुजा पवार , दशरथ दाभोलकर ,सरपंच अजय महाडिक, नंदकुमार महाडिक, विलास महाडिक, सचिन गमरे

#Malshiras:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धनगरांची मानाची काठी व घोंगडी देऊन केला माळशिरसच्या नगरसेविका रेश्मा टेळे यांनी सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या नगरसेविका म्हणून माळशिरस तालुक्यातील रेश्मा सुरेश टेळे या निवडून आल्या आणि त्यांनी मनसेचे सोलापूर जिल्ह्यातील खाते उघडले त्यामुळे त्यांना मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा शुभेच्छाचा फोन आला होता .रेश्मा टेळे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तसेच मुंबई येथे  येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार त्यांनी २फेब्रुवारीला  आपले पती मनसे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे सहकुटुंब तसेच  मनसेचे पदाधिकारी यांच्या समवेत मुंबई येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आमंत्रण स्वीकारले.तसेच त्यांची भेट घेऊन धनगराची मानाची काठी व घोंगडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला.तसेच पक्षाच्या कॅलेंडरचेही प्रकाशन करण्यात आले.   सदर विजय हा राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वाद व  दिलीप बापू धोत्रे यांनी आमच्यावर  ठेवलेल्या विश्वासामुळे,तसेच  कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या सहकार्याने  झाले असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी मनसेच्या वतीने मुंबई येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, त्यांच्या स्वागत व सन्मानाने

#Malshiras:तहसील कार्यालयातील जावेद मणेरी यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करा

Image
माहिती सेवाभावी संस्थेची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे तहसिल कार्यालय माळशिरस या कार्यालया मध्ये जावेद मणेरी हे गेली 7 वर्षा पासुन कारकून अव्वल कारकून या पदावर कार्यरत आहेत . तसेच कोतवाल या पदावर ते येळीव व पुरंदावडे येथे सेवा बजावत असताना देखील आपण त्यांना कशाच्या आधारे तहसिल कार्यालयाचे सक्षम अधिकारी तहसीदार यांचे डिजीटल स्वाक्षरी दिली आहे . तहसिदार यांच्या डिजीटल सहिचा गैर वापर होताना दिसुन येत आहे ? कारण माळशिरस तालुक्यामध्ये महाई सेवा केंद्र / आपले सरकार सेवा केंद्राची शासनाने गावोगावी सोय केलेली असुन त्या ठिकाणी महाई . सेवा केंद्रातील ठरावीक लोकांचीच काम हाती घेवून वेळेवर केली जात असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी आपण आपल्या डिजीटल सहीचा अधिकार का ? व कशासाठी जावेद मणेरी या खाजगी ऑपरेटर यांच्याकडे दिलेला आहे. याची या सर्व प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी त्या मध्ये सेतू सुविधा केंद्र / महा ई सेवा केंद्र /आपले सरकार सेवा केंद्रा कडुन यांच्याकडे किती दाखले पाठवण्यात आले ते परत किती दिवसानंतर दिले गेले याची चौक

#Pune:ह भ प निवृत्ती बुवा पैठणकर यांचे निधन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथामागे ९३ दिंडीचे मालक गुरुवर्य.ह.भ.प. निवृत्ती बुवा पैठणकर भगत यांचे मंगळवार १ फेब्रुवारी रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले ते ९० वर्षांचे होते.जुन्या पिढीतील  ज्येष्ठ वारकरी व्यक्तिमत्त्व होते. तसेच त्यांचे संत साहित्यातील अनेक अभंग मुकगत होते,आळंदी, देहू, पंढरपूर, पैठण,त्र्यंबकेश्वर,अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन व या माध्यमातून वारकरी सांप्रदयाचा प्रसार प्रचार त्यांनी केला तसेच आळंदी येथे माऊलींच्या मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक द्वादशी दिवशीची महापूजेचा नेम अनेक भाविक भक्तांकडून त्यांनी सुरू केला. अन्नदानाच्या बाबतीत आळंदीमध्ये त्यांचे नाव लौकिक होते. सर्व साधुसंताच्या पुण्यतिथी जयंती उत्सव गावोगावी त्यांनी सुरू केले. आळंदी पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी ते होते तसेच  नेमाचे भजन यासाठी निवृत्ती बुवा पैठणकर हे महाराष्ट्रभर सांप्रदायातील लहानथोरांना परिचीत होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असतानाही हातात काठीचा आधार घेऊन. त्यांनी सप्ताहच्या माध्यमातून