#Mumbai किर्ती रात्र विद्यालय शिवडी येथे 'तिमिरातुनी तेजाकडे' यांच्या वतीने २९६ वे निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव किर्ती रात्र विद्यालय शिवडी प्रशालेत तिमिरातुनी तेजाकडे यांच्या वतीने बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर गरीब विद्यार्थी मागे पडतात याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव. सदर बाबीचा विचार करुन सन्माननीय श्री चंद्रकांतराव शिंदे अध्यक्ष प्रगती मंडळ मुंबई यांनी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. प्रमुख मार्गदर्शक श्री सत्यवान यशवंत रेडकर सर (बीकॉम, एमकॉम, एमए(हिंदी), एमए (पब्लिक ऍडमिन), एलएलबी, पीजीडीएचआरएम, पीजीडीएलएल & आयएल, पीजीडीटी) कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमा शुल्क विभाग मुंबई, भारत सरकार ह्यांचे हे २९६ वे निःशुल्क मार्गदर्शन शिबिर होते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, स्पर्धा परीक्षांमध्ये यूपीएससी अंतर्गत कोणत्या शासकीय विभागात नोकरी मिळवता येते, केंद्र व राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या सेवा, सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन