Posts

Showing posts from August, 2023

#Natepute:मारकडवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

Image
उपसरपंच मारुती रणदिवे व पत्रकार सचिन रणदिवे जिल्हाध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था यांचा स्तुत्य उपक्रम महादरबार न्यूज नेटवर्क - मौजे मारकडवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले.समाजामध्ये आपण काहीतरी देणे लागतो या उद्धात हेतूने मारकडवाडी गावचे नुतन उपसरपंच मारुती शंकर रणदिवे व पत्रकार सचिन रणदिवे जिल्हा अध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा मारकडवाडी, खडकवस्ती,कोडलकर वस्ती,नावडकर वस्ती, या शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी युवा उद्योजक नगरसेवक सचिन (आप्पा) वावरे, बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण (भाऊ) साठे, मारकडवाडी गावचे लोकप्रिय सरपंच पै रणजित मारकड, माजी सरपंच अमित वाघमोडे-पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे, प्रगतशील बागायतदार सचिन पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयराम नरळे, खडक वस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण मारकड टेलर,ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब मारकड, अरुण वाघमोडे, महादेव भाळे, प्रहार संघटनेचे मा

#Natepute:गुणवंत विद्यार्थ्यांचा हिवरकर पाटील यांच्याकडून सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - गोरगरीब लोकांना आरोग्याची सेवा मिळावी म्हणून अहोरात्र झटणारे माळशिरस शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील हे माळशिरस तालुक्यातील गोरगरीब लोकांना आरोग्याची सेवा मिळावी व शासनाने आरोग्याच्या बाबतीत शेवटच्या घटकापर्यंत सुविधा मेळाव्यात यासाठी माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,  आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत,  जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातसमाजकार्य प्रचंड गतीने चालू आहे त्याचबरोबर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गेल्या आठवड्यात गवंडी काम करणाऱ्याच्या मुलाचा साहिल झेंडे याचा एमबीबीएस साठी नंबर लागल्याने त्याचा सत्कार करून भविष्यात शैक्षणिक कामासाठी अडचणी आल्यास मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे असे सांगून  वैद्यकीय क्षेत्रात राज्यात स्वतःचा लवचिक मिळवला असे डॉक्टर आदित्य संदीप कल्याणी व शैक्षणिक क्षेत्रात  मृण्मयी आनंदकुमार लोंढे हिने दहावी मध्ये ९६.४० एवढे गुण मिळवल्याबद्दल  त्याचबरोबर सिने कलाकार संजय मोहित

#Satara:23 वर्षानंतर भेटले जुने वर्गमित्र

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी च्या सन १९९९-२००० चा सातवी च्या बॅच चे ३४ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात सर्वजण तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले..निमित्त होते स्नेहसंमेलन..१५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी येथे ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहून नंतर शाळेतील त्यांच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेला १० खुर्च्या भेट देऊन शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला..त्यानंतर आपण २३ वर्षांपूर्वी ज्या वर्गात शिकलो त्याच वर्गात बसून रासकर गुरुजी आणि रासकर बाई गिरी गुरुजी, राऊत  गुरुजी यांच्याशी गप्पा मारल्या..तसेच सारिका शिंदे , दुर्गा , अर्चना , अॅड गणेश धायगुडे , गणेश ननावरे, सचिन जाधव, सागर जाधव , तुकाराम धायगुडे , किसन खिलारे, संतोष राऊत, सचिन कचरे , राहुल दीक्षित , सागर गावडे  त्यानंतर लोणंद या ठिकाणी आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात सर्वांनी सरस्वती पूजन.एकमेकांचे स्वागत आणि ओळख त्यानंतर गप्पा गोष्टी आणि त्यानंतर स्नेहभोजन,सरांशी विचारविनिमय,पुन्हा भेटण्याचा स

#Chiplun:विठ्ठलावरील श्रद्धा आणि एकनिष्ठतेमुळेच हजारो वारकरी पंढरपुरात एकत्र- आ.शेखर निकम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव तुमची श्रद्धा आणि एकनिष्ठा विठ्ठलावर ठाम आहे, म्हणूनच या ठिकाणी दोन जिल्ह्यातुन हजारो वारकरी या ठिकाणी एकत्र आले असून आता अशी श्रद्धा आणि एकनिष्ठता तुमच्या व्यतिरिक्त कुठे राहिल्याचे दिसत नसल्याचे प्रतिपादन आ शेखर निकम यांनी पंढरपूर येथे केले. श्री क्षेत्र पंढरपूर येथे नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या सोहळ्यासाठी हजारो वारकरी पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. विठ्ठल प्रासादिक वारकरी मंडळ पुणे, शिवप्रासादीक मंडळ पुणे आणि पंचक्रोशी वारकरी संप्रदाय पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.                               जाहिरात  या कार्यक्रमाला चिपळूण संगमेश्वरचे आ शेखर निकम याना निमंत्रित करण्यात आले होते. निवृत्ती महाराज मुकनाक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. विठ्ठलावरची भक्ती, प्रेम अन‌् श्रद्धा जर बघायची असेल तर त्याला इथेच यावे लागेल. रत्नागिरी, सिधुदुर्ग कुठे आणि पंढरपूर कुठे पण केवळ आणि केवळ विठ्ठलभक्तीमुळे आज हजारो वारकरी या ठिकाणी एकत्र आले आहेत. आपल्या

#Chiplun:माखजन बाजारपेठेतील नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी १३ लाखांचा निधी मंजूर

Image
व्यापारी,ग्रामस्थांनी मानले आ. शेखर निकम यांचे आभार                         महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव तालुक्यातील गडनदीला प्रतिवर्षी येणा-या पुरामुळे माखजन बाजारपेठ व आरवली ब्राम्हणवाडी येथे पुराचे पाणी शिरून व्यापा-यांचे व ग्रामस्थांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. गेली अनेक वर्षे याबाबत उपाययोजना कराव्यात यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचेकडे पूरग्रस्त पिडीत व्यापारी व ग्रामस्थ मागणी करीत होते परंतू कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नव्हती.                             जाहिरात  पुरामुळे बाजारपेठ, व्यापारी व ग्रामस्थ यांचे होणारे नुकसान व त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी करण्यात आली. जिल्हा वार्षिक पुर नियंत्रण योजनेंतर्गत माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट व आरवली ब्राम्हणवाडीपासून नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी 25 लाखांचा निधी मंजूर करून आणला. नदी पात्रातील गाळ काढाला जाणार असल्याने याचा काही प्रमाणात फायदा व्यापारी व ग्रामस्थांना होणार असल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेवून त्यांचे आ

#Natepute:हाॅटेल गौरव ढाबा चे उद्घाटन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग लगत धर्मपुरी बंगला जवळ नव्याने सुरू होत असलेल्या कर्चे बंधू यांच्या हाॅटेल गौरव ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट चे उद्घाटन नागपंचमीच्या मुहूर्तावर सोमवार दि.२१रोजी सायं ४.१५ वाजता होत आहे. धर्मपुरी परिसरासह खव्वयांसाठी एक नवी पर्वणीच आहे. हाॅटेल गौरव ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट हे सुसज्ज असे बनविण्यात आले आहे. धर्मपुरी परिसरासह खव्वयांनी उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन. डॉ.ब्रम्हदेव कर्चे तसेच पै.महेश कर्चे यांनी  केले आहे.

#Yavat:दामू काळे यांचे निधन

Image
राहू / पिलाणवाडी (ता. दौंड) जून्या पिढीतील आदर्श, ज्येष्ठ व्यक्तिमत्व, प्रगतशील शेतकरी दामू भिकू काळे वय ७७ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक भाऊसाहेब काळे, राहू (ता.दौंड)येथील ,  दौंड तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संतोष काळे हे त्यांचे पुत्र होत. इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपशिक्षिका, पिलाणवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या सीमा संतोष काळे ह्या त्यांच्या सुनबाई होत. तर डॉ. दत्तात्रेय आनंदा मदने हे त्यांचे नातू होत.

#Varvand:अठरा वर्षांनी कुसेगावच्या श्री भानोबा विद्यालयात विद्यार्थी स्नेह मेळावा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर दि.१३ . ८. २३रोजी श्री भानोबा विद्यालय कुसेगाव ता-दौंड जि- पुणे या ठिकाणी तब्बल १८ वर्षांनी मार्च २००६ च्या बॅचचे विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी एकत्र आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वर्गवासी मित्र व त्यावेळचे सेवकवर्ग यांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत बैलगाडी सजवून त्यामध्ये बसवुन घोड्यावरुन विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करुन केली यामुळे सर्व गुरुजन भारावून गेले. या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी कृतज्ञता म्हणुन शिक्षणाच्या बदलत्या गरजा विचारात घेऊन विद्यालयास चाळीस हजार रुपये किमतीचा प्रोजेक्टर भेट दिला. तसेच विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना घेतला जाणारा परिपाठ व कवायत प्रकार घेऊन मुले वर्गात गेली. उशिरा येणाऱ्या मुलांना शिक्षा देऊन वर्गात घेतले व पुन्हा एकदा वर्ग भरवला. शालेय जीवनात घेतल्या जाणाऱ्या खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या व जिंकनार्या मुलांना बक्षिसे देण्यात आली. अतिशय आनंदी वातावरणात स्नेह मेळावा पार पडला या का

#Solapur:स्वातंत्र्य दिनानिमित्त रेल्वे स्टेशनवर सेल्फि विथ पीएम आणि सेल्फि विथ क्लिन इंडिया उपक्रम

Image
जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या हस्ते उदघाटन केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूरचा मल्टीमीडिया प्रदर्शनातील उपक्रम सोलापूर, दि. १७ : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली माघील ९ वर्षातील अनेक लोकाभिमुख योजनांची प्रभावी प्रचार प्रसार करण्यात येत आहे. यामध्ये विशेषतः स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशामध्ये लहान बालकापासून ते वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाने स्वच्छतेच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतला आहे. स्वच्छतेमुळे देशात अनेक बदल झालेले आहेत. याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात आलेल्या “सेल्फि विथ पीएम आणि सेल्फि विथ क्लिन इंडिया” या फोटो बूथला जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा आणि मेरी माटी मेरा देश अभियानाच्या अनुषंगाने रेल्वे स्टेशन येथे आयोजित केलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनात ठेवण्यात आले

#Natepute:नातेपुते एज्यूकेशन सोसायटीच्या तीन शिक्षकांना दीपस्तंभ आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रसन्न फाऊडेशनच्यावतीने देण्यात येणारा "दीपस्तंभ आदर्श शिक्षक गौरव पूरस्कार" यावर्षी नातेपूते एज्यूकेशन सोसायटीच्या संजय पवार,अभिजित वाळके,संजय जाधव यांना प्रदान करण्यात आला,  हा पूरस्कार  ग्लोबल टीचर रणजितसिह डिसले,धैर्यशील मोहीते पाटील,नवनाथ धांडोरे  याच्या हस्ते देण्यात आला. संजय पवार,अभिजित वाळके,  संजय जाधव.याच्या सामाजिक, शैक्षणिाक काम, कोरोना काळात उल्लेखनीय काम, शिष्यवृत्ति परीक्षा, शैक्षणिक शालेय सहल, पर्यावरण संर्वधन, अपंग,दिव्यांग,निरक्षर,स्वच्छता अभियान सर्वेक्षण,विविध प्रशिक्षण,, यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा पूरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमास ग्लोबल टीचर रणजीतसिंह डिसले,शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहीते पाटील,प्रसन्न फाऊडेशनचे नवनाथ धांडोरे,उपजिल्हाधिकारी,अजयकूमार नष्टे,सूनिल लिंगाडे,नागेश नरळे, संजय पवार,अभिजित वाळके,संजय जाधव यांना दीपस्तंभ आदर्श शिक्षक गौरव शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपूते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील

#Chiplun:कोंढ्रणमधील भूस्खलन बाधितांना आमदार शेखर निकम यांच्याकडून प्राथमिक स्वरूपाची मदत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील कोंढ्रण गावामध्ये भूस्खलन झाल्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन संबंधित घटनेची पाहणी केली होती. यावेळी निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्याकरिता पुनर्वसन मंत्री मा. श्री अनिल पाटील, पालकमंत्री मा.श्री उदयजी सामंत, जिल्हाधिकारी रत्नागिरी मा. श्री देवेंदर सिंग यांच्याकडे पत्रव्यवहार करून लवकरात लवकर बाधितांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. तशा पद्धतीचा अहवाल तहसीलदार श्रीम. अमृता साबळे व गटविकास अधिकारी श्री भरत चौगले यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आलेला आहे. आमदार शेखर निकम यांच्या वतीने बाधित ५४ कुटुंबांना प्राथमिक स्वरूपाची मदत करण्यात आली. यावेळी सरपंच मुकेश बारगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शेठ बोथले, माजी सरपंच प्रफुल बाईत, उपसरपंच नितीन गोरीवले, तेजस शिंदे, उपसरपंच तुळसणी आप्पा बेर्डे, सिताराम आगरे, प्रथमेश निकम व गावचे पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

#Barshi:बार्शी येथील युवकांचा भारतीय मातंग युवक संघटनेत प्रवेश

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - बार्शी जिल्हा - सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भारतीय मातंग युवक संघटनेची बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गुरूवर्य मातंग हृदयसम्राट श्री विठ्ठल साठे साहेब व प्रदेश अध्यक्ष श्री.शंकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील युवकांनची सभासद नोंदणी करू घेण्यात आली.व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख चि. केतन यादव यांच्या हस्ते कार्यकत्यांनी संघटनेत प्रवेश केला. या वेळी संघटनेत प्रवेश केलेल्या कार्यकत्यांनचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व संघटनेत स्वागत करून. बार्शी तालुक्यात गाव तिथे भारतीय मातंग युवक संघटना अशी बांधनी करण्यात यावी असे चि.केतन यादव म्हणाले.व सामाजिक व संघटनेचे काम करत असताना. भारतीय मातंग युवक संघटना पुर्ण ताकदीने बार्शी तालुक्यातील कार्यकत्यांनच्या पाठीशी असेल असेही म्हणाले. यावेळी भारतीय मातंग युवक संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख चि. केतन यादव यांचा बार्शी तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय मातंग युवक संघटनेचे गणेश जाधव,विभीषन कनगरे, संदीप जाधव, महेश जाधव, राजपाल जाधव, कृष्णा जाधव, रविराज पवार,

#Varvand:दौंड तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांच्या बाबत महेश पासलकर यांची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर दौंड तालुक्यातील पुनर्वसीत गावठाणांच्या मोजणी व हद्दकायम करणेकामी प्रशासनाकडून ७९ लाखांचा मंजूर निधी खर्च होवून देखील गावठाणांच्या मोजण्या सदोष झाल्याने व हद्दी कायम न केल्याने प्रशासनाकडून झालेल्या हलगर्जीपणाबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संताप असून, मोजणीकरिता आलेल्या सर्व निधी चा अपव्यय झालेची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये निर्माण झाली आहे. तरी, याबाबत प्रशासनाकडून झालेल्या अनियमितते बाबत व प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायामुळे  शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी मा.उच्च न्यायालयात धाव घेतली असून, पासलकर यांनी ॲड.अक्षय देशमुख यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.        याबाबत अधिक माहिती देताना पासलकर म्हणाले की, पानशेत व वीर बाजी पासलकर,उजनी, नाझरे, वीर धरण प्रकल्पग्रस्तांचे दौंड तालुक्यातील ३३ गावांमधे ४२ गावठाणांमध्ये पुनर्वसन होऊन सुमारे ५० ते ६० वर्षाचा कालावधी उलटून गेला असून, पुनर्वसित गावठाणांचे मोजणीकरिता ७९,लाख ११ हजार खर्च करून देखील उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयाकडून गावठाणांचे

#Solapur:स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्मिळ छायाचित्रांचे मल्टिमिडीया प्रदर्शन

Image
केंद्रीय संचार ब्यूरोचा “मेरी माटी मेरा देश” अभियानानिमित विशेष उपक्रम भारतीय स्वातंत्र्याचे १८५७ ते १९४७ कालखंडातील दुर्मिळ छायाचित्र विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित्त विशेष श्रद्धांजली कार्यक्रम पंतप्रधान सोबत एक सेल्फी बुथचे आयोजन                                               प्रदर्शन तीन दिवस सर्वांसाठी खुले               सोलापूर. दि.१२ – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता कार्यक्रम, मेरी माटी मेरा देश आणि विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर आणि मध्य रेल्वे, सोलापूर विभाग यांच्या वतीने दिनांक १४ ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडीवर आणि स्वातंत्र्यसंग्रामातील महत्वपूर्ण घटनांवर तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर रेल्वे स्टेशनमधील जनरल तिकीट खिडकीच्या जवळील जागेत करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनमध्ये १८५७ ते १९४७ पर्यतच्या स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती, सोलापुरातील चार हुतात्मे 

#Indapur:चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. चे इंदापूर येथे भव्य प्रदर्शन व विक्री

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - 197 वर्षाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या, महाराष्ट्रातील बावनकशी सोनं, व बारामतीचे शुद्ध सोनं अशी ओळख असणारी सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. एमआयडीसी शाखा बारामती यांच्यावतीने दिनांक 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट सोने चांदी हिरे यांचे भव्य प्रदर्शन राधिका रेसिडेन्सी या ठिकाणी उपलब्ध आहे. सोने मजुरीवर 15% डिस्काउंट, चांदीच्या 25% डिस्काउंट, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहेत. ही ऑफर चार दिवसांसाठी मर्यादित आहे. व या ऑफर्सचा इंदापूरकरांनी भरभरून लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि च्या संचालिका सौ.नेहा किशोरकुमार शहा यांनी केले. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मा सौ अंकिता शहा, मा सौ अनुराधा गारटकर, मा सौ डॉ.कल्पना खाडे, मा सौ डॉ अश्विनी ठोंबरे मा डॉ कोमल गार्डी, मा सौ डॉ. भारती कुरुडकर मा सौ अनिता खरात मा सौ सविता बंगाळे मा. सौ.निकिता वाघ,सुनीता वाघ, सुजाता वाघ, गटविकास अधिकारी मा श्री विजयकुमार परीट व सौ.रूपाली परीट माननीय बकुळा ताई शेंड

#Varvand:पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग समस्यांवर केंद्रीय वाहतूकमंत्री समवेत आ राहुल कुल यांची चर्चा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर    केंद्रीय वाहतूक मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची दिल्ली येथे भेट घेतली यावेळी NH-9 पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच NH- 548 DG न्हावरा - केडगाव चौफुला रस्त्याच्या संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली तसेच दौंड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी  केंद्रीय रस्ते निधी मिळावा अशी मागणी केली , प्रसंगी खालील प्रमुख मागण्या केल्या -   पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत उन्नत महामार्ग (Elevated Highway ) उभारण्या संदर्भात प्रस्तावास मान्यता देऊन सदर कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. पुणे सोलापूर महामार्गावरील यवत, भांडगाव, वाखारी, चौफुला, वरवंड, पाटस , मळद, खडकी, स्वामी चिंचोली येथे ठीक ठिकाणी सर्व्हिस रोड चे काम करणेबाबत आपल्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी व वरील सर्व्हिस रोडची कामे सुरु करण्यात यावीत. रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे सोलापूर महामार्गावरील वाखारी, धायगुडेवाडी, भागवतवाडी  तसेच कुर

#Solapur:पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य राजा माने यांचा माहिती कार्यालयाच्या वतीने सत्कार

Image
  सोलापूर ,  दिनांक 9:- राज्य शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ पत्रकार राजा माने यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानिमित्त माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी श्री. माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वरिष्ठ पत्रकार प्रशांत माने ,  राजाराम मस्के उपस्थित होते. राज्य शासनाकडून शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर नुकतीच ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारांच्या आरोग्य व उपचार विषयक समस्या ,  आकस्मिक संकटे या सारख्या विषयांसाठी राज्य शासनाने आर्थिक तरतूद करुन शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची स्थापना केलेली आहे.

#Solapur:मातृभूमीची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीराना वंदन म्हणजे “मेरी माटी मेरा देश” अंकुश चव्हाण यांचे प्रतिपादन

Image
आजपासून ३० ऑगस्ट पर्यंत देशभर विविध कार्यक्रमांसह अभियानाचा प्रारंभ सोनामाता आदर्श विद्यालयांमध्ये “मेरी माटी मेरा देश“ अभियानाच्या सेल्फी बुथाचे विद्यार्थ्यीनीच्या हस्ते शुभारंभ शासकीय अधिकारी, विद्यार्थ्यी , शिक्षक आणि पालकांनी घेतली पंचप्रणची शपथ सोलापूर : दि. ९ – “मेरी माटी मेरा देश” अभियान म्हणजे स्वातंत्र्यसाठी थोर वीरांनी दिलेले बलिदान, देशाच्या अखंड व एकात्मतेसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या वीरांचे स्मरण आहे. मातीला वंदन आणि वीरांना नमन हे या अभियानाची संकल्पना आहे,असे प्रतिपादन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी आज येथे केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने आज रेल्वे लाईन येथील सोनामाता आदर्श विद्यालयामध्ये “मेरी माटी मेरा देश” अभियानाच्या सेल्फी बुथचे उद्घाटन आणि पंचप्रण शपथ प्रसंगी श्री चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात पंचप्रण च्या शपथने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक न. भ. अघोर, शिक्षण पर्यवेक्षक जि.ह. पटेल, निवृत्त अधिकारी सतीश घोडके, क्षेत्रीय प्रच

#Varvand:आमदार राहुल कुल यांची भाजपा जिल्हा समन्वयकपदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा समन्वयकपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.        भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार राहुल कुल यांची जिल्हा समन्वयक म्हणून दि.४ रोजी निवड करण्यात आली आहे . भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी पुणे जिल्हा ग्रामीण हा संपूर्ण जिल्हा होता. यावर्षीपासून यामध्ये बदल करत दक्षिण व उत्तर असे दोन जिल्हे निर्माण केले आहेत.त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्षांची नेमणुक केली आहे.   यामुळे या दोन्हीही ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे .     यावरून एक प्रकारे आमदार राहुल कुल यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. आमदार राहुल कुल यांच्याकडे यापूर्वी बारामती लोकसभा निवडणूकप्रमुख पदाची जबाबदारी असून आत्ता पूर्ण ग्रामीण जिल्ह्याची समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याने जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यामुळे बळ मिळ

#Dound:दौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना फॉरेस्टपैकी वाटप केलेल्या जमिनी बदलून मिळणार ?

Image
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर पुणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना शासनाकडून वनसंवर्गातील (फॉरेस्ट) वाटप जमिनीचे निर्वाणीकरण केलेले नसल्याने अशा जमिनीचे भोगवटा वर्ग १ मध्ये रूपांतरण करण्यास वन विभागाकडून प्रतिबंध करण्यात येत असून, फॉरेस्टपैकी वाटप जमिनी प्रकल्पग्रस्तांना बदलून देण्याबाबतचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावेत व तसेच महाराष्ट्र शासनाने अशा प्रकरणी निश्चित धोरण ठरवावे या मागणीची जनहित याचिका शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत मा.उच्च न्यायालयात प्रकल्पग्रस्तांचे न्यायहक्कासाठी केलेल्या मागणीबाबत अधिक माहिती देताना पासलकर म्हणाले की, ज्या प्रकल्पग्रस्तांना फॉरेस्ट पैकी जमिनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी ,पुणे यांचेकडून वाटप झाल्या आहेत.त्या जमिनी भोगवटा वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रुपांतर केल्यास वन विभाग सदर वाटप जमीनी शासन जमा करून ७/१२ सदरी “महाराष्ट्र राज्य राखीव वन” असा शेरा कब्जेदार सदरी दाखल करण्याची कारवाई करीत असल

#Delhi:चिपळूण शहराच्या पूर नियंत्रण प्रकल्पाबाबत आ. निकम यांची दिल्लीत केंद्रीय पर्यटनमंत्र्यांशी चर्चा

Image
चिपळूणचा पूर नियंत्रणात येणार, पर्यटन विकासाला चालना मिळणार महादरबार न्यूज नेटवर्क - चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी  मंगळवारी सकाळी दिल्ली येथे केंद्रीय बंदर नौकानयन, जलवाहतूक आणि पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली. दाभोळ ते पेढे जलमार्ग, चिपळूण शहर पूर नियंत्रण प्रकल्प, तसेच पर्यटन संदर्भातील कामांबाबत सविस्तर चर्चा केली. ना. श्रीपाद नाईक यांनी या चर्चेबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या भेटीवेळी आमदार शेखर निकम यांच्यासोबत राष्ट्रवादीचे युवा नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव, श्री. कपूर उपस्थित होते. दाभोळ ते पेढे (गोवळकोट) या राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक २८ आणि पेढे येथील नियोजित रो रो आय डब्लू टी टर्मिनलला मंजुरी देऊन हे काम मार्गी लावल्याबद्दल आ. निकम यांनी मंत्री श्रीपाद नाईक यांचे आभार मानले. या जलमार्गाच्या विकासामुळे मालवाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूक आणि पर्यटन व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या

#Natepute:संजय पवार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी परीषदेमार्फत   याच्यावतीने या वर्षिचा देण्यात येणारा आदर्श शिक्षक,पञकार, पुरस्कार नातेपुते येथील डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला येथील सांस्कृतिक विभाग  प्रमूख संजय पवार यांना देण्यात आला.नातेपुते यैथील कार्यक्रमात राष्टीय अध्यक्ष  मूकूल शर्मा,तसेच सेक्रेटरि राजिंदर सिह यांच्या हस्ते देण्यात आला. संजय पवार  यांच्या सामाजिक , शैक्षणिक काम, कोरोना काळात उल्लेखनीय काम, शिष्यवृत्ति, शालेय सहल, पर्यावरण संर्वधन यामध्ये  केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल  हा पूरस्कार देण्यात आला. संजय पवार सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,नातेपूते एज्कूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमूख,व्हा.चेअरमन, संतोष काळे,सेक्रेटरी महेश शेटे,मार्केट कमिटी उपसभापती मामासाहेब पांढरे,मूख्याध्यापक विठ्ठल पिसे व संचालक मंडळ तसेच शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास, डाॅ.मूकूल शर्मा,राजिदर सिंह,मोहिंदर डेंग,देवेद्र सिंह,नूर बानो,घोष,डाॅ.रजनी पांडा, डाॅ,योगिराज,टी,गटशिक्षणाधिका