Posts

Showing posts from January, 2023

#Natepute:गणेश घुले यांचे आयडीबीआय बँकेचे विरोधात अमरण उपोषण

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -  नातेपुते येथील गणेश मल्हारी घुले यांचे खादी ग्राम उद्योग महामंडळाकडून व्यवसायसाठी मंजूर होऊन आलेले कर्ज प्रकरण आयडीबीआय बँक देत नसल्याने आयडीबीआय बँकेचे शाखा मॕनेजर यांच्या विरोधात दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिना पासून नातेपुते येथील आयडीबीआय बँकेच्या समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. गणेश घुले यांनी उपोषणापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र व्यवहार केला असून पत्रामध्ये म्हटले आहे की अनेक बँका बेरोजगार युवकांना शासनाच्या महामंडळाकडून  मंजूर होऊन आलेले कर्ज प्रकरणे देत नाहीत गणेश घुले यांनी सोलापूर खाद्यी ग्रामोद्योग महामंडळ  यांचेकडे रु.२५ लाख कर्जास अर्ज केला ते प्रकरण नातेपुते येथील आयडीबीआय बँकेकडे   पुढील प्रक्रियेसाठी आले आहे.परंतु आयडीबीआय बँकेचे मॕनेजर टाळाटाळ करत आहेत  मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असे  गणेश घुले यांनी सांगितले. सदर प्रकरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

#Natepte:महा किड्स चे ध्वजारोहण नवनिर्वाचित सदस्य सौ.निशाताई सरगर यांच्या हस्ते

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -  दि.26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण महा किड्स च्या नवनिर्वाचित सदस्या व प्रमुख पाहुण्या सौ.निशाताई सरगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सौ.सरगर यांनी संस्था कोरोनानंतर नवीन उभारी घेत आहे. सर्व पालक, शिक्षक, आणि सर्व  सदस्य मिळून  झालेले नुकसान येत्या काळात  भरुन काढू व संस्था पूर्वपदावर आनन्यास  सिर्वोत्तपरी  मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले. महिलांसाठी हळदी-कुक, व सर्वांसाठी तिळगुळ कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्व पालकांनी  उस्फुर्त सहभाग घेतला. स्कूल मधील मुलांनी कवायत आणि भाषणे केली. प्री-प्रायमरी गटातून प्रथम विकास नामदेव पवार, द्वितीय शंभूराज अंकुश पांढरे, तृतीय स्वराज संदीप कदम तर प्राथमिक विभागातुन प्रथम आरुष सुशील गांधी, द्वितीय आर्या राजेंद्र मुंजी, तृतीय श्रीशा शंकर बरडकर यांना देण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्री.शिवशंकर पांढरे, डॉ.अंकुश मोटे, श्री.जितेंद्र साळी, श्री सिताराम पांढरे, सौ अलका पांढरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे सर यांनी केले. तसेच समस्त शिक्ष

#Pune:लघुपट हा समाजाचा आरसा ; युवा पिढीला व्यक्त होण्याचे प्रभावी व्यासपीठ म्हणजे लघुपट - अभिनेता सिद्धार्थ भोकरे

Image
जेष्ठ रंगकर्मी जयमाला इनामदार जीवनगौरव पुरस्काने सन्मानीत ; माहेरच्या सन्मानाने इनामदार भावुक महादरबार न्यूज नेटवर्क  -  विलास गुरव लघुपट हा समाजाचा आरसा आहे. समाजातील प्रत्येक घटकतील घडामोड लघुपटातून प्रभावीपणे मांडली जाते. युवा पिढीला व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे लघुपट होय असे प्रतिपादन अभिनेता सिद्धार्थ भोकरे यांनी केले. युवा संवाद सामाजिक संस्था आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय युवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. 'युवा कलाकारांनी लघुपट या प्रभावी माध्यमाकडे गांभीर्याने बघायला हवे.लघुपट ऑस्करला जाऊ शकतो याची माहिती लघुपट निर्मात्यांना होत नाही.यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काम करते आहे.नवख्या कलाकारांना कलाक्षेत्रात येणाऱ्या कोणत्याही अडचणीला चिटपट महामंडळ सदैव कटिबद्ध आहे.कलाकारांनी कलेची सेवा करत रहावी.असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले.युवा संवाद सामाजिक संस्था आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय युवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन कै. अभिजित कदम विरंगुळा केंद्र आंबेगाव बुद्रु

#Chiplun:आगवे ग्रामपंचायत सभागृहाचे उद्घाटन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या उपस्थित पार पडले

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -    चिपळूण तालुक्यातील आगवे गावात ग्रामपंचायत इमारतीवर असणा-या जागेत सभागृह व्हावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती जेणेकरुन ग्रामपंचायत मध्ये होणा-या सभा व इतर कार्यक्रमास पुरेशी जागा उपलब्ध व्हावी. १५ वित्त आयोग व ग्रामपंचायत फंड याचा वापर करुन येथे नवीन ग्रामपंचायत सभागृह बांधण्यात आला त्याचे उद्घाटन आमदार शेखर निकम सर यांच्या उपस्थित पार पडले. आमदार शेखर निकम  यांनी गाव विकास दृष्टीने मार्गदर्शनपर भाषण करताना ग्रामस्थांनी मागणी केलेल्या विकास कामांबाबत पाणी योजना, व्यायाम शाळा, रस्ते हि कामे विविध योजनेतुन पुर्ण करण्याबाबत ग्रामस्थांना अश्वासीत केले. यावेळी भुवड सर, पूजा निकम, सिताराम कदम, जयंत घडशी (सरपंच), अनिकेत भंडारी (उपसरपंच), श्रीराम हुमणे (तंटामुक्ती अध्यक्ष), वसंत चव्हाण (पोलीस पाटील), भागवत (ग्रामसेवक), सोनाली चव्हाण, स्नेहा राणीम, शशिकांत राणीम, भुवड सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, अशा सेविका व गावातील गावकरी मंडळी इ. उपस्थित होते.

#Indapur:कळंब काॅलेज 94-96 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह सोहळा समारंभाचे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -    कळंब / वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयाच्या 1991-92 ते 1992-93 व कळंब काॅलेजच्या 93-94, 94-95, 95-96 सध्याचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या कला शाखेच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थींनीचा स्नेह सोहळा समारंभ रविवार, दि. 29 जानेवारी रोजी कळंब ( वालचंदनगर ) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बळीराजा सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन सुभाष गायकवाड, संजय माने, मनोज देवडीकर, नितीन बल्लाळ, जगन्नाथ रणवरे, सुनिल/ शहाजीराजे भोसले, शंकर रणसिंग, उदय बर्गे, आप्पासाहेब मानकरी, अ‍ॅड.राजेंद्र शिणगारे, संतोष रणसिंग, भरत भगत, बाळासाहेब शिंदे, मंगल लावंड/काकडे, राजश्री ओव्हाळ/साळवे आदिंनी केले आहे. स्नेह सोहळा समारंभात सकाळी 9 ते 10 स्वागत व फोटो शुट , 10 ते 10.30 चहा व नाष्टा, 10.30 ते 12 ओळख व प्रमुख अतिथींचे मनोगत, दुपारी 12.30 ते 1.30 स्नहभोजन, 2 ते 4 मुक्त संवाद, स्मरण चिन्ह वितरण व आभार, 4 ते 5 शाळा व महाविद्यालय भेट व निरोप याप्रमाणे समारंभाची रूपरेषा असल्याचे व सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी क

#Natepute:रुग्णालयाच्या कॅम्पस मध्ये रुग्ण आला की आता मी बरा होईन असा विश्वास रुग्णाला वाटावा असे काम करा - शिवाजीराव सावंत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -      ग्रामीण रुग्णालयाच्या कॅम्पस मध्ये रुग्ण आला की आता मी बरा होईन हा विश्वास वाटावा असे वर्तन आणि काम सर्वांनी करावे तुमच्याकडून रुग्णाला निम्मा धीर आला पाहिजे हा सर्व स्टाफ माझ्यासाठी काम करत आहे असे रुग्णाला वाटले पाहिजे आलेल्या पेशंटला आधार देण्याचे काम करा त्या पेशंटला आत्मविश्वास व आधार वाटला पाहिजे असे वागा  ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला चांगल्या सेवा देऊन  आरोग्यमंत्र्यांनी  रुग्ण सेवे बाबतचा केलेला संकल्प थडीस न्या असे प्रतिपादन बाळासाहेबांचे शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य  शिवाजीराव सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात तत्काळ मंजुरी देऊन केलेल्या रक्ताच्या ऑटो तपासणी यंत्राच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या  वेळी केले. पुढे बोलताना शिवाजी सावंत म्हणाले आरोग्य मंत्री यांनी पहिली भेट नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयाला देऊन मंत्री महोदयांनी सर्व रुग्णालय फिरून बघितले  होते. आरोग्य मंत्री यांची सवय आहे प्रत्य

#Natepute:साईराज ननवरे यांची गरूड भरारी,राज्यात दूसरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -       नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय वूशु स्पर्धेत  येथील डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशालेतील साईराज प्रदिप (बाबा) ननवरे यांनी  राज्यात  द्वितीय क्रमांक  पटकावला. साईराज यास राजेंद्र काळे, अमोल पिसे,सतिश राऊत यानी मार्गदर्शन केले.       या यशाबद्दल नातेपुते एज्यूकेशनसोसायटीचे मार्गदर्शक बाबाराजे देशमूख,चेअरमन डाॅ.एम.पी.मोरे,सेक्रेटरी विरेंद्र दावडा,सभापती मामासाहेब पांढरे, सहसचिव संतोष काळे, अॅड.डी.एन.काळे संचालक ,धैर्यशील देशमूख, शिवाजीराव पिसाळ,बाहूबली चंकेश्वरा,अरविंद पाठक,महेश शेटे, मालोजीराजे देशमूख सागर गांधी, वर्धमान दोशी,नंदन दाते,बाबा बोडरे, मूख्याध्यापक प्रविण बडवे, उपमूख्याध्यापक विठ्ठलपिसे,पर्यवेक्षक दत्ताञय यादव,विनायक देशपांडे,सांस्कृतिक विभाग प्रमूख सजय पवार यांनी कौतूक केले.

#Natepute:चंद्रप्रभू स्कूल सामाजिक उपक्रमात ही आग्रेसर - नगराध्यक्षा सौ. उत्कर्षाराणी पलंगे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -       दरवर्षी प्रमाणे चंद्रप्रभू इंग्लिश मेडीयम स्कूल, नातेपुते याठिकाणी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नातेपुते नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ. उत्कर्षाराणी पलंगे , नगरसेविका सौ. संगीता काळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी चंद्रप्रभू स्कूल सामाजिक उपक्रमात ही आग्रेसर असल्याचे सौ, पलंगे म्हणाल्या. यावेळी नातेपुते शहरातील महिला डॉक्टर, शिक्षीका, आधिकरी सह मातापालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सौ. अर्चना गांधी, सौ. वर्षा दवाडा, सौ. रेवती दोशी, सौ.सारिका गांधी शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. शितल ढोपे मॅडम, पर्यवेक्षिका सौ. मुजावर ,प्री-प्रायमरी सुपरवायझर सौ.पल्लवी कुलकर्णी सह सर्व महिला शिक्षीका उपस्थित होत्या. यावेळी आगळे वेगळे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. चिठीत लिहलेल्या नावावरून गाणी म्हणणे, उखाणे घेणे, संगीत खुर्ची यासारखे खेळ घेण्यात आले. यावेळी महिलांना वाण देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुंदर अयोजन नियोजन केले होते. त्यामुळे उपस्थित महिलांनी शाळे

#Natepute:नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी बारामती येथील कृषी प्रदर्शन "कृषिक २०२३" ला सदिच्छा भेट दिली

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -       नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयाचे पिक शास्ञ विभागाच्या  विद्यार्थ्यांनी बारामती  येथील  प्रदर्शन "कृषिक २०२३" ला सदिच्छा भेट दिली.त्याठिकाणी इस्त्राईल पद्धतीची शेती व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेतली.                                         ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.निलेश नलावडे  यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना शेती ही आता पारंपारिक पद्धतीने करण्याऐवजी नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे असा सल्ला दिला .                              सदर भेटीचे आयोजन नातेपुते कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य.भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली,पिक शास्ञ विभागाचे प्रा.श्री.अमोल जावीर व   रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका.संगिता पालवे  यांनी केले.

#Malshiras:महाराष्ट्र यशवंत सेनेच्या माळशिरस तालुका युवक अध्यक्ष पदी सुभाष नरुटे यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -       महाराष्ट्र यशवंत सेनेच्या माळशिरस तालुका युवक अध्यक्ष पदी  सुभाष नरुटे यांची निवड. महाराष्ट्र यशवंत सेना संस्थापक अध्यक्ष राजू (दादा) झंजे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र यशवंत सेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आकाश होनमाने यांनी अकलूज येथील शासकीय विश्रामगृह अकलूज येथे दिले व सामाजिक कार्य आपल्या हातून घडो समाजाचे प्रश्न आपण  शासन दरबारी मांडून समाजास न्याय द्यावा व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी लक्ष्मण (तात्या) नरुटे सुदाम महाराज आवारे , अविनाश सावंत , सुनील जाधव उपस्थित होते..

#Natepte:साईराज ननवरे यांची बाॅक्सिंग स्पर्धेत राज्यपातळीवर निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते येथील डाॅ.बाळकृष्ण जयवंत दाते प्रशालेतील साईराज बाबा ननवरे यांची बाॅक्सिंग स्पर्धेत राज्यपातळीवर निवड झाली आहे.           पुणे येथे घेण्यात आलेल्या शालेय विभागीय स्पर्धेत निवड करण्यात आली,यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेत धर्मराज जाधव,प्रतिक राऊत,रूषीकेश वाघमारे,यानी तृतीय क्रमाक मिळवला.         विजयी खेळाडूचे माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख,चेअरमन डाॅ.एम.पी.मोरे,सेक्रेटरी विरेंद्र दावडा,सभापती मामासाहेब पांढरे, मूख्याध्यापक प्रविण बडवे,उपमूख्याध्यापक विठ्ठल पिसे,पर्यवेक्षक दत्ताञय यादव,विनायक देशपांडे, क्रिडा शिक्षक राजेंद्र काळे,अमोल पिसे, रितू पिसे,सतिश राऊत,सांस्कृतिक विभाग प्रमूख संजय पवार यांनी अभिनंदन केले.

#Natepute:ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमधील मृणाल मोरे ची इस्रो येथे विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - ग्रामीण भागातील विदयार्थ्यांमध्ये संशोधनाची रुची निर्माण व्हावी तसेच, ग्रामीण विदयार्थ्यांना उच्च तंत्रज्ञान व संशोधन संस्था बघता याव्यात, यासाठी मागील वर्षी नोबेल फाऊंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन जळगाव द्वारा राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न झालेली होती या परीक्षेच्या मुलाखतीचा अंतिम निकाल दि. 16 जानेवारी रोजी संध्याकाळी जाहीर करण्यात आला. राज्यभरातून बसलेल्या विदयार्थ्यानमधून अंतिम 61 जणांची निवड करण्यात आली. यात सोलापूर जिल्हयातून प्रथम क्रमांकाने तर राज्य स्तरावरून 14 वा क्रमांकाने ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची मधील मृणाल मोरे इ ७ वी हिची निवड झाली आहे.  या अभ्यास दौऱ्यात ईस्त्रो स्पेस लॅब, आयआयटी, प्लाजमा अनुसंधान संस्था व इतर विज्ञान अभ्यासक्रम  संदर्भात संस्थांना भेट देणार. तसेच विद्यार्थी विज्ञान मंथन NCERT, दिल्ली यांनी आयोजित केलेल्या National level science exam मध्येही  तिचा सोलापूर जिल्हयात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच या परिक्षेत मौर्य निटवे यानेही सहभाग नोंदविला. या दोघांचा ग्लोबल इंटरनॅशनल

#Indapur:कळस-वालचंदनगर जिल्हा परिषद गटामध्ये प्रस्थापितांना राष्ट्रीय समाज पक्ष देणार यंदा दणका

Image
आकाश पवार यांच्या रूपांने नवीन जिल्हा परिषद सदस्य होणार असल्याचे सर्वसामान्य युवकांमध्ये चर्चा महादरबार न्यूज नेटवर्क - श्री क्षेत्र पंढरपुर नगरी मध्ये राष्ट्रीय समाज पक्षांच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यात त्यागी नेतृत्व महादेवरावजी जानकर साहेब यांनी आकाश पवार यांचे नाव घेत राजकारणातील अनेक किस्से सांगितल्यामुळे कळस-वा.नगर जिल्हा परिषद गटातील प्रस्थापित राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत अशी चर्चा गावा-गावात सुरू आहेत. आकाश पवार हे कळंब ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी भाऊ पवार यांचे चिरंजीव असून त्यानी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षांमध्ये गेली १३ वर्षे काम करून आपले राजकारणात वेगळी ओळख निर्माण केले , असून त्यांना कोणत्याही राजकीय वारस नसताना २०१७ मध्ये निमगाव -केतकी पंचायत समिती गणामधून राष्ट्रीय समाज पक्षांचे उमेदवारी देऊन त्यांना त्या गणांमध्ये ७३० मतदान पडले होते व प्रस्थापितांच्या बुडाला लाग लावून त्यांनी पक्षांनी ठेवलेला विश्वास सार्थ करुन दाखवला व शेती महामंडळाच्या कामगारांच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी तत्कालीन महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यां

#Natepte:चित्रकला स्पर्धेत अर्शचे घवघवीत यश

Image
          महादरबार न्यूज नेटवर्क  -                       विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी2022-23 स्पर्धे अंतर्गत  तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत अर्श फिरोज आतार याने यश संपादन केले.सन 2022 23 मध्ये टॅलेंट हंट तालुकास्तरीयचित्रकला स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा देवबासूळ वस्ती शाळेचा विद्यार्थी अर्श फिरोज आत्तार इयत्ता चौथी याने तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला या स्पर्धेत तालुक्यातील 27 केंद्रातून विद्यार्थी आले होते या स्पर्धा माळशिरस बी आर सी या ठिकाणी घेण्यात आल्या तसेच दिनांक 18.1.2023 रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.            जिल्हा परिषद शाळा देवबासूळ वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर, काळे मॅडम, मुजावर मॅडम तसेच काळुबे मॅडम यांनी त्याला मोलाचे मार्गदर्शन केले .     तसेच सोमनाथ दडस, रुपनवर सर , सोहम रुपनवर यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय परीक्षेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

#Pune:शिवसेना प्रवक्ते , राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, प्राध्यापक माननीय लक्ष्मण हाके साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Image
#Pune:शिवसेना प्रवक्ते , राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, प्राध्यापक माननीय लक्ष्मण हाके साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक हनुमंत माने पाटील संपादक साप्ताहिक महादरबार , विकास सोनवलकर पाटील पत्रकार फलटण

#Natepute:महा किड्स मध्ये महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - 12 जानेवारी रोजी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती, पत्रकार दिन, आणि सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख  पाहुणे म्हणून ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.श्रीकांतजी बाविस्कर होते. तसेच  अभिमन्यू आठवले, विलास भोसले, राजुभाई नदाफ उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर पांढरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषण केले. यावेळी महा  किड्स  मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची सुमारे 50 पुस्तकांचे प्रमुख पाहुणे व विद्यार्थी यांच्यासाठी प्रदर्शन मांडण्यात आले होते! प्रमुख पाहुण्यांनी संघर्ष हा समृध्दीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे असा संदेश दिला. पूर्व प्राथमिक गटातून स्वामी विवेकानंद वेशभूष प्रथम क्रमांक असद फय्याज मुलांनी, द्वितीय  अर्जुन पवार,  सावित्रीबाई फुले वेशभूषा प्रथम क्रमांक नम्रता गणेश पवार प राजमाता जिजाऊ वेशभूषा प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक आर्या राजेंद्र मुंजी, पत्रकार वेशभूषा द्वितीय वेदांत राजेंद्र वाघमोडे, तृतीय आरोही सतिश झंजे यांना देण्यात आला!  पूर्व प्राथ

#Pune:आ. रोहित पवारांचा युवा केंद्रित सामाजिक उपक्रम महाराष्ट्र व्हिजन फोरमला सुरुवात

Image
महाराष्ट्र दिनी युवांनी बनवलेले महाराष्ट्राचे  व्हिजन डॉक्यूमेंट होणार सादर महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  महाराष्ट्रातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही ४० वर्षाखालील नागरिकांची असली तरी सार्वजनिक धोरण-निर्धारण यंत्रणेत युवांचा सहभाग अत्यल्प आहे. विधिमंडळ आणि संसदेतही ४० वर्षांखालील लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधीत्वही कमीच आहे. त्यामुळे शासन आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेत याच युवांनी अधिकाधिक योगदान देऊन महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’ (MVF) ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी आज पुणे येथे पुणे युथ क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. मात्र, SDG इंडिया इंडेक्स – २०२० (क्रमांक ९), सामाजिक प्रगती निर्देशांक (क्रमांक २९) अशा विविध निर्देशांकामधून महाराष्ट्र बाहेर पडला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही ४० वर्षाखालील युवांची आहे. मात्र, सार्वजनिक धोरण आणि नियंत्रण या यंत्रणेत युवा वर्गाचा सहभाग हा अत्यल्प आहे. तर दुसरीकडे संसद आणि विध

#Natepute:बाळासाहेबांची शिवसेना माळशिरस तालुका यांच्यावतीने राजमाता जिजाऊ आईसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त अभिवादन

Image
जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मुलींच्या संघाचा केला सन्मान महादरबार न्यूज नेटवर्क - फडतरी तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडतरी येथे बाळासाहेबांची शिवसेना माळशिरस तालुका अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील तसेच त्यांचे सहकारी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडतरी मोठा गट (मुली) यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये  प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्या पूर्ण टीमचे प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्या शाळेमधील एका विद्यार्थिनीचा तालुका चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिचे हे अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती राजकुमार हिवरकर पाटील , दादा मुलाणी , जावेद मुलाणी , पोपट शिंदे ,  शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

#Natepute:नातेपुते येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय भांड यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -    नातेपुते येथे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय भांड यांच्या वतीने मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन नातेपुते येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते अरुण पांढरे, साईराज गॅस एजन्सीचे आप्पासाहेब उर्फ नितीन भांड, अक्षय चौगुले, रियाज शेख, संकेत लाळगे उपस्थित होते यावेळी अनेक पत्रकार बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले. सन्मान प्रसंगी अक्षय भांड म्हणाले आम्हा तरुण पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नेहमीच पत्रकारांच्या बातमीमुळे मार्गदर्शन लाभत असते समाजामध्ये पारदर्शकता ठेवण्यास पत्रकार बांधवांचे मोठे योगदान आहे येथून पुढेही आम्हाला काम करण्यास पत्रकाराकडून प्रोत्साहन लाभावे.

#Natepte:हनूमान विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची 'इन्स्पायर अवॉर्ड’ साठी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -    भारत सरकारतर्फे आयोजित प्रतिष्ठित 'इन्स्पायर अवॉर्ड' साठी शालेयस्तरावरील नवकल्पना असणाऱ्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाते. यावर्षीच्या  शिदेवाडी ता माळशिरस येथील रयत शिक्षण संस्थेच्या हनूमान विद्यालयातील शिवांजली मूळीक,जाधव,कादबंरी पवार या तीन विद्यार्थ्यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  इन्स्पायर अवॉर्डच्या अधिकृत वेबसाईटवरून या विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये इतकी रक्कम या विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नवकल्पनेसाठी मिळणार आहेत.        भारताने जगाचे नेतृत्व करावे व विश्वगुरु बनावे यासाठी भारत सरकार इनोव्हेशन अर्थात नवकल्पनेवर लक्ष केंद्रित आहे करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही वर्षापासून भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे.  विद्यार्थ्यांनी हे उत्तुंग यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना  सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.         या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आखाडे,सुर्यवंशी,बापुराव मूळीक,राजेंद्र पवार,

#Natepte:जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत फडतरी जिल्हा परिषद शाळेने मिळवला प्रथम क्रमांक

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - कोर्टी तालुका पंढरपूर येथे दिनांक - 7/1/ 2023 रोजी जिल्हा परिषद सोलापूर आयोजित जिल्हा परिषदेच्या शालेय मुलांच्या क्रीडा स्पर्धे अंतर्गत मोठा गट मुलींचा संघ कबड्डी या क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडतरी तालुका माळशिरस प्रथम क्रमांक मिळवून यशस्वी झाला. या संघाने केंद्र स्तर , बीट स्तर तालुकास्तर व जिल्हास्तर असा खडतर प्रवास करून घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी देशमुख साहेब, विस्तार अधिकारी करडे साहेब, केंद्रप्रमुख वंसाळे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ यांनी मिळालेल्या या यशाबद्दल कौतुक केले.

#Natepte:Dr.Nitave’s ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची मध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मोरोची तालुका माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची” या शाळेत आज सोमवार दिनांक 09 जानेवारी 2023 रोजी‌ नातेपुते परिसरातील विविध वर्तमान पत्रांचे संपादक, वार्ताहर , यांचा सत्कार पत्रकार दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला नातेपुते  येथिल जेष्ठ पत्रकार श्री.श्रीकांत बाविस्कर, लतिफ नदाफ यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी परिसरातील संपादक, वार्ताहर , विद्यालयाचे चेअरमन डॉ. दत्तात्रय निटवे सर प्राचार्य ताहेर शेख सर, उपप्राचार्य जिलानी आतार सर व्यासपीठावर उपस्थित होते.नंतर विद्यालयात उपस्थित सर्व पाहुण्यांचा विद्यालयाचे चेअरमन डॉ दत्तात्रय निटवे सर विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर, उपप्राचार्य जिलानी आतार सर,व विद्यालयातील शिक्षक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल महाराष्ट्र या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रद

#Natepute:श्रीकांत बाविस्कर यांची ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Image
  महादरबार न्यूज नेटवर्क - ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल महाराष्ट्र या नोंदणीकृत राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नातेपुते येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत उत्तम बाविस्कर यांची  सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनी निवड झाली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी पत्र देऊन बाविस्कर यांची निवड जाहीर केली श्रीकांत बाविस्कर हे गेल्या २५ वर्षापासून पत्रकार क्षेत्रात असून त्यांनी अनेक नामांकित दैनिकात पत्रकार म्हणून काम केले आहे आणि सध्याही करीत आहेत. निवडीनंतर श्रीकांत बाविस्कर म्हणाले ए जी एफ सी या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली  असून संघटनेच्या ध्येयधोरणानुसार सर्वांना बरोबर घेऊन संघटनेचे काम करणार आहे.

#Solapur:वंचित, गोरगरीबांना आरोग्य योजनांची माहिती द्यावी - उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. राधाकृष्ण पवार

Image
सोलापूर, दि. 7 (जि. मा. का.) :  केंद्र व राज्य शासन दरवर्षी आरोग्य विषयक योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करीत असते. परंतु, लोकांना या योजनांची माहिती नसल्यामुळे ते लाभापासून वंचित राहतात. महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनांच्या रूपाने लोकांना एक संजीवनी मिळाली आहे. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून वंचित व गोरगरीब गरजूंना शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत करा, अशा सूचना उपसंचालक (आरोग्य सेवा), पुणे डॉ. राधाकृष्ण पवार यांनी केल्या. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.  यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. पिंपळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुधभाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय कार्यक्रम समन्वयक तसेच जिल्हास