Posts

Showing posts from March, 2024

#Pune राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - गरुड फाउंडेशन यांच्याकडून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक/ डिजीटल मीडिया), युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्राम विकास आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनिय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार आयोजित केले आहे.                         Advertisement  सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुकांनी व्हॉटसॲपवरच आपला प्रस्ताव पाठवावा. मा.आकाश पुजारी फोन व व्हॉटसॲप ९८६०९४९६०० / ९०९६५०६१५० या नंबरवर १० एप्रिल २०२४ पर्यंत पाठवावे असे आवाहन गरुड फाउंडेशन'चे अध्यक्ष श्री. आकाश पुजारी यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

#Baramati मायावतींचा बसपा करणार "सोशल इंजिनीअरिंग" बारामतीत कोणाचे गणित बिघडवणार?

Image
धनगर समाजाला उमेदवारी देणार! महादरबार न्यूज नेटवर्क - बारामती लोकसभा मतदार संघात यावेळी पवार घराण्यात दुफळी निर्माण झाली आहे, त्यामुळे काका, पुतण्याचा संघर्ष महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, अगदी खालच्या पातळीवर दोन्ही कडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नेते टीका एकमेकांवर करीत आहेत, हा संघर्ष पहिल्यांदाच पवार घराण्यात पाहायला मिळतोय दुसरीकडे संपूर्ण देशात भाजपची सत्ता असताना बारामतीत मात्र भाजप शांत आहे , भाजप लांबून या सर्व परिस्थितीकडे बघत आहे.                               Advertisement   त्यामुळे बारामतीत पहिल्यांदाच पवारांच्या होम पिचवर चुरस निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाज देखील आपली ताकत दाखवण्याच्या तयारीत आहे, ओबीसी, बहुजन समाजाचा मतदार बारामती लोकसभेत मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामध्ये धनगर समाजाचे मोठे निर्णायक मतदान या मतदार संघात आहे. धनगर समाजाचे महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेना टफ फाईट दिली होती. तब्बल चार लाख 4.51 हजार मते त्यावेळी त्यांना मिळाली होती हे देखील महत्वाचे आहे, त्यातच आता देशात सोशल इंजिनीअरिंग करण्यात माहीर असलेल्या&quo

#Natepute तेजस्विनी मोरे -पांढरे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - जि .प. प्रा .शाळा कारुंडे शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ तेजस्विनी शिवशंकर मोरे -पांढरे  यांना पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार सन 2022-23 शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर श्री कादर शेख यांच्या हस्ते गटविकास अधिकारी विनायक गुळवे व गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.                           Advertisement   तसेच त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विषयक मार्गदर्शन ,स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. लोंढे मोहिते वाडी, पाटील वस्ती ,लोंढे वस्ती व कारुंडे या  गावामध्ये त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतशील विद्यार्थि घडविले आहेत. लोंढे वस्ती येथे  प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून  कामकाज पाहिले आहे. शाळेसाठी लोकसहभागातून   75000 रु. इतका  निधी शाळेसाठी उपलब्ध केला.. कोरोना काळात  ऑनलाइन  अध्यापन् केले. इयत्ता आठवी NMMS परीक्षेत तीन विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. तसेच त्या क्रीडा मार्गदर्शक आहेत. जिल्हास्तर व तालुका स्तर

#Solapur सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  भाजप उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार आरोग्य दूध आमदार राम सातपुते यांना भाजपने सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सोलापूर लोकसभेसाठी राम निती आखत राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

#Chiplun तांबेडी गावातील घराला मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग; पावणे चार लाखाचे नुकसान

Image
आमदार शेखर निकम यांनी भेट देवुन केली तातडीची मदत महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गावी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत राहते घर पुर्ण बेचीराख झाले असुन ग्रामस्थ्यांच्या प्रसंगाधनाने घरातील महिलेचे प्राण वाचल्याचे बोलले जात आहे. मात्र घराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे तांबेडी येथे श्रीमती प्रतिभा पांडुरंग भारती यांच्या मालकीचे घर आहे, मात्र त्या वास्तव्यास पुणे येथे असल्याने त्यांचे गावचे घर बंद असते, मात्र शिमग्यासाठी प्रतिभा भारती या दोन दिवसापुर्वी गावी आल्या होत्या, शनिवारी मध्यरात्री एक च्या सुमारास श्रीमती प्रतिभा यांना आपल्या घराला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडओरड केली. शेजारील ग्रामस्थानी भारती यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी पुर्ण घराला आगीने वेढा दिल्याचे दिसलें.                           Advertisement  त्याच वेळी श्रीमती भारती घरात अडकल्याचे दिसताच ग्रामस्थानी मोठ्या धाडसाने त्यांची सुखरूप सुटका केली. मात्र श्रीमती भारती यांचे पुर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले, ऐन शिमग्याच

#Yavat राजकीय नेत्याकडून वृद्ध आजी बरोबर माणुसकीचे दर्शन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप यवतमध्ये महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी व आपल्या पक्षाच्या कामासाठी आलेल्या दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष योगिनी दिवेकर (शरद पवार गट) मंदिरात असलेल्या आजीशी गप्पा मारताना त्यांनी चौकशी केली त्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत  केली.                           Advertisement  एप्रिल मध्ये संजय गांधीचे प्रकरण करू असे आश्वासन दिले लगेच त्यांच्या वार्डातील सरपंच समीर दोरगे ह्यांची ग्रामपंचायत मध्ये जाऊन भेट घेतली त्या आजीला कशी मदत करता येईल याबाबत चर्चा केली.

#Natepute संतोष पवार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारुंडे ता.(माळशिरस) येथील विद्यार्थीप्रिय,  उपक्रमशील शिक्षक संतोष बापू पवार  यांना माळशिरस पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                               Advertisement  संतोष पवार यांनी जाणीवपूर्वक  कोथळे, फडतरी,कारुंडे यांसारख्या डोंगर पायथ्याशी असलेल्या शाळांमध्ये शैक्षणिक कार्य केले. विद्यार्थी हिताच्या अनेक योजना राबवल्या. ग्रामीण भागात त्यांनी आपल्या शैक्षणिक, सामाजिक,राष्ट्रीय कार्याचा ठसा उमटवला आहे.तसेच त्यांची स्कॉलरशिप मार्गदर्शक म्हणून ख्याती आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारुंडे ही स्वच्छ व सुंदर शाळेमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रथम क्रमांकाने आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्येही तालुकास्तरावरती प्रथम क्रमांकाचा व जिल्हा स्तरावरती द्वितीय क्रमांकाचा बहुमान या शाळेला मिळालेला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये एक दर्जेदार प्राथमिक शाळा बनवण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन अकलूज या ठिकाणी सोला

#Chiplun सावर्डे गावातील माऊली चव्हाण आणि सहका-यांनी आमदार शेखर निकम यांना साथ देण्याचा निर्धार; राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्ष प्रवेश

Image
विश्वासाने साथ द्या आत्मविश्वासाने काम करा, आपल्या स्वागतासाठी सदैव तत्पर - आ. शेखर निकम मतदार संघाचा विकास करण्याची कार्यपद्धती पाहूणच होत आहेत मने परिवर्तन : प्रवेशकर्ते महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण-संगमेश्वर संघातील सावर्डे गाव म्हणजेच आमदार शेखर निकम यांची कर्मभूमी मतदार संघाचा विकास करता करता आपल्या सावर्डे गावाचा विकास अगदी नियोजन पद्धतीने करत केला आहे. शिक्षणाची पंढरी असे संबोधले जाणारे सावर्डे गावाला अशा नियोजबद्ध विकासाची अत्यंत गरत होती आणि ती आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने व आपल्या सततच्या पाठपुराव्याने गेले साडेचार वर्षात प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पक्षविरहीत राजकारण करत व जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत रस्ते, पाणी, क्रिडा, कला, सांस्कृतिक, सहकार व शिक्षण क्षेत्राचा विकास केला आहे.                             Advertisement  आमदार शेखर निकम यांची कामाची कार्यपद्धती पाहुण सावर्डे गावातील माऊली चव्हाण आणि सहका-यांनी जनसंपर्क कार्यालय, सावर्डे येथे भेट देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्

#Chiplun सावर्डेत महा होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
८० गावातून ४ हजार महिलांचा उत्स्फूर्त सहभाग महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील आ.   शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक महिला दिनानिमित्त राधा गोविंद फाउंडेशन पुरस्कृत मुक्तांगण आयोजित महा होम मिनिस्टर प्रथम फेरीच्या स्पर्धा दिनांक २९ फेब्रुवारी पासून ते १० मार्च या कलावधीत चिपळूण संगमेश्वर देवरुख या ठिकाणी घेण्यात आल्या.                             Advertisement  त्यामध्ये प्रामुख्याने दहा ठिकाणी आपण या स्पर्धा घेतल्या. दसपटी पंचक्रोशी, शिरगाव पंचक्रोशी, खेर्डी, चिपळूण शहर त्याचबरोबर संगमेश्वर, कडवई पंचक्रोशी, देवरूख ग्रामीण, देवरुख शहर, माखजन पंचक्रोशी, सावर्डे पंचक्रोशी, संगमेश्वर शहर या पंचक्रोशीतून बुरंबी, तेरे, असुर्डे, धामणी, ओझर खोत, गोळवली, कसबा, फणसवणे, कुसुंब या गावातील महिलांचा सहभाग होता. माखजन पंचक्रोशी येथील आंबव, सरंद, मुरडव, आरवली, कोंडीवरे, कासे असावे, नारडुवे, पेढांबे, कळंबूशी, पुरे, नायरी या गावातील महिलांचा समावेश होता. कडवई पंचक्रोशी येथील चिखली, तुरळ, मासरंग, शेणवणे, शिंदे आंबेरी, राजवाडी, शेंब

#Solapur सोलापूर लोकसभा मतदार संघातून अभिमन्यू आठवले निवडणूक लढविणार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघातून मा.श्री.अभिमन्यू आठवले हे उमेदवारी दाखल करणार असून महाराष्ट्रातील एक नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख आहे. अभिमन्यु आठवले हे साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्राचे संपादक पत्रकार आहेत.                             Advertisement  तसेच बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक आहेत. निर्भिड, रोखठोक व अन्याय याचा कर्दनकाळ म्हणून ओळख आहे. कायद्याचा अभ्यास, तसेच असंख्य पुरस्काराने सन्मानित झाले आहेत, निर्व्यसनी आहेत, उच्च शिक्षित आहेत, असंख्य आजी-माजी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती, आजी-माजी सभापती, उपसभापती, सदस्य, जि.परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, लहान, थोर, वडील धारी यांनी सोलापूर लोकसभा लढवावी म्हणून अभिमन्यू आठवले यांच्याकडे आग्रह केला आहे. त्यामुळे गेली दोन महिने सोलापूर लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. अभिमन्यु आठवले हे लोकसभेचे उमेदवार असणार असल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जन माणसात मिसळणारे आहे

#Chiplun श्री क्षेत्र टेरव येथे २५ मार्चपासून साजरा होणार शिमगोत्सव

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या कुलस्वामिनी श्री भवानी - वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात व धार्मिक वातावरणात २५ मार्चपासून साजरा होणार आहे. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ,  पुजारी हे उत्सवाची जय्यत तयारी करीत आहेत.                                 Advertisement  २५ मार्च रोजी सकाळी कुलस्वामिनी श्री भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पुजारी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधीवत पुजा करुन घेतील. गावचे पुजारी (गुरव) मंदिरातून  या वर्षी चांदीने मढविलेली पालखी सजवून कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांच्या नवीन घडविलेल्या  रुपी लावून मंदिर व होमा समोरील  मानाच्या  सहाणेवर आसनस्थ होईल.  सकाळी ९ वाजता ढोलताशांचा गजरात  होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलीत करुन ग्रामस्थ होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण करतील. प्रदक्षिणा घालताना भैरी- केदाराच्या चांगभ

#Yavat मुळा-मुठा नदीवर जलपर्णीची झालर नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न झाला निर्माण

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड  तालुक्यातील राहू उंडवडी या दोन गावाच्या मधून  मुळा- मुठा नदी वाहत आहे या नदीमध्ये  जलपर्णीची झालरच निर्माण झाली आहे असे दिसते, त्या कारणाने नदी काठच्या गावांच्या नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये आजार वाढण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. जलपर्णीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांकडून मागणी होत आहे.                           Advertisement  शहरातील गलिच्छ  पाण्यावर  जलपर्णी दिसते, पाण्यावर झालर आहे का असे वाटत आहे. या जलपर्णीमुळे मासेमारी व्यवसाय करणारे ना अडचणी येतात .पाण्यात सडलेल्या जलपर्णीच्या पाण्यामुळे मासे मरत आहेत खराब वास येत असून डासची पैदास  आहे. या सर्वांमुळे नदी लगत व  परिसरातील नागरिकांना  साथींच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे .जनांवराना आजार होत आहेत  . नदीकाठच्या गावाना उंडवडी, राहू पिंपळगाव, चे शेतकऱ्यांचे शेतीसाठी पाणी उपसा करत असलेले पंप आहेत  या जलपर्णीमुळे शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यासाठी अडचणी येतात.  शेतकऱ्यांच

#Malshiras ॲड. सिताराम झंजे यांची नोटरी पदी नियुक्ती

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -                                                                                   Advertisement  भारत सरकार केंद्रीय न्याय व विधी विभाग यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याकरिता नोटरी अधिकारी यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील खुडुस येतील  ॲड व्होकेट सिताराम धुळा झंजे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा जिल्हा व सत्र न्यायालयात १५ वर्षे वकिली व्यवसाय सुरू आहे. त्यांच्या निवडीने तालुक्यातून विविध विभागातून व पंच क्रोशी तून तसेच मित्रमंडळी नातेवाईक यांचेकडून प्रत्यश भेटून, व्हॉट्सअँप,फेसबुक, इंस्टा वरून अभिनंदन  व सत्कार शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या या निवडीने तालुक्यात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

#Natepute दुष्काळातही शिंदेवाडी च्या विशाल बाळासाहेब देशमुख यांची ऊस उत्पादनात एकरी शंभर टनाकडे वाटचाल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शेतकरी विशाल बाळासाहेब देशमुख यांनी पाण्याची कमतरता असूनही एकरी ९६ टन उत्पन्न घेतलेले आहेत,तर हे सर्व शक्य झाले सेंद्रिय खताच्या मदतीने व योग्य मार्गदर्शनाने ,हॉटेल व्यवसाय बघत बघत शेती आवडीने करतात ,त्यामध्ये जास्त वेळ शेतीला देऊन व्यवस्थित नियोजन करून ९६ टन उत्पन्न घेऊन तालुका भर आपले नाव केलेले आहे.                               Advertisement  त्यांनी ८६०३२ हे बेणे वापरले आणि चळी,थाप बांधणी अशा प्रकारे अशा पद्धतीने तीन सेंद्रिय खताचे डोज केले व दोन फवारण्या केल्या .त्यामध्ये त्यांनी ३० टक्के रासायनिक खते वापरले व पाऊस कमी असल्यामुळे ऊस लगेच पाण्याला येऊ नये म्हणून ऊसाची पाचट काढली व उसाच्या बुडात पाचटीचे मल्चिंग तयार केले आणि दर पंधरा दिवसाने ऊस मोकळा भिजवला असे त्यांनी सांगितले , ४८ते ५० कांड्यावर ऊस असून ऊसाला वजन आणि जाडी चांगल्या प्रकारे आलेली होती.तालुकाभर विशाल देशमुख यांचे कौतुक केले जात आहे व शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, योग्य खते व योग्य मार्गदर्शन लाभले तर दुष्काळा

#Malshiras विझोरीच्या शाखाध्यक्षपदी सोमनाथ मिसाळ यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विझोरी ता ( माळशिरस ) येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाची बैठक पक्षप्रमुख किरणजी साठे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाली या बैठकीत सोमनाथ मिसाळ यांची विझोरी शाखाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.                                           Advertisement  यावेळी राज्य समन्वयक अजितदादा साठे,राष्ट्रीय नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल सराटे,अकलूज शहर संघटक चेतन साठे,विठ्ठल जाधव,योगेश इंगळे,लक्ष्मण दडस,अजय बोडरे,किशोर जाधव,शंकर जाधव,मारुती चौगुले,धनाजी जाधव,बाबुराव पवार,नाना मिसाळ,सुरज मोहिते,पार्थ मोहिते,प्रणित साठे,सागर मिसाळ,आदी मान्यवर उपस्थित होते.

#Chiplun सावर्डे येथे आमदार चषक २०२४ भव्य जिल्हास्तरीय नमन स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले  हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव सावर्डे येथे  भव्य जिल्हास्तरीय नमन स्पर्धा, उद्घाटन आमदार शेखरजी निकम भैय्या शेठ सामंत , सांस्कृतिक विभाग प्रदेश उपाध्यक्ष अभिनेते दिग्दर्शक असित रेडीज,सचिन पाकळे, केतन पवार, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, बक्षीस वितरण समारंभ प्रथम क्रमांक हौशी कलाकार नमन मंडळ गोलवली, तालुका संगमेश्वर, द्वितीय क्रमांक रवळनाथ नमन मंडळ रत्नागिरी, तृतीय क्रमांक ए वन केदारनाथ नमन मंडळ सावर्डे भुवडवाडी. तसेच वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट गन उत्कृष्ट गवळण उत्कृष्ट वादन उत्कृष्ट गायन लक्षवेधी सादरीकरण उत्कृष्ट अभिनय... विजेत्या संघाला चित्रपट अभिनेते हास्य जत्रा फ्रेम प्रभाकर मोरे यांच्या हस्ते रोख रुपये पन्नास हजार बक्षीस  व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.                                                             Advertisement   द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रेडीज यांच्या हस्ते रोख रुपये पस्तीस हजार व आकर्षक चषक  देऊन  गौरवण्यात आले, तृतीय क्रमांक विजेत्याला रोख रुपये २१००० व आकर्षक च

#Natepute महा किड्सचा सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - एस एम.पी  एजूकेशन सोसायटी नातेपुते संचलित महा किड्स सी.बी.एस. ई स्कूल फोंडशिरस चा सांस्कृतिक कार्यक्रम युवा नेते जीवनभैया उत्तमराव जानकर व मामासाहेब पांढरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.                                                                                       Advertisement  जीवन भैया जानकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना पालकांनी मुलांना मैदानी खेळ स्पर्धा परीक्षा  आणी मुलाना सकस आहार कसा देता येईल यावर भर द्यावा असे प्रतिपादन केले. एक चांगली सुद्रुढ पिढी घडवायची असेल तर मुलांचा शारीरिक, मानसिक आणी बौद्धीक विकास होने गरजेचे आहे. त्यासाठी  मुलांना मैदानी खेळ , योगा आणी बुद्धिबळ याचे  प्रशिक्षण गरजेचे आहे.  महा किड्स  ग्रामीण भागातील पालक आणी विद्यार्थ्यांना खेळ आणी सी.बी.एस, ई अभ्यासक्रमाची पर्वणीच देत आहे  त्याचा फायदा पालक आणी विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले. तसेच मामासाहेब पांढरे यांनी संस्थेने कोरोना काळातून उभारी घेत पालकांचा विश्वास जिकून पुन्हा उभारी घेतली आहे याचे कौतुक केले आणी बक्षिस मिळालेल्या चिमुकल्यांन

#Natepute मयुरी थोरात पैठणी विजेत्या

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  जागतिक महिला दिन निमित्त गुरसाळे ग्रामपंचायत यांच्या वतीने ७ मार्च २०२४ रोजी महिलांकरिता KRA घरकुल मिनिस्टर कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महिलांचे खेळ सादर करण्यात आले. यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पैठणी मयुरी अनिल थोरात यांना मिळाले. विजयी महिलांना आकर्षक बक्षीस व भेटवस्तू देण्यात आल्या.तसेच वृद्ध, वयस्कर महिलांना सन्मान व मुलींना भेटवस्तू देण्यात आले.  तसेच ग्रामपंचायत  गुरसाळे चे लोकनियुक्त विद्यमान सरपंच  श्री सागर सर्जेराव  खिलारे व  ग्रामसेविका पूजा  गायकवाड मॅडम ,  ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले होते.सदर  कार्यक्रमांमध्ये गावातील बहुसंख्य महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला .उपसरपंच, सर्व सदस्य,  आरोग्य सेविका ,आशा स्वयं सेविका ,अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील विविध महिला बचत गट यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

#Chiplun तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत चिपळूण-संगमेश्वर तालुक्यासाठी शेखर निकम यांच्या प्रयत्नाने सुमारे ३ कोटींचा निधी मंजुर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०२३/२४ करिता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर तालुक्यातील कामांना प्रशासकीय मान्यता व निधी वितरित करण्यात आला असून याचे सर्व श्रेय तालुक्याचे आमदार शेखर निकम यांचे आहे.       महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती-जमाती असून अद्यापही भटकंती करून स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगत आहेत. लमान, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे, वस्त्या असून अशा तांड्यामध्ये या जाती-जमातीचे लोक अनेक वर्षांपासून राहत असले तरी अशा तांडे किंवा वस्त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाहीत व त्यामध्ये आधुनिकतेकडे कल असला तरी या प्रवर्गातील बहुसंख्य समाज गरिबीचे जीवन जगत आहे. तांडे, वाडी किंवा वस्त्या यामध्ये सध्या या प्रवर्गातील समाज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्याच ठिकाणी या समाजात स्थिर जीवन जगता यावे याकरिता त्यांना काही अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.       त्या अनुषंगाने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने शिफ

#Chiplun धामापुर जिल्हा परिषद गटातील मौजे नारडुवे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून नारडुवे गावकरीता भरघोस निधी मंजुर करण्यात आला आहे त्यातील  नारडुवे बौध्ववाडी रस्ता खडीकरण करणे व जोगले वाडी रस्ता खडीकरण करणे कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री सुशील भायजे,विभाग अध्यक्ष श्री महेश बाष्टॆ,युवा नेते अक्षय चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. गावाचा विकास करताना आमदार निकम साहेब कधीही पक्ष भेद बघत नाहीत व त्यामुळेच जनता देखील  आमदार निकम सरांच्या पाठीशी ठाम पणे उभी आहे असे मत भायजे यांनी व्यक्त केले.अक्षय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार निकम सर हे एकमेव असे आमदार आहेत जे राजकारण विरहीत विकास करत आहेत. मतांचा विचार न करता मतदार संघातील खेड्या पाड्याचा  विकास करणे हा एकच उद्देश ठेवून सर काम करीत आहेत. आपणं देखील सरांचा पाठीशी ठाम पणे उभ राहील पाहिजे अस मत व्यक्त केले.उपसरपंच श्री जोगळे यांनी आभार मानताना आमचा निर्धार पक्का आहे आम्ही सरांचा पाठीशी ठाम पणे उभे आहोत असे मत मांडले. यावेळी गावचे सरपंच श्री.कृष्णा जोळगे, उपसरपंच श्री.विजय

#Indapur राष्ट्रवादी पार्टीच्या युवती इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी कल्याणी शहाजीराजे भोसले

Image
आमदार दत्तात्रय भरणे ( मामा ) च्या हस्ते नियुक्ती पत्र महादरबार न्यूज नेटवर्क - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या युवती इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी कल्याणी शहाजीराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कळंब ( ता.इंदापूर ) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला.  ग्रामपंचायत कार्यालया समोर उभारण्यात आलेल्या भव्य व दिव्य शामियान्यात भरणे मामांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी भरणे मामांची हत्ती वरून दिमाखात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दादासाहेब हनुमंत डोंबाळे, कल्याणी भोसले, हर्षवर्धन हारमोडे, अमेय बंडू चव्हाण व आदिंना नियुक्ती केल्याबद्दल चे निवडीचे पत्र आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देण्यात आले.  यावेळी पं.स.चे मा. सदस्य सुहास डोंबाळे, मार्केट कमिटीचे मा.सभापती  दत्तात्रय फडतरे,सरपंच विद्या अतुल सावंत, कळंब सोसायटीच्या चेअरमन योगिता शहा, योगेश डोंबाळे, संदिप पाटील, राजेंद्र ( पिंटू ) डोंबाळे, कालिदास राऊत सर, कळंब सोसायटीचे व्हा

#Chiplun मिरज-कोल्हापूर-माखजन बससेवा सुरू; आमदार शेखर निकम यांचे विशेष योगदान

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव माखजन येथील प्रवाशांना सांगली, मिरज, कोल्हापूर या ठिकाणी जाण्याकरिता सोयीचे व्हावे म्हणून मिरज-कोल्हापूर-माखजन बस सेवा सुरू होत असून या कामी तालुक्याचे आमदार शेखर निकम यांचे विशेष योगदान लाभले आहे.       माखजन येथे मध्यवर्ती बस स्थानक असून येथूनच ग्रामस्थांना मुंबई-गोवा महामार्गावर जावे लागते. यापूर्वी सांगली, मिरज, कोल्हापूर या ठिकाणी जाण्याकरिता प्रवाशांना बस बदलावी लागत असे. कोल्हापूर, सांगली, मिरज येथे वैद्यकीय उपचारासाठी असंख्य लोकांना जावे लागते. थेट बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे आजारी रुग्णांना वेळेचा व आर्थिक फटका बसत होता. माखजन येथे पुणे, गुहागर, चिपळूण, देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी या ठिकाणच्या बसेस मुक्कामासाठी होत्या. त्यामुळे मिरज, सांगली, कोल्हापूर मार्गे देखील बस सुरू करून माखजन येथे मुक्कामी थांबवावी अशी दशक्रोशीतील वीस गावातील लोकांनी मागणी केली होती.       माखजनकरांच्या या मागणीचा विचार करून ग्रामस्थांची व येथील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी येथील कार्यक्षम आमदार शेखर निकम यांनी शासन दरबारी गाऱ्हाणे मांडले

#Yavat शिवसेनेच्या प्रवक्ते पदी योगेश केदार (शिंदे गट)यांची नियुक्ती

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप शिवसेनेच्या प्रवक्ते पदी धाराशिव चे सुपुत्र योगेश केदार यांची नियुक्ती. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर योगेश केदार यांचा प्रवेश लक्ष वेधून घेणारा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकसभा लढण्याची इच्छा समाज माध्यमातून व्यक्त केली होती. जिल्ह्यात सद्ध्या शिवसेनेकडून संभावित उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. सध्या राज्यात प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अशी चळवळ उभी आहे. त्यात एका सामान्य मराठा कार्यकर्त्याला संधी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांचे सचिव असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी देखील बरीच कामे केली आहेत. सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे प्रकल्प मंजूर करून आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. धाराशिव जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय मंजूर करून आणले. धाराशिव आणि लातूर जिल्ह्या करता गॅस पाइपलाइन ची योजना आणली आहे. काही दिवसांपूर्वी तेर येथील गोरोबा काका मंदिराला 'अ' वर्ग दर्जा मिळवून दिला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ष निवास स्थानी मराठा आंदोलनातील प्रमुख 

#Natepute माढा लोकसभेचे भावी खासदार लक्ष्मण हाके यांचे गाव भेट दौरे सुरू

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माढा लोकसभेचे भावी खासादार अभ्यासू व्यक्तिमत्त्व, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य तथा शिवसेना प्रवक्ते मा.प्रा.श्री लक्ष्मणजी हाके साहेब यांची फोंडशिरस जि.प.गट आणि नातेपुते शहरात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी फोंडशिरस जि.प.गटातील कुरबावी, एकशिव गावातील अनेक जेष्ट मान्यवराचे आशिर्वाद घेऊन लोकसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच पुढील कार्यक्रमाला जाताना नातेपुते शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची धावती भेट घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी राष्ट्रीय काॅंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व ओबीसीचे जिल्हाध्यक्ष मा. राजाभाऊ पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख मा. विजय रुपनवर, धर्मपूरी गावचे शिवसेना शाखाप्रमुख मा. मनोज राऊत,निवेदक नवनाथ रूपनवर सर तसेच  कुरबावी, एकशिव,डोंबाळवाडी येथील असंख्य नागरीक उपस्थित होते. नातेपुते येथील भेटीदरम्यान शिवसेना शहरप्रमुख सनी गवळी, शमीर मुलाणी,निजाम काझी,आमिर बागवान राहुल देसाई, बंटी सूरती,साजिद मुलानी, सलीम मुलानी यांचेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

#Natepute पालक,शिक्षक,संस्थाचालक या ञिसूञीमूळे एस.एन. डी.स्कूल गगनभरारी घेईल - आ.राम सातपुते

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - देशाचे भविष्य मूलांच्या हाती असून भविष्यात चांगले,नागरीक देशभक्त घडविण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून होईल, . त्यामुळे मुलांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी त्यांच्यात देशभक्ती रुजवण्यासाठी शिक्षकांनी अथक परिश्रम करावेत, असे आवाहन आमदार राम सातपुते यांनी येथे केले. येथील एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बाबाराजे देशमुख होते. मंचावर संस्थेचे चेअरमन व नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, सुचित्रादेवी देशमुख, श्रुतिका देशमुख, अमरशील देशमुख, तात्यासाहेब देशमुख, माजी सरपंच भानुदास राऊत, पांडुरंग देशमुख, बाहुबली चंकेश्वरा, शिवाजीराव पिसाळ, अर्जुनराव जठार, महेश शेटे, सर्व विश्वस्त, माजी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, नगराध्यक्षा अनिता लांडगे आदी उपस्थित होते. स्नेहसमेलन कार्यक्रमात लहान मुला-मुलींनी एकापेक्षा एक बहारदार गीते व नृत्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. यावेळी माजी जि.प,उपाध्यक्ष बादाराजे देशमुख म्हणाले, कोरोना काळात संस्थेच

#Natepute सिंघम स्टाईल परजणे साहेबांची दमदार कामगिरी, 3लाख रूपयांचे मोबाईल शोधून दिले मूळ मालकांना परत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते पोलिस स्टेशन हद्दीतील अॅपलसारखे मोबाईल चोरीला गेले होते.यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे १२मोबाईल सापडले असून त्यांची किंमत २,९०,४९०रू असून ते सर्व मोबाईल मूळ मालकास परत करण्यात आल्याची माहीती नातेपुते पोलिस स्टेशन सपोनि महारूद्र परजणे यांनी दिली. ६फेब्रूवारी रोजी नातेपुते पोलिस स्टेशनमध्ये सत्यजित मदनकूमार जोशी (रा,नातेपुते) यांनी फिर्याद दाखल केली होती.त्या गून्हाचा तातडीने तपास करून अल्पावधितच  आरोपी उमेश पोपट लोंढे(रा.बरड,ता.फलटण.जि.सातारा)या अटक करुन त्याच्याकडून चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले. यापुर्वी अनेकवेळा बाजारतळ,शहर,तसेचग्रामीण  भागातून मोबाईल चोरीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या.होत्या.त्यांची तातडीने दखल घेऊन सायबर सेलच्या मदतीने तपास करून .२,९०,४९०,रू किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. विशेष पोलिस महानिरीक्षक सूनिल फूलारी,पोलिस अधिक्षक शिरीश देशपांडे,अप्पर पोलिस अधिक्षक प्रीतम यावल,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी महारूद्र परजणे,ए.स,आय.गडदे,पोलिस काॅस्टेबल रणजित मदने,शिवानंद सोनवणे,सं