Posts

Showing posts from June, 2023

#Yavat:दौंडच्या जनतेने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवेन- आमदार राहुल कुल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप शेतीच्या पाण्याचा पाऊस लांबल्याने प्रश्न गंभीर होऊ लागला , परंतु चिंतेचे प्रश्न नाही, मुळशीचे पाणी मिळवून दौंडच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवेन,असा निर्धार दौंडचे आमदार राहुल कुल यांनी श्री क्षेत्र विठलं बन डाळिंब येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे, दौंड हवेली आणि पुरंदर या तीन तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या आणि या भागातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठलंबन डाळिंब येथील एकादशी निमित्त पूजा आमदार राहुल कुल यांनी  केली, विठ्ठल बन देवस्थान ट्रस्ट डाळिंब आणि ग्रामपंचायत डाळिंब याचे वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार कुल आपल्या भाषणात पुढे म्हणाले , दौंडच्या जनतेने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवेन, दौंड तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवले आहेत, काही राहिले आहेत, तेही लवकरच सोडवले जातील, प्रश्न कोणताही असू द्या, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवेन, याची ग्वाही देत आहे, यावेळी दौंडचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात आपल्या

#Varvand:तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना मराठा ओबीसी आरक्षणचे निवेदन

Image
 मराठा वनवास यात्रा प्रमुख योगेश केदार  महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर गल्ली ते दिल्ली एकच विषय मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण. दि(२७) लातुळजापूर येथे तेलंगणचे राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनजागृती विषयी माहिती दिली. देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ओबीसी आरक्षण संदर्भातील निवेदनही दिले. सद्ध्या आम्ही सर्वत्र केवळ एकच विषय घेऊन वावरत आहोत. तो म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण. एखादा शेतात राबणारा शेतकरी असो की एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, सर्वांना फक्त तोच विषय समजावत आहे.  तेलंगणा राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी असलेले हरीश राव यांनी काल मला सहज फोन केला होता. ते सद्ध्या अर्थ आणि सार्वजनिक आरोग्य अश्या दोन महत्वूर्ण खात्याचे मंत्री आहेत. ते मला म्हणाले, योगेश भाई महाराष्ट्र मे आ रहे हैं, पंढरपूर और तुळजापूर का दर्शन करने वाले है. आप कहा हो? मी त्यांना म्हणालो की मैं बार्शी के आंदोलन के लिये आया हू. यहाँ से उमरगा जा रहा हुं. यहाँ से वापस आझाद मैदान जाऊंगा. त्यानंतर ते म्हणाले की मी तुमचे स्टे

#Chiplun:चिपळूण रेल्वे स्थानकावर वंदे भारत गाडीला थांबा मिळावा यासाठी आ. शेखर निकम यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - चिपळूण रेल्वे स्थानक हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख मधवर्ती रेल्वे स्थानक असुन असंख्य प्रवासी चिपळूण रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात शहारा लगत विविध औद्योगिक कंपन्या व पर्यटन स्थळे त्यामुळे चिपळूण हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे तसेच चिपळूण रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना पाणी भरून दिले जाते. वंदे भारत या गाडीला चिपळूण सारख्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर थांबा न देणे म्हणजे कोकणच्या विकासाला खीळ घालने समान आहे. या संदर्भात पवार साहेब यांच्याशी चर्चा केली नंतर लगेचच साहेबांनी या संदर्भात रेल्वेमंत्री यांच्याशी बोलतो असे आश्वासित केले.

#Natepute:मामाश्री प्रतिष्ठानकडून वारकरी भक्तांना फळे वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नातेपुते येथे आले असता पालखी सोहळा दरम्यान नातेपुते  येथील मामाश्री  प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपत नातेपुते नगरीं मध्ये येणाऱ्या वारकरी भक्तांना 3 टन केळी व 2 हजार लस्सी चे मोफत वाटप करण्यात आले. मामाश्री प्रतिष्ठाण हे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. यावेळी मामाश्री प्रतिष्ठाण संस्थेचे अध्यक्ष तेजस पाटील उपाध्यक्ष धनाजी पांढरे तशेच नगरसेवक अतुल बावकर, दादासाहेब लाळगे, विनोद शेंडगे, राहुल शेंडगे, अमोल शेंडगे, बापू शेंडगे, नाना सोरटे, आकाश भुसारे, संजय शेंडगे, उपस्थित होते. मामाश्री प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचे नातेपुते सह परिसरातून कौतुक केले जात आहे.

#Yavat:कडेठाण येथे विद्यार्थ्यांचा संयुक्तरीत्या दिंडी सोहळा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील कडेठाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कै. त्रिंबक दिवेकर विद्यालय यांनी एकत्रित करण्यात आला लहान विध्यार्थ्यांचा सुंदर असा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता,लहान विद्यार्थी श्री विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या वेशात होते. पूर्ण गावात दिंडी  नेण्यात आली ग्रामस्थांनी मोठया आनंदाने व कौतुकाने या बालवारकऱ्यांचे स्वागत केले पूजन केले. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक सौ शुभांगी दिवेकर व त्यांचा शिक्षक वर्ग यांनी  व्यवस्थापन केले होते त्यांना सहकार्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी केले होते आणि कै. त्रिंबक दिवेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जनक वरपे सर व त्यांचा शिक्षक वर्ग उपस्थित होता, सर्व शिक्षकांनी उत्तम असे दिंडीचे नियोजन केले होते. संजय वाबळे सर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सरपंच सौं. सोनाली ताई नराळे व उपसरपंच अनिल धावडे, ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश शिपलकर, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष सौ निपुल यादव,सदस्या दीपा दिवेकर व सर्व  सदस्य व  ग्रामस्थ उपस्थित होते .

#Malshiras:सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

Image
माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांना मातृशोक… महादरबार न्यूज नेटवर्क - सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवार दि. २६ जून २०२३ रोजी सायंकाळी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री होत्या. जिजाबाई व विठ्ठल सातपुते यांनी प्रतिकूल परिस्थितीत संसार करून आपल्या मुलांना चांगले संस्कार व उच्च शिक्षण दिलेले आहे. माळशिरस तालुक्यामध्ये अनेक वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम केलेले आहे. त्यांचा मुलगा राम सातपुते यांना माळशिरस तालुक्याचे आमदार होण्याचे भाग्य लाभलेले आहे. दोन-तीन महिन्यापासून दवाखान्यांमध्ये औषध उपचार सुरू होते.

#Solapur:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यात स्वागत

Image
सोलापूर, दि. 25 (जि. मा. का.) :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सोलापूर विमानतळ येथे जिल्हावासियांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने व सहायक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी आले होते.

#Varvand::दौंडच्या पश्चिम पट्ट्यात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनामघर दौंड तालुक्यात दि २४,२५रोजी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्गात नागरिकांमध्ये व व्यापारी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे उन्हामुळे  त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे तालुक्यात सर्वत्र शेतकरी वर्ग सुखावलेला आहे वरवंड कडेठाण देवळगाव माळवाडी पडवी, येथील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे खरीप लागण्यासाठी आवश्यक असणारा पाऊस आता पडण्यास सुरुवात झालेली असून दोन दिवस सतत पाऊस चालूच आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नागरिकांमध्ये व्यापारी वर्गात मंदीचे वातावरण आहे शेतकऱ्यांकडे चलंन फिरले तरच व्यापारी चलन फिरत असते असे मानले जाते. खरीप पिकांसाठी तसेच होऊ लागण्यासाठी हा पाऊस चांगला आहे पडणाऱ्या पावसामुळे बाजरी, सूर्यफूल,कांदा, ऊस ची लागवड शेतकरी वर्ग आता करू शकतो. एकंदरीत पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र समाधान आहे  उशिरा आलेला पावसामुळे त्यांच्यामध्ये एक चिंता होते ती कमी झालेले आहे आता ते आपले पिके वाचू शकतात .सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी थोड्या फार कमी होतात.

#Varvand:आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यत शैक्षणिक शालेय फि मध्ये सवलत द्यावी - संभाजी दहातोंडे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -   अक्षता हनमघर आरटीई'  शैक्षणिक  सवलत दहावीपर्यत मिळावी मराठा महासंघाची मागणी संभाजी दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना मुंबई येथे निवेदन  देण्यात आले. आरटीई (बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत शालेय फी मध्ये सवलत दिली मात्र, ज्या वर्गासाठी भरमसाठ फी आहे त्याच काळात म्हणजे नववीपासून सबंधित पालकाना शुल्क भरावे लागत आहे. हे शुल्क भरण्याची ऐपत नसलेल्या पालकांच्या पाल्याचे शिक्षण अडचणीत येत आहे. राज्यातील सुमारे ७०हजार अधिक विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी ही सवलत दहावीपर्यत करावी अशी मागणी    शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन केली आहे. संभाजीराव दहातोंडे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गरिब व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटूंबातील बालकांना नामांकित

#Chiplun:मठाधिश भाईनाथजी महाराज यांच्या हस्ते जि.प.शाळा नं.2 धामणी येथे शैक्षणिक साहित्य वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव सोमवार दि.19 जुन 2023 रोजी संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे श्री.श्री.श्री. महंत पिर योगी भाईनाथजी महाराज,मठाधिश कालभैरव मठ पायधुनी मुंबई यांच्या वतीने  जि.प. शाळा.धामणी नं.2 गावातील सर्व शाळांमधील गरजू व होतकरू मुला-मुलीनां शैक्षणिक साहित्यांचे वाटत करण्यात आले. सुमारे  70 मुलांना दप्तर, ड्रेस,छत्री, वह्या,पेन, इत्यादी शैक्षणिक साहित्यांचे वाटत केले गेले. सदर कार्यक्रमाला स्वामीभक्त श्री प्रभाकर घाणेकर, सरपंच श्री संतोष काणेकर, उपसरपंच श्री संगम पवार, शिक्षण विस्तार अधिकारी श्री विनायक पाध्ये,माजी पोलीस पाटील श्री हरिश्चंद्र गुरव,ग्राम.पं.सदस्य ,श्री गौतम गमरे,शा.व्य.स.अध्यक्ष, केंद्रप्रमुख,शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.  तसेच कार्यक्रम श्री प्रभाकरशेठ यांच्या प्रेरणेतून आणि प्रयत्नातुन गेली 14 वर्षे अखंडपणे चालू आहे. सामाजिक सेवेचे व्रत अंगीकारलेले भाईनाथजी महाराज दरवर्षी आपल्या कोकणातील सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी,रुग्ण, मुलभूत सोईसुविधांपासून वंचित, गोरगरीब जनतेला फार मोठं आर्थिक योगदान देत असतात. कार्यक्रमाला भाईनाथजी म

#Yavat:सुनील लोणकर यांची पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या कोषाध्यक्षपदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या कोषाध्यक्षपदी भिवरी (ता. पुरंदर) येथील सुनील पांडुरंग लोणकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. सासवड येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा कार्यकारणी विस्तार सभेत ही निवड झाली. यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे,राज्य नेते महादेव माळवदकर, राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, जिल्हाध्यक्ष सुनील वाघ, सरचिटणीस संदीप जगताप, इंदापूर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल, पुरंदर शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर, सरचिटणीस भाऊसाहेब बरकडे, शिक्षक नेते लतिफ इनामदार यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देऊन  लोणकर यांना सन्मानित करण्यात आले. सुनील लोणकर हे पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभापती व पुरंदर तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. शिक्षक हिताच्या प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे सुनील लोणकर यांनी सांगितले.

#Natepute:हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

Image
धर्मपुरी येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले पालखीचे स्वागत पंढरपूर दि. २३ (उ.मा.का.) :-  आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री. विखे-पाटील  यांच्यासह खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू रजणीश कामत, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माऊलीच्या पालखी स्वाग

#Natepute: प्रेम भैया देवकाते, सागर बिचुकले, विशाल साळवे यांच्या धरणे आंदोलनाला यश

Image
मागण्या मान्य झाल्याने धरणे आंदोलन स्थगित महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते तालुका माळशिरस येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्काम शुक्रवारी असल्याने या ठिकाणी करमणुकीसाठी छोटे मोठे पाळणे आलेले आहेत. या  पाळण्यामध्ये सामान्य जनतेला बसता यावे तसेच आनंद घेता यावा यासाठी नातेपुते नगरपंचायत ला पाळण्याचे दर कमी करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. घेतल्याने निवेदनाची दखल न घेतल्याने प्रेम भैया देवकाते, सागर बिचुकले, विशाल साळवे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलनास बहुतांशी नागरिकांनी पाठिंबा दिला. आंदोलनाची दखल घेत नातेपुते नगरपंचायतने पाळण्याचे दर कमी केले. अखेर पाळण्याचे दर कमी करण्यात यश मिळाले. पाळण्याचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे वीस रूपये ते पन्नास रुपये असे ठेवण्यात आले. पाळण्याचे दर कमी करण्यात आल्याने उपोषण करते यांनी आपले आंदोलन थांबविले.

#Chiplun:माखजन बाजारपेठेला आमदार शेखर निकम यांनी स्वखर्चाने केले गाळमुक्त

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव माखजन बाजारपेठेतील गड नदीतील गाळ अनेक दिवसांपासून साचून राहिला होता. त्यामुळे तेथील व्यापारी वर्गासह नागरिकांचे हाल होत होते. हि अडचण ओळखून येथील आमदार शेखर निकम यांनी स्वखर्चाने गाळ काढून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून त्यांची सुटका केली. माखजन बाजारपेठ ही आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी सोयीची अशी आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे तेथील नाल्यांमध्ये गाळ साचून दुर्गंधी पसरली होती. स्थानिक प्रशासनाला अनेकदा कळवूनही, गाळ काढण्यासाठी वारंवार पत्र देऊनही प्रशासन गेली 2 वर्ष माखजन बाजारपेठेकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हते. चिपळूणपेक्षाही माखजन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी भरुन व्यापारी, शेतकरी तसेच घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. माखजनवासियांची हीच अडचण ओळखून येथील लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी गाळ काढण्यासाठी आपल्या स्वखर्चाने जेसीबी देऊन गाळ काढण्याचे काम चांगल्या प्रकारे करुन दिले. दोन वर्षांपासून प्रलंबित गाळ प्रश्न सोडवून व्यापारी, शेतकरी व नागरिकांची होणारी गैरसोय दूर केल्

#Yavat: इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पालखी उत्सवाचे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप काळ बदलत आहे तसेच शिक्षण व्यवस्था आहे  शहराबरोबर ग्रामीण भागातही आता बऱ्याच प्रमाणात इंग्रजी माध्यमांच्या शैक्षणिक संस्था चालू झालेले आहेत. परंतु इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक संस्था चालू असतानाही    मराठी बांधवांचे सण उत्सव आहे त्याचे आयोजन करण्याचे काम यवत येथील मोरया एज्युकेशन सोसायटीने ठेवले आहे. मोरया एज्युकेशन सोसायटी,यवत संचलित यवत हेरीटेज स्कूल च्या वतीने श्री काळभैरवनाथ मंदिर येथे पालखी सोहळा प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात ३ ते ४ वर्षाच्या चिमुकल्यांनी स्केटींग करत विठ्ठल- रुक्मीणी व तुकाराम महाराजांच्या भोवती प्रदक्षिणा करून अविस्मरण प्रदर्शन केले या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सोनल मिस , संचालक रोहन दोरगे, प्रतिभा रोहन दोरगे यांच्यावतीने करण्यात आले होते यावेळी नर्सरी, एल.के.जी, यु.के.जी चे सर्व लहान विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

#Yavat:कत्तलीला नेणाऱ्या मुक्या गाईची सुटका

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड येथील कत्तलखान्यावर छापा टाकून १६ जनावरांची पोलीस आणि प्राणिमित्रांनी सुटका केली. जनावरांच्या चरबीपासून बनविलेले भेसळ तूप आणि जनावरांची कातडी जप्त केली. दौंड येथे ईदगाह मैदान शेजारी खाटीक गल्लीतील कत्तलखान्याशेजारी जनावरे गोवंश कत्तलीसाठी ठेवले आहेत, अशी माहिती प्राणिमित्रांना मिळाली. त्यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना ही माहिती दिली. प्राणिमित्र अधिकारी शादाब मुलाणी, मंगेश चिमकर, निखिल दरेकर, अहिरेश्वर जगताप, ओमकार जाधव, प्रेम पवार व इतर सहकारी यांनी दौंड पोलीस स्टेशनला महिती दिली. खाटीक गल्ली येथे छापा टाकण्यात आला. १६ लहान मोठी वासरे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आली होती. १६ गोवंशाची सुटका करण्यात आली. जनावरांच्या चरबीपासून बनविलेले १०० किलो बनावट डालडा तुप जनावरांची कातडी जप्त केली. शरीफ हसन कुरेशी (रा. दौंड, खाटीक गल्ली) याच्याविरोधात दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व मानद पशुकल्याण अधिकारी महेश भंडारी यांनी विशेष सहकार्य केले. पुढील तपास अमीर शेख, रवींद्र काळे

#Yavat: जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीच्या स्वागतासाठी यवतकर सज्ज

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन दौंड तालुक्यात दि १५ रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील यवत ,वरवंड या ठिकाणी तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मुक्काम आहे. तेथील सर्व व्यवस्था पूर्ण झालेली आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे . यवत येथील पालखीचा मुक्काम श्री काळ भैरवनाथ मंदिरात आहे . यवत येथील पालखीच्या मुक्कामात सर्व ग्रामस्थ व देवस्थान कमिटी कडून सर्व सुविधा  करण्यात आलेले आहे असे देवस्थान समितीचे अध्यक्ष सतीश दोरगे पाटील यांनी दिली आहे. यवत येथील मुक्कामात वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठले भाकरीचा मेनू आहे,  ही खूप जुन्या काळापासून परंपरा आहे पिठलं भाकरी  बनवण्यासाठी स्वतंत्र मंडप तयार केलेला आहे .   पालखीसाठी प्रशासनाने यवत गावातील सर्व पथ दिवे जास्त प्रमाणात वाढवलेले आहेत. प्रशासनाकडून पाण्यात जंतू विरहित होण्यासाठीचे टीसीएल पावडर टाकून  निर्जंतुकरण केले आहे . गावातील रस्ते स्वच्छ केलेलेत प्रशासनाकडून मोबाईल चार्जिंग व्यवस्था व टॉयलेटची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासना

#Chiplun:आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत मुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष लागवडीबाबत बैठक

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव आ. शेखर निकम यांच्या सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे अभियंते, ठेकेदार, अधिकारी वर्ग, संबंधीत गावांचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करणेबाबत बैठक संपन्न झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या परशुराम ते संगमेश्वर भागातील रस्त्याच्या दुतर्फा असणारी अनेक मोठ-मोठ्या वृक्षांची तोड करण्यात आली. या भागातील महामार्गाचे काम अंतिम टप्यात आले असून महामार्गाच्या दुतर्फा पुन:श्च वृक्ष लावणे महत्वाचे असल्याने आमदार शेखर निकम यांनी महामार्ग अभियंता, अधिकारी वर्ग, संबंधीत गावचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांची आपल्या कार्यालयात बैठक आयोजित करून वृक्ष लागवड करण्याबाबत चर्चा केली. यामध्ये महामार्गाच्या दुतर्फा मोकळ्या जागेत आंबा, काजू, फणस, जांभूळ, चिंच, बकुळ, वड, पिंपळ व अन्य अशी झाडे १२ मिटर अंतरावर एक  झाड लावण्याचे नियोजन करण्यात आले.  जून महिन्याच्या अखेर पर्यंत खेरशेत, असुर्डे, आगवे, सावर्डे, कोंडमळा, कामथे, कापसाळ, आंबेड खुर्द, धामणी, गोळवली, तुरळ, शिं

#Natepute:नातेपुते दिंडीचे आळंदीला जाण्यासाठी उत्साहात प्रस्थान

Image
नातेपुते नगरीच्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे यांच्या हस्ते पूजन संपन्न                           महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालुक्यातील नातेपुते  येथील वै.गुरूवर्य ह भ प मनोहर महाराज भगत यांची नातेपुते परिसर दिंडी सोहळा हा पायी दिंडी सोहळा नातेपुते येथून शनिवारी आळंदीकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले कैवल्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या बरोबर नातेपुते परिसर दिंडी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने निघत असतो यावर्षीही त्याच उत्साहाने निघत असून यानिमित्ताने शनिवारी १० जून रोजी सकाळी भजन पुजन सोहळा नातेपुते ग्रामस्थांच्या वतीने संपन्न झाला. वै गुरूवर्य मनोहर महाराज भगत यांनी गेल्या २२ वर्षांपूर्वी नातेपुते गावातून दिंडीला सुरूवात केली.  दिंडीमध्ये नातेपुते, सातारा, कवठेमहाकाळ, सोलापूर, पुणे, गिरवी, माळशिरस,बारामती, इचलकरंजी जळगाव खानदेश, आदी भागातील भाविकांचा समावेश आहे. दिंडीच्या माध्यमातून धार्मिक, नामस्मरण,व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा, सामाजिक, वृक्षारोपण, शेतीविषयी,देशभक्ती यावर कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून दिंडीच्या वतीने समाजप्रबोधन केले

#Varvand:गोवा येथे झालेल्या नॅशनल बँडी स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर गोवा येथे झालेल्या नॅशनल बँडी स्केटिंग (मिरामार) येथे संपन्न झाल्या त्या स्पर्धा गव्हर्नमेंट स्पोर्ट्स युथ स्टेडियम येथे होत्या. या  स्पर्धे मध्ये भारतातील एकूण १४राज्य सामील झालेले होते.त्यात दौंड तालुक्यातील केडगाव (चौफुला) येथील ग्रेट स्पोर्टस ॲकॅडमी च्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्र चे नेतृत्व करत भारता मध्ये महाराष्ट्र साठी  ३ क्रमांक पटकावला  यश संपादन करणारी मुले अनुक्रमे खालील प्रमाणे (१) १२ वर्षा खालील प्रमाणे मुल हर्ष शेंडगे (२)१४वर्षा खालील मुले दिव्यांशु जाधव,अंश यादव,क्षितिज कुंभार.हर्षर्धन शितोळे ,ओजस शेळके ,अजित पवार (३)१९ वर्षखालिल मुल चैतन्य शितोळे  या सर्व मुलांची निवड ही रशिया येथे होणाऱ्या अंतराष्ट्रिय स्पर्धा साठी झाले आहे या सर्व विद्ार्थ्यांना  मार्गदर्शन  समाधान दाने , गणेश घुगे व आकाश कसबे यांनी केले यश संपादन करणाऱ्या मुलांचे कौतुक शरद पवार सर, डॉ लोणकर संदीप टेगले सर व समस्थ केडगाव चौफुला ग्रामस्थांनी केले.

#Baramati:चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. एमआयडीसी शाखेच्या वतीने करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - इयत्ता दहावी नंतर पुढे काय असा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ असतो. नक्की कोणत्या बाजूला आपण जायचं आणि आपल्या आवडीनिवडीनुसार आपण आपल्या क्षेत्रात काम करून मिळणाऱ्या संधी याबाबत मार्गदर्शनाची गरज असते. अशावेळी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड ने पुढाकार घेऊन बारामतीच्या एमआयडीसी शाखेमध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत मार्गदर्शनाचे शिबिर आयोजित केले होते. यावेळी अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सृजन सोशल वेल्फेअर  फाउंडेशनचे प्रा.विशाल भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या युगात स्वतःला आवडीनुसार झोकून देण्यासाठी स्वतःची क्षेत्रे स्वतःच निर्माण केली पाहिजेत. आणि मिळणाऱ्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे, असे विचार देखील त्यांनी व्यक्त केले. यावेळी एसबीआय बँकेच्या वतीने श्री मुल्ला सर व सौ मोरे मॅडम यादेखील उपस्थित होत्या. श्री प्राध्यापक प्रफुल्ल आवाडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा महामंत्रच दिला. सदर कार्यक्रमासाठी चंदुकाका सराफचे चेअरमन किशोर कुमार शहा,बारामती क्लस्टर हेड श्री दीपक वा

#Chiplun:भविष्य काळात चिपळूण तालुक्यातील तिवडी गाव महाबळेश्वर बनेल, गावाच्या विकासासाठी कटिबद्ध - आ. शेखर निकम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थित तिवडी येथील अनेक वर्ष नागरिकांची मागणी असलेला भटवाडी रस्ता भूमिपूजन, राळेवाडी रस्ता डांबरीकरण उदघाटन तसेच काही कार्यकर्त्यांनी जोमाने राष्ट्रवादी पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले कि आपण आज राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागत करत आहात आज आपण जो निर्णय घेत याचा कधीच तुम्हाला पश्चताप होणार नाही. आपणाला माहित आहे कि तिवरे धरण फुटी झाल्यानंतर दसपटी भागात पाणी समस्या भेडसावत आहे. मात्र जल जीवन मिशन अंतर्गत तिवरे, आकळे, कादवड गावातील योजना चालू असून येणाऱ्या काळात एखादा मोठा  पाझर तलाव झाल्यास त्यातून मुक्तता मिळेल त्याचप्रमाणे मागील दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टी झाल्यानंर महत्वाचे ब्रिज व्हाऊन गेले मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्याने तुमच्या सहकार्याने व माझ्या प्रत्नातून कळकवणे , दादर, आकळे आणि नांदिवसे येथील ब्रिज करण्यात यश आले, तिवडी हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असून भविष्यात महाबळेश्वर सारखे पर्यटन क्षेत्र होईल.सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांचा शिक्षणासठी कायम सहकार

#Mumbai:राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली मेंढपाळाच्या वाड्यावर

Image
एक लाख रुपये चा धनादेश देऊन अश्रू पुसण्याचा प्रयत्न 27 मेंढ्या ठार झालेल्या मेंढपाळांचा केला सन्मान महादरबार न्यूज नेटवर्क - गेल्या काही दिवसापूर्वी नागठाणे येथील बिबट्याच्या हल्ल्यात कागल येथील मेंढपाळाच्या 27 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या, मेंढपाळ कुटुंबावर आलेल्या दुखाच्या डोंगरावर मात करण्यासाठी मेंढपाळ बांधवांना हातभार लावण्यासाठी त्यांच्या मेंढपाळ वाड्यावर जाऊन त्यांना धीर आणि आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाज बांधवांनी मेंढपाळ वाड्यावर जात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विधायक रीतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समाजातील दानशूर व्यक्ती ठाण्याचे सवदे काका आणि मुंबई ची टीम यांनी एक लाख रुपये देऊन मेंढपाळांचा सन्मान केला,तसेच सर्व सहकाऱ्यांनी साडीचोळी ,किराणा माल असे एक महिन्याचा शीधा देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा छोटासा प्रयत्न केला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याशी प्रो.अजित येडगे साहेबांनी संपर्क करून दिल्यानंतर पडळकर साहेबांनी मेंढपाळांना धीर देऊन मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले,तसेच सवदे काका आणि मुंब

#Natepute:अशोक तुकाराम पिसे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मांडवे तालुका माळशिरस येथील अशोक तुकाराम पिसे यांनी एस.टी महामंडळ मध्ये ३३ वर्ष सेवा बजावत ३१मे २०२३  रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती बद्दल नातेपुते येथील प्रेम भैया देवकाते पाटील मित्र परिवाराच्या वतीने सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. 33 वर्ष एसटी महामंडळ सेवा31 मे, 2023 रोजी निवृती झाले राहणार मांडवे 50 फाटा यावेळी प्रेम भैया देवकाते पाटील मित्र परिवाराच्या वतीने सत्कारावेळी प्रेम भैया देवकाते पाटील, गौतम शेठ पांढरे पाटील,राहुल शेठ रणदिवे, अक्षय भैय्या ठोंबरे,अजित दादा पांढरे पाटील इ. उपस्थित होते.

#Natepute:दाते प्रशालेची साक्षी गोरे तालूक्यात प्रथम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इ. १० वी परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये नातेपुते येथील डॉ.बा. ज. दाते प्रशालेचा ९६.८८ टक्के, चंद्रकांत घुगरदरे प्रशाला ९० टक्के तरश्रीमती रत्नप्रभा मोहीते पाटील प्रशालेचा ८९/८३% लागला आहे, यामध्ये नातेपुते एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. बा. ज. दाते प्रशालेत प्रथम क्रमांक साक्षी सुधीर गोरे (९७.४० टक्के), द्वितीय क्रमांक मृण्मयी आनंदकुमार लोंढे (९६.४० टक्के), उन्नती सचिन बोराटे (९६.४० टक्के) तर तृतीय श्रावणी तुकाराम भोमाळे (९६.२० टक्के). अक्षय शिक्षण संस्था संचलित चंद्रकांत घुगरदरे प्रशालेत प्रथम आदित्य संजित ऐवळे (९३. ८० टक्के), द्वितीय रामेश्वरी राणोजी सुतार (९१.२० टक्के), तृतीय ऋतुजा महेश लाळगे (९०.४० टक्के) तर श्रीमती रत्नप्रभा मोहीते पाटील प्रशालेत   प्रथम कु.मुलाणी सना नजीर ९३/८०%, व्दितीय कु अल्दर नम्रता अशोक ९१%,तृतीय कु सय्यद आफ्रिन अक्तर  ८७/६०%; असे गूण मिळालेल्या यशस्वी विद्यार्थाचे मूख्याध्यापक प्रविण बडवे, उपमुख्याध्यापक विठ्ठल पिसे,  मुख्याध्यापक रवी

#Yavat:यवत येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचा दहावीचा निकाल जाहीर विद्यार्थिनी अग्रेसर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप शैक्षणिक वर्ष २०२२-२३यावर्षी विद्या विकास मंदिर यवत या विद्यालयाचा एसएससी चा शेकडा निकाल ८८.५४ टक्के लागलेला आहे. यामध्ये प्रथम दोन क्रमांकावर मुलींनी बाजी मारलेली असून प्रथम क्रमांक कु.श्रावणी सचिन थोरात .९४ ४०% द्वितीय क्रमांक कु. स्वराली आशिष मेहता ८८.०८% तृतीय क्रमांक चि.ओंकार नंदू बारवकर ८१% विद्यालयाचा निकाल ८४.५४,℅ लागला असून विद्यालयाचे प्राचार्य कुदळे मॅडम व पर्यवेक्षक सतीश सावंत सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.