Posts

Showing posts from October, 2022

#Malshiras:ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका,माळशिरस यांच्या वतीने स्नेह मेळावा,सन्मान सोहळा संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - दिवाळी म्हटलं की आला गोडवा, पण आहारातही तसा गोडवा वाढतो तसा आपल्या विचारातही गोडवा वाढविणे गरजेचे असते यासाठी  माळशिरस तालुका प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका, माळशिरस यांच्या वतीने भाऊबीज व पाडवा या दिवशी म्हणजे बुधवारी दिनांक २६/१०/२०२२ रोजी तालुक्यातील महाराष्ट्र व इतर राज्यात विविध ठिकाणी कार्यरत असलेले भूमिपुत्र तथा वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अधिकाऱ्यांचा स्नेह मेळावा  तसेच माळशिरस तालुक्यातील नूतन  शासनसेवेत अधिकारी व कर्मचारी म्हणून निवड झाले आहेत त्यांचाही सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील उत्कृष्ट खेळाडू व त्यांचे पालक यांचाही विशेष गुण गौरव व सन्मान सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी मा. बाळासाहेब वाघमोडे पाटील (IPS) पोलीस अधीक्षक पालघर,  मा.धनंजय मगर (IFS) उपवनसंरक्षक ओडीसा राज्य ,   मा.सागर मिसाळ (IAS)  मा. शुभम जाधव(IPS)  मा. डॉ. रामदास भिसे (IRTS) वाणिज्य व्यवस्थापक भारतीय रेल्वे विभाग पुणे  मा. उमेशचंद्र मोरे, जिल्हा न्यायाध

#Malshiras:आ राम सातपुते यांच्या प्रयत्नांने माळशिरस व नातेपुते येथील बस स्थानके होणार चकाचक

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालुक्यातील माळशिरस व नातेपुते या महत्त्वाच्या शहरातील बस स्थानके ही मोडखळीस आली असून या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून ही बसस्थानके बीओटी तत्त्वावर करून मिळणे बाबत माळशिरसचे आ राम सातपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2 ऑगस्ट रोजी पत्र दिले होते या पत्राची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन या पत्रावर सही करून मागणी मंजूर केल्याने माळशिरस व नातेपुते या ठिकाणची बस स्थानके आ. राम सातपुते यांच्यामुळे चकाचक होणार असल्याने या भागातील नागरिकांमधून समाधानाचे वातावरण आहे. माळशिरसचे आ. राम सातपुते हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांच्या बाबतीत सातत्याने आग्रही भूमिका घेत असून यापूर्वीच त्यांनी मागील आठ दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी आणला असून 2 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ राम सातपुते यांनी पत्र दिले असून या पत्रामध्ये त्यांनी माळशिरस तालुक्यातील माळश

#Parbhani:शेषराव सोपणे मामा यांचा परभणी येथे व्यापारी बांधवांकडून सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - श्री शेषराव सोपणे मामा यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख पदी निवड झाल्याने,अ.भा.पोलीस हक्क संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत परभणी येथे व्यापारी बांधवांकडून सत्कार. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री माऊली वैद्य संचालक हरिओम कृषि भांडार परभणी, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननिय श्री श्रीनिवास इंदुरकर यांनी श्री शेषराव सोपणे मामा यांच्या सामाजिक कार्य, संघटना बांधणीसाठी तत्परता, तसेच संघटनेच्या कार्याची वेळोवेळी जनसमान्यापर्यंत माहिती पोहोचवून, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेला प्रसिध्दी देण्यासाठी प्रयत्न केले असल्याने, श्री शेषराव सोपणे मामा यांची महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख पदी निवड करण्यात आली असल्याने, परभणी येथील नवामोंढा येथे व्यापारी बांधवांनी सत्कार केला. यावेळी श्री माऊली वैद्य संचालक हरिओम कृषि भांडार परभणी,प्रमुख व्याख्याते विनोदअण्णा भोसले प्रदेशाध्यक्ष अ. भा. पोलीस हक्क संरक्षक संघटना महाराष्ट्र, प्रसाद आरमळ जिल्हा उपाध्यक्ष सिडस् फर्टीलायझ

#Baramati:बारामती स्पेशल कोर्टात पोस्को व बलात्कार 376 प्रकरणी राहुल कांबळे याची निर्दोष मुक्तता

Image
  ॲड. सिताराम  झंजे यांनी राहुल कांबळे याला न्याय मिळवून दिला महादरबार न्यूज नेटवर्क - सदर प्रकरण हे अल्पवयीन मुलीवर बलात्कार असे इंदापूर कोर्ट येथे गुन्हा रजिस्टर नंबर 447-2018 असे नोंद झाला होता. बारामती स्पेशल कोर्टात पोस्को व बलात्कार 376 प्रकरणी दावा चालू होता सदर प्रकरणात पीडित मुलगी व तिचे आई-वडील व पोलीस अधिकारी डी एस कुलकर्णी यांचे जबाब नोंदवले होते तसेच फिर्यादीतर्फे सरकारी वकील म्हणून अॅड संदीप ओव्हाळ यांनी काम पाहिले व आरोपी राहुल कांबळे यांचे काम ॲड सिताराम धुळा झंजे यांनी पाहिले. सदर प्रकरणात राहुल कांबळे आरोपी यांची गुणवत्तर चौकशी होऊन निर्दोष मुक्तता झाली असून अखेर राहुल कांबळे याला न्याय मिळाला आहे सदर प्रकरण हे बारामती स्पेशल कोर्ट जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री शहापुरे साहेब यांच्या समोर होते. या प्रकरणाच्या निकालानंतर अॅड  सिताराम झंजे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

#Indapur:माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लुमेवाडी येथील जोधपुरी बाबांच्या दर्गाहचे दर्शन घेतले

Image
लुमेवाडीचा उरूस उत्साहात सुरु  महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार  लुमेवाडी (ता.इंदापूर) येथील प्रसिध्द हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबां( रहे.)च्या दर्गाहचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.17) रात्री दर्शन घेतले. जोधपुरी बाबांचा उरूसास सर्वधर्मीय भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.              याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी जोधपुरी बाबांच्या मजारवरती फुलांची चादर अर्पण केली. याप्रसंगी दर्गाह ट्रस्टच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जोधपुरी बाबांचा दर्गाह महाराष्ट्रभर प्रसिद्धीस आलेला आहे. जोधपुरी बाबांचे आशीर्वाद आपले सर्वांच्या पाठीशी आहेत. या दर्गाहच्या विकासासाठी आपण आजपर्यंत सर्व प्रकारची मदत केलेली असून, आगामी काळातही  सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, संचालक हरिभाऊ घोगरे, संजय बोडके, बाळासाहेब मोहिते, सरपंच शितल मोहिते, रणजीत वाघमोडे, चेअरमन निलेश बोडके, सरपंच आबासाहेब बोडके, माजी सरपंच उस्मान शेख, कमाल जमादार, सरपंच सुनील

#Natepute:शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांचे पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे नातेपुते हद्दीतील विविध कामांसाठी निवेदन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे माळशिरस तालुका शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख राजकुमार  हिवरकर पाटील यांनी नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये डीपीडिसी  मधून  महत्वाच्या विविध कामांना मंजुरी मिळून सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्याकडे वर्ग करण्याची भेटून निवेदनाद्वारे मागणी केली असून मागणी केलेली कामे  नातेपुते मांडवे रस्ता पाचशे मीटर काँक्रीट रस्ता करणे ९.९० लक्ष, नातेपुते मांडवे हजार मीटर काँक्रिटी रस्ता करणे ९.९० लक्ष, नातेपुते मांडवे पंधराशे मीटर काँक्रिटी रस्ता करणे ९.९० लक्ष, नातेपुते मेडद पाचशे मीटर काँक्रिटी रस्ता करणे ९.९० लक्ष, नातेपुते मेडद  हजार मीटर काँक्रीट रस्ता करणे ९.९०लक्ष, नातेपुते मेडद  पंधराशे मिटर काँक्रीट रस्ता करणे ९.९०लक्ष, नातेपुते मेडद  दोन हजार मीटर काँक्रिटी रस्ता करणे ९.९० लक्ष,  नातेपुते बाजार तळ येथे काँक्रीट करणे ९.९० लक्ष रकमेची एकूण पाच कामे, तुळशी स्वीट होम ते पोलीस स्टेशन काँक्रिटी रस्ता करणे ४० लक्ष,  शंकर नगर ते हायवे काँक्रिटी रस्ता करणे २० लक्ष, सद्गुरु कॉलनी प्रभाग क्

#Yavat:वृत्तपत्र विक्रेते हे वृत्तपत्र सृष्टीतील महत्वाचे घटक - एम.जी. शेलार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - संतोष जगताप वृत्तपत्र क्षेत्रात वृत्तपत्र विक्रेते  हे  वृत्तपत्र पत्रकार आणि सर्व सामान्य वाचक यामधील महत्वाचे घटक आहे. असे मत जेष्ठ पत्रकार एम.जी. शेलार यांनी यवत येथील वृत्तपत्रक विक्रेते मिनेश गुजर आणि राजू गुजर यांचा जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिना निमित्त सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले. यवत आणि दौंड मधील सर्व पत्रकार संघाचे वतीने यवत येथील जुने वृत्तपत्र विक्रेते गुजर बंधू यांचा जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिना निमित्त सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मिनेश गुजर आणि राजू गुजर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन  सत्कार केला. यावेळी बोलताना शेलार पुढे म्हणाले, गुजर बंधू हे यवत परिसरातील जुने वृत्तपत्र विक्रेते आहेत, थंडी वारा आणि पाऊस असो अंत्यत खडतर परिस्थितीत त्यांनी वृत्तपत्र लोकांना वेळेत देण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत, आजही करीत आहेत.त्यांच्या कष्ट आणि प्रयत्न यामुळे वेळेत पेपर मिळत आहे.आज थोडी त्यांचे विषयी आपुलकी म्हणून त्यांचा सत्कार करण्याची  संधी मिळणे हे आनंददायक आहे. यावेळी संतोष जगताप, राहुल अवचट, मनोज खंडांगले,  विनाय

#Indapur:पिंपरी बुद्रुक येथे लक्ष्मण शक्ती सोहळ्यासाठी बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नानासाहेब आटोळे यांची उपस्थिती

Image
पिंपरी गावच्या सर्व धार्मिक क्षेत्रामध्ये नेहमीच मदतीचे सहकार्य करीत राहीन - विद्यमान सरपंच श्रीकांत बोडके महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे भावार्थ रामायणाचे पारायण पहिल्यांदाच चालू आसल्याने या मधील  लक्ष्मण शक्ती सोहळा संपन्न झाला. भावार्थ रामायण ग्रंथ व कलश पूजन  सोहळ्यासाठी  पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच श्रीकांत शिवाजी बोडके व पोलीस पाटील वर्धमान बोडके, माजी सरपंच आबासाहेब बोडके, चेअरमन निलेश बोडके, तसेच गावातील भाविक भक्त यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.  लक्ष्मण शक्ती सोहळ्यासाठी बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नानासाहेब आटोळे यांनी नतमस्तक होऊन दर्शन व आशीर्वाद घेतला. पिंपरी गावच्या वतीने त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला, रात्रभर रामायण कथेचे वाचन करून पहाटे 6 वाजता नामाच्या जयघोषात लक्ष्मण शक्ती सोहळा श्रीफळ फोडून पार पडला.  या कार्यक्रमासाठी वाचक आणि सूचक नरसिंहपूर, टणु, गिरवी, गोंदी, सराटी, ओझरे, गारअकोले,टाकळी, गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, या सर्वच भागातून मोठ्या संखेने उपस्थितीत राह

#Dound:कडेठाण गावचे ग्रामदैवत श्री सांजोबा महाराज यात्रेचे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - अक्षता हनमघर दौंड तालुक्यातील  कडेठाण गावातील ग्रामदैवत श्री सांजोबा महाराज यात्रा  रविवार दि १६ व १७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे मौजे कडेठान येथिल ग्रामदैवत श्री संजोबा महाराज यांच्या मूर्ती पूजन रविवारी पहाटे ५.३० वा.देवाची पूजा होईल. तसेच दुपारी १२.०० वा. ग्रामदैवताची मानाची काठी निघणार आहे. सायंकाळी ६.००वा. देवाची पालखी (छबीना) मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या अतिशबाजीत छबीन्याचे आयोजन करण्यात आले आहे.  सोमवारी सकाळी ६.०० वा. श्री सांजोबा महाराज पालखी सोहळा पारंपारिक वाद्याच्या गजरात गाव प्रदक्षणा  गावकरी मानकरी मान्यवरांच्या उपस्थितीत जयघोष करीत गावातील हनुमान मंदिरामध्ये आणली जाते.  मौजे कडेठाण यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने सोमवार दि १७ रोजी सकाळी ९.०० वा, मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा हजऱ्याचा लोककला मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे दुपारी ३:०० वाजता श्री सांजोबा महाराज यांच्या पालखी छबीना  मिरवणूक होणार आहे, तसेच सोमवारी रात्री ९:००वा, मंगला बनसोडे यांचा बहुरंगी तमाशा लोक मनोरंजनाचा  कार्यक्रम होण

#Solapur:जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या झाली कमी आता दीर्घकालीन उपाययोजना करा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

Image
सोलापूर,दि.14 (जिमाका): जिल्ह्यात अपघातात मरणारे, गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. मात्र याबरोबरच जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची संख्या कमी होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. उर्वरित अपघातप्रवण क्षेत्रात आता दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अनिल विपत, रोहित दुधाळ यांच्यासह समितीमधील सदस्य उपस्थित होते. श्री. शंभरकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागात 55 अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) होते ते आता 23 वर आले आहेत. शहरातील 21 ब्लॅक स्पॉटचे 29 झाले आहेत. ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी आय रॅडचा ॲपचा वापर वाढवा. अपघात हे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात होतात. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने महामार्गावरील सर्व वळण रस्ते, प्रवेश, मोक्याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लाव

#Malshiras:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाळुंग - श्रीपुर नगरपंचायतीवर धडक मोर्चा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका उपाध्यक्ष रोहित खाडे यांच्या नेतृत्वाखाली महाळुंग नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना घेऊन  दि .१४ रोजी  नगरपंचायतीवर मोर्चा काढला. निवडणूक होऊन वर्ष संपले तरी कोणत्याच प्रभागात निधी खर्च झाला नाही की कसलेच काम झाले नाही. सध्या चिकणगुण्या ,  डेंगू सारख्या आजाराने थैमान घातले असतानाही नगरपंचायतीकडून कसलीच यंत्रणा राबवली गेली नाही. पावसामुळे तुंबलेल्या गटारींचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  यामुळेच झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी दि .१४रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.  जर येणाऱ्या पंधरा दिवसात काहीच प्रक्रिया राबवली गेली नाही तर  १ नोव्हेंबर रोजी यापेक्षा तिव्र आंदोलन करू असा इशारा माळशिरस तालुका उपाध्यक्ष रोहित खाडे यांनी दिला. यावेळी निवेदन स्वीकारताना कार्यकारी अधिकारी गव्हाणे साहेब , नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी चव्ह

#Malshiras:मनरेगाच्या सर्व शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी - सहाय्यक गटविकास अधिकारी ए . बी . मोरे

Image
ग्रामरोजगार सेवक यांचे तीन दिवशीय समृद्ध गाव, लखपती कुटुंब, नियोजन प्रशिक्षण शिबीर संपन्न  महादरबार न्यूज नेटवर्क  - माळशिरस तालुका पंचायत समिती स्तरावर विविध मानरेंगाच्या शासकीय योजनांची माहिती शेवटच्या गरजू घटकापर्यंत पोहोचवणे हे रोजगार सेवकांचे कर्तव्य आहे.ते प्रत्येक रोजगार सेवकाने आपले कर्तव्य हे जबाबदारी समजून काम करावे,याकडे आपण जातीने लक्ष दिल्यास गावनिहाय एकही गरजू लाभार्थी वंचित राहणार नाही.असे कर्तव्य दक्ष सहाय्यक गटविकास अधिकारी ए . बी . मोरे म्हणाले.  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांचे तीन दिवशीय प्रशिक्षण शिबीर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले.यामध्ये कार्यशाळा ,शिवार फेरी यांची प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली.गटविकास अधिकारी माळशिरस यांच्या सूचनेनुसार माळशिरस तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेची नव्याने कार्यकारणी जाहीर करून उपस्थित सर्व ग्रामरोजगार सेवकान मधुन संघटनेची स्थापना करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष  अशोक राजगे उपाध्यक्ष मारुती खताळ,सचिव संतोष वाघमोडे ,प्रसिद्धीप्रमुख,अक्षय साठे व संजय हुलगे या

#Natepute:दहिगावला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने बाबुराव खिलारे ग्रामस्थ सोबत करणार आमरण उपोषण

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - दहिगाव ता. माळशिरस या गावात ग्रामस्थांना पिण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे पाणी हे दूषित असून अनेक वेळा ग्रामसेवक यांना सांगूनही ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पंधरा दिवसानंतर भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्च्याचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबुराव खिलारे व गावातील ग्रामस्थ माळशिरस पंचायत समिती समोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन गट विकास अधिकारी माळशिरस यांना 11 ऑक्टोबर रोजी देण्यात आले. निवेदनामध्ये म्हटलं आहे की दहिगाव ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना होणाऱ्या दूषित पाण्याबद्दल दहिगाव  ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कर्णे यांना अनेक वेळा ग्रामस्थांनी समक्ष भेट घेऊन सांगूनही याकडे ते दुर्लक्ष करीत आहे कामात कुचराई व वेळ काढूपणा हालगर्जपणा करीत आहे गावाला दूषित पाणीपुरवठा गेले तीन वर्षापासून होत आहे तरी ग्रामसेवक याविषयी गांभीर्याने घेत नाही त्यांच्या हालगर्जीपणामुळे गावातील लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त होत चालले आहे तरी संबंधित ग्रामसेवक  गावातील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय भाग घेत आहेत ग्रामसेवक मौजे दहि

#Malshiras:भार्गवी वाघमोडे हि प्लास्टिक मुक्त व व्यसनमुक्त भारत या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - विजयादशमीच्या औचित्याने सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सिंगल यूज प्लास्टिक मुक्त भारत (प्लास्टिक बंदी) व व्यसनमुक्त भारत जनजागृतीसाठी आपट्याच्या पानावर चित्र काढणे ही ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.          प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका आहे.जगभरातील प्लास्टिकच्या पिशव्या समाप्त करण्यासाठी सुमारे एक हजार वर्षे लागतील.प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे दरवर्षी सुमारे एक लाख प्राणी मरत असतात.याबाबत तळागाळात जनजागृती होणे अपेक्षित आहे.तसेच भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे.धुम्रपान व तंबाखूमुळे कँन्सर सारखे आजार जडतो.धुम्रपानामुळे जगातील  ११% लोकांचा मृत्यू होतो.याबाबत शालेय जीवनात व समाजात जनजागृती व्हावी म्हणून सृजन संस्थेने हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संस्थेतर्फे आवाहन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . त्यात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील  इयत्ता सातवीतील भार्गवी वाघमोडे  हिचा प्र

#Yavat:पांढरे कुटुंबीयांची खाडे बालक आश्रमाला मदत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - संतोष जगताप हंडाळवाडी -केडगाव ता दौंड येथील पार्वती विठोबा पांढरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पांढरे कुटुंबीयांनी गलांडवाडी ता दौंड येथील खाडे बालक आश्रमाला मदत केली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. यावेळी एक दिवसाचा खर्च २५०० रुपयांचा धनादेश यावेळी दिला.  यावेळी दौंड बाजार समिती माजी सभापती दिलीप हंडाळ, संदीप पांढरे, बाळासाहेब महारनोर, रामदास पांढरे, सावळा हाके, गणेश पांढरे, संदीप हंडाळ, प्रवीण पांढरे, अधीक्षक बापू गोफने, बापू बडे, तानाजी दाखले उपस्थित होते. गेल्या २२ वर्षापासून खंडेराव खाडे व प्रमिला खाडे हे दाम्पत्य अनाथ मुलांचे संगोपन शासकीय मदतीशिवाय करीत आहेत. या संस्थेतून अनेक विद्यार्थी घडून गेले आहेत. गेल्या महिन्यात देखील अनेकांनी संस्थेस मदत केली. कानिफनाथ जेधे पारगाव सा. मा. ता. दौंड यांचा मुलगा गणेश जेधे याच्या वाढदिवसानिमित्त मुलांना एकवेळचे जेवण दिले. महेश डचंदुलाल शहा पुणे यांनी अमृत महोत्सवी स्वतंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडून  संस्थेस १० हजार रुपये देऊन संस्थेस मदत केली. बलवंतसिंह चतुरसिंह जाला आनंदनगर, चौफुला यां

#Solapur:जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक अभिनव कार्यक्रम “माझिया मना”

Image
सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने मानसिक स्वास्थ्य सुदृढ -  जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी   सोलापूर,दि.11 (जिमाका) : सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने मानसिक स्वास्थ्य सुदृढ होत असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर अहेमद औटी यांनी केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे किमान समान कार्यक्रमाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्यातर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा न्यायालय येथे ‘माझिया मना’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी डॉ. औटी बोलत होते. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्ना खटावकर प्रमुख वक्ते होते. त्यांनी मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावयाची याबाबत विवेचन केले. वैद्यकीय सेवा आणि न्यायालयीन कामकाज हे एकमेकांशी निगडीत आहेत. दोन्ही ठिकाणी मनुष्य हा केंद्रबिंदू असतो, मानसिक आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी ताणतणावापासून मुक्त जीवन जगून संतुलित आचरण ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक बाधा हा आजार नसून बदललेली मानसिक स्थिती असते. त्यामुळे अशा व्यक्तीकडे भावनिकरित्या जाणून घे

#Chiplun:चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील विकास कामांकरिता निधी देण्याची आवश्यकताआ. शेखर निकम यांची पालकमंत्री उदय सामंतांकडे मागणी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - विलास गुरव  शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी आवश्यक कामांना निधीची गरज असून सुमारे सव्वा दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणी बरोबर शहरातील अन्य कामासाठीही निधीची मागणी करून जल संधारणाच्या मंजूर कामावरील स्थगिती उठवण्याची मागणी राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे आ. शेखर निकम यांनी केली. महत्त्वपुर्ण प्रकल्प आणि चिपळूण संगमेश्वरच्या विकासासाठी निधीची कमतरता जाणवणार नसल्याचे आश्वासन यावेळी ना. सामंत यांनी दिल्याने चिपळूणच्या सौंदर्यात भर पडताना रखडलेली कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.     राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर बहुतांशी कामांना स्थगिती देण्यात आली आहे तर अन्य कामांना निधीची गरज असल्याने सध्या निधी उपलब्ध होणे अवघड झाले होते. आ. शेखर निकम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्याच्या विकासाची पुरेपूर जाण असणाऱ्या उदय सामंत यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली आणि चिपळूणच्या विकासाचे निवेदन ही त्यांना दिले.     गत कित्येक वर्षे इंदिरा गा

#Indapur:हर्षवर्धन पाटील यांनी नंदिकेश्वर मंदिरात अनुभवला श्रीमहाकाल नवनिर्माण लोकार्पण लाईव्ह सोहळा!

Image
निरवांगी नजीक दगडवाडी येथे शेकडो नागरिकांची उपस्थिती  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथे  सोहळा संपन्न! महादरबार न्यूज नेटवर्क  -  बाळासाहेब सुतार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरवांगी नजीक दगडवाडी येथील नंदिकेश्वर मंदिरामध्ये मोठ्या स्क्रीन द्वारे उज्जैन येथील श्रीमहाकाल मंदिर नवनिर्माण ( कॅरिडोर ) लोकार्पण लाईव्ह सोहळा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.11) सायंकाळी अनुभवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीमहाकाल लोक कॅरिडोर लोकार्पण सोहळा धार्मिक व उत्साही वातावरण संपन्न झाला.              उज्जैन ( मध्य प्रदेश) येथे 856 कोटी रुपये खर्च करून सुमारे 47 हेक्टर क्षेत्रावर महाकाल मंदिर काॅरिडोर उभारण्यात आला आहे. उज्जैन येथील श्रीमहाकालेश्वर मंदिर हे देशातील एक ऐतिहासिक व जागतिक प्रसिद्धी लाभलेले जोतिर्लिंग आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले.         श्रीमहाकाल मंदिर नवनिर्माणमध्ये भगवान शंकराचे भव्य कलाकृती, थीम पार्क, हेरिटेज मॉल आदीच्या माध्यमातून अलौकिक विश्वाचे दर्शन होणार असून या काॅरिडोरला 'महाकाल लोक&#

#Natepute:माळशिरस तालुका राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा ता. शिवसेना उपप्रमुख सतीश सपकाळ यांच्याकडून सन्मान

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या माळशिरस तालुका नूतन पदाधिकाऱ्यांचा माळशिरस तालुका शिवसेना (शिंदे गट) तालुका उपप्रमुख सतीश सपकाळ व नातेपुते शहर प्रमुख समीर शेख यांच्याकडून मानाचा फेटा बांधून  सतीश सपकाळ यांच्या निवासस्थानी सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.  यावेळी पत्रकार संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अभिमन्यू आठवले, उपाध्यक्ष श्रीराम भगत महाराज, तालुका कार्याध्यक्ष विलास भोसले, तालुका सरचिटणीस उमेश पोतदार, तालुका सचिव हनुमंत माने उपस्थित होते. सत्कार प्रसंगी तालुका उपप्रमुख सतीश सपकाळ म्हणाले पत्रकारांची संघटना असणं काळाची गरज आहे आपण अन्याय विरुद्ध निर्भीडपणे बातम्या देत असता त्यामुळे एकाद्या  पत्रकारावर अन्याय झाला तर त्याविषयी आवाज उठवण्यासाठी पत्रकारांची संघटना असणे महत्वाचे आहे आपल्या पत्रकार संघटनेच्या मार्फत सामाजिक उपक्रम ही राबविले जावेत व एकजुटीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. यावेळी  तालुका अध्यक्ष अभिमन्यू आठवले म्हणाले आमच्या तालुका पत्रकार संघातील नूतन पदाधिकाऱ्यांचा सतीश सपकाळ यांनी पहिल्य

#Pune:कोथरूड मधील वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेत नवरात्र निमित्त आगळावेगळा उपक्रम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - विलास गुरव    वनाझ परिवार विद्यामंदिर या शाळेत नवरात्र निमित्त यावर्षी एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये दररोज एक विषयाची शैक्षणिक साहित्याची माळ तयार करून वर्गात लावून घेतली होती. ही माळ फक्त लावलीच नव्हती तर ती विद्यार्थ्यांकडून तिचे वाचन करून घेण्यात आले.       अशा नऊ दिवसाच्या नऊ माळा प्रत्येक वर्गात लावून नवरात्र उत्सव साजरा केला या नवरात्रात वर्गामध्ये  धान्याचाही घट बसवून विद्यार्थ्यांना धान्यांचे माहिती तसेच घट बसवण्यामागील शास्त्रीय तसेच धार्मिक कारणेही सांगण्यात आली. तसेच ज्ञानाचा घट बसवून त्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्याच्या माळा लावून देवीचा आगळावेगळा जागर करण्यात आला.      दररोज देवीच्या नऊ रूपांची माहिती तसेच कथा नवरात्र निमित्त विद्यार्थ्यांना   सांगण्यात आली.             या उपक्रमाची कल्पना शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका अनिताताई दारवटकर यांनी मांडली तर ते साकारण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्ग शिक्षकांनी सहभाग घेतला. कोरोनाच्या दीर्घ कालखंडानंतर विद्यार्थी व शिक्षकांचा या उपक्रमातील सहभाग वाखाणण्याजोग

#Natepute:माळशिरस तालुका ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेची कार्यकारणी घोषित

Image
   माळशिरस तालुका अध्यक्षपदी  अभिमन्यू आठवले तर उपाध्यक्ष पदी श्रीराम भगत महाराज यांची निवड  महादरबार न्यूज नेटवर्क  -  ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल संघटनेची बैठक नुकतीच कोल्हापूर येथे विश्वस्त यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश पाटील, डिजिटल मीडिया प्रमुख अशोक पवार, केंद्रीय कोषाध्यक्ष सत्यवान विचारे, प्रदेशाध्यक्ष कांचन जांबोटी, प्रदेश सरचिटणीस गोविंद राजपूत, प्रदेश संघटक सचिन ठोंबरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस  सर्वांनी एकमताने  माळशिरस तालुका कार्यकारणी जाहीर केली. माळशिरस तालुका अध्यक्षपदी अभिमन्यू आठवले, तालुका उपाध्यक्षपदी श्रीराम भगत महाराज, तालुका सचिव हनुमंत माने , तालुका कार्याध्यक्ष विलास भोसले,  तालुका संघटक धनंजय पवार, तालुका कोषाध्यक्ष प्रमोद भैस, तालुका सरचिटणीस उमेश पोतदार, तालुका सहसंघटक आबा भिसे, तालुका संयोजक संजय पवार, तालुका संपर्कप्रमुख बशीर शेख, तालुका सदस्य मनोज राऊत, विवेक राऊत याप्रमाणे माळशिरस तालुका कार्यकारणी घोषित झाले असून ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल माळशिरस तालुका

#Chiplun:आ. शेखर निकम यांची राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना समन्वयक पदी नियुक्ती

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - विलास गुरव  चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार शेखर निकम यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना समन्वयक (कोकण विभाग) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना दिले. आ. निकम यांनी निवडून आल्यानंतर आजतागायत आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याबाबत त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे व गरजूंना मदत मिळवून दिली आहे. सामाजिक कामामध्ये अग्रेसर असताना त्यांनी आपल्या पक्षाच्या विचारांचे पालन करत पक्ष संघटना बळकट करण्याचे देखील काम केले आहे.  त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटना समन्वयक (कोकण विभाग) पदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. याद्वारे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, पक्षाचे मान्यवर नेते व कार्यकर्ते यां

#Solapur:पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते सायकल बँक उपक्रमातून मुलींना सायकली वाटप

Image
सोलापूर, दि.4 (जिमाका) : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 चे नंबर वन फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुलींसाठी सुरू केलेल्या सायकल बँक उपक्रमाला 100 सायकली देण्यात आल्या. त्यातील प्राधिनिधीक स्वरूपात 11 सायकलींचे वाटप महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते मुलींना वाटप करण्यात आले. नियोजन भवन येथे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील 11 मुलींना प्रातिनिधीक स्वरूपात सायकली प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन श्री. विखे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशाधीन शेळकांदे, कार्यकारी अभियंता पंडीत भोसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्कर बाबर, संजय जावीर, गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ, प्रशांत काळे, मल्हारी बनसोडे, बापूसाहेब जमादार, उत्तम सुर्वे उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेचे च

#Pune: जाणीव ममतेची

इयत्ता पाचवीचा वर्ग सुटला, सोनू ची पावलं घराकडे वळाली. गावापासून 3 किमी शाळा दूर होती. कोवळच वय चालून चालून दमायला व्हायचं.दारात चपला काढता काढताच सोनू म्हणाला ए आई मला भूक लागली काही तरी खायला दे ना ग! आई उत्तरली अगोदर घरात तर ये!हात पाय धुवून घे. नको ग आई आधी खायला दे,मला खूप भूक लागली. आईने भाकरीच टोपलं तपसलं, बाळा भाकरी आणि भाजी आहे खाऊन घे, सोनू म्हणाला नको ग आई काहीतरी चांगल बनव. घरात अठराविश्व् दारिद्र्यचं....पण अशातही जर कोणी अचानक आलंच तर 2 भाकरी जास्तीच्या असायच्या कायम तेव्हाची लोकं पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असायची... घेणार का, खाणार का असा सूर नसायचा. सरळ ताट समोर यायचं.आई , आलेच म्हणत शेजारी गेली आणि काहीतरी साडीच्या पदराआड उसणवार घेऊन आली. आणि बनवून दिलं. त्याला काय खाण्यात राम मग कुठून का येईना... शेवट खोडकर वय ते पण तो खाताना तिच्या चेहऱ्यावर प्रचंड सात्विक आनंद आणि समाधान होत. पोटात ढकलून सोनू गेला मित्रांमध्ये खेळायला. तशी आई स्वाभिमानी कधी, कोणत्याही संकटात कुणापुढे हात न पसरणारी, न झुकणारी, आणि आपल्या परिस्थितीच रडगाणं गाऊन समोरून दया मिळावी याची तिला प्रचं