Posts

Showing posts from August, 2022

#Parbhani:जखमी हरणाचे प्राण वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांची धावा धाव

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -            अज्ञात वाहनाच्या धडकेने चाटोरी येथे नदीच्या शेजारी जखमी झालेल्या हरणाचे प्राण वाचवण्यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर व सहकाऱ्यांनी धावपळ करत त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न आज केला. चाटोरी येथील युवा कार्यकर्ते आकाश किरडे,सुशांत किरडे यांनी सकाळी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कॉल करून आमच्या भागात रोडच्या बाजूला हरिण जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती दिली. याला उपचार मिळवून देण्यासाठी आपण वनविभागाचे अधिकार्याशी संपर्क साधावा असेही कळवले. यावरून सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हा वनाधिकारी जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ आगाव, डॉक्टर सावने व त्यांच्या सहकार्याशी संपर्क साधून सदरची माहिती कळवली. वन विभागाच्या हेल्पलाइन नंबर वर सुद्धा ही माहिती नोंदवण्यात आली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधून सदरची माहिती कळवली. त्यामुळे ही यंत्रणा तात्काळ हलली. सकाळी दहा वाजता वनविभागाचे अधिकारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने त्या जखमी

#Solapur:गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास 2 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Image
सोलापूर,दि.30 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सांस्कृतिक कार्य विभागाने यावर्षी गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवड करण्याची कार्यपध्दत निश्चित केली आहे.गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 ऑगस्ट 2022 दिली होती, स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 2 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतचे शुद्धीपत्रक शासनाने जाहीर केले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सदर अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर 2 सप्टेंबर 2022 पूर्वी ऑनलाईन पाठवावेत. प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई यांनी सदर अर्जाची जिल्हानिहाय विभागणी करुन संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या ईमेलवर दि. 3 सप्टेंबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज उपलब्ध करुन द्यावेत. यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र ईमेल तयार करुन प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांना त्यांच्या pldeshpande१११@gmail.

#Chiplun:संगमेश्वर तालुक्यातील जाधव कुटुंबीयांना आ. शेखर निकम यांचा मदतीचा हात

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे गावातील संजय महीपत जाधव यांचे गोठ्यावर वीजपडून १३ गुरे व वैरण जळून खाक झाली होती.त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाथ होता.त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मदतीचा हात मागितला होता.त्यानुसार बँकेचे संचालक व आमदार शेखर निकम सर व स्थानिक संचालक राजेंद्र सुर्वे व नेहा माने यांनी संचालक मंडळ बैठकीत यावर चर्चा करून त्यांना मदत द्यावी अशी आग्रही मागणी केली. त्यावर संचालक मंडळाने तातडीची मदत मंजूर केली.आणि त्यांना मदतीचा हा एक लाखाचा धनादेश सोमवारी वितरित करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी भरत चोगले,राष्ट्रवादी देवरुखचे शहर अध्यक्ष हनिफ हरचिरकर,कृषी बाजार उत्पन्न समितीचे माजी सभापती दत्तात्रय उर्फ बाळू ढवळे,देवरुख सोसायटीचे चेअरमन संतोष लाड, नगरसेवक प्रफुल्ल भुवड,सहायक निबंधक सतोषकुमार पाटील,विनोद म्हस्के,बँकेचे तालुका निरीक्षक तुषार साळुंखे,व्यवस्थापक बँकेचे संतोष जाधव,शाखा व्यवस्थापक रविकांत शिंदे,पंकज पुसाळकर,पाचांबे सरपंच संदेश घाडगे,नारायण भुरवणे आदी उपस्थित होते.

#Natepute:गणेश उत्सवामध्ये श्रीगणेशाचा अधिकाधिक नामजप करा - मनोहर महाराज भगत

Image
  महादरबार न्यूज नेटवर्क -                   !!     गणपती बाप्पा मोरया     !!      वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा !! कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण श्रीगणेश पुजनांने करतो गणेशाचे बालरूप जितके मनमोहक आहे तितकेच त्याची शक्ती मुक्ती विवेकबुद्धी चतुर आहे. गणपती केवळ विघ्नहर्ता नाही तर तो बुद्धीदाता आणि समृद्धीकारक ही आहे चतुर्मासातील दुसरा महिना भाद्रपद महिना हा मुख्य करून गणपती पूजनासाठी प्रसिध्द आहे. भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंत घरोघरी श्रीगणेशाची पार्थिव पूजन  करण्याची प्राचीन काळापासून  परंपरा आहे यंदा बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे प्रत्येक घरी आपल्या आवडीनुसार मनमोहक गणपतीची मूर्ती आणली जाते आणि श्रीगणेश पूजन केले जाते. ही आचरण भक्ती मानली जाते. कर्मकांडा पेक्षा उपासना कांड श्रेष्ठ आहे गणेशाची उपासना करत असताना ॐ गणपते नमः ॐ गणपते नमः हा नाम जप अधिकधिक वेळा करावा असे आव्हान ज्येष्ठ किर्तनकार मनोहर महाराज भगत नातेपुते यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने केले. गणेशाचे नामस्मरण हेच गणपती बाप्पाच

#Solapur:कौशल्य विकासाच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून द्या -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

Image
सोलापूर,दि.29 (जिमाका) -  देशामध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, छोटे-मोठे व्यवसाय, धंदा करून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक बेरोजगारांना शासकीय नोकरी मिळत नाही. बेरोजगार युवांनी कोणत्याही गोष्टीला कमी न मानता कौशल्य विकासचे प्रशिक्षण घेऊन रोजगाराभिमुख व्हावे. या कौशल्य विकासाच्या कामाला, नव्याने व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.               पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा पहिला दिक्षांत समारंभ, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र.कुलगुरू व्ही.बी. पाटील, कुलसचिव सुरेश पवार आदींसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   बाजाराची गरज

#Varvand:शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीचे दौंड तालुक्यात जल्लोषात स्वागत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर शिवसेना कार्यालयासमोर फटाके फोडून पेढे वाटून युती कार्यकर्त्यांचा जल्लोष  शिवसेना -संभाजी ब्रिगेड दौंड तालुक्यातील जनतेचे प्रश्न समन्वयाने सोडवणार      सत्तापिपासू भाजपाकडून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू असून, महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची घोषणा करत आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीसंदर्भात भूमिका राज्यातील जनतेसमोर स्पष्ट केली असून, याच पार्श्वभूमीवर दि.२७ रोजी  जिल्ह्यातील व  दौंड तालुक्यातील संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी यांनी शिवसेना कार्यकारणीबरोबर समन्वय साधून आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी , जिल्हा प्रमुख  महेश पासलकर म्हणाले की, संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती ही आगामी काळात राज्यात

#Natepute:नातेपुते येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

Image
   महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते येथे दरवर्षी परंपरेने श्रावण महिन्यात चतुर्दशी दिवशी समाज बांधवांच्या व भजनी मंडळ नातेपुते यांच्या वतीने तिथीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी दि. २६ ऑगस्ट रोजी  सायंकाळी उपस्थित मान्यवरांच्या व समाज बांधवांच्या हस्ते प्रतिमापूजन व भजनाचा कार्यक्रम होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली यानंतर आरती होऊन पसायदान घेऊन अभिवादन करून प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार मनोहर महाराज भगत, हनुमंतराव धालपे, दत्तात्रयभाऊ उराडे,प्रभाकरभाऊ चांगण,दिलीप उराडे,दत्तात्रय हुलगे,बिट्टू अण्णा काळे, विनायकराव उराडे,विजयराव डफळ, संजय मामा उराडे, गणेश बापू उराडे, सोपान उराडे, दिलीपराव ठोंबरे, अमर भिसे, प्रेमभैया देवकाते,अवधूत अण्णा उराडे, महेश ठोंबरे, दर्शन उराडे, पवन उराडे, जयपाल ठोंबरे, श्रीकृष्ण महाराज भगत, गणेश महाराज भगत, विलासराव लाळगे, दिलीपराव लाळगे, माऊली राऊत भाजप अनुसूचित जाती मोर्चेचे तालुकाध्यक्ष बाबुराव खिलारे,भजनी मंडळाचे जगन्नाथ सोनवळ, साहेबराव देशमुख, तुकाराम ठोंबरे, सुभाष उराडे, भा

#Mumbai:धनगर समाजातील अनेक प्रलंबित प्रश्नाचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना राज माने पाटील यांचे निवेदन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - धनगर समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न घेऊन राज माने पाटील यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात राज माने पाटील यांनी असं म्हटलं आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील घुलेनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची बारव येथे भव्य अशी मुर्ती स्थापन करण्यात यावे व सुशोभीकरण करण्यात यावे, तसेच महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास पाठ्यपुस्तक मध्ये समाविष्ट करण्यात यावा, तसेच अहमदनगर चे नामकरण अहिल्यानगर त्वरित करण्यात यावे अशी संपुर्ण धनगर समाजाच्या वतीने नम्र विनंती केली,अशा  आशेचे निवेदन राज माने पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी उपस्थित धनगर शक्ती संपादक आकाश पुजारी, युवा नेते सुरेश सुळ ,वैभव गोडगे हे उपस्थित होते.

#Indapur:बावडा गावासाठी वाढीव नळपाणीपुरवठा योजना मंजूर- अंकिता पाटील ठाकरे

Image
रु. 6 कोटी 23 लाख खर्चास मान्यता  महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार बावडा गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन विस्तारित नळ पाणीपुरवठा योजनेस केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दोन दिवसांपूर्वी बुधवार,दि.24 ऑगस्ट 22 रोजी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 6 कोटी 22 लाख 74 हजार रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या  सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.26) दिली.           भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सदरची विस्तारित नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेस शिवसेना-भाजप सरकारने तात्काळ मंजुरी दिलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.  या वाढीव स्वतंत्र योजनेमुळे बावडा गावच्या परिसरातील  बारावा फाटा, अरगडे वस्ती, घोगरेवस्ती, रत्नप्रभादेवीनगर आदी परिसरातील नागरिकांना पिण्य

#Mumbai:महापूरापासुन वाचण्यासाठी चिपळूणला गाळमुक्त कधी करणार?आमदार शेखर निकम आक्रमक

Image
आवश्यक  निधी  तातडीने देण्याची विधानसभेत केली मागणी   महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  चिपळूण शहरातील उर्वरित गाळ काढण्यासाठी निधी आवश्यक निधी मिळावा याबाबत आमदार शेखर निकम यांनी  विधान सभेत मांडली आक्रमक भूमिका घेतली. दुसऱ्या व तिसऱ्या टप्यातील गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या येणाऱ्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे मा. मंत्री अब्दुल सत्तार यांनी मान्य केले. चिपळूण शहर व ग्रामीण भागातील उर्वरीत गाळ यावर्षी काढणार का? दुसऱ्या व तिसऱ्या टप्यातील निधी हा तातडीने मिळणार का? व नदी संवर्धन गाळ काढण्यासंबंधी सेंट्रल बोर्ड व जलशक्ती मिनिस्ट्रीकडे मेरीटाईम बोर्ड हा प्रस्ताव तातडीने सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठविणार आहे का?  असे सभागृहात मुद्देसुद प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधुन घेतले.  चिपळूण शहर व ग्रामीण भागामध्ये २२ जुलै २०२१  च्या महापुरामध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली होती. यामुळे चिपळूण शहरात पुरामुळे मोठ्या प्रमाणात पाणी घुसले तसेच शहरा लगत असणा-या ग्रामिण भागातील नदी किणाऱ्याची शेती  व गाळ मोठ्या प्रमाणात प्रवाहासोबत वाहत आला, नदीची पात्रांचा मार्ग बदलला व नदीची पात्र

#Indapur:तबला संगीत विशारद मध्ये ह भ प ओंकार गजेंद्र डांगे यांनी प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल महादेव सुतार यांच्या सहीत विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांच्या वतीने सन्मान

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार गोंदी तालुका इंदापूर येथील शिवचरित्रकार व युवा कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी डांगे यांचे बंधू व ह भ प गजेंद्र डांगे यांचे चिरंजीव ह भ प ओंकार महाराज डांगे यांनी तबला संगीत विशारद ही परीक्षा दिली त्यामध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण  झाल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला . ह भ प संतोष महाराज कवडे सर (संगीत विशारद) यांच्या मार्गदर्शनाने  संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली.  या निमित्ताने पिंपरी बुद्रुक भजनी मंडळ, ग्रामस्थ यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे त्यांचा सन्मान करण्यात आला विणेकरी ह भ प महादेव सुतार यांच्या हस्ते  सन्मान केला. यावेळी समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते ह भ प ओंकार महाराज डांगे यांनी पंचक्रोशी मध्ये प्रथमच संगीत कला क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक संपूर्ण भागामध्ये होत आहे. सूत्र संचलन ह भ प महेश सुतार यांनी केले व आभार  बाळासाहेब घाडगे यांनी मानले.

#Varvand:ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या पदविकाधारक डॉक्टरांना कायदेशीर संरक्षण देण्यासंदर्भात शासनाने त्वरित कारवाई करावी - आमदार राहुल कुल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर  आज विधानसभेमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांनी लक्षवेधी सूचना मांडत असताना ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय पदविकाधारक डॉक्टरांच्या संबंधित प्रश्न उपस्थित केला. ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी पदविकाधारक डॉक्टरांची संख्या जास्त प्रमाणात आहेत. जे वाड्या वस्त्यांवर जाऊन पशुवैद्यकीय सेवा देत असतात. पदवीधारक आणि पदविका धारक असा वाद या राज्यामध्ये आहे. यासंदर्भात केंद्राच्या काही गाईडलाईन्स आहेत  त्याच्यामध्ये बसून या पदविकाधारक डॉक्टरांना प्रॅक्टिस करत असताना ज्या अडचणी येत आहेत त्यासंदर्भामध्ये शासनाने वारंवार बैठका घेतलेल्या आहेत. परंतु त्याच्यामध्ये अजून काही मार्ग निघालेला नाही. पशुवैद्यक पदवी व पदविकाधारक यांच्यातील वाद सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. या पदविकाधारक डॉक्टरांना संरक्षण देण्यासंदर्भात मंत्री महोदय निर्णय घेतील का ? असा सवाल दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत उपस्थित केला. या प्रश्नावर उत्तर देत असताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की सन्माननीय सदस्यांनी अतिशय चांगली सूचना के

#Baramati:झारगडवाडीत प्रथमच दहीहंडीचा उत्सव..

Image
दहीहंडीला झारगडवाडी व पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती..  महादरबार न्यूज नेटवर्क - नवनाथ बोरकर गोकुळाष्टमी निमित्त झारगडवाडीत ( बारामती ) दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी  गोल्डन गर्ल सुवर्णा काळे, आणि रानबाजार फेम माधुरी पवार या सिनेतारकाच्या नृत्यावर तरूणाई अक्षरशः बेधुंद होत थरकली. झारगडवाडीत प्रथमच दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला होता यात पार्थदादा युथ फाउंडेशन ची 55 हजार 555 रुपयांची दहीहंडी अभिनव दहीहंडी संघाने फोडली तर जनहित युवा प्रतिष्ठानची 51 हजारांची हंडी जय मल्हार दहीहंडी संघाने फोडली. यावेळी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.  यावेळी दहीहंडी उत्सवाला बारामती ऍग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार, बा. न. पालिकेचे जेष्ठ संचालक किरण गुजर, बा. ता. अध्यक्ष संभाजी होळकर, सोलापूरचे  उपमुख्याधिकारी माणिकराव बिचकुले, परिवहन अधिकारी हेमंत सोलणकर,   सिद्धार्थ राजेकंग, मा. का. संचालक योगेश जगताप, बा. संजय गांधी योजनेचे माझी अध्यक्ष किरण तावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत गावडे, पं. स. सदस्य राहुल झारगड, छ. कारखान्याचे संचा

#Baramati:ग्रामीण भागातील झारगडवाडीत प्रथमच पार पडणार दहीहंडीचा उत्साह..

Image
दहीहंडी निमित्त सोमवारी झारगडवाडीत सिनेतारकांचा पाहायला मिळणार जलवा.. महादरबार न्यूज नेटवर्क - नवनाथ बोरकर गोकुळाष्टमीचा उत्साह मोठ्या उत्साहात देशभर, आणि राज्यभर पार पडत आहे. राज्यामध्ये सर्वात मोठ्या दहीहंड्या ह्या मुंबई, पुणे या शहरांमध्ये पार पडत असतात मात्र आता शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडत आहे.  बारामती तालुक्यातील झारगडवाडीत पहिल्यांदाच दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोमवारी ( ता.22 ) सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या दहीहंडी साठी झारगडवाडीत रान बाजार फेम माधुरी पवार आणि गोल्डन गर्ल सुवर्णा काळे या दोन अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आले आहे यामुळे ग्रामीण भागातील झारगडवाडी मध्ये दहीहंडी निमित्त सिनेतारकांचा जलवा पाहायला मिळणार आहे.  या दहीहंडी मुळे ग्रामीण भागातील महिलांना देखील दहीहंडी पहाण्याचा आनंद मिळणार आहे. दहीहंडी निमित्त झारगडवाडीत बिकेबीएन रस्त्याच्या दोन्ही बाजूला गोपाळ भक्तांना शुभेच्छा असे बॅनर झळकले आहेत. या दहीहंडीचे आयोजन जनहित युवा प्रतिष्ठान झारगडवाडी आण

#Yavat:खुटबाव येथील महाविद्यालयात पुस्तक हंडीचे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  संतोष जगताप कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून कोणालाही दहीहंडी जल्लोषात साजरी करता आली नाही. त्यामुळे तरुणाईच्या मनात काहीशी खंत होती. पण यंदा मात्र करोनाचे निर्बंध तसेच अन्य कोणत्याही निवडणुकीची कसलीही आचारसंहिता नसल्यामुळे दहीहंडीची जल्लोषात साजरी करण्याकडे तरुणाईचा कल आहे.  परंतु अलिकडच्या काळात दहीहंडीच्या निमित्ताने अभिनेत्रींना आणण्याचे फॅड  मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ह्या उत्सवाला काहीसे ओंगळवाणे स्वरूप प्राप्त होत असल्याचे दिसत आहे. ह्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील खुटबाव येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाने पारंपरिक दहीहंडीऐवजी पुस्तकहंडी( दि १८)रोजी आयोजित केली.  पारंपरिक हंडीमध्येच संत तुकाराम, म. फुले, छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची चरित्रे तसेच इंग्रजी शब्दकोश ठेवले. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींसाठी दोन वेगवेगळ्या हंड्या तयार करण्यात आल्या आणि ह्या हंड्या फोडून त्यातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. वाचनाची आवड जोपासण्यासाठी आयोजित केलेल्या ह्या आधुनिक उपक्रमाबद्

#Indapur:विधानसभा व लोक सभेसाठी ५० टक्के आरक्षण मिळवण्यासाठी खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभे राहू - डॉक्टर वर्षा शिवले

Image
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश चिटणीस पदी डॉ. वर्षा शिवले यांची एक मताने निवड महादरबार न्यूज नेटवर्क -  बाळासाहेब सुतार वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वर्षा शिवले यांची नुकतीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली . राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी डॉ. वर्षा शिवले यांना नियुक्तीचे पत्र दिले . वढू बुद्रुक येथील डॉ. शिवले या राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ आसून  यापूर्वी तालुका अध्यक्ष, शासकीय समिती सदस्य, अहमदनगर जिल्हा निरीक्षक, पुणे जिल्हा बँकेचे संचालकपद भूषवित पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवली आहेत, काही दिवसांपूर्वी त्यांनी नुकतेच शरद पवार यांच्यावर आधारित ॲग्री विथ कल्चर हे पुस्तक छापले आहे, डॉ. शिवले यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती केली , तर निवडी नंतर बोलताना वर्षा शिवले म्हणाल्या की शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे अनेक महिलांना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. सामाजिक धोरणामुळे महिलांना

#Baramati:बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशातील पहिली मिरवणूक धनगर समाज सुधारक हरी पिराची धायगुडे यांनी काढली - माजी आमदार अॅड. रामहरी रुपनवर

Image
हरी पिराजी धायगुडे यांनी १९२० साली पहिली धनगर शिक्षण परिषदेची स्थापना बारामतीत करून धनगर समाजाला दिली दिशा.. महादरबार न्यूज नेटवर्क - नवनाथ बोरकर बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशातील पहिली भव्य मिरवणूक धनगर समाजातील हरी पिराजी धायगुडे या व्यक्तीने काढली. या मिरवणुकीला बारामतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता हा विरोध केवळ अस्पृश्यतेच्या कारणामुळे झाला होता मात्र बारामतीकरांच्या विरोधाला झुगारून धनगर समाजाच्या समाज सुधारक हरी पिराजी धायगुडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रेल्वे स्टेशन पासुन ते कचेरी पर्यंत बाजारपेठेतून सन्मानाने मिरवणूक काढली होती.  त्यावेळी हरी धायगुडे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बारामतीकरांचा रोष पत्करावा लागला होता, त्यांना काही दिवस वाळीत देखील टाकण्यात आले होते १९२० साली हरी पिराजी धायगुडे यांनी पहिली धनगर शिक्षण परिषदेची स्थापना बारामतीत करून धनगर समाजाला दिशा देण्याचा त्याकाळी प्रयत्न केला होता यातून हरी पिराजी यांची दूरदृष्टी लक्षात येते हा इतिहास आहे. मात्र हा इतिहास कुठेही पुढे आला नाही असे वक्तव्य विधान परिषदेचे माजी आ

#Solapur:ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने सन्मानित

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील शाळांना विविध पुरस्कार प्रदान केले जातात. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची या शाळेतील स्वच्छता, विद्यालय परिसरातील स्वच्छता, व विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या स्वच्छतेच्या  सर्व सोई-सुविधा शाळेत वापरल्या जात असल्यामुळे सन २०२१-२०२२ सालचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार शाळेला मिळाला. जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. निटवेज. दर्या प्रतिष्ठान संचलित “ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची ” या शाळेचे प्राचार्य मा. ताहेर शेख सर यांनी पुरस्कार स्वीकारला. शाळेला जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय निटवे सर, सेक्रेटरी डॉ. योगिता निटवे मॅडम, संचालक आप्पासाहेब शेंडगे , संजय कोडलकर , हनुमंत माने यांनी शाळेतील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर विशेषकरून स्वच्छता कर्मचारी यांचे अभिनंदन केले. स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची विद्यालयावर पालक व नातेपु

#Indapur:शाळेच्या व गावाच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करणार - तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर

Image
काठी भरतवाडी येथील शाळेसमोर ध्वजारोहण करीत असताना तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर महादरबार न्यूज नेटवर्क -  बाळासाहेब सुतार   काटी भरतवाडी तालुका इंदापूर या ठिकाणी भारतीय 75 वा स्वतंत्र अमृत्व महोत्सवा निमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका आध्यक्षा छायाताई पडसळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हर घर तिरंगा हा उपक्रमही ग्रामस्थांच्या हस्ते राबविण्यात आला. तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर ध्वजारोहणा नंतर बोलत आसताना म्हणाल्या की माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून शाळेच्या व गावच्या विकासासाठी जेवढा विकासासाठी निधी आणता येईल तेवढा जास्त आणण्याचा प्रयत्न  करणार व शिक्षकांनी शाळेमधील विद्यार्थी चांगले घडवीले, परंतु इथून पुढेही असेच संस्कार घडवावेत तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर यांचे ध्वजारोहण प्रसंगी उदगार. इंदापूर तालुका काटी भरतवाडी शाळा या ठिकाणी 75 वा आमृत मोहत्सव साजरा करण्यात आला. गोर गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, वही, पेन, दप्तर, खाण्यासाठी मिठाई व खाऊ याचे देखील या निमित्त छायाताई पडळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 13 ते 15

#Varvand:यवत येथे भारताचा ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -   अक्षता हनमघर यवत येथे भारताच्या ७५वा स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला विध्यार्थीची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीमध्ये  स्वतंत्र भारताच्या घोषणा देत होते यावेळी सर्व शिक्षक वृंद कर्मचारी सहभागी होते  विद्या विकास मंदीर येथे सरपंच समीर दोरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात यावेळी पत्रकार तसेच स्वातंत्र्य माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. दहावीत प्रथम क्रमांक आलेली चेताली युवराज मेहताचा सन्मान करण्यात आला. विद्या विकास मंदिर व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त  सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांनी सुंदर देशभक्तीपर गाणी व नृत्य सादर केले तसेच हजरत बडे शहावली दर्ग्यातील विद्यार्थ्यांनी  देश भक्तीपर गीत झाले. यानंतर ग्रामसभा घेण्यात आली यावेळी  या कार्यक्रमास  सरपंच समीर दोरगे तसेच उपसरपंच सुभाष बापू यादव, जि प सदस्य गणेश क

#Indapur:बावडा ते नरसिंहपुर परिसरात ७५ व्या स्वतंत्रच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध उपक्रम राबवून ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  बाळासाहेब सुतार बावडा ते निरा नरसिंहपुर, तालुका इंदापूर परिसरामध्ये भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र अमृत महोत्सवा निमित्त, या भागातील विद्यालये व ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी हार घर तिरंगा ध्वज शालेय साहित्य वह्या, पेन, विद्यार्थ्यांसाठी दप्तर,  शालेय गणवेश, खाऊ वाटप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. नरसिंहपूर, गिरवी, पिंपरी बुद्रुक, टणु , गोंदी ,ओझरे, लुुमेवाडी, गणेशवाडी, सराटी, बावडा,लिंबोडी, या भागामध्ये विविध उपक्रम राबवून हर घर तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. तर बावडा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया समोर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व बावडा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सरपंच किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सराटी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ या विद्यालयाच्या समोर पुणे जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या, आध्यक्षतेखाली माजी सैनिक नवनाथ कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पिंपरी बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालया समोर माजी सरपंच श्रीकांत बोडके यांच्या मा

#Natepute: “ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची येथे जवानांच्या हस्ते ध्वजारोहण”

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मोरोची तालुका माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित डॉ. निटवेज “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची” या शाळेत आज सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी ‌स्वातंत्र्य दिन दिमाखात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोरोची परिसरातील जवानांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.  नंतर विद्यालयातील रायफल परेड चे विद्यार्थी प्रमुख पाहुणे यांना ध्वजारोहण करण्यासाठी घेऊन आले. प्रमुख पाहुणे जवान श्री. सुनिल खांडे सर‌ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी भारतीय सैन्यात सेवा बजावणारे इतर ही जवान उपस्थित होते.यामध्ये श्री. दादा कुमकले सर , श्री.अशोक राऊत सर, श्री.नितिन सुळ सर, श्री.गणेश महानवर सर व सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थी  यांच्या उपस्थित ध्वजारोहण करण्यात आले.नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हाऊस वाईज बॅन्ड च्या तालावर दिमाखदार संचलन सादर केले.  यानंतर विविध कलागुण सादर करण्यात आले.  यामध्ये देशभक्ती पर गीत गायण व नृत्य सादरीकरण करण्यात आले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्

#Baramati:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे मॅरेथॉनचे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  पल्लवी चांदगुडे भारतीय स्वातंत्र्याला  ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने लोकांमध्ये आरोग्य विषयी स्वतः प्रति जागृती निर्माण व्हावी म्हणून  १० किलोमीटर मॅरेथॉन आयोजित  करण्यात आले होते.  मॅरेथॉन मध्ये लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. महिलांनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला.                   सर्व सहभागी मान्यवरांना प्रमाणपत्र देण्यात आले बारामती शहर पोलीस ठाण्याकडे नेमणुकीस असलेले अधिकारी कर्मचारी तसेच दंगल काम्बू पथक यातील कर्मचारी व विविध पोलीस अकॅडमी विद्यार्थी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक पत्रकार बंधू प्रमुख सत्र न्यायाधीश श्रीमती जेपी दरेकर मॅडम प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व अंतर किरे साहेब  या सर्वांनी बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.                      मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अविनाश देशमुख, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश

#Natepute:नातेपुते येथे तिरंगा रॅली संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भारत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त नातेपुते येथे नातेपुते भजनी मंडळ नातेपुते महिला भजनी मंडळ, नातेपुते पत्रकार बंधू, अखंड हरिनाम सप्ताह समिती नातेपुते,यांच्या वतीने मोठ्या उत्साहात दिनांक १४ ऑगस्ट सकाळी साडे नऊ वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली. तिरंगा रॅलीला खंडोबा मंदिर नातेपुते येथून सुरुवात होऊन नातेपुते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, पिराळे चौकातून नगरपंचायत मार्गे शंभू महादेव मंदिर या ठिकाणी या तिरंगा रॅलीची सांगता झाली.   या तिरंगा रॅलीमध्ये जेष्ठ किर्तनकार ह भ प मनोहर महाराज भगत नातेपुते गावचे माजी सरपंच व नगरसेवक अॅड बी वाय राऊत, विजय दादा उराडे, भाजपाचे प्रविण काळे, बिट्टू अण्णा काळे, आर पी आयचे नेते एन के साळवे, संजय मामा उराडे, विजय डफळ, शशिकांत पलंगे, राष्ट्रवादीचे अक्षय भांड, भजनी मंडळाचे साहेबराव देशमुख ,भागवत चांगण, नारायण चांगण, दशरथ चांगण, दयानंद लाळगे , अनिल गरगडे, एकनाथ उराड

#Solapur:महापालिका आवारात शंभर फूट उंच स्तंभावर दिमाखात ध्वजारोहण !

Image
क्रांतिभूमी सोलापुरात नवा इतिहास घडला ! महापालिका आयुक्तांच्या हस्ते झाला शानदार सोहळा !  सोलापूर,दि.13 (जिमाका) :- पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज डौलाने फडकवणाऱ्या आणि 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या क्रांतिभूमी सोलापूर नगरीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवा इतिहास घडला. महापालिकेच्या आवारात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या तब्बल शंभर फुटी उंच स्तंभावर दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. शानदार असा सोहळा देशभक्तीमय वातावरणात शनिवारी सकाळी नऊ वाजता पार पडला. "याची देही याची डोळा" उपस्थितांनी हा स्फूर्तीदायी सोहळा पाहिला. अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये हा क्षण टिपला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार "हर घर तिरंगा" हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. याची जय्यत तयारी महापालिका प्रशासनाने केलीय.  दरम्यान , हा अमृत महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या संकल्पनेतून महापालिका आवारात 100 फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तं

#Baramati: बचत गटाच्या माध्यमातून महिलांची यशस्वी उद्योजक होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - पल्लवी चांदगुडे इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील कित्येक महिला ज्यांनी बचत गट चालू करून एक यशस्वी उद्योजकाच्या दृष्टीने वाटचाल चालू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे . स्त्री शक्ती महिला स्वयंसहाय्यता समूह आणि भिमाई महिला स्वयंसहायता समूह या बचत गटातील महिलांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान पुणे यांच्या मार्गदर्शनाने बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत ग्रामीण महिला व बालविकास  मंडळ या संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.        ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचे नीलम जाधव , राम कांबळे यांच्या मार्गदर्शनाने समूहातील महिलांनी एकत्र येऊन रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राख्या बनवल्या आहेत. महिलांनी इंदापूर तालुक्यातील लासुरने ,भवानीनगर येथे स्टॉल लावून राख्यांची विक्री केली आहे. बचत गटातून घेतलेल्या पैशातून राख्या बनवून विक्री केल्यामुळे त्यांना त्याचा दुप्पट मोबदला मिळालेला आहे.