Posts

Showing posts from July, 2023

#Mumbai:आ. शेखर निकम यांनी मांडल्या कृषी मंत्र्यांसमोर आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव मा‌.  कृषी मंत्री महोदयांनी मा. सभापती विधान परिषद यांचे दालन क्र. 145 पहिला मजला विधान भवन मुबंई येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मंत्री महोदय, संबंधित आमदार, सचिव, आयुक्त, संचालक, सह संचालक, कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत या विषयी सखोल चर्चा झाली. आमदार शेखर निकम यांनी या बैठकीत आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या व प्रक्रिया उद्योग याबाबत अभ्यासपूर्ण अड अडचणी मांडल्या. यामध्ये आंबा फळ पीक विकास, काजू फळ पीक विकास, व माझा शेतकरी मी त्याच्या बांधावर हे विषय बैठकीत मांडले. बैठकीत काजू फळ पिकाच्या लागवडी पासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत येणाऱ्या अडचणी विचारत घेऊन सर्वकष विकासाचे निश्चित केलेल्या धोरणाचा शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणेसाठी उपाय योजना ठरविण्यात आल्या. यावेळी मा.ना.श्री. धनंजयजी मुंढे, मंत्री (कृषी), मा.ना.श्री. उदय सामंत, मंत्री (उद्योग),  मा.ना. श्री. अदिती तटकरे, मंत्री (महिला व बालकल्याण) , आमदार राजन साळवी, आमदार नितेश राणे, आमदार अनिकेत तटकरे   , आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, (विपस), , मा

#Malshiras:पिलीव येथील महालक्ष्मी देवीच्या विकासासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधी

Image
    महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील पिलीव  येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान  असलेल्या  महालक्ष्मी  देवी आहे.मात्र याठिकाणी  कसल्याही प्रकारच्या  सुविधा  उपलब्ध  नाहीत .यासाठी  आ रामभाऊ सातपुते  यांच्या  विशेष  प्रयत्नाने दोन कोटी रुपये  विकास  निधी  उपलब्ध  करुन  दिला आहे. मात्र याठिकाणी  भक्त  निवास,सुलभ शौचालय  ,रस्ते व इतर  सुविधा उपलब्ध  करुन  देणयासाठी  जागाच उपलब्ध  नाही. याठिकाणी  दोनशे  एकराच्या  आसपास  इनामी जमीनी आहेत .याठिकाणी  फेब्रुवारी  - मार्च  महीन्यात  जवळपास  पंधरा दिवस  मोठी यात्रा  भरते या यात्रेला कर्नाटक, आंध्र प्रदेश  व इतर जिल्हातुन लाखो भाविक व व्यापारी  येतात  परंतु  याठिकाणी  एवढया वर्ष  यात्रा भरुनही कसल्याही प्रकारच्या  मुलभुत  सुविधा  उपलब्ध  नाहीत. याठिकाणी  २०० एकराच्या आसपास इनामी जमीन आहे पण  तरीही  जागा देत नसल्यामुळे  सोयीसुविधा  उपलब्ध  करुन  देणे  शक्य नाही. याठिकाणी  भविष्यात  मोठी दुर्घटना  घडु शकते.याबाबत  तालूकयाचे आ रामभाऊ सातपुते यांनी  यात्रेच्या  ठिकाणी  आवश्यक  सुविधा उपलब्ध करुन  यात्रेचे योग्य  नियोज

#Yavat:यवत येथे पुणे सोलापूर मुख्य रस्ता व सर्विस रस्त्यांची दुर्दशा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथे सोलापूरच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्यावरच विठ्ठल चहाच्या समोर  खड्डेच खड्डे आहेत. मुख्य रस्त्यावरच खड्डे असल्याने वाहन आंचालकांची  वाहन चालवताना कसरत होत असते या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रशासन याबाबत काहीच कारवाई करत नाही जिथे खड्डे पडलेले तेथे सोलापूरच्या दिशेने जाताना सर्विस रस्ता मुख्य रस्ता एकत्र होतो त्याच्या खड्डे पडले आहेत पुलाचा उतार असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही .येचे मोठा अपघात होण्याची  शक्यता आहे  नागरिकां मधून बाबतीत नाराजी व्यक्त होतआहे . सेवा रस्त्यावर पावसामुळे येणारे पाणी  यवत  येथील सेवा रस्ता सुरू होतो  ते विद्या विकास मंदिर शाळा च्या कडेने  पाऊस  पडला कि  खड्डे असतातच त्यात पाणी जाते साचणाऱ्या पाण्यामुळे जाणाऱ्या लोकांना सेवा रस्त्यावर चालता येत नाही या रस्त्यावर वाहन  गेले कि डबक्यातून पाणी सर्वत्र जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडत असते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वादाचे प्रसंग येत आहे आहेत वारंवार लोकांनी सांगून सुद्धा तोंड प्रशासनाची

#Solapur:जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा होणार

1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर दि.27 (जि.मा.का.) :- महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी 01 ऑगस्ट (महसूल दिन)  ते 07 ऑगष्ट या कालावधीत "महसूल सप्ताह" साजरा करण्यात येणार असून, या कालावधीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखली जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली. "महसूल सप्ताह" निमित्त दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून, महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच  महाराजस्व अभियानातंर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव सन्मान करण्यात येणार आहे. जमीन महसूल अधिनियम कलम 155 खालील ई- हक्क पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे तलाठयामार्फत निकाली क

#Yavat:अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दिल्लीच्या आंदोलनाला दौंड तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून पाठिंबा - मयूर सोळसकर जिल्हा युवक अध्यक्ष यांची माहिती

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दिनांक २५जुलै रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे. यासाठी दौंड तालुक्यातील ६७ ग्रामपंचायत यांनी आपला जाहिर पाठिंबा पत्र तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना दिले आहे आणी सर्व पत्र दिल्ली येथे आंदोलनाला घेऊन जाणार आहेत. त्याच प्रमाणे विद्यमान आमदार राहुल  कुल, माजी आमदार रमेश  थोरात, रा. कॉ. अध्यक्ष अप्पासाहेब पवार आणी बोरमलनाथ देवस्थान ट्रस्ट यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे.अशी माहिती जिल्हा युवक अध्यक्ष मयूरआबा सोळसकर यांनी राहू ग्रामपंचायत येथील पत्रकार परिषद मध्ये दिली. २०१४ साली व २०१६साली दिलेले राज्य सरकारने आरक्षण कोर्टामध्ये टिकले नाही. २०१६ मध्ये राज्यभरामध्ये मराठा क्रांती मोर्चा चे ५८ मोर्चे निघूनही मूळ मागणी प्रलंबित आहे.१९८१ पासून स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील व स्वर्गीय शशिकांत आप्पा पवार यांनी उभा केलेला लढा आजपर्यंत मराठा महासंघ लढत आहे. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप व युवक प्रदेशाध्यक्ष रणजीत दादा जगताप यांच्या मार्गदर्शन

#Yavat:पाटस येथील नागेश्वर विद्यालयचे शिष्यवृत्ती परीक्षेत ११विद्यार्थी पात्र

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप रयत शिक्षण संस्थेचे नागेश्वर विद्यालय व कै. मधुकरराव गंगाजीराव शितोळे ज्युनिअर कॉलेज पाटस येथील इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण११ विद्यार्थी पात्र झाले असून, त्यातील सपकाळ संस्कार माणिक व कु गवळी श्रेया नवनाथ हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. त्यांना शासनाकडून ७५०० रुपये प्रमाणे वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच एन.एम. एम.एस परीक्षेत विद्यालयातील २८ विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी कुमारी खटावकर वैष्णवी महादेव आणि कुमारी गवळी श्रेया नवनाथ हे दोन विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक झाले आहेत त्यांना वार्षिक १२ हजार रुपये प्रमाणे ६० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच नऊ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीधारक झाले असून त्यांना वार्षिक ९५०० प्रमाणे ४७५००रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचे एकूण २५ विद्यार्थी पात्र झाले आहे. सर्व शिष्यवृत्तीधारक पात्र विद्यार्थ्यांचे विभाग प्रमुख सौ.दिवेकर शुभांगी, सौ. रंधवे मनीषा, सौ.थोरात अश्विनी व सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन

#Malshiras:एक राखी सैनिकांसाठी,माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबाने पाठवल्या सीमेवरील सैनिकांना राख्या

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी दिवस रात्र तैनात असलेले सैनिक त्यांच्या कुटुंबियांसोबत कोणतेच सण साजरे करू शकत नाहीत.पुढील महिन्यात येणाऱ्या बहीण- भाऊ यांचया पवित्र नात्यातील "रक्षाबंधन" या सणालाही बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकत नाही, अशा अनेक सैनिक भावांसाठी" एक राखी सैनिकांसाठी " ही संकल्पना मनात रुजवून माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबीयांनी आपल्या स्वतःच्या हाताने तिरंगा कलरमध्ये राख्या तयार करून आपल्या भारत मातेच्या विविध सीमेवरील सैनिकांना पाठवल्या. रक्षाबंधन उत्सव हा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र भारत मातेचे रक्षण करणाऱ्या देशाचे सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबासोबत उत्सवात सहभागी होता येत नाही. परंतु, सीमेवरील सैनिकांना आपल्या बहिणीच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबीयांनी  यंदाही भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी, कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने घरीच  तिरंगा कलर मध्ये एक हजार राख्या तयार केल्या आहेत. आपले सर्वस्व अर्पण करण

#Mumbai:आ. शेखर निकम यांनी कोकणातील कृषीविषयक प्रश्न व योजनांवर मुद्दे उपस्थित करून पावसाळी अधिवेशनात शासनाचे वेधले लक्ष

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी हळद प्रशिक्षण केंद्र, आंबा-काजू बागायतदारांच्या कर्जाचे पुर्नगठनासह व्याज माफी, काजू पिकासंदर्भात केसरकर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी, काजूला हमीभाव, बंधारे, धरणांची दुरुस्ती  आदी मुद्दे तडाखेबंद आवाजात उपस्थित करून कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी मुद्दे मांडताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शासनाने ५२ कृषी योजना सुरू केल्या आहेत. शासनाने हळद लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याकरता हिंगोली येथे हळद संशोधन केंद्र सुरू केले आहे. या निमित्ताने आपली मागणी आहे की, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळदीची लागवड उत्तमपणे केली जात आहे. तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी हळद प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे. जेणेकरून दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी आणखी उत्तमपणे हळदीची लागवड करून आर्थिक उन्नती साधेल, असा विश्वास व्यक्त केला. आंबा-

#Solapur:सोलापूर जिल्ह्यात परिवहन कार्यालयाकडून तपासणी मोहिम

Image
1 हजार 355 खाजगी प्रवासी बसची तपासणी;  9 लाख 52 हजारांचा दंड वसूल सोलापूर दि. 19 (जि.मा.का.) :- समृध्दी महामार्गावर घडलेल्याा घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहनांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खाजगी बस तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. दिनांक 01 ते 18 जुलै 2023 या कालावधीत  1 हजार 355 खाजगी प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. यामध्ये  289 खाजगी प्रवासी बस दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली  असून 9 लाख 52 हजार 968 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिनांक 01 ते 31 जुलै 2023 या कालावधीत खाजगी बस तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी पुणे सोलापूर रोड सावळेश्वर टोलानाका , लातूर- पुणे रोड बार्शी टोलनाका  तसेच कोल्हापूर सोलापूर रोडवर इचगाव टोलानाका येथे वायुवेग पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.  तसेच सीमा तपासणी नाका , नोंदणी व सीमा तपासणी नाका , कात्राळ ( मरवडे) येथे कार्यरत अधिकारी यांच्याकडून मोटारवाहन कायदयातील तरतूदींनुसार दिनांक 01 ते 18 जुलै 2023 य

#Natepute:नातेपुते येथे ५०० मेणबत्या लावून डॉ.आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते ता . माळशिरस येथे लोकशाहीर साहित्यरत्न साहित्य संम्राट डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त ५०० मेणबत्या लावून व पुष्पहार घालून डाॅ.आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी नातेपुते नगरपंचायतचे नगरसेवक नंदुभाऊ लांडगे, भारतीय मातंग युवक संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख केतन यादव,शिवा लांडगे, आदित्य पाटोळे,अफान मुलाणी,ओम पवार, संदीप लांडगे, एकनाथ लांडगे, गणेश लांडगे तसेच यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Mumbai:आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून चिपळूणसाठी साडे पंधरा कोटींचा निधी मंजूर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव कोकणात पडणा-या अतिवृष्टीमुळे तसेच वादळी वा-यामुळे पुरपरिस्थिती तसेच दरड कोसळणे यामुळे खुप मोठ्या प्रमाणात रस्ते, संरक्षक भिंती इत्यादीचे नुकसान होते. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने, व इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर कामे होणे अत्यंत आवश्यक होते व ही कामे तातडीने व्हावी यासाठी मतदार संघातील जनतेचीही सततची मागणी होती. ही मागणी लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांनी याबाबतचा सततचा पाठपुरावा करुन ही कामे होणे किती महत्वाची आहेत याबाबत मा. मंत्री महोदयांना सबळ कारणे देत निधी मंजूर करणेसाठी विनंती केली होती. त्याचाच परिणाम म्हणून 2023-24 पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य बजेट अंतर्गत चिपळूण तालुक्यासाठी रु. 15 कोटी 60 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर झाल्याने आमदार शेखर निकम यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मा. उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार साहेब व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब तसेच मा. पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचे विशेष आभार मानले असुन याबाबत समाधान व

#Yavat:आषाढ महिन्यातील यवत येथील महालक्ष्मीमाता यात्रेची सांगता

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथील श्री महालक्ष्मी मातेचा आषाढ महिन्यातील पौर्णिमेनंतर सुरू होणारा उत्सवाची सांगता आज  शेवटच्या रविवारी झाली  यवत येथील श्री महालक्ष्मी माता प्रसिद्ध आहे .या भागातील नागरिक हा उत्सव जोरदार साजरा करतात .वर्षानुवर्षे येथील देवी चे महात्म्य वाढत  आहे .लोकांना नार्मल टाकण्यासाठी कचरा भांडे ठवले होते. कचरा इतर भांड्यात टाकण्यात यावा सांगण्यात येत होते. आयोजकांकडून स्वच्छतेवर भर देण्यात येत होता. त्या देवीच्या उत्सवात देवीची नारळ फोडणे पेढे प्रसाद ठेवले जातात  पेढे, नारळ ,विक्रेते  आलेले होते .खेळणी इतर दुकाने या परिसरात भरून गेलेली होती मागरिकांची गर्दी होत असल्यामुळे उत्सव अधिकच चांगला होत चाललेला आहे. आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार असल्यामुळे सुट्टी असल्यामुळे आज जास्त प्रमाणात गर्दी होती गर्दीमुळे यवत येथील वातावरण यात्रेसारखे होऊन गेलेले होते.

#Natepute: नातेपुते नगरपंचायतीच्या मुख्यअधिकारी यांना साडी, चोळी, बांगडी व जिलेबी भेट देणार - आप्पासाहेब कर्चे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नातेपुते नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साडी चोळी, बांगडी व जिलेबी भेट देणार असल्याचे निवेदन आज माढा लोकसभेचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी नगरपंचायत नातेपुते यांना दिले आहे . या मध्ये त्यांचे म्हणणे असे आहे की गेल्या वर्षी दि. 22/07/2022 ला मी माझा अर्ज अतिक्रमण कारवाई मध्ये आपण घेतलेले साहीत्य मला माघारी करा. त्याचा रितसर दंड मी भरायला तयार आहे परंतु एक वर्ष आपण उडवा उडवीचे उत्तरे दिले तसेच एक पत्र लेखी दिले व त्यामध्ये आपण असे सांगता की सदर अतिक्रमण पाटबंधारे खात्याच्या जागेत आहे जर ते त्या जागेत होते तर आपण आपल्या मशीनने काढून आपले कर्मचारी लावून आपल्या टॅक्टर मधून कसे घेऊन गेला त्यांचे व्हीडीओ व फेसबुक लाईव्ह माझ्याकडे आहे तरी आपण एक वर्षा मध्ये कारवाई केली नसल्यामुळेच गांधीगीरी मार्गाने आपणास दि 22/07/2023 रोजी साडी चोळी बांगडी व जिलेबी भेट देण्यात येणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

#Baramati:चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या सुवर्ण पेढीने स्त्री सन्मानासाठी बाईपण भारी देवा चित्रपट दाखविला मोफत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.च्या माध्यमातून बारामती विभागामध्ये जवळपास 250 महिला काम करतात. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत शॉप मध्ये काम करून महिलांना घरी देखील जास्तीचा वेळ द्यावा लागतो. अशावेळी या महिलांना विरंगुळा म्हणून सदर सुवर्णपेढीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. महिलांना स्वतःचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. उत्तम काम करणाऱ्या महिलांना रोख स्वरूपात वस्तू स्वरूपात अशी बक्षिसे देखील दिली जातात. यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. या सुवर्ण पेढीमध्ये जवळपास 80% महिला कार्यरत आहेत. सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेला बाई पण भारी देवा हा चित्रपट महिलांच्या कार्यकर्तृत्वावर भाष्य करणारा  चित्रपट आहे व असा चित्रपट अनेक दिवसानंतर  प्रदर्शित झाला आहे. महिला वर्गाने या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे.250 महिलांना या सुवर्णपेढीच्या माध्यमातून मोफत चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चे चेअरमन श्री. किशोरकुमार शहा व सौ.नेहा किशोरकुमार शहा यांच्या कल्पनेतून देण्यात आली आहे. बारामती मधील प्रसिद्ध तारा सिनेमाग

#Natepute:सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी केतन यादव यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भारतीय मातंग युवक संघटने च्या सोलापुर जिल्हा संपर्क प्रमुख " पदी प्रसिध्द गायक मा.श्री.केतन लक्ष्मण यादव यांची निवड भारतीय मातंग युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष , मा.शंकर वाघमारे यांनी केली असुन सदर  निवडीचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष , जेष्ठ साहित्यिक , विचारवंत मा. विठ्ठलजी साठे साहेब यांच्या हस्ते दि.९ जून२०२३ रोजी देण्यात आले . यावेळी प्रदेश संघटक , मा.राजेंद्र भोंडवे , संघटक , मा.पांडूरंग दुबळे इ.कार्यकर्ते उपस्थित होते .

#Yavat:अधिवेशना ला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा मुंबईत झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप मराठ्यांनी आवळली वज्रमूठ! येत्या १७ तारखेला पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हजारोंच्या संख्येने आझाद मैदानावर राहणार उपस्थित. चुना भट्टी मुंबई येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय. येणारे पावसाळी अधिवेशन विविध राजकीय घडामोडींमुळे वादळी ठरणार असल्याचे चिन्हं आहेत. त्यातच मराठा समाज देखील आपल्या ओबीसी आरक्षण मागणी साठी आक्रमक झाला असून मुंबई सह राज्यात हे आंदोलन मोठे करण्यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत आहेत. साहजिकच विधानसभेत देखील त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या १७तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून पहिल्याच दिवशी मराठा समाज मुंबईमध्ये धडकणार आहे. त्यासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक सकल मराठा समाज भवन, चुना भट्टी मुंबई येथे पार पडली. सकल मराठा समाज व मराठ क्रांती मोर्चाचे सक्रिय पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. ओबीसी मधून आरक्षण कसे मिळेल? यावर सखोल मार्गदर्शन केले. सदर बैठकीला मराठा वनवास यात्रा चे आयोजक योगेश केदार यांनी मार्गदर्शन केले. पुन्हा एकदा राज्यात मराठा क्रांती मो

#Chiplun:धामापूर जिल्हा परिषद गटाचा आमदार शेखर निकम यांना जाहीर पाठिंबा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव बदलत्या राजकीय घडामोडी, अजित पवार यांनी भाजप शिवसेना सरकार मध्ये सामील होत उपुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ आणि आमदार निकम यांनी अजित दादा ना दिलेला पाठिंबा या पार्श्वभूमीवर मतदार संघात हा निर्णय किती मान्य आहे हे पाहणं औचित्यच होते.चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात आमदार निकम यांना मात्र पाठिंबा कायम असून राष्ट्रवादीचा मतदार आमदार निकम यांचा पाठीशी ठाम असल्याचे चित्र दिसून येत आहे. चिपळूण पाठोपाठ संगमेश्वर तालुक्यात देखील आमदार निकम यांना पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. खाडीपट्ट्यातील धामापूर जिल्हा  परिषद गट हा आमदार निकम यांचा सोबत असल्याचे चित्र अलीकडच्या कालावधीत दिसून आले आहे.याचं जिल्हा परिषद गटातून सर्व पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आमदार निकम यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर करत आम्ही तुमचा निर्णयाबरोबर आहोत,सर ठरवालं ते धोरण आणि बांधाल ते तोरण आम्ही सदैव तुमचा सोबत अश्या भावना पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात आल्या.      यावेळी उपस्थित जिल्हा युवक उपाध्यक्ष सुशील भायजे,विभाग अध्यक्ष महेश बाष्टे,तालुका उपाध्यक्ष

#Akluj:चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अकलूज शाखेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त माननीय ज्योती माने पाटील माननीय रावसाहेब आप्पा मगर संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना व सौ. मधुमाला मगर, प्रगतशील बागायतदार नानासाहेब लोखंडे, मा. हर्षकुमार फडे सर मा. अनुप्रिता फडे व पंकज फडे प्रसिद्ध उद्योजक, तसेच प्रगतशील बागायतदार बापूसाहेब देशमुख, मा. डॉक्टर राणे सर मा.डॉ.कदम मॅडम मा. डॉ.वैष्णवी शेटे  मा. डॉ. सुरभी देशमुख , मा.डॉ.अजित गांधी , मा. श्रीनिवास कदम पाटील बारामती झटकाचे संपादक, मा. उमेश बनकर मा. प्रदीप कुमार मेहता, मा. रामचंद्र ठवरे संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखाना , श्री आनंद कोकाटे श्री तानाजीराव इंगवले देशमुख श्री गुड्डू लाल शेख श्री अभिजीत फाटे प्रसिद्ध उद्योजक , सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेचे श्री खंडागळे श्री वैभव पवार श्री कोडलिंगे सौ.देंडे मॅडम , क्षीरसागर मॅडम यांचे देखील उपस्थिती लाभली. सर्व उपस्थित मान्यवरांचे सन्मान चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन श्री किशोर कुमार शहा सर यांनी केले यावेळी बारामती क्ल

#Chiplun:आम्ही आमदार शेखर निकम सरांसोबतचं- संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आ. शेखर निकम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा घेतला निर्णय

Image
देवरूखमधील पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी स्पष्ट केली भुमिका महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर- चिपळुणचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगत संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. संगमेश्वर तालुका राष्ट्रवादीतर्फे देवरूखात आज शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीत बंडाळी झाल्यानंतर  संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात सापडले होते. त्यांच्यामध्ये चलबिचल होती. त्यांची भुमिका अद्यापही गुलदस्त्यात होती. तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा नेमका कोणाला पाठींबा आहे. हेच कळत नव्हते. अखेर संगमेश्वर तालुका राष्ट्रवादीच्यावतीने आज शुक्रवारी देवरूख येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांना आपला पाठींबा असल्याची भुमिका स्पष्ट केली. आमदार शेखर न

#Yavat:खडकावर नंदनवन फुलवुन प्रसन्न विध्येचे मंदिर साकारणाऱ्या आदर्श शिक्षक दाम्पत्याचा निरोप समारंभ

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथील माणकोबावाडी येथील शाळेत दि. (०८ )रोजी माणकोबावाडी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने या शाळेतील मा. शिक्षक  सुरेश मेमाणे व लिलाबाई खेडेकर यांची बदली झाल्यामुळे त्यांचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्याबरोबरच या शाळेत नवीन रुजू झालेले शिक्षक लांडगे सर व साळवे सर यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला. गेली १७ वर्ष ज्यांनी या शाळेत अविरत सेवा करून उघड्या माळावरील शाळेला आयएसओ मानांकन मिळवुन दिले असे हे शिक्षक दाम्पत्य सुरेश मेमाणे व लिलाबाई खेडेकर यांनी जेव्हा १७ वर्षापूर्वी येथील शाळेत आले तेव्हा हि शाळा फक्त एका खडकावर दोन वर्गखोली च्या स्वरुपात उन्हाच्या झळा सोसत उभी होती. परंतु हे शिक्षक जेव्हा येथे आले तेव्हा त्यांनी या शाळेचा कायापालट करण्याचा मानस मनात पक्का केला आणि लोकांच्या मनात जागा निर्माण करून शिक्षणाबरोबर पर्यावरण व शुशोभिकरण हि गोष्ट मनात ठेवुन येथे झाडे लावण्याचा प्रयत्न केला एक एक झाड करत येथे असंख्य झाडे मोठी करून एक हरित शाळा निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी साक

#Natepute:मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्त शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माढा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी हिंदु जननायक मराठी हृदय सम्राट राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज जिल्हा परीषद प्राथमिक शाळा पिंपरी व कर्चेवाडी येथील शाळांना वह्या पेन बीस्कीटे वाटप केले . त्यावेळी पिंपरी गावचे युवा सरपंच अविनाश कर्चे मा सरपंच व विद्यमान सदस्य दादासो कर्चे, मा सदस्य सागर कर्चे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष पै शंकर कर्चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, मनसे तालुका सचीव लक्ष्मण नरुटे, मनसे तालुका उपाध्यक्ष रोहीत खाडे, महीला आघाडी तालुका अध्यक्ष मंगल ताई चव्हाण, मनसे नातेपुते प्रसीद्धी प्रमुख दादा भांड  इ. मान्यवर मंडळी उपस्थीत होते. या वेळी बोलताना रोहीत खाडे यांनी सांगीतले दर वर्षी हजारो मुलांना आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन हा उपक्रम माढा लोकसभा अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून व सहकार्यने साजरा करतो. खरोखर माझी मराठी शाळा जगली पाहिजे वाचली पाहीजे आणी त्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करावे लागेल. लवकरच आम्ही येणाऱ्या

#Solapur:सुनील सोनटक्के यांनी घेतला सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार

Image
सोलापूर-दि.04 (जिमाका) :- कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी आज सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा  पदभार घेतला आहे.  श्री. सोनटक्के यांनी यापूर्वी जळगांव माहिती अधिकारी, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी, लातूर जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी  पदाचा अतिरिक्त पदभार तसेच लातूर व कोल्हापूर विभागाचा अतिरिक्त उपसंचालकाचा पदभार  यशस्वीपणे सांभाळला आहे. यावेळी सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयात वरिष्ठ लिपिक अविनाश गरगडे,  शरद नलावडे,  मिलिंद भिंगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी  लिपीक संजय घोडके, वाहनचालक भाऊसाहेब चोरमले, अनिल नलवडे उपस्थित होते.

#Baramati:चंदुकाका सराफ यांनी जपलं गुरुपौर्णिमेचे महत्त्व - हभप नवनाथ कोलवडकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रत्येक माणसाचे आयुष्य गुरुविना जीवन हे निष्काम असते. गुरु शिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती अतिउच्च पदावर करता येत नाही. व चंदुकाका सराफ यांनी गुरुपौर्णिमेच्या महत्त्व जपलं असे प्रतिपादन ह भ प नवनाथ महाराज कोलवडकर यांनी व्यक्त केले. अनन्य साधारण गुरूचे महत्त्व असणाऱ्या या गुरुपौर्णिमेचा औचित साधून चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती शाखेने बारामती परिसरातील शिक्षक प्राध्यापक प्राचार्य व कीर्तनकार यांना खास निमंत्रित करून त्यांचा सन्मान चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चे चेअरमन किशोर कुमार शहा सर व संचालिका नेहा किशोर कुमार शहा भाभी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चा प्रवास दोनशे वर्षाच्या पूर्णत्वाकडे करत आहे. महाराष्ट्रातील असंख्य ग्राहकांचे प्रेम आम्हाला मिळत असल्याचे प्रतिपादन चेअरमन, किशोरकुमार शहा यांनी केले. गुरु पौर्णिमेनिमित्त मळद येथील जिल्हा परिषद शिक्षक, माध्यमिक शिक्षक व प्राध्यापक तसेच हरिभक्त परायण कीर्तनकार महाराज यांना निमंत्रित

#Natepute:माळशिरस तालुक्यात आदरणीय अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर फटाके फोडून जल्लोष साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते ता. माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी मा.अजितदादा पवार यांनी शपथ घेतल्या मुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय भांड व तरूणांनी मिळून दादांच्या निर्णयाचे स्वागत केले अजित दादांन कडे महाराष्ट्र चे विकास पुरुष म्हणून बघितले जाते.त्यामुळे दादांच्या या निर्णया मुळे महाराष्ट्रा चा विकास गतीमान होईल असे मत अक्षय भांड यांनी व्यक्त केले . यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय भांड, अक्षय चौगुले,प्रशांत ठोंबरे, उदय बरडकर, अदित्य पलंगे, ओंकार लाळगे,रियाज शेख,मनोज लांडगे,अक्षय मदने,तुषार साळवे,संग्राम जाधव,संतोष तांबडे, सैरभ सोरटे इ. उपस्थित होते.

#Mumbai:काही झालं तरी मी अजित पवार यांच्या सोबतच - आ. शेखर निकम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार यांना सोडणे शक्य नाही. त्यामुळे मी अजित पवार यांच्या बरोबरच ठाम राहाणार. यावे तरळी पक्का निर्णय घेतला आहे.होणाऱ्या परिणामांचा विचार केलेला नाही, असे स्पष्ट मत चिपळूण-संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे नेते व माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून पक्षाच्या काही आमदारांना बरोबर घेत शिंदे सरकारला पाठिंबा दिला आणि ते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. हे वृत्त चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव शेखर निकम हे आमदार आहेत. कोकणामध्ये रायगडमधून आदिती तटकरे व चिपळूण-संगमेश्वरमधून निकम असे दोनच आमदार असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता होती. त्यात आदिती तटकरे यांना मंत्रिपदाची शपथ मिळाल्याने आ. शेखर निकम यांची भूमिका काय? या बाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. याबाबत बोलताना शेखर निकम म्हणाले आज पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली

#Chiplun:राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा डॉक्टर सेल तालुका चिपळूण यांच्या वतीने आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत डॉक्टर डे संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण खेर्डी येथील हॉटेल मीरा येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा डॉक्टर सेल तालुका चिपळूण यांच्या वतीने आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत डॉक्टर डे संपन्न झाला. याकार्यक्रमाचे औचित्य साधुन डॉक्टरांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव देखील करण्यात आला. 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टरांच्या समर्पण, कार्य, निष्ठा आणि आपल्या जीवनासाठी आणि शेवटी देशासाठी सेवा यांचा सन्मान आणि अभिवादन करण्यासाठी साजरा केला जातो. डॉक्टरांना देवाच्या खालोखालचा दर्जा दिला जातो कारण देव आपल्याला जीवन देतो आणि डॉक्टर आपल्याला ते जीवन निरोगीपणे जगण्यास मदत करतात. मानवी आरोग्यासाठी त्यांचे योगदान तुलना करण्यापलीकडे आहे. डॉक्टर रुग्ण आणि जनतेच्या आरोग्याचे रक्षण आणि प्रचार करतात. हा दिवस सर्व डॉक्टरांचे कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेबद्दल आभार मानण्यासाठी आहे. डॉक्टरांना देव का म्हणतात याची प्रचिती लोकांना कोरोना काळात आली. चिपळूण मध्ये पूर आला त्यावेळी सुद्धा डॉक्टरानी दिलेली सेवा व त्यांचे योगदान खूपच मोठे आहे तसेच इतर लहान म

#Natepute:सोलापूर जिल्ह्यातील महा ई सेवा,आपले सरकार सेवा,सीएससी केंद्रावर कार्यवाही झालीच पाहिजे - विनायक सावंत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -                  महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय सेवा पुरवणारी केंद्र,महा ई सेवा,आपले सरकार सेवा केंद्र,सीएससी अशी अनेक सेवा केंद्रे यांचेमार्फत नागरिकांची होणारी आर्थिक लूट,नागरिकांना दिला जाणारा मानसिक त्रास व शासकीय नियमांचे उल्लंघन यावरती योग्य उपाययोजना करणेबाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता.या तक्रारीबाबत माननीय निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी तात्काळ सोलापूर जिल्ह्यातील सर्व माननीय उपविभागीय अधिकारी व सर्व माननीय तहसिलदार यांना कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्याचे आदेश दिले होते.परंतु वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाला सोलापूर जिल्ह्यातील एकही अधिकारी मानत नाहीत.त्यामुळेच अजूनपर्यंत कार्यवाही सोडूनच द्या साधी चौकशीही केली नाही अशी परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकाही माननीय उपविभागीय अधिकारी तसेच एकाही माननीय तहसिलदार यांनी कोणतीच कार्यवाही न केल्यामुळेच सेवा देणारे केंद्र चालक अजूनही जास्त प्रमाणातच मनमानी कारभार करु लागले आहेत.म्हणून माननीय निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर तसेच माननीय उपविभा