Posts

Showing posts from July, 2022

#Yavat:उंडवडी मध्ये स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सवी कार्यक्रम अतिशय अनोख्या उपक्रमांनी साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  संतोष जगताप ग्रामपंचायत उंडवडी येथे पंचायत समिती दौंड व जिल्हा परिषद पुणे  यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र्यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम  कृषी अधिकारी श्री.झरांडे , प्रशासन अधिकारी कुंभार साहेब, कृषी विस्तार अधिकारी ढोले साहेब , यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातील स्वछता अभियान तसेच आरोग्यविभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी , बूस्टर डोस लसीकरण त्याचबरोबर गावातून प्राथमिक शाळेतील मुलांची स्वच्छता दिंडी काढण्यात आली. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत उंडवडी च्या वतीने घनकचरा व्यवस्थापण शेडचे उद्घाटन करण्यात आले.  देश सेवा केलेल्या सैनिकांचा नागरी सत्कार करण्यात आला आणि पशुसंवर्धन विभागा तर्फे गावातील जनावरांना जंत नाशक गोळ्या ,औषधे देण्यात आली गावातील ७५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांना पंचायत समिती मार्फत प्रत्येकी एक केशर आंब्याचे झाड वाटप करण्यात आले त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या मुलांनी भाषणे केली. मुलांनी विविध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा यांचे उत्तम सादरीकरण त्यासाठी बक्षीस रुपी शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले

#Natepute:आ. राम सातपुते यांच्या सहकार्याने पुनम वाघमोडे यांचे आठ लाख रुपयांचे ऑपरेशन झाले मोफत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - गिरवी ता. माळशिरस येथील बापू अर्जुन वाघमोडे व त्यांचे कुटुंबीय अल्पशा शेत जमिनीवर उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब त्यांची कन्या पुनम वाघमोडे ही सुरुवातीपासूनच दोन्ही खुब्याचे बॉल निकामी असल्याने चालताना त्रास व्हायचा परंतु ऑपरेशन करण्याचा खर्च मोठा व तो खर्च कुटुंबाला पेलवत नसल्याने इच्छा असूनही जेमतेम बारावीपर्यंतचे शिक्षण घ्यावे लागले.  बारावीच्या पुढे इच्छा असूनही आजारपणामुळे तिला पुढे शिकता आले नाही मात्र मांडवे येथील आ. राम सातपुते यांचे सहकारी नंदू लवटे यांनी ही गोष्ट आ. राम सातपुते यांच्या कानावर घातली आणि आ. राम सातपुते यांनी पुनम वाघमोडे ला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करून आठ लाख रुपयांचे ऑपरेशन मोफत करून दिल्याने वाघमोडे कुटुंबीयांनी आ. राम सातपुते यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करीत आहे माळशिरस तालुक्यासह संपूर्ण राज्यभरातील गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना पुणे मुंबई सारख्या मोठ मोठ्या शहरांमध्ये मोफत ऑपरेशन करून देणारे आ राम सातपुते हे सर्वदूर परिचित आहेत यातच गिरवी ता. माळशिरस येथील पुनम वाघमोडे हिच्या आजारपणाची माहिती नंदू लवटे या

#Natepute:ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची सी.बी.एस.ई. दहावीचा निकाल १०० टक्के

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मोरोची तालुका माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित Dr. Nitave’s “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची”  शाळेचा सी.बी.एस.ई. बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला. सी.बी.एस.ई. बोर्डाची में महिन्यात परिक्षा घेण्यात आली होती. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची या शाळेची इयत्ता दहावी ची पहिली बॅच होती. बोर्डाने आज निकाल जाहीर केला यामध्ये विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. शाळेतील टॉप फाईव्ह अनुक्रमे यशस्वी विद्यार्थी कु.समृद्धी रुपनवर ९४.६०, कु प्रतिक्षा कर्चे  ८५.८०, कु. गितांजली वाघमोडे ७६. ४०, चि.सुशांत पालवे ७२ . व चि. सागर पाटील ७१.६० गुण मिळवले आहेत. संस्थेचे चेअरमन मा. डॉ.दत्तात्रय निटवे सर, सेक्रेटरी डॉ. योगिता निटवे मॅडम,  संस्थेचे संचालक , विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर , उपप्राचार्य जीलानी आतार सर व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मोरोची व परिसरातील लोकांकडून तसेच  पालकांकडून ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन तसेच सर्व शिक्षक यांनी चांगले लक्ष देऊन शाळेचा निकाल चांगला लावल्याने यशस्वी विद्य

#Mumbai:वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी केली थेट मागणी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मुंबई मंत्रालय विशेष प्रतिनिधी वृत्तपत्र,वेब चॅनल,इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व सदरच्या प्रसार माध्यमात काम करणाऱ्या वार्ताहर, पत्रकारांसाठी वार्ताहर कल्याणकारी महामंडळ निर्माण करण्यासंदर्भात पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना  निवेदन दिले .  तसेच वृत्तपत्रातील प्रतिनिधी, वार्ताहर,बातमीदार यांना पत्रकारांचे तसेच वृत्त संस्थेचे वेगवेगळे प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेवर ही संधी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने मागील दहा वर्षापासून  वार्ताहर कल्याणकारी महामंडळ तसेच पत्रकारांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबतचा  मुद्दा उचललेला आहे. महायुतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी  वार्ताहर कल्याणकारी महामंडळासाठी सकारात्मकता दाखवली होती, याचाच दाखला देत आज त्यांना त्याबाबत आणखी एकदा विनंती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना न्याय हक्क मिळवून दे

#Chiplun:''आरोग्य रक्षणाय व्याधी निग्रहणाय'' ही भूमिका अपरांत हॉस्पिटल नक्कीच पार पाडेल - आ. शेखर निकम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  अपरांत हॉस्पिटल येथे महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार श्री शेखरजी निकम व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.रत्नदीप साळोखे यांच्या हस्ते नुकताच पार पडला.  या योजनेअंतर्गत पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना अपरांत हॉस्पिटल येथे कॅशलेस आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.पोलिसांसाठी अश्या प्रकारची योजना उपलब्ध करून देणारे अपरांत हॉस्पिटल हे उत्तर रत्नागिरी येथील पहिले हॉस्पिटल आहे. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना अनेकदा त्यांना शारीरिक व मानसिक ताण तणावातूनच जावे लागते. त्यांच्यासाठी "आरोग्य रक्षणाय, व्याधी निग्रहणाय" अशी भूमिका अपरांत हॉस्पिटल निश्चितपणे पार पाडेल अशी भावना आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.  यावेळी  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.रत्नदीप साळोखे यांनी अपरांत हॉस्पिटलच्या या योजनेचा लाभ बाणकोट ते संगमेश्वर मधील सर्व पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना चिपळूणसारख्या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध करून द

#Malshiras:महिलेवर जबरदस्तीने धमकावून बळजबरीने अत्याचार (बलात्कार )व मारहाणीचा आरोप असणाऱ्या बब्रुवान प्रमोद मलमे यास माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मंजूर

Image
मे. कोर्टाने आरोपींच्या जामीन अर्ज वरती बचावासाठीचा युक्तिवाद मान्य करून अटी व शर्तीच्या अधीन राहून जामीन अर्ज मंजूर केला. आरोपीचे वकील  ॲड. प्रशांत रुपनवर.   महादरबार न्यूज नेटवर्क - जबरदस्तीने धमकावून बळजबरी  अत्याचार व मारहाण केलेल्या चा आरोप असणारे आरोपी बब्रुवान प्रमोद मलमे लवंग शेक्शन याचेवर अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता. सदर आरोपीच्या बाजूने बचावासाठी युक्तिवाद ॲड प्रशांत रुपनवर यांनी न्यायालयात केलेला होता. सदर आरोपीचा बचावासाठीचा युक्तिवाद मेहरबान कोर्टाने मान्य करून अटी व शर्तीच्या आधीन राहून आरोपीस जामीन मंजूर केला आहे. हकीगत अशी अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 0369 दिनांक 22/05/2022 रोजी बब्रुवान प्रमोद मलपे लवंग सेक्शन तालुका माळशिरस यांच्यावर भारतीय दंड संहिता 1960 कलम 376, 366, 327 ,323 ,504 ,506 प्रमाणे गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपीने ओळखीचा फायदा घेऊन बळजबरीने अत्याचार करून दुसऱ्या तालुक्यामध्ये घेऊन जाऊन आरोपीच्या ओळखीच्या ठिकाणी पंधरा दिवस ठेवून जबरदस्तीने व बळजबरीने शरीर संबंध करत असत प्रतिकार केल्यास

#Chiplun:चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया सेल तालुकाध्यक्ष पदी सचिन साडविलकर यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री.शेखरजी निकम व माजी आमदार श्री.रमेशभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिन साडविलकर यांना  चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे उल्लेखनीय  काम केल्याबद्दल त्यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन  मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला  तसेच भावी वाटचालीस  शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी,दिशा ताई दाभोळकर,शिरीष भाऊ काटकर,नितीन ठसाळे,डॉ.राकेश चाळके,योगेश शिर्के,मनोज जाधव,अक्षय केदारी,खालिद पटाईत,संदेश गाेरिवले,सावित्री होमकळस,दीपिका कोतवडेकर रिहाना बिजले आदी उपस्थित होते.

#Pune:गुरुपूजनाने खुलले वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे प्रांगण

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   गुरुविण कोण दाखवील वाट  आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट असा हा पथ सुगम करणाऱ्या गुरुंसाठी वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेमध्ये गुरु पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व वनाझ परिवार विद्यामंदिर  यांच्या संयुक्त प्रयत्नातून मंत्रमुग्ध वातावरणात मंत्रोच्चार,गुरुस्तवन व गुरुपूजन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे कार्यक्रमास लाभलेल्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आभार.  यावेळी त्यांच्याकडून विद्यार्थी व शिक्षकांना पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या संध्याताईनी स्वामी विवेकानंदांविषयी मंत्रमुग्ध करणारी गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली.आजच्या दिवशी विवेकानंदांसम शिष्य व्हावे अशी आशा व्यक्त केली.तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशपांडे सर व पाटील सर यांनी गुरुस्तवन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीताताई जपे प्रास्ताविक सौ. मायाताई झावरे व आभार प्रदर्शन सौ. संगीता ताई चव्हाण यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिताताई दारवट

#Pandharpur:गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता

Image
गोपाळपूर ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व पालख्यांचे स्वागत पंढरपूर,दि.13 (उमाका):- गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. आषाढी यात्रा सोहळ्याची काल्याने सांगता झाली. गोपाळपूर ग्रामपंचायतीने सर्व पालख्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दही भात॥वैकुंठी तो ऐसें नाही। कवळ कांही काल्याचें॥ एकमेकां देऊ मुखी सुखी घालू हुंबरी॥ या संत वचनाप्रमाणे गोपाळ काल्याचा उत्सव झाला. पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची पालखी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर भजन झाले. पुढे पुढे चाला मुखाने श्री गजानन बोलाचा जयघोष करीत भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध संतांच्या छोट्या मोठ्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल होत होत्या. सकाळी 9.20 च्या सुमारास जगदगुरु श

#Natepute:ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये आय.आय.टी फाउंडेशन कोर्सचे थाटात उद्घाटन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मोरोची तालुका माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची” या शाळेत दि. ११ जूलै २०२२ रोजी‌ आय.आय. टी फाऊंडेशन कोर्स चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेत मोरोची व नातेपुते परिसरातील एस.एस.सी. बोर्ड परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर,  दहावीला यश संपादन केलेले विद्यार्थी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आय.आय.टी. फाऊंडेशन कोर्सचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जावे लागते. सर्वांना ते शक्य होत नाही यासाठी काहीतरी केले पाहिजे असे संस्थेचे चेअरमन डॉ दत्तात्रय निटवे सर यांना वाटत असे यातुनच ही कल्पना सुचली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मीळावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी स्पर्धेच्य  युगात कुठेही कमी पडुन नये असे डॉ. निटवे सर यांचे मत आहे.   सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांचा मोठं प्रतिस

#Yavat: विठ्ठला भरपूर पाऊस दे - आमदार संजय जगताप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप गेली दोन वर्षे आरोग्याच्या  दृष्टीने अतिशय वाईट गेली आहेत, यावर्षी प्रथम आरोग्य सम्पदा आणि पाउस हे दोन्ही भरपूर प्रमाणात द्यावी, अशी मी विठलं चरणी प्रार्थना केली आहे, असे प्रतिपादन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी डाळिंब विठलं बन येथे बोलताना केले आहे. प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठलं बन येथील विठलाची महापूजा पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि त्यांच्या सुविद्य पत्नी राजवर्धिनी जगताप यांचे हस्ते आयोजित करण्यात आली होती. आमदार जगताप पुढे म्हणाले, मी सोपानं नगरी सासवड येथे राहतो,विठलंबन आणि सोपानं नगरीची  भावनिक आणि भक्तीची नाळ आहे,त्यामुळे येथे येण्याची ओढ वाटते, आणि येथे येऊन दर्शन घेतल्यावर आत्मिक समाधान लाभते. मी पुरंदरचा आमदार आहे त्यामुळे मी येथे आलो तरी मला निधी देत येत नाही, तरीही येथे येण्याची ओढ लक्षात घेऊन मी माझे वडील स्व, चंदूकाका जगताप यांचे स्मरणार्थ  ५  लाख रुपये देवस्थान विकास कामास देत आहे. आमदार संजय जगताप. यावेळी बोलताना दौंडचे आमदार राहुल कुल म्हणाले, डाळिंब बन आणि परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रय

#Malshiras:शंकर सहकारी साखर कारखाना मिल रोलर पूजन संपन्न

Image
                                        महादरबार न्यूज नेटवर्क - श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे सिझन  २०२२- २३ चे मिल रोलर पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील  यांच्या शुुभहस्ते करण्यात आले.  यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, श्री शंकर कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, शंकर कारखान्याचे संचालक बाबाराजे देशमुख, सुनील माने, संजय बापू कोरटकर, दत्ता चव्हाण, शिवाजी गोरे, दत्तू काका रनवरे, सुधाकर पोळ, सुरेश पाटील, अलका पाटील, सुरेश मोहिते, धोंडीराम नाळे, सुरेश जगताप, रामदास कर्णे, नंदन दाते, नगरसेवक विशाल पोळ, अनंतलाल दोशी, प्रशांत दोशी, विरकुमार दोशी, पोपट गरगडे, विठ्ठल अर्जुन, अरविंद भोसले, पुरंदावडे सरपंच देविदास ढोपे, शिवराज निंबाळकर, युवराज देशमुख, विलास निंबाळकर, विलास फडतरे, तुकाराम चव्हाण, लालखान पठाण, बापू सालगुडे, बाळू सालगुडे, दिपक माने देशमुख, कामगार युनियन, शंकर सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#Parbhani:जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याची जबाबदारी सर्वांची - सखाराम बोबडे पडेगावकर

Image
गंगाखेडच्या एकमेव जि प शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद  महादरबार न्यूज नेटवर्क - जिल्हा परिषदेच्या शाळेतच खरे गुणवान विद्यार्थी घडतात. जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याची जबाबदारी सर्वांची असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर  यांनी गंगाखेड येथे सोमवारी शहरातील एकमेव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसमोर बोलताना दिली. सोमवारी गंगाखेड शहरातील एकमेव जिल्हा परिषद शाळेस आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर , सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक भगवान ठूले सर यांनी त्यांचे स्वागत केले. आठवी ते दहावी चे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत यावेळी ग्रामीण भागातील उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या भरपूर होती. यावेळी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शाळेत काय काय सुविधा हव्यात, पिण्याचे पाणी, शौचालय, मुतारी आदी सुविधा आहेत का? त्याचबरोबर प्रवासाम

#Chiplun:संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे (नेरदवाडी) येथील जळीत गोठ्याची आ. शेखर निकम यांनी तातडीने दखल घेत पाहणी केली

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील पाचांबे (नेरदवाडी) येथे आता चालू असलेल्या सततधार विजकडाक्यासह पडत असणाऱ्या पाऊसात  रात्री येथील शेतकरी संजय जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडली.  त्यामध्ये १३ गूरे, ६ म्हैशी, २ रेडे, ५ रेडकं जळूण मृत पावल्या यामध्ये त्यांचे अंदाजे रु. ११लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे. याची आमदार शेखर निकम यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष पहाणी केली.  गोठ्यातील जळूण मृत पावलेली गुरे बघून ही खूपच दु:खदायक अन वेदनादायक घटना आहे असे मत व्यक्त केले. मात्र यावेळी कोणतीही मनुष्यहानी  झाली नाही.  हतबल झालेले शेतकरी  संजय जाधव यांना धीर दिला व तातडीने  मदत केली. याबाबत शासकिय यंत्रणेला योग्य त्या सुचना करून तत्परतेने शासकीय मदत व्हावी असे संबंधित अधिकारी यानां सांगण्यास आले. यावेळी सरपंच संदेश घाडगे, शाम घाडगे, विनोद मस्के, विनोद ताठरे प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

#Pune:आषाढी एकादशीनिमित्त वनाझ परिवार विद्यामंदिरमध्ये अभंग गायन स्पर्धा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   विद्यार्थ्यांना शिक्षण तर आवश्यक आहेच परंतु शिक्षणासोबतच सण, संस्कृती,परंपरांचे रक्षण करणे व त्यांचे महत्व जाणून घेणे हे देखील राष्ट्रहिताच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे ठरते.असाच वैष्णवांचा/ वारकऱ्यांचा जणू काही कुंभमेळा ठरावा असा हा आषाढी एकादशीचा पंढरपूर नगरीतील उत्सव आज आमच्या वनाज परिवार विद्या मंदिर कोथरूड शाळेमध्ये अभंग गायन स्पर्धेच्या निमित्ताने सजला होता. इ.१ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेतील स्पर्धा समितीचे प्रमुख श्री दीपक राऊत सर  सौ. अश्विनी चव्हाण व संगीता चव्हाण या शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक ९/७/२०२२ रोजी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी सर्व शिक्षकांनी मुलांकडून उत्साही वातावरणात अभ्यासाला जोडून तयारी करून घेतली. तसेच सर्व विद्यार्थी वारकरी पोशाखात, हातात टाळ, मुली डोक्यावर तुळस घेऊन अभंग म्हणत होत्या. " चाले हे शरीर कोणाचिये सत्त  कोणा बोलविते हरी विण ! देखवी दाखवी एक नारायण  तयाचे भजन चुको नका!! अभंग

#Malshiras::मा.राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा गिरवी ता. माळशिरस  यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरवी व वाड्या वस्तीवरील सर्व शाळांना मोफत वही वाटप  करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी हा उपक्रम वेगवेगळ्या गावांमध्ये राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून  गिरवी ता. माळशिरस गावामध्ये हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे.  त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष मनसेचे नगरसेवक माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे तसेच गिरवी गावचे सरपंच सोमनाथ मदने, गिरवी गावचे उपसरपंच राजाभाऊ नरूटे, मनसेचे तालुका सचिव लक्ष्मण नरूटे, गिरवी गावचे माजी उपसरपंच व मनसे शेतकरी सेनेचे तालुका कार्याध्यक्ष राजाभाऊ तांबवे, गिरवी गावचे शाखाध्यक्ष सुभाष नरूटे, शाखा उपाध्यक्ष विजय मदने, शेखर कोकरे, लाला जाधव, तानाजी नरूटे, अवि सावंत, जयराम नरूटे, समाधान पडळकर, ढोबळे गुरुजी, पवार गुरुजी, गायकवाड गुरुजी, खरंगले गुरुजी, पुराने गुरुजी, श्रीमती ओव्हाळ मॅडम, श्रीमती कुलकर

#Pandharpur:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' चा समारोप

Image
प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरणाचे रक्षणाचा संकल्प करूया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर, :- आषाढी वारीच्या निमित्ताने  प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रा. तानाजी सावंत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, एकदा वापर करुन फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे १ जुलै २०२२ पासून एकदा वापरण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ज्ञानोबा-तुकोब

#Yavat:प्रति पंढरपूर डाळिंब बन यात्रेची तयारी पूर्ण

Image
प्रति पंढरपूर -- दौंड  हवेली आणि पुरंदर या तीन तालुक्याच्या सीमेवर असणारे डाळिंब विठलं बन हे या भागातील प्रति पंढरपूर म्हणून प्रख्यात आहे महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून वारकरी भाविक भक्ताचे तीर्थ स्थान ओळख असणाऱ्या डाळिंब  बन येथील यात्रेची तयारी पूर्ण झाल्याचे देवस्थान समितीने नमूद केले आहे. डाळिंब बन येथील विठलं बन आशाडी एकादशीला विठलं दर्शनासाठी दीड ते दोन लाखाहून अधिक भाविक आणि भक्तगण दर्शनासाठी येत असतात. यासाठी वेळेत आणि सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारी, देउळ आणि सम्पूर्ण परिरासारची साफ सफाई, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य वीज, दळण वळण या सर्व त्या सुविधेचा पूर्तता करण्यात आली आहे. विठलाची महापूजा पहाटे  आमदार संजय जगताप, आमदार राहुल कुल यांचे हस्ते होणार आहे,याचे  हस्ते करण्यात येते, यानंतर सभामंडपात मान्यवर आणि उपस्थिय यांचा विठलं बन देवस्थान याचे वतीने सत्कार करण्यात येणार आहे. खेळण्याची , मिठाईची दुकाने, पाळणे यासाठी व्यवस्था केली आहे, उरुळी कांचन येथून बसची सुविधा देण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक

#Chiplun:चिपळूण नगरपरिषदेच्या वतीने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाय-योजनांचा आमदार शेखर निकम यांनी घेतला आढावा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास चिपळूण नगरपरिषदेच्या वतीने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाय-योजनांचा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा आमदार शेखर निकम सर यांनी आढावा घेऊन नगरपरिषद  विभागानुसार आपत्तीव्यवस्थापन पथकांची माहिती घेतली तसेच नगरपरिषदेने अद्यावत तयार करुन ठेवलेल्या बोटींची पहाणी करुन बोटींच्या केलेल्या नियोजनाबाबत चर्चा केली व चिपळूणमध्ये दाखल झालेल्या NDRF पथकाशी संवाद साधून त्यांचे स्वागत केले. गत २०२१ वर्षी झालेली भीतीदायक अशी पुर परिस्थिती पहाता आपण अधिक सतर्कता बाळगत चिपळूणमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे जरी नियोजन केले असले तरी पुर परिस्थिती निर्माण होवूच नये असे मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त करत  ईश्वरास केली प्रार्थना. यावेळी मुख्य-कार्यकारी अधिकारी प्रसाद शेगडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, शिरिष काटकर, बापूशेठ काणे, अरुणशेठ भोजने, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, NDRF प्रमुख व नगरपरिषदेचे विभागानुसार आपत्ती विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

#Malshiras:‘सिड बॉल’च्‍या माध्‍यमातून वृक्षारोपन करून पालखीमार्ग हरित करणार - उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील

Image
वन विभाग व माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम महादरबार न्यूज नेटवर्क  –  वन महोत्‍वाअंतर्गत वारक-यांच्‍या सोयीसाठी रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा, रेल्‍वे, , डोंगर मार्गावर ‘सिड बॉल’च्‍या (बीज गोळे) माध्‍यमातून वृक्षारोपन करुन ‘हरित वारी’ उपक्रम राबवित असल्‍याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले. अंतरराष्‍ट्रीय पर्यावरण दिनाच्‍या निमित्‍ताने वन विभाग व माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्‍युरो, सोलापूर क्षेत्रीय कार्यालयाच्‍या संयुक्‍त विदयामाने ‘सिड बॉल’ तयार करणेबाबत कार्यशाळा घेण्‍यात आली होती. यावेळी संगमेश्‍वर कॉलेजचे विदयार्थी व पर्यावरण प्रेमी यांनी पाच हजार पेक्षा जास्‍त ‘सिड बॉल’ तयार केले होते. त्‍याचे वाटप  माळशिरस तालुक्‍यातील खुडूस वन विभागाच्‍या रोपवाटीके समोर करण्‍यात आले. यावेळी क्षेत्रीय प्रसिध्‍दी अधिकारी श्री. अंकुश चव्‍हाण, सहाय्यक वनसरक्षक बी.जी.हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद हाके, संजय भोईटे व प्रकाश कुंभार अद‍ि उपस्थित होते.                                    Advertisement सदरील बिज गोळे हे स्‍थानिक प्रजाति

#Mumbai:अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेऊन

Image
एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश  महादरबार न्यूज नेटवर्क - राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या ९ आणि एसडीआरएफच्या ४ अशा एकूण १३ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील संपूर्ण कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.  आज दुपारी १२ वाजेपर्यंत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०० मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे

#Akluj:जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचे स्वागत केले. नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.२० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन करुन जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी दर्शन घेतले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे उपस्थित होते. तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी श्री.परीट यांनी भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीन

#Yavat:केडगावच्या सनराईज चे अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील केडगाव येथील सनराईज अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या विभागीय स्पर्धेत केडगावच्या १४ विध्यार्थ्यांना विजयी घोषित करण्यात आले. विजयी सर्व विध्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. पैकी १७ विध्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. तर सनराईज अबॅकसला देखील सन्मानित करण्यात आले. रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड येथे ही स्पर्धा पार पडली. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे, सातारा, अहमदनगर या ठिकाणहुन सुमारे ७५९ विध्यार्थी सहभागी झाल्याची माहिती प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे राज्य समन्वयक गिरीश करडे यांनी माहिती दिली.                         Advertisement ६ मिनिटांत तब्बल १०० गणिते विध्यार्थ्यांनी यावेळी सोडवली. या स्पर्धेत साडे चार वर्षाची अंकिता प्रमोद नेवसे  हिने देखील बक्षीस पटकावले. ओमकार मधुसूदन काळभोर या चिमुकल्यांने लिटल चॅम्प गटात प्रथम प्रावीण्य मिळविले. लहान गटातील रितिका प्रवीण रुपनवर, जुई संदीप रणदिवे, समृद्धी सचिन जगताप, शरण्या सागर शेळके, हर्ष हेमंत वाघ,  आर्य

#Phaltan: डॉक्टर विठ्ठल सोनवलकर यांच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विठ्ठल सोनवलकर यांच्यावतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना मोफत औषध उपचार ही करण्यात आला असल्याची माहिती डॉक्टर विठ्ठल सोनवलकर यांनी दिली. गेल्या सात वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित स्वाती सोनवलकर, गणेश सूर्यवंशी, शिंदे महाराज, काळोखे, डॉक्टर शुभम सरगर, श्रीमंत विश्वजीत राजे युवा मंच दुधेबावी,अध्यक्ष  विकास सोनवलकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.

#Natepute:माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात हरी नामाच्या गजरात आगमन

Image
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाच्या वतीने केले पालखीचे स्वागत महादरबार न्यूज नेटवर्क - पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरी नामाच्या गजरात  दि.४ रोजी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथील  कारुंडे  बंगला येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के, भाऊसाहेब चोरमले ,प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, माळशिरसचे तहसीलदार जगदिश निंबाळकर, सपोनि मनोज सोनवलकर, अर्जुनसिंह मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते पाटील, किशोर सुळ, गट विकास अधिकारी विनायक गुळवे,

#Phaltan:श्रीमंत विश्वजीतराजे युवा मंच दुधेबावी यांचे मार्फत वारकरी भाविक भक्तांना अल्पोहार वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्रीमंत विश्वजीतराजे युवा मंच दुधेबावी, यांचे मार्फत वारकरी भाविक भक्तांना  दि.०२/०७/२०२२ रोजी मौजे कोळकी ता.फलटण येथे  अल्पोपहार वाटप करण्यात  आहे. मोफत अल्पोहार वाटपाचे आयोजन श्रीमंत विश्वजीत राजे युवा मंच दुधेबावी,अध्यक्ष : मा.श्री विकास सोनवलकर यांनी केले होते.