Posts

Showing posts from November, 2023

#Yavat:भिमा पाटस कारखान्याचा पाहिला हप्ता ३००० रूपये जाहीर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप भिमा पाटस कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पाहिला हप्ता ३००० रूपये देण्याचा निर्णय एम आर एन ग्रुप चे अध्यक्ष मुर्गेश निराणी व चेअरमन तथा आमदार अॅड. राहुल कुल यांनी एकत्रित येऊन घेतला असल्याची माहिती चेअरमन तथा आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे. यावेळी बोलताना भिमा - पाटसचे चेअरमन तथा आमदार अॅड. राहुल कुल म्हणाले की, यावर्षी कारखान्यास येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता 3000 रूपये जाहीर  केला आहे. त्यानुसार आजपासून हे बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. कारखान्याच्या मोळीपूजन कार्यक्रमावेळी आमदार अॅड. कुल यांनी इतरांच्या बरोबरीने भीमा पाटस देखील बाजार भाव देईल असे शेतकरी व सभासदांना आश्वासन दिले होते त्यानुसार 3000 रुपये भाव जाहीर करून हे आश्वासन आमदार अॅड. कुल यांनी पूर्ण केले आहे. सध्या भिमा - पाटसकारखाना पुर्ण क्षमतेने सुरु असून आज अखेर ६०,००० मेट्रिक टनाचे गाळप पुर्ण केले आहे. शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस भिमा पाटस कारखान्यास देवुन सहकार्य करावे असे आव्हान ही अॅड. कुल यांनी केले आहे.

#Malshiras:फळवणी हायस्कूल मध्ये सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक पद रिक्त;पालकांचे आमरण उपोषण सुरू

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस फळवणी ता माळशिरस येथे रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण विद्यालय असून इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असून सेमी च्या 6 व मराठी च्या 6 तुकड्या आहेत.येथे फळवणी, कोळेगाव साळमुख,काळमवाडी,आसबे वस्ती येथून शिक्षणासाठी येणारे एकूण 379 मुले व 359 मुली असे 738 विद्यार्थी आहेत.सदर शिक्षण संस्था फळवणी परिसरात नावजलेली असून कायम इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागत आहे.शिक्षक वर्ग अतिशय मेहनत घेत असून विद्यार्थी आणि पालकांचेही त्यांना सहकार्य लाभत आहे. परंतु मागील सहा महिन्यापासून या शाळेत प्रमुख जबाबदारी असलेले मुख्याध्यापक पद रिक्त असून त्याचबरोबर लिपिक पदी रिक्त असल्याने याबाबत पालकांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मुख्याध्यापक व लिपिक पद भरण्यासाठी पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते व पालक जोतीराम आवताडे यांनी फळवणी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयासमोर 28 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मुख्याध्यापक नसल्याने शाळेची शिस्त बिघडत असून पालकांचा शाळेकडे बघण्याचा दृष्

#Yavat:श्री काळभैरव जन्मोत्सव सोहळ्याचे यवतमध्ये आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदीरात (दि२९) पासून श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळाची सुरुवात श्री काळभैरव मंदिरात होणार आहे. यामध्ये जन्माष्टमी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन असे कार्यक्रम होणार आहे .व्यासपीठ चालक ह भ प शंकर महाराज उंडे आळंदी हे राहणार आहेत किर्तन रोज सायंकाळी ९ ते ११या वेळेत होणार आहेत. यामध्ये दि २९  रोजी ह भ प शामसुंदर ढवळे हिंगणी बेरडी यांचे किर्तन होणार आहे दि३० ला ह. भ .प. पोपट महाराज पाटील कासार खेडेकर खानदेश  दि१ रोजी  ह. भ. प. आदिनाथ महाराज लाड आळंदी दि २ रोजी ह .भ. प. सुधाकर महाराज वाघ पैठण दि ३ रोजी ह. भ .प. वैजनाथ महाराज थोरात हिंगोली दि ४ ला ह. भ. प. गंगाराम महाराज राऊत पैठण दि ५ ला दुपारी चार ते सहा वेळेत भव्य दिंडी सोहळा होणार आहे ह. भ. प. माधव महाराज राऊत बीड यांचे श्री काळभैरवनाथ  जन्मोत्सव किर्तन रात्री दहा ते बारा या वेळेत होणार आहे(दि ६) रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत ह. भ. प. प्रकाश महाराज साठे यांचा काल्याचे किर्तन होणार आहे तरी यवत्व पर

#Natepute:शिवसेना भवनावर आणखी एका होतकरू डॉक्टरचा सन्मान

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - कु.प्रवीण संजय जाधव या विद्यार्थ्याला हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पेठ वडगाव कोल्हापूर येथे बी. ए. एम. एस या वैद्यकीय कोर्ससाठी शासकीय कोट्यातून फ्री मध्ये प्रवेश मिळाला. त्याबद्दल त्याचा व  वडील संजय जाधव सह मामा विशाल कुलकर्णी यांचा सत्कार शिवसेना भवन माळशिरस तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते पार पडला. घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असताना वडील नातेपुते येथील पांढरे इलेक्ट्रॉनिक या दुकानात मजुरीने जातात. आई चंद्रप्रभू इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिपाई कामगार म्हणून कार्यरत आहे. एवढी हालाखीची परिस्थिती असताना देखील कोणतेही ट्युशन नाही कोणतेही क्लासेस नाहीत एकविसाव्या शतकात टीव्ही मोबाईलला समाजात दोष दिला जातो परंतु प्रवीण याने मोबाईल कडे बघणाऱ्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातले असे म्हणावे लागेल. कारण याच मोबाईलच्या माध्यमातून युट्युब च्या माध्यमातून अभ्यास करून त्याने तब्बल 457 गुण मिळवले त्याचे ऍडमिशन मोफत झाले आहे .शिवसेनेच्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, संवेदनशील

#Chiplun:चिपळूण तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम क्रमांक

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळ आणि चिपळूण तालुका गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेसाठी चिपळूण तालुक्यातील 28 संघ सहभागी झाले होते. त्यामधून अत्यंत चुरशीच्या स्पर्धेमध्ये एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलच्या अपूर्व आनंद बुरटे आणि शार्दुल तुषार शिंदे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला व त्यांची जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषेसाठी निवड झाली. सदर स्पर्धेत गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या ऋषिकेश मंदार लेले आणि चैतन्य मिलिंद साल्ये यांनी द्वितीय क्रमांक आणि मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूल खेर्डीच्या आर्या अभिजीत बर्वे आणि आदित्य सचिन राजेशिर्के यांनी तृतीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे देवखेरकी हायस्कूलच्या ऋग्वेद मंगेश अलीम आणि सुजल सुरेश हळदे आणि मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय अलोरेच्या सई संजय बेर्डे आणि भूमि नितीन कोलगे या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या स्पर्धेच्या शानदार पारितोषिक वितरण स

#Natepute:पिंपरी गावच्या लोणारबाबा राणबा देव यात्रेला महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख ची कुस्ती व रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - सालाबादप्रमाणे याही वर्षी पिंपरी गावचे समाजाचे जागृत देवस्थान लोणारबाबा व राणबादेव यांची यात्रा या वर्षी २७ तारखेला गोडवा नैवद्य २८ तारखेला बकरी व मनोरंजना साठी महाराष्ट्रातील नामांकीत विनोदाचा बादशहा मास्टर रघूविर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा रात्री ८ वा तसेच २९ तारखेला कुस्त्यांचे जंगी भव्य मैदान घेण्यात येणार आहे. या मैदानाचे खास आर्कषण यंदाचा महाराष्ट्र केसरी सोलापुर जिल्याचा सुपुत्र पै सिंकदर शेख ची लढत ३ लाख रुपये इनामा वर होणार आहे तसेच या मैदाना साठी प्रमुख पाहुणे लोणारी समाजाचे पहीले आमदार मा श्री रविंद्र भाऊ धंगेकर साहेब व लोणारी समाजाचे प्रथम महाराष्ट्र केसरी करमाळा पंचायत समीतीचे माजी सभापती पै चंद्रहास बापु निमगीरे हे ही उपस्थीत रहाणार आहेत १०० रू ते ३००० रु पर्यंतच्या सर्व कुस्त्या त्याच दिवसी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत मैदाना मध्येच जोडण्यात येणार आहेत व अंतीम निर्णय पंचाचा राहील याची सर्व पैलवान लोकांनी नोंद घ्यावी ही समस्थ ग्रामस्थ यांच्या कडून विनंती व आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे. लेकीच्या हाकेला व भक्ताच्या भक्तीला पावणार हे

#Chiplun:चिपळूण शहरातील वाशिष्ठी गाळ उपशासाठी ९.८० कोटी निधीची तरतूद व्हावी - आ.शेखर निकम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून चिपळुणातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचे काम सुरू आहे. पूरमुक्त चिपळूणसाठी अजूनही मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा व बेटे काढण्याची आवश्‍यकता आहे. तरी या बाबीची दखल घेऊन हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी यादीमध्ये वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी ९.८० कोटी रूपयांच्या निधीची तरतुद करावी, अशी मागणी चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी  राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, ना. पवार याबाबत सकारात्मक असल्याने वाशिष्ठी गाळ उपशाच्या कामाला अधिक गती प्राप्त होण्याची शक्यता आहे.  चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीमध्ये जुलै २०२१ उद्भवलेल्या महापूर परिस्थितीमध्ये चिपळूण शहरामध्ये पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली होती. चिपळूण बचाव समिती व नागरिकांच्या लढ्यानंतर राज्य शासनाने वाशिष्ठी नदीतील गाळ व बेटे काढण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिलेला होता. त्यानुसार गाळ उपशाचे काम गतवर्षीपासून सुरू आहे. पावसाळ्यानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामासंदर्भात अधिकारी व चिप

#Natepute:दशरथ पोटे यांचे निधन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते येथील वृत्तपत्र विक्रेते सागर पोटे व विठ्ठल पोटे यांचे वडील दशरथ ऊर्फ बाजीराव मारुती पोटे वय वर्ष ७० यांचे रविवार रात्री निधन झाले. अतिशय मनमिळावू धार्मिक सेवाभावी व्यक्तिमत्व त्यांचं होतं नातेपुते येथील जुन्या परंपरेतील शंभू महादेवाच्या मानाच्या कावडीची सेवा त्यांच्याकडे आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे ते अतिशय प्रामाणिक व कष्टाळू होते त्यांनी आपल्या दोन्ही मुलावर चांगले संस्कार घडवले त्यांच्या जाण्याने नातेपुते व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.

#Mumbai:जि.प. गट धामापूर तर्फे संगमेश्वर गटातील मेळावा मुंबईस्थित नागरिकांचा मेळावा उत्साहात संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण संगमेश्वर आमदार शेखर निकम यांनी आमदार झाल्यानंतर मागील चार वर्षात केलली विकास कामे जनतेपर्यंत पोहचली की नाही तसेच मतदार संघातील उर्वरीत विकास टप्पा टप्प्याने कसा करता येईल हे आपल्या गावाप्रति प्रेम करणा-या चाकरमान्यांकडून जाणून घेण्यासाठी व योग्य मार्गदर्शन व सर्व चाकरमान्यांची सदिच्छा भेट व्हावी यासाठी जिल्हा परिषद गटाप्रमाणे मेळाव्याचे आयोजन आमदार शेखर निकम यांनी त्या त्या गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने केले आहे. त्याप्रमाणे जि.प. गट ओझरे, जि.प. कडवई व मुचरी पं.स. गण याचे मुंबईस्थित चाकरमान्यांचे मेळावे अलोट गर्दीने यशस्वीरीत्या पार पडले. मात्र कालच झालेला जि.प.धामापूर तर्फे संगमेश्वर गटाचा मेळावा हा विश्व करंडक भारत व ऑस्ट्रोलिया फायनलच्या दिवशी असल्याने याला गर्दी होईल की नाही यामध्ये संभ्रम चिपळूण संगमेश्वर मतदार संघातील जनतेत होताच तेवढाच या मेळाव्यात किती लोक हजेरी लावतात याकडे सर्व विरोधकांमधील  नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांन

#Natepute:वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपण करुन केले रक्षा विसर्जन

Image
आई वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लावली रोपे महादरबार न्यूज नेटवर्क - सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव ज्ञानेश्वर लोंढे यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या तिसऱ्या दिवशीच्या जलदान विधीवेळी शेतामध्ये वृक्षारोपण करुन त्यांचे रक्षा विसर्जन करण्यात आले.त्याबरोबर आईच्या स्मृतीप्रीत्यर्थही आंब्याचे झाड लावण्यात आले. सध्या वृक्षारोपण ही काळाची गरज असुन पाणी दूषित होऊ नये याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.ही गरज ओळखूनच सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव ज्ञानेश्वर लोंढे (वय ८३)यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांचा अंत्यविधीनंतर तिसऱ्या दिवशी जलदान कार्यक्रमानिमित्त त्यांची मुले आनंदकुमार लोंढे,शशिकांत लोंढे व मुलगी जयश्री सोनवणे,सुन पल्लवी लोंढे ,वंदना लोंढे यांनी  तोंडले ता.माळशिरस येथील शेतामध्ये सदाशिव लोंढे यांचे अस्थि  व रक्षा आंब्याची रोपे लावून त्याखाली विसर्जन करण्यात आले.मागील वर्षी शांताबाई सदाशिव लोंढे यांचेही निधन झाले होते.या दोघा आई वडिलांच्या  स्मृतिप्रीत्यर्थ मुलांनी आंब्याची रोपे लावून वृक्षारोपणाचा संदेश दिला. यावेळी रिपाई राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, पंचायत समिती सदस्य अजय सकट, त

#Chiplun:वाशिष्टी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण येथील वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.      चिपळूण येथील उक्ताड जुवाड येथे वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याचा शुभारंभ पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दिवाळीमध्ये चिपळूणकरांना दिवाळी भेट द्यावी, यासाठी याकामाचा दिवाळीमध्ये शुभारंभ केल्याचे पालकमंत्री म्हणाले.         यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, प्रशांत यादव, माजी  नगराध्यक्ष सुरेखा खराडे, चिपळूण बचाव समितीचे बापूसाहेब काणे यांच्यासह चिपळूण बचाव समितीचे सदस्य तसेच नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.      पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, गाळ काढणे हे आपल्या सर्वांचे प्राधान्य आहे. चिपळूणकरांची अडचण दूर करण्यासाठी त्यांना नदीला येणाऱ

#Malshiras:पिलीव येथील "आठवणी ९५" या माजी विदयार्थी सामाजिक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नितीन शिंदे यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील  पिलीव येथील  आठवणी  ९५  या माजी  विदयार्थी  सामाजिक  संघटनेच्या  अध्यक्षपदी पत्रकार  संजय पाटील  यांची तर उपाध्यक्षपदी  नितीन  शिंदे  व सचिव पदी सचिन  गाटे यांची सर्वानुमते  बिनविरोध निवड करण्यात आली. आठवणी  ९५ ही  माजी विदयार्थीनची गेल्या  अनेक  वर्षापासून  सामाजिक  क्षेत्रात  कार्यरत असणारी सामाजिक संघटना आहे .या संघटनेमार्फत  विविध  सामाजिक  उपक्रम, गोरगरीब विदयार्थीना  मदत,आरोग्यविषयक  मार्गदर्शन  ,शैक्षणिक  क्षेत्रात   येणाऱ्या  अडी अडचणी  सोडविणे असे अनेक  सामाजिक  उपक्रम  राबविले जातात. यावेळी  माजी अध्यक्ष  उमेश  देशमुख  यांच्या  हस्ते  नुतन अध्यक्ष  संजय पाटील  यांचा तर माजी उपाध्यक्ष  अविनाश  जेऊरकर  यांच्या  हस्ते  नुतन उपाध्यक्ष  नितीन  शिंदे  तसेच  सचिन  गाटे यांचा सत्कार करण्यात आला. हया वर्षी  गोल्डन  महीला  म्हणून  सत्यभामा मदने यांचा साडी देऊन  तर गोल्डन  पुरुष म्हणून  सुर्यकांत  मदने यांना  मानाचा फेटा देणयात आला. या मेळाव्याप्रसंगी  डॉ    स्मिताराणी पाटील, राणी महामुनी,अनिता जगदाळे ,सत्यभामा  म

#Yavat:मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा होणार

Image
3 डिसेंबर रोजी राज्यातील 10,000 पत्रकारांची एकाच वेळी आरोग्य तपासणी होणार महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.. एस.एम.देशमुख यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे ही माहिती दिली.3 डिसेंबर रोजी किमान दहा हजार पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात येईल असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला आहे. समाजासाठी कार्यरत असताना पत्रकारांचे कायम  आरोग्याकडे दुर्लक्ष होते.. त्याचा फटका असंख्य पत्रकारांना बसलेला आहे.. मात्र यापुढे ही वेळ कोणत्याही पत्रकारावर येऊ नये यासाठी मराठी पत्रकार परिषद आपला वर्धापन दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा करते.. या दिवशी राज्यातील प्रत्येक तालुक्यात स्थानिक डॉक्टर्स, रोटरी किंवा लायन्स क्लब किंवा अन्य स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते.. गेल्या वर्षी 8 हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती, यावर्षी 10,000 पत्रकारांची आरो

#Natepute: दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मौजे अलंकापुरी तालुका माळशिरस मध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन संपन्न....

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत साहेब, सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील हे तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये आरोग्याचा विषय आहे यामध्ये बचत गटातील महिलांचे आरोग्य तपासणी असेल तालुक्यातील पाच ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी असेल 99 हजार नागरिकांना शिवसेनेच्या वतीने सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेली डाळ असेल अशा विविध उपक्रमांनी शिवसेना नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दहीगाव मधील अलंकापुरी येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन दिमाखात पार पडले यासाठी जिल्हा परिषद गटप्रमुख प्रमोद चिकणे, अध्यक्ष विजय ढेकळे ,उपाध्यक्ष सागर वलेकर त्याचबरोबर गणेश गोफने, महेंद्र वलेकर, हर्षवर्धन देशमाने, ओंकार पुष्पे, ओंकार खिलारे, सचिन वलेकर, धुळदेव वलेकर, आनंद वलेकर, किरण वलेकर

#Natepute:दहिगाव येथे कुमार केसरी पैलवान ओंकार मिसाळ याचा सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - पैलवान ओंकार हनुमंत मिसाळ यांने कोथरूड जिल्हा पुणे येथे झालेल्या कोथरूड कुमार केसरी किताब पटकविल्या बद्दल. दहिगाव ता- माळशिरस येथे दहिगाव ग्रामस्थांकडून पैलवान ओंकार मिसाळ याचा सत्कार करण्यात आला. यावेळी दहिगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

#Indapur:केतन यादव यांची इंदापूर तालुका सुत गिरण संघाच्या संचालक पदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून नवीन प्रकल्प येणार असल्याचे चर्चा सुरू असताना. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक केतन यादव यांची निवड इंदापूर तालुका सुतगिरण संघाच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे. केतन यादव हे सामाजिक चळवळीमध्ये काम करत असतात. येणाऱ्या सर्व संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि अशा वेळी नवीन प्रकल्प सुरू करत असताना अशा संयमी व्यक्तीमहत्वाचे गरज या प्रकल्पाला असल्यामुळे बालयोगी महेश्वरानंद महाराज यांच्या सूचनेनुसार त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती. मुख्यप्रवर्तक आकाश पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे. व ते पुढे म्हणाले की केतन आणि आम्ही सर्व सभासद एकत्रित रित्या येऊन जून २०२४ पर्यत कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्व शेतकरी वर्गानी या कारखान्यास नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.

#Natepute:खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नातेपुते शिवसेना भवन कार्यालयाला भेट

Image
शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी तालुक्यामध्ये केलेल्या कामाच्या कार्य अहवालाची प्रशंसा महादरबार न्यूज नेटवर्क - माढा लोकसभा मतदारसंघाचे कलियुगातील भगीरथ म्हणून ज्यांची ओळख आहे. असे खासदार माननीय श्री रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे धडाडीचे शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या शिवसेना भवन या कार्यालयात भेट देऊन राजकुमार हिवरकर पाटील यांना तसेच शिवसेनेचे नेते पदाधिकारी शाखाप्रमुख व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या... कलियुगातील भगीरथ अशी ओळख असणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिवाळीच्या पूर्व संधेला माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या नातेपुते येथील शिवसेना भवन येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच तालुकाप्रमुख या नात्याने शिवसेनेने माळशिरस तालुक्यामध्ये केलेल्या कामाचा कार्य अहवाल पाहिला व पाहताक्षणी त्यांच्या असे निदर्शनास आले की, एवढ्या सगळ्या बातम्या एवढी सगळी कामे बघून खूप कौतुक केले. कलियुगातील भगीरथ म्हणून ओळख असणारे खासदार यांनी राजकुमार हिवरकर पाटील यांना शब्द द

#Natepute:अंबड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राजकुमार हिवरकर पाटील यांचे आवाहन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी 17 नोव्हेंबर रोजी अंबड जिल्हा जालना येथे ओबीसी समाजाचा एल्गार पुकारलेला आहे या सभेच्या नियोजनासाठी शंकरराव कॉम्प्लेक्स नातेपुते येथे ओबीसी समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये विलास किसन क्षीरसागर या ओबीसी बांधवांचा मृत्यू झाला या घटनेचा निषेध करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी मार्गदर्शन करताना ओबीसी समाजाला आजची परिस्थिती बिकट आहे समाजावर मोठे संकट आले आहे ओबीसी समाजाला भीती दाखवण्याचे काम चालू आहे त्यामुळे ओबीसी समाजाने सामाजिक लढाई एकत्रित येऊन लढले पाहिजे दुबळे राहून चालणार नाही दहा नंबरी नागासारखा फणा काढला पाहिजे मोठी भीती सरकारला निर्माण झाली आहे आरक्षण म्हणजे गरीबी निर्मूलनाचा मंत्र नसून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुर्लक्षित समाज प्रवाहात आणण्याचा अधिकार दिला आहे अंबड येथे होणाऱ्या एल्गार परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्ती दाखवण्याची गरज असल्याची त्यांनी सांगितले आहे. या

#Malshiras:वंचितांच्या चेहऱ्यावरचे हास्य हाच दिवाळीचा खरा आनंदोत्सव - संस्कृती राम सातपुते

Image
पालावरच्या नागरिकांसोबत दिवाळी साजरी करत आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी जपली सामाजिक बांधिलकी महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या सुविद्य पत्नी संस्कृती सातपुते यांनी आमदार रामभाऊ सातपुते यांचे वडील विठ्ठल सातपुते यांच्यासमवेत पालावरच्या नागरिकांसमवेत दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. मांडवे येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन ऊसतोड कामगार, महिला व त्यांच्या लहान लहान मुलांना दिवाळी फराळ, फटाके तसेच नवीन कपडे देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. वंचितांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हाच दिवाळीचा खरा आनंदोत्सव असल्याचे मत संस्कृती राम सातपुते यांनी बोलताना सांगितले. दिवाळी ही आनंदाची, चैतन्याची आणि तेजोमय दिव्यांची असते मात्र आपल्या आजूबाजूला कामानिमित्त घरापासून दूर असलेले पालावर राहणारे बांधव दिवाळी करू शकत नाहीत, त्यांच्या घरी दिवाळी व्हावी असे वाटते. त्याच जाणीवेतून मांडवे येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन त्यांची भेट घेतली, विचारपूस केली. त्यांना कपडे, मिठाई भेट  दिली. त्यांच्य

#Yavat:सन सिटी (धायरीत) साकारला नळदुर्ग किल्ला

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर दिवाळीत घरोघरी किल्ले करण्याची फार जुनी प्रथा आहे पण एखाद्या सोसायटीत संपूर्ण सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याची अनोखी प्रथा येथील सनसिटी येथे गेली अनेक वर्ष सातत्याने सुरू आहे हे या सोसायटीचे मुख्य वैशिष्ट्य. यावर्षी सोसायटी  रहिवाशांनी नळदुर्ग या भुईकट किल्ल्याची प्रतिकृती सादर केली. सोसायटीतील  तरुण वर्ग ज्या किल्ल्याची प्रतिकृती करावयाची त्या किल्ल्याला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील किल्ल्याची संपूर्ण माहिती, इतिहास किल्ल्याचे फोटो, चित्रीकरण करतात व त्याप्रमाणे हुबेहूब तो किल्ला उभा करण्याचा प्रयत्न करतात हे आणखी एक वैशिष्ट्य. सोलापूरला प्राध्यापक असताना अनेकदा विद्यार्थ्यांच्या सहलीसोबत नळदुर्ग किल्ल्याला भेट देण्याचा योग आला . सन सिटीतील सर्व सभासद आबाल वृद्ध हा किल्ला तयार करण्यासाठी स्वेच्छेने अहोरात्र मेहनत घेतात. गेले पंधरा दिवस सोसायटीतील सर्व तरुण व तरुणी रात्र-रात्र जागून ही कलाकृती सादर करण्यासाठी झटत  असताना पाहिले. अगदी पाच वर्षाच्या बालकापासून ते पं

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेत आनंद मेळावा उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव बुधवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी कोथरूड येथील वनाझ परिवार विद्या मंदिर या शाळेत ' आनंद मेळावा' आयोजित केला होता. यामध्ये विद्यार्थी व पालकांनी खाद्यपदार्थ ,स्टेशनरी, दिवाळी साहित्य, भाज्या ,फळे, गजरे यांचे स्टॉल लावले होते. तसेच शाळेतील प्रत्येक वर्गांच्या खेळाचा एक स्टॉल लावण्यात आला होता. त्यामध्ये विविध प्रकारचे मनोरंजक खेळ ठेवण्यात आले होते . तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले आकाश कंदील पणत्या सुगंधी उटणे यांचेही स्टॉल लावण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून 'इनर व्हील क्लबच्या प्रेसिडेंट' शृणाली आपटे मॅडम तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी  त्यांनी आनंद मेळावा उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.इनरव्हील क्लबचे सहकार्य नेहमीच शाळेला राहिले आहे.शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका अनिता दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका नीता जाधव पर्यवेक्षिका माया झावरे यांच्या सहकार्याने सांस्कृतिक समिती प्रमुख कविता कांबळे व स्वाती वाघमारे यांच्या नियोजनाखाली आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमा

#Natepute:शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी शारदादेवी शिंदे यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालूक्यातील शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी  शारदादेवी छगनराव शिंदे यांची  तर उपसरपंचपदी संग्राम  शिंदे यांची एकमताने निवड झाली. अडिच वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती ,अडिच वर्षानंतर सरपंच सूचिञादेवी शिदें व उपसरपंच सूनिल शिदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदावर, शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी चंद्रकांत शिंदे गटाच्या  शारदादेवी  शिंदे व उपसरपंचपदी मल्हारी शिंदे गटाचे . संग्राम भानुदास शिंदे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राठोड यांनी काम पाहीले. या निवडी प्रसंगी शंकर सहकारी साखर कारखाण्याचे संचालक चंद्रकांत शिंदे, मल्हारी शिंदे,माजी सरपंच सूचिञादेवी शिदे, छगनराव शिंदे,  माजी उपसरपंच विनोद रणवरे,हनुमंत  मोरे, माजी उपसरपंच सुनिल शिंदे , माजी सर्व ग्रामपंचायत सदस्य,तसेच किरण शिंदे, अभिजित शिंदे , संतोष शिंदे , अशोक भोसले, मारूती शिंदे ,नंदकूमार मसूगडे.  गोपीनाथ शिंदे, शिवाजी शिंदे,हणमत पाटणे,सतिश देशमूख,निलेश शिंदे,सतिश शिंदे,नाना माने,आदि मान्यवर उपस्थित होते.

#Piliv:पिलीव येथील साठवण तलावासाठी ९ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीस‌ प्रशासकिय मान्यता - आ. राम सातपुते

Image
                            महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील  पिलीव  येथील  महालक्ष्मी  मंदीराजवळील  व जामदारवस्ती लवण लगत असणाऱ्या रुपांतरीत साठवण तलावासाठी  आ राम सातपुते  यांनी  राज्याचे माजी  उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहीते पाटील  यांच्या  मार्गदशनाखाली  ९ कोटी ५५ लाख रुपयांच्या  निधीस प्रशासकीय  मिळविली आहे. त्यामुळे  पिलीव  परीसरातील  सर्वसामान्य  शेतकऱ्यांनमधुन  समाधान व्यक्त व्यक्त होत आहे. माळशिरस तालुक्यातील विविध  विकासकामांना सातत्याने  निधी उपलब्ध  करुन देणयासाठी  आ राम सातपुते  हे सतत  प्रयत्नशील असतात  नुकतेच आ राम सातपुते  यांनी २५/१५ योजनेअंतर्गत  तालुक्यातील  विविध  गावातील  वेगवेगळ्या  कामांसाठी  ५ कोटी रुपयाचा  निधी  उपलब्ध करुन  दिला आहे. आणी दोन दिवसानंतर पिलीव येथील  महालक्ष्मी  मंदीराजवळील  रुपांतरीत साठवण तलावासाठी  ४ कोटी ८५ लाख रुपये व जामदारवस्ती  शेजारील रुपांतरीत साठवण तलावासाठी  ४ कोटी ७० लाख रुपये  अशी एकुण ९ कोटी ५५ लाख रुपयांच्या  निधीस प्रशासकीय  मान्यता  मिळाली असल्याने  या भागातील  शेतकऱ्यांनच्या  आशा पल्लवीत झा

#Yavat:यवत येथील उजव्या डाव्या कालव्यात घाणीचे साम्राज्य

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर पुणे येथून येणाऱ्या उजव्या डावा कालवा यवत येथून जातो उजवा हा कालवा पुढे जातो ह्या कालव्यातून शेतीपाण्यसाठी पाणी  खडकवासला धरणातून व इतर तीन धरणातून सोडले जाते या धरणातून येणारे पाणी हवेली दौंड यात व इंदापूर या तालुक्यातला पुरवले जाते या धरणाच्या पाण्यामुळे शेतीला,पिण्याच्याचे पाण्यासाठी तलावात सोडून त्याशेजारी विहिरी आहेत त्या विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा वापर होतो . हवेली ,दौंड ,इंदापूर येथील गावचा  पाण्याचा बऱ्याच अंशी प्रश्न सुटलेला आहे.या कालव्याचे पाणी आत्ता पंधरा दिवसा पासून येण्याचे बंद झालेले असताना या कालव्यात  लोकानी टाकलेले बरेचसे प्लास्टिक ,हार कचरा हे यवत येथील पुणे सोलापूर रोडवरील असलेल्या कालव्यात बराच कचऱ्याचे थवे दिसून येत आहे या घाणीमुळे प्रदूषण वाढण्यास मदत होते, कालव्याचे पाणी पुढे जाण्यास विलंब होत आहे असलेला कचरा व प्लास्टिक खराब हार फुले टाकले जातात त्यामुळे पाणी खराब होते संबंधित प्रशासनाने टाकणाऱ्या टाकण्यास मज्जाव करावा अशी नागरिकातून मागणी होत आहे. तसेच या पाणी  माटोबा तलावाच्या शेजारी बऱ्याच गावाच्या विहि

#Chiplun:कृषी, औद्योगिक संघाच्या संचालकपदी पूजा निकम बिनविरोध

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघाच्या संचालकपदी चिपळुणच्या सौ. पूजा शेखर निकम, रत्नागिरीच्या सौ. ऋतुजा उमेश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री. बाबाजी जाधव, संचालक ॲड. दीपक पटवर्धन यांनी संचालकपदी अर्ज भरावयाच्या व्यक्तींची नावे निश्चित केली. त्यामुळे राष्ट्रवादी, भाजपाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. सौ. ऋतुजा कुलकर्णी या धामणसे ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. यापूर्वी त्यांनी दोन वेळा संचालकपदाची निवडणूक लढवून विजयी होण्याचा मान मिळवला होता. धामणसे विविध कार्यकारी सोसायटीवर सौ. ऋतुजा कुलकर्णी या तज्ञ संचालिका म्हणून कार्यरत आहेत. भविष्यात शेती संदर्भात, शेतकरी, उद्योजक यांना उपयुक्त असलेले कामकाज करू असे प्रतिक्रिया सौ. ऋतुजा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. सौ. पूजा निकम या चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती असून आमदार शेखर निकम यांच्या पत्नी आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण, ॲड. दीपक पटवर्धन आदींनी सौ. पूजा निकम, सौ.

#Malshiras:आ राम सातपुते यांच्या प्रयत्नातून 25/15 योजनेअंतर्गत 5 कोटीचा निधी मंजूर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आ राम सातपुते यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 25/15 योजनेअंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना सातत्याने राबवून यासाठी राज्य सरकारकडून भरीव निधीची तरतूद करण्यात आ राम सातपुते सतत प्रयत्नशील असतात . तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा करिता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यामध्ये तालुक्यातील इस्लामपूर येथे जिजाऊ चौक सुशोभीकरण करणे , मारकडवाडी ,पिलीव व भांबुर्डी पूल बांधणे, रेडे, कुसमोड ,फोंडशिरस, बचेरी, शेंडेचिंच, तांबवे ,बांगार्डे, पाणीव, पळस मंडळ ,पठाणवस्ती, झंजेवाडी ,विजोरी, खंडाळी, मांडवे, कचरेवाडी ,गारवड, दसुर, मगरवाडी, पिरळे, गुरसाळे या ठिकाणी सभामंडप बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आलाआहे . सदाशिवनगर,कण्हेर, पिलीव, उंबरे दहीगाव, खुडूस, उं

#Piliv:पिलीव विकास सेवा सोसायटीच्या सभासदांना दिवाळीनिमित्त १० टक्के लाभांशाचे वाटप

Image
पिलीव  विकास  सोसायटीच्या वतीने  सभासदांना  लाभांशचे वाटप करताना  चेअरमन  महादेव सुळे, संचालक  संग्राम  पाटील, विठ्ठल  मदने,सुग्रीव  लेंगरे, नबाजी  मदने,कुबेर भैस व इतर मान्यवर महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील  पिलीव येथील  विविध  कार्यकारी  सहकारी  सेवा संस्थेच्या वतीने  दिवाळीनिमित्त  ११३७ सभासदांना  १० टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले. सभासदांच्या  भागभांडवल  ८४ लाख ३ हजार  ६६० या भागभांडवलावरती सदरच्या  लाभांशाचे वाटप करण्यात आले. सदरचा लाभांश चेअरमन  महादेव  सुळे,व्हा  चेअरमन  किसन सातपुते, माजी चेअरमन  संग्राम पाटील, संचालक  विठ्ठल मदने सर, प्रा सुग्रीव लेंगरे, कुबेर भैस,नबाजी मदने,पंकज  मदने,जाफर मुलाणी,संस्थेचे सचिव  श्रीकृष्ण  सावंत, विजय सपाटे,सुरज काटकर  तसेच  अनेक  सभासदांनाच्या उपस्थित  सदरचे लाभांश वाटप करण्यात आले.        

#Malshiras:उत्तमराव जानकर साहेब यांनी कारूंडे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचा केला सन्मान

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - वेळापूर (ता.माळशिरस ) ०७ नोव्हेंबर २०२३... गरुड बंगला वेळापूर या ठिकाणी, कारुंडे ता. माळशिरस, ग्रामपंचायत निवडणूकीत, तालुक्याच्या जनतेचे आमदार, लोकनेते श्री. उत्तमराव जानकर साहेब (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज) यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने, सरपंच पदासह ०८-०३ ने  विजय मिळवला. यावेळी नूतन सरपंच सौ. नंदा कैलास नामदास यांचा सन्मान श्री.उत्तमराव जानकर साहेब यांच्या स्नुषा डॉ. स्नेहलताई जीवन जानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला, तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ.रेश्मा मोहन रुपनवर,सौ. सुनिता संजय पवार, सौ. सीमा संतोष वाघमोडे, सौ. कल्पना लक्ष्मण करचे, सौ. हर्षाली गणेश गायकवाड यांचाही सन्मान करण्यात आला. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री. सूर्यकांत विठ्ठल पाटील, श्री. सचिन भास्कर शिंदे, श्री. महेश दिलीप थिटे यांचा सन्मान श्री. उत्तमराव जानकर साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.       यावेळी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलप्रमुख मा. सरपंच श्री.हनुमंत पाटील, श्री सुभाष पाटील मा. चेअरमन ,युवा नेते श्री. तुष