Posts

Showing posts from May, 2022

#Yavat:यवत येथील पुणे सोलापूर महामार्ग वरील लोखंडी कंपाउंड मुळे नागरिकांना नाहक त्रास

Image
    रस्ता रुंंद  करण्यामुुुळे वाहतूक सुलभ आणि सुरळीत होते, येथे झाले उलट या महामार्गाचे कामामुळेच यवत करांची कायम कोंडी झाली असून रोजच यातना सहन लागत आहेत. महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पुणे -सोलापूर या मार्ग क्रमांक ६४ चे चौपदरी काम करून १० एक वर्षं झाली आहेत, मात्र सोलापूर हायवेवर येण्यासाठी वा यवत गावात जाणाऱ्या ठिकाणी चौक ठेवणे सुलभ व सोयीचे असताना नेमका येथेच रस्ता ला बंद केले आहे, या प्रमुख चौकाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस भक्कम लोखंडी संरक्षक कठडे बांधले आहेत, यामुळे यवत गावात जाण्यासाठी पश्चिमेस १ कि, मि, भुलेशवर फाटा किंवा पूर्वेस कालव्याच्या पुलकडून १ की,मी,वळसा घालून यवत गावात जाण्यासाठी हा द्राविडी प्राणायम घालावा लागत आहे, वास्तविक ही जाणीव पूर्वक रस्ते खात्याने यवत साठी हा अडथळा निर्माण केला असून ती याची येथे प्रचंड चीड आहे, यवतच्या पश्चिम गावात प्रशस्त चौक व यवतचे कोंडी, हा थांबले पाहिजे, रस्ते विभागाने येथे पुन्हा पाहणी करून येथे प्रशस्त चौक अलीकडे पलीकडे जाण्यासाठी त्वरित निर्माण करणं जनतेच्याया सहन शक्तीचा अंत पाहू नये अशी जोरदार मागणी

#Chiplun:रत्नागिरी राष्ट्रवादीच्या महिलांकडून महागाई विरोधात आंदोलन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  विलास गुरव  रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात रविवार (दि.२९) रोजी चिपळूण येथील तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यानंतर महागाई संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार शेजाळे यांनी तहसीलदार यांच्यातर्फे निवेदन स्विकारले. दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. खाद्यतेल, कडधान्य, गॅस, पेट्रोल-डिझेल आदी सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतर सावरत चाललेल्या जनतेला दिलासा मिळण्याऐवजी दरवाढीच्या संकटाने हैराण केले आहे. 'उत्पन्न कमी आणि खर्च जास्त' अशी त्यांची अवस्था झाली आहे. यासाठी मोदी सरकारलाच जबाबदार धरत रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार अर्थात मोदी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत घोषणा देण्यात आल्या. तसेच यासंदर्भात तहसिलदार यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे चिपळूण - संगमेश्वर मतदार सं

#Malshiras:कै.नानासाहेब आबाजी कर्णवर-पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण व कै.तुकाराम आबाजी कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

Image
१६० रक्तदात्यांनी केले रक्तदान,२४० गरजूंनी केली डोळे तपासणी महादरबार न्यूज नेटवर्क - गोरडवाडी(ता.माळशिरस)येथील कै.नानासाहेब आबाजी कर्णवर-पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण व कै.तुकाराम आबाजी कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ दि.२७ मे २०२२ रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ ते ९ वा. - श्राध्द विधी श्री. शरद काका वझे, माळशिरस यांच्या शुभहस्ते करण्यात आले नंतर  सकाळी १० ते १२ वा.- ह.भ.प.गुरुभक्ती भूषण हरिहरनंदन महाराज, पिलीव यांचे सुश्राव्य किर्तन झाले तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे त्यामुळे रक्तदान करण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घेतला यात  १६०  रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदानासाठी अक्षय ब्लड बँक सोलापूर यांचे सहकार्य लाभले  तसेच सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत मोफत   आरोग्य तपासणी शिबिर  घेण्यात आले  या शिबिरात २४० गरजूंचे डोळे तपासण्यात आले .या शिबिरासाठी  बुदाणी हॉस्पिटल (के.के.आय.), पुणे यांचे सहकार्य लाभले. यातील १४ जणांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्याचे सां

#Malshiras:कै. भानुदास झंजे यांच्या पुण्याईने अनिल भानुदास झंजे सर्वात जास्त मते मिळवून विजयी

Image
श्री काळभैरवनाथ पॅनलच्या१३-० दणदणीत विजय.                                                                                 महादरबार न्यूज नेटवर्क - मेडद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मेडद, ता. माळशिरस या सेवा संस्थेची    स्थापनेपासून आज पर्यंत एकदाही निवडणूक लागलेली नव्हती .कै. भानुदास चंद्रकांत झंजे यांनी अथक परिश्रम घेऊन प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. त्यांना गावातील कुठल्याही माणसानं विरोध केला नाही.गावातील प्रत्येकजण त्यांना देवमाणूसच म्हणून ओळखत होते. ते गेल्यानंतर पहिल्यांदा सन २०२१--२०२२ ते  २०२६--२०२७या सालाकरिता पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे. श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनल व श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये १३ जागांसाठी२६ उमेदवार उभे राहिलेले आहेत. श्री काळभैरवनाथ पॅनलचे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव तुपे, ज्येष्ठ नेते दादासाहेब जगताप, शंकरराव काळे, विजयराव तुपे, विद्यमान उपसरपंच शिवाजी लवटे, सदस्य अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  १३-० असा दणदणीत विजय  झाला. सर्वसाधारण

#Yavat:दौंड तालुक्यात “शिव संपर्क” अभियानास सुरवात

Image
खासदार कृपाल तुमाने यांनी घेतली प्रमुख पदाधिका-यांसोबत बैठक महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी साहेब ठाकरे  यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून, बारामती लोकसभा मतदार संघाचे शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार मा.कृपालजी तुमाणे साहेब रामटेक लोकसभा मतदारसंघ,नागपुर यांचे उपस्थितीत दौंड तालुक्यात गुरुवार दि.२६ रोजी शिवसंपर्क अभियानाची सुरवात झाली. शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्याच दिवशी खा.तुमाने साहेब यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ,चौफुला येथे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी खासदार तुमाने म्हणाले की, शिवसंपर्क अभियानाचे पुढील चार दिवस प्रत्येक शिवसैनिकांनी तालुक्यातील प्रत्येक गावात ,प्रत्त्येक घरातील नागरिकापर्यंत संपर्क करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे आवाहन केले. शिव संपर्क अभियान हे शिवसेना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रभावी माध्यम असून, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे

#Solapur:धर्मपुरी येथील शासकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत नसलेबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रदीप झेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस पश्चिम भागातील धर्मपुरी (तालुका माळशिरस) ग्रामपंचायत ने ग्रामसभेचे ठराव करून देखील शासकीय अधिकारी व कर्मचारी गावांमध्ये राहत नाहीत म्हणून धर्मपुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप झेंडे यांनी  जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे कर्मचारी गावांमध्ये राहत नसते बाबत तक्रार  केली आहे . प्रदीप झेंडे यांनी धर्मपुरी येथील अधिकारी-कर्मचारी गावांमध्ये राहत नसून शासनाची फसवणूक करून घर भाडे घेत आहेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरती शासन आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच सर्व धर्मपुरी येथील अधिकारी यांनी वार्षिक विवरणपत्र मध्ये  दिलेली मालमत्ता व प्रत्यक्ष मालमत्ता याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये म्हटले आहे. प्रदिप झेंडे यांनी दिलेल्या अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, वन मंत्री महाराष्ट्र राज्य, आरोग्य मंत

#Solapur:प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी मंगळवारी (दि.३१मे) ऑनलाईन संवाद साधणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याने तयारी करण्याच्या सूचना केंद्रीयस्तरावरून मिळालेल्या असल्याने सोलापूर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण नियोजन केले आहे. काटेकोर नियोजनासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर संबंधित विभागाची वेळोवेळी आढावा बैठक घेऊन सूचना देत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून सूचना करीत आहेत. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सहभागी विभागांनी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केले आहेत. प्रातिनिधीक स्वरूपात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आ

#Natepute:नातेपुते पोलीस स्टेशन समोर माहिती सेवाभावी संस्थेचे (IMDS.LTD) यांच्याविरोधात धरणे आंदोलन सुरू

Image
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आंदोलनकर्त्यांची भूमिका महादरबार न्यूज नेटवर्क - इन्स्टिट्यूट ऑफ महा ई लर्निंग अँड डिग्निटी स्किल डेव्हलपमेंट लिमिटेड (IMDS LTD.) चे संस्थापक अमोल गोविंद शिंदे व जिल्हा डेव्हलपमेंट अधिकारी ज्ञानेश्वर कृष्णा जाडकर (नातेपुते) यांनी आस्मा इलाहीबकक्ष मुलाणी, सौ.सलमा इलाहीबक्ष पक्ष मुलाणी रा. नातेपुते ता. माळशिरस व नूरमोहम्मद अ रज्जाक मुलाणी रा. सोनके तालुका पंढरपूर यांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली व मानसिक त्रास दिला त्यासंदर्भात माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून धरणे निदर्शने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात महेंद्र साठे, सचिन रणदिवे आस्मा मुलाणी, ईलाहीबक्ष मुलाणी, वाल्मीक रणदिवे अरसलान आगा, तसेच आधी मान्यवर सहभागी झाले आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ महा ई लर्निंग अँड डिग्निटी स्किल डेव्हलपमेंट लिमिटेड चे संस्थापक अमोल गोविंदराव शिंदे (शाखा- नेरूळ, मुंबई. व जिल्हा डेव्हलपमेंट अधिकारी ज्ञानेश्‍वर कृष्णा जाडकर

#Mumbai:'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि सिडको यांच्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यात सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले.  सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, दैनिक सामनाचा मी देखील काही काळ संपादक होतो, त्यामुळे राजकारण आणि पत्रकार यांच्यातील संबंध लहानपणापासून पाहत मी मोठा झालो, त्यामुळे पत्रकारितेशी माझे कायम ऋणानुबंध आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये बराच बद

#Natepute:फोंडशिरस येथे जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांचे कामाचे भूमिपूजन संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - फोंडशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व त्यांच्या शिफारसी नुसार फोंडशिरस येथील वार्ड क्रमांक 6 मध्ये ननवरे वस्ती ते रुपनवर वस्ती या रस्त्यासाठी 6 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या रस्त्याचे भूमिपूजन दिमाखात संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ नेते भानुदास पाटील,माजी सरपंच विष्णू गोरे, सरपंच पोपट बोराटे ,माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील,उपसरपंच दादा रणदिवे,संजय मामा कोडलकर,बशीर भाई मुलानी, माजी उपसरपंच उमाजी बोडरे, ग्रामपंचायत सदस्य भाऊ पाटील, परशुराम शेंडे,प्रदीप गोरे,बंडगर,काळे,ननवरे वस्ती रुपनवर वस्ती व पांढरे वस्ती वरील ग्रामस्थ व वार्ड क्रमांक 6 चे सदस्य सुनील गोरे कृष्णा ढोबळे व हनुमंत कुंभार यांनी सुरेश आबा पालवे यांचे आभार मानले.  सुरेश आबा पालवे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्श

#Chiplun:कळकवणे दादर येथे आ.शेखर निकम यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे दादर येथे दि. २०/०५/२०२२ रोजी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजन संपन्न झाले.  कळकवणे, वालोटी, ओवळी या तिन्ही गावांमध्ये असलेली नळपाणी पुरवठा योजना सन २०१९ मध्ये बंद पडली होती, तेव्हापासून सदरच्या तिन्ही गावातील ग्रामस्थाना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत होता. या तिन्ही गावांमध्ये संपूर्ण बारमाही पुरेल असा नैसर्गिक पाण्याचा मोठा स्रोत नसल्याने या तिन्ही गावांसाठी कोयना ई व्ही टी स्रोतातून ग्राव्हीटी द्वारे पाणी योजना राबविणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे असे मार्गदर्शन व सूचना माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते अशोकराव कदम यांनी केले. त्यानुसार ऍड. अमित कदम, सतीश सुर्वे, कळकवणे ग्रामपंचायत सरपंच कविता आंबेडे, मनोहर पिंगळे, संजय गणवे, दिनेश शिंदे, सुनील शिंदे, बाळ धुळप, कृष्णकांत आंबेडे, व सहकारी यांनी सादर योजना मार्गी लावणे कामी पाठपुराव्यास सुरुवात केली.  सदरची योजना कार्यरत होऊ शकते व कसे यास

#Natepute:नातेपुते येथील प्रसिद्ध खत विक्रेते मे.पोपटलाल गांधी यांचा खत विक्री परवाना निलंबित

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते येथील सुप्रसिद्ध खत विक्रेते मे. पोपटलाल मुलुकचंद गांधी पुणे पंढरपूर रोड नातेपुते, ता. माळशिरस या खत विक्रेत्याचा खत विक्री परवाना LAFD  11100283 वैध मुदत दि. 31/03/2022 हा खत नियंत्रण आदेश 1985 मधील कलम 31 (1)( ए )( 2 ) नुसार दि. 31/5/2022 पर्यंत निलंबित करण्यात आलेला आहे, असा आदेश परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी रासायनिक खत विक्री परवानामध्ये आढळून आलेल्या त्रुटी मध्ये 17/5/20/22 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये दिलेला आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर बाळासाहेब शिंदे यांनी खत परवाना निलंबित केल्यानंतर नातेपुते पंचक्रोशीमध्ये साळसूदपणाचा बुरखा फाडून खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मे. पोपटलाल मुलुकचंद गांधी, नातेपुते यांच्या खत विक्री दुकानांमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर श्री. बाळासाहेब शिंदे यांच्या पथकाने दुकानाची दोन ते तीन तास कसून चौकशी केलेली होती. पथकामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी पंढरपूर श्री. एस. व्ही. तळेकर, माळशिरस तालुका प्रभारी कृषी अधिकारी डी. एस.

#Malshiras:आ. राम सातपुते यांच्या गाडीचा अपघात, वेळापूरच्या शंभू महादेवाच्या नगरीत सुखरूप

Image
सर्वसामान्य जनतेच्या कायम पाठीशी राहणार, काळजी करण्याचे कारण नाही –  आमदार राम सातपुते महादरबार न्यूज नेटवर्क - भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या गाडीचा अपघात वेळापूर येथे झालेला आहे. आ. राम सातपुते यांची गाडी सर्विसिंगला दिलेली असल्याने ते मित्राची गाडी घेवून कार्यक्रमासाठी निघाले होते. गाडीमधील कोणालाही खरचटलेसुद्धा नाही वेळापूरच्या शंभू महादेवाच्या नगरीत आ. राम सातपुते यांच्यासह विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे, चालक सर्व सहीसलामत आहेत. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते मुंबई पुणे येथील कामे आटोपुन आज सकाळी मतदार संघातील लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांना भेटी देऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या टेंभुर्णी येथील कार्यक्रमासाठी जात असताना पुणे पंढरपूर रोडवर वेळापूर येथे अचानक ट्रॅक्टर आडवा आल्याने चालक यांनी बाजूला घेत असताना डीवाईडरवर गाडी गेली आणि समोरचे दोन्ही टायर फुटल्याने गाडी बाजूच्या शेतामध्ये गेलेली आहे. गाडीमधील आमदारासह कोणालाच

#Tuljapur:अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने काक्रंबावाडी येथे करणार शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप- महेश कोळेकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क-  तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथील शेतकरीपुत्र महेश बजरंग कोळेकर ३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त काक्रंबावाडी येथे फळझाड वाटप करण्याचे योजिले आहे.                  दरवर्षी ३१ मे हा दिवस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. अलीकडच्या काळात जयंती साजऱ्या करण्याच्या पद्धती बदलत चालल्या आहेत. डीजे, बँड, फटाके अशा समाज विघातक घटकांना आळा घालण्यासाठी महेश बजरंग कोळेकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अशा मार्गाने साजरी करण्याची योजिली आहे अशी माहिती दिली. आज त्यांनी सर्वांसमोर आदर्श घालून दिलेला आहे. अनावश्यक खर्च टाळून जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजाला त्याचा हातभार लागेल. आणि त्यातून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम ही साध्य होईल असे ते म्हणाले. आज या त्यांच्या अभिनव अशा उपक्रमाचे संपूर्ण तुळजापूर तालुका भरातून कौतुक होत आहे.

#Solapur:राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट देण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - केंद्र सरकार व राज्य सरकार मधील मंत्रिमंडळातील मंत्री  महाराष्ट्र राज्यात सभा मेळावे बैठका व दौरे  त्याच बरोबर  विविध विकासकामाचे उद्घाटन करण्यासाठी  तसेच वेगवेगळ्या  प्रशासकीय कामकाजचा आढावा घेण्यासाठी येत असतात विविध मंत्र्यांच्या बातम्या करण्यासाठी पत्रकारांना आपल्या खाजगी वाहनातून वेगवेगळ्या तालुक्यात व जिल्ह्यात जावं लागत असून वेगवेगळ्या जिल्ह्यात वार्तांकन करण्यासाठी जात असताना पत्रकारांना टोल भरावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य सरकार मधील सर्वच मंत्र्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सचिवालयातील सर्व सचिवांना त्याच बरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गावरील टोल  नाक्यावर सूट देण्यात आली असून त्याच अनुषंगाने राज्यातील सर्वच पत्रकारांना राष्ट्रीय महामार्गावरील टोलमधून सुट  देण्यात यावी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे  सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत

#Yavat:अंधत्वाला कमजोरी न समजता यशस्वी झालो व मंत्रालयात नोकरी लागली - राम लवांडे

महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप अंधत्वावर मात करत जिद्दीने काटेरी प्रवास केला. कोणतीही गोष्ट मिळताना प्रतिक्षा करावी लागली. दुःख आणि अपमान सहन करत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले असा राम लवांडे यांनी खुटबाव, ता. दौंड येथे संतराज कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपला जीवन पट उलगडला. पुढे ते म्हणाले, विद्यार्थ्यांनो तुम्हीही प्रयत्न करा. यश मिळण्यासाठी चिकाटी व संयम गरजेचा असतो. सध्या मी मोबाईल, लॅपटॉप सफाईदारपणे वापरतो. त्याचा मला खूप फायदा झाला. एमपीएससीद्वारे मंत्रालयात नोकरी लागल्यानंतर आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. राम लवांडे हे दौंड तालुक्यातील खोर येथील रहिवासी आहेत. सध्या मुंबई मंत्रालयात गृह खात्यात ते कार्यरत आहेत. ते एमपीएससीची आणखी कर सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण झाल्याने  या पदाची देखील दिवाळीनंतर संधी असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  एमकेसीएलचे विभागीय अधिकारी विश्वजित उत्तरवार, पुणे जिल्हा समन्वयक सुरज लाकाळ, साधू सूळ, भूषण शेलार व खुटबाव परिसरातील एमएस-सीआयटीचे विद्यार्थी उपस्थित होते.

#Natepute:महाराष्ट्र नवनिर्माण सेना नातेपुते शहर निवडी जाहीर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते मा. दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे ,माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रदीप (बाबा) ननवरे यांच्या हस्ते  नातेपुते शहरातील नियुक्त्या पार पडल्या. नातेपुते शहराध्यक्ष अक्षय   बावकर नातेपुते शहर संघटक शंभू (दादा) वाघमोडे यांची निवड करण्यात आली. यावेळी अनिल काळे, प्रशांत कुचेकर, दादा भांड, किरण खिलारे, सोमनाथ कुमठेकर, लखन काळे, विकास भरते, टिंनु माने इत्यादी मनसे सैनिक उपस्थित होते.

#Yavat:प्राचार्य डॉ अविनाश सांगोलेकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - रमेशअप्पा थोरात

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप " प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून तो एक चमकणारा ज्ञानाच्या हिरा आहे," असे प्रतिपादन भैरवनाथ शिक्षण मंडळाचे संस्थापक व चेअरमन रमेशअप्पा थोरात ह्यांनी केले. ते (६ मे) रोजी खुटबाव येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  ते पुढे म्हणाले ," उच्च शिक्षणाचा महाविद्यालयरुपी रथ २००९ - २०१० पासून  चालवत असताना आम्हांला अनेक अडचणी येत गेल्या. त्यातून  २०१७ साली हे महाविद्यालय  बंद पडते की काय, अशी समस्या निर्माण झाली होती. मात्र ह्या समस्येवर मात करीत २०१७ ते २०२२ ह्या कालावधीत महाविद्यालयानं आश्चर्यकारक प्रगती केली.त्याचे श्रेय प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांना जाते." ह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना  प्रसिद्ध कवी भरत दौंडकर ह्यांनी प्राचार्य डॉ.सांगोलेकर ह्यांचे मराठी गझलेतील योगदानावरही प्रकाश टाकला आणि त्यांची ' माणूस मारणारे ते लोक कोण होते ? ', ही प्

#Chiplun:अणदेरी येथे श्री बाजेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार कार्यक्रम संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  तालुक्यातील अणदेरी गाव येथील ग्रामदेवता श्री बाजेश्वराच्या मंदिराचा जिर्णोध्दार कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेश राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री बाजेश्वर हे अणदेरी गावचे ग्रामदैवत असून येथील लोकांचेच नव्हे तर आसपासच्या परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा देखील भरते. दिवसागणिक भक्तांची वाढणारी गर्दी पाहूनच गावातील ग्रामस्थांनी मंदिराच्या जीर्णद्धाराचा निर्णय घेतला.       यावेळी माजी खासदार नीलेश राणे, माजी जिल्हा परिषद सदस्य व रचना होडे, पत्रकार अनघा मगदूम, पूजा निकम, सरपंच दिनेश मालप, स्वप्नील शिंदे, दिनेश मालप, बुधाजी सोलकर, सिताराम मालप, अशोक बेंद्रे, सुबोध सोलकर, विश्राम मालप, बगाराम होडे, बाकू होडे, लक्ष्मण मालप, शांताराम सोलकर, सिताराम पाचकले, विनोद म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य समृद्धी सोलकर, रेश्मा मालप, डॉ. लाठरे आदी मान्यवर उपस्थित होते.

#Natepute:धर्मपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी संभाजी पाटील , व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत मसुगडे यांची निवड

Image
नूतन सदस्यांचा सत्कार व मिरवणूक महादरबार न्यूज नेटवर्क -  धर्मपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २० एप्रिल रोजी पार पडली या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलच्या सर्व म्हणजे १३ जागेवर संभाजी भिमराव पाटील, चंद्रकांत मसुगडे, विष्णू केंजळे, मोहन मोरे, संतोष जैन, हरिचंद्र काटकर, नानासो पाटील, भास्कर झेंडे, महावीर निगडे, भारत राऊत, शशिकला अरुण पाटील, मंगल सोपान माने, सारिका लालासो पाटोळे हे उमेदवार विजयी झाले होते. विजय उमेदवारांमधून चेअरमन पदी संभाजी पाटील तर  व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत मसुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर चेअरमन व्हाईस चेअरमन व सदस्य व पार्टी प्रमुख यांनी ग्राम दैवतांचे दर्शन घेऊन भाजपाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव सुदाम काटकर यांच्या निवासस्थानी नूतन चेअरमन व सदस्यांचा काटकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला नंतर  पाटोळे वाड्यात सोसायटीचे माजी चेअरमन व माजी सरपंच दिवंगत तानाजीराव पाटोळे यांच्या यांच्या प्रतिमेस नूतन चेअरमन व सदस्य यांच्याा हस्ते पुष्पहार अर्पण करण्याात आला.   यावेळी विजयकुमार तानाजीराव

#Chiplun:प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ओवळी, वालोटी, कळकवणे गावांचा पाणीप्रश्न मार्गी

Image
चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार  शेखर निकम  यांच्या प्रयत्नांना यश महादरबार न्यूज नेटवर्क -  विलास गुरव  चिपळूण तालुक्यातील ओवळी, वालोटी, कळकवणे  गावात गेले खुप दिवस पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. याबाबत ग्रामस्थांची पाणी प्रश्नाबाबत सततची मागणी होती.  याचा विचार करता “जलजीवन मिशन अंतर्गत” माननीय श्री. गुलाबराव पाटील, पाणी पुरवठामंत्री, माननीय श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री यांच्याकडे या पाणीप्रश्नाबाबत आमदार  शेखर निकम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रु. १२ कोटी ८१ लाख ६०हजार चा निधी मंजुर झाला आहे.  महाआघाडीच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत खास बाब म्हणून हा निधी मंजुर झाल्याने आमदार श्री. शेखर निकम यानी मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मा. महसुलंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.