Posts

Showing posts from April, 2024

#Malshiras पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी हजारो तरुणांची असणार उपस्थिती - शंभूराजे जगताप

Image
भाजप युवा मोर्चाची माळशिरस येथे बैठक संपन्न महादरबार न्यूज नेटवर्क - देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता माळशिरस या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेसाठी येणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघातील हजारो तरुणांची लक्षणीय उपस्थिती असणार आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माढा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी माळशिरस या ठिकाणी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आगामी लोकसभा निवडणूक व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची श्रीनाथ विद्यालय माळशिरस या ठिकाणी महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान शंभूराजे जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी माढा लोकसभेचे युवा मोर्चाचे संयोजक अँड.सुजितकुमार थिटे हे उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीमध्ये विविध मोठ्या पदांव

#Chiplun सावर्डे येथील कुंभारवाडी संत गोरोबा कुंभार क्रिडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेस आ.शेखर निकम यांची सदिच्छा भेट

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावातील संत गोरोबा कुंभार क्रिडा मंडळ, कुंभारवाडी आयोजित कबड्डी स्पर्धेस आमदार शेखर निकम यांनी सदिच्छा भेट दिली. यादरम्यान आमदार शेखर निकम यांनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूना मार्गदर्शन केले. स्पर्धा आयोजकांशी संवाद साधला, त्यांनी उत्त्तमरीत्या स्पर्धेचे नियोजन केल्याबद्दल कौतुक केले आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आमदार शेखर निकम यांचे सावर्डे कुंभारवाडीतील संत गोरोबा कुंभार क्रिडा मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मन:पुर्वक स्वागत केले व शाळ, श्रीफळ देवून सन्मानित केले.   यावेळी तुकाराम साळवी, अनंत कुंभार, चंद्रकांत पिरधनकर, आत्माराम पिरधनकर, सुरेश पिरधनकर, अनंत कुंभार (बुआ), विलास कुंभार, लवु भैरवकर, उमेश राजेशिर्के, सुमितकुमार पाटील सर, विपूल घाग, अमित सुर्वे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

#Yavat यवत येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप यवत येथील श्री हनुमान मंदिरात दि २३ रोजी हनुमान जयंतीला सकाळी पहाटेपासून  मारुती मंदिरात गर्दी होती सकाळपासूनच भाविकांनी दर्शन साठी येत होते तत्पूर्वी पहाटे येत येथील विठ्ठल समाज मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. नंतर सकाळी सहा वाजता मारुती जन्माच्या कार्यक्रम झाला मंदिरात भाविकानी अभिषेक केला नारळ फोडले. मंदिरात भाविकांची गर्दी होती , नारळ विक्रेते हार विक्रेते होते तसेच मारुतीला अभिषेक व तेल वाहत होते.मारुती च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.  मारुती मंदिराचे जीर्णोद्धार चे काम चालू आहे .

#Chiplun कोसुंब पंचायत समिती गण महायुती लोकसभा निवडणूक सभेला भव्य मेळावाचे स्वरूप

Image
मा. नारायण राणे साहेब यांना महायुतीद्वारे जास्तीत जास्त मताधिक्य  देणारच - आ.शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गटातील कोसुंब पंचायत समिती गणात लोकसभा निवडणूक महायुतीची प्रचार सभा ताम्हाणे येथे पार पडली. सभेला प्रंचड गर्दी झाली होती सभेचे बघता बघता मेळाव्यात रूपांतर झाले.  सभा चालू होण्याअगोदर पाऊण तास वीज गेली होती. मात्र लोकांची गर्दी कमी न होता वाढतच जात होती. या प्रचार सभेला आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रमोद अधटराव आणि पदाधिकारी मार्गदर्शन करत होते. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या या प्रचार सभेत आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन करताना मा. नारायण राणे साहेब यांचा अगदी राजकारण्यात येण्यापासून अगदी मुख्यमंत्री होण्यापर्यंत विकास कामाचा, कोकणातील आणलेली विकास गंगा, कोकणचा विकास या त्यांच्या माध्यमातून कसा झाला, विरोधक संविधान बदलण्याचे करत असलेले आरोप, नारायण राणे साहेब बहुमताने का निवडणूक यावेत, आपण महायुतीद्वारे केलेली विकास कामे तसेच आप

#Yavat सहजपुर व खामगाव फाटा रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू न झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील खामगाव फाटा आणि सहजपुर रेल्वे गेट दरम्यानच्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम केंद्रीय रस्ते विभागाकडून   मंजूर आहे. या उड्डाण पुलाच्या मंजुरीस एक वर्षे चा कालावधी  झाला असून रेल्वे उड्डाण पुलाचे काम राहिले असल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या वाहनधारक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खामगाव फाटा, सहजपुर दरम्यान रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे गेट असून या दोन्ही गेट दरम्यान वाहनांची सारखी मोठी वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी लक्षात घेऊन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून दोन्ही ठिकाणचे उड्डाण पुलाचे काम मंजूर करून घेतले. दोन्ही पुलाच्या कामाचा संबंधित अधिकाऱ्यांनी पहाणी देखील केली आहे. मात्र दोन्ही ठिकाणच्या उड्डाण पुलांची कामे मंजूर होऊन एक वर्षे उलटून गेली तरी कामे सुरू न झाल्यामुळे वाहनधारक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहनधारक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सहजपुर, नांदूर परिसरात मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. तर दौंड तालुक्यात चार साखर कारखाने, तसेच शेकडोंच्या संख्येनी ऊसाची गु-हाळघ

#Natepute माळशिरस शिवसेना तालुका अध्यक्षपदी सतीश सपकाळ यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - सोलापूर येथील जिल्हा संपर्क कार्यालयात दिनांक १६ एप्रिल रोजी (शिंदे गट) शिवसेनेचे सचिव संजयजी मशिलकर  यांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन या बैठकीमध्ये माळशिरस तालुका अध्यक्षपदी सतीश आनंदा सपकाळ यांची निवड झाल्याची जाहीर करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दीपक खंडागळे, माळशिरस तालुका संघटक पदी समीर शेख, तर नातेपुते शहर अध्यक्षपदी निखिल पलंगे यांची  निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सचिव  संजयजी मशिलकर,  जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, युवासेना प्रमुख प्रियदर्शन साठे, सोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवाल, शिवसेना नेते दिलीप कोल्हे व सर्व तालुकाप्रमुख  यांच्या उपस्थित नूतन तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांना पत्र देण्यात आले यावेळी तालुका संघटक समीर शेख, नूतन शहर प्रमुख नातेपुते निखिल पलंगे, संजय धणाने, रणजीत गायकवाड, दत्ता रुपनवर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित  होते.

#Beed सुपरस्टार चित्रपट कलावंत विश्वजित पोटभरे मुंबईहुन मित्राच्या भेटीसाठी जेथलिया हाँस्पिटल ला भेट

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - बाबुरावजी  पोटभरे साहेब यांचे दोन्ही चिरंजीव अभिजित बाबुरावजी पोटभरे व चित्रपट कलावंत सुपरस्टार, अनेक  मालिका,नाटक, चित्रपटात चमकलेला हिरो ,डाँ ऋषिकेश यांचा बेंच मित्र(वर्ग) विश्वजित पोटभरे या दोन्ही बंधुनी  डाँ ऋषिकेश जेथलिया यांच्या जेथलिया हाँस्पिटल माजलगाव व सिध्देश्वर मेडिकल ला सदिच्छा भेट दिली.भेट घेऊन खुप खुप शुभेच्छा दिल्या.ऋषिकेश व विश्वजित आठवणीत रंगुनी गेले. त्यांचे  जेथलिया हाँस्पिटल व जेथलिया परिवाराच्या वतीने डाँ ऋषिकेश जेथलिया यांनी शाल व शिवराय, जिजाऊ यांची पुस्तक भेट देऊन सत्कार केला.चळवळतील  बाबुरावजी पोटभरे साहेब यांच्या बदल च्या विविध जुन्या आठवणींना संतोषबापु जेथलिया यांनी उजाळा दिला.पोटभरे साहेबांचे चळवळीतील योगदान गेली चाळीस वर्षे मित्र म्हणून पाहतोय अशा भावना संतोषबापु जेथलिया यांनी व्यक्त केल्या. दोन्ही बांधवांना भावी आयुष्यासाठी  जेथलिया हाँस्पिटल परिवाराच्या वतीने खुप खुप शुभेच्छा दिल्या.

#Baramati महाराष्ट्राचा नावलौकिक चंदुकाका सराफ ने वाढवला - डॉ. चंद्रशेखर मुरूमकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - बारामती शहर वेगवेगळ्या नावांनी,अंगांनी, वैशिष्ट्यांनी ओळखले जाणारे शहर म्हणून पाहिले जाते. या शहरांमध्ये चंदुकाका सराफ प्रा लि या सुवर्णपेढीने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवल्याचे मत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य  डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांनी व्यक्त केले. या सुवर्ण पेढीचा १९७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बारामतीचे नूतन पोलीस निरीक्षक श्री संतोष घोळवे श्री रमेश खोमणे डॉक्टर अंकुश खोत सौ सुषमा मुरूमकर, श्री आनंदराव माने, श्री गिरीश नेवसे श्री महेश माने  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सुवर्णपेढीने सोन्याची शुद्धता जपता जपता सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. नावीन्यता,शुद्धता, परंपरा, विश्वास सूत्रांचा वापर करून ग्राहकांच्या मनातला दागिना घडवून देण्याचे काम या सुवर्णपिढीने कायम केले आहे व भविष्यात देखील करत राहणार असल्याचे मत या सुवर्णपेढीचे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी व्यक्त केले. दिनांक २०,२१ व २२ एप्रिल पर्यंत ग्राहकांना हिऱ्यांच्या दागिन्यावर १०० % पर्यंत व सोन्याच्या दागिन्यांच्या घडा

#Yavat वरवंड पुनर्वसन येथे श्रीराम , हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील वरवंड  (पुनर्वसन, वरसगाव) येथे हनुमान मंदिर चा पन्नासावा सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळा श्रीराम जन्म राम , हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे,रोज काकडा, पूजा, ज्ञानेश्वरी पारायण चे वाचन हरिपाठ  धार्मिक कार्यक्रम होतील. यावर्षी धार्मिक  कार्यक्रम भरगच्च आहेत दिनांक १७,४,२४ ते दिनांक २४,४ २४ पर्यंत हे सर्व कार्यक्रम आहे. दि१७ ला रामचंद्र भरेकर सुनील निवणगुणे यांचे किर्तन, १८रोजी आशाताई हनमघर यांचे कीर्तन , १९ रोजी महंत प्रमोद महाराज जगताप यांचे, दि २० रोजी चैतन्य महाराज कबीर आळंदी, दिनांक २१ला संतोष महाराज पायगुडे मांडवी व २२ रोजी चंद्रकांत महाराज वांजळे, दिनांक २३ ला संजय महाराज वाबळे यांचे पहाटे ५ ते ७ देऊळगाव किर्तन  व राम शास्त्री यांचे किर्तन ७  ते ९ , दि २४  ला आसाराम बडे महाराज आळंदी यांचे कीर्तन रोज संध्याकाळी ७ ते ९वाजेपर्यंत आहेत होईल. काल्याचे किर्तन होईल तरी ग्रामस्थांनी दि२४ ला काल्याचा महाप्रसाद दुपारी २ वाजेपर्यंत  महाप्रसाद घ्यावा ही विनंती आहे. समस्त ग्राम

#Baramati बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीच्या कल्याणी वाघमोडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भरला अर्ज

Image
लोकांच्या मतांचा अनादर करणाऱ्या प्रस्थापित घराणेशाहीला मोडीत काढण्यासाठी सुप्त लाट... महादरबार न्यूज नेटवर्क - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्र सह देशाचे लक्ष लागून राहिले आहे .बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात जरी असे चित्र असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदारांचा कौल मात्र वेगळाच असल्याचे दिसून येत आहे. एक सुप्त लाट दिसून येत आहे. बारामती मतदारसंघातील लोकांना आता बदल हवा आहे. घराणेशाहीला बाजूला सारण्यासाठी आता तिसरा चेहरा समोर आहे. उच्चशिक्षित सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या  मूळ बारामतीच्या कल्याणी वाघमोडे या बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा समतोल विकास साधण्यासाठी तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक युवती यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांचे कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बारामती लोकसभा मतदारसंघांमधून चळवळीतून उदयास आलेले नेतृत्व कल्याणी वाघमो

#Chiplun महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत- आ. नितेश राणे

Image
सावर्डे येथे आ. शेखर निकम यांच्या कार्यालय सदिच्छा भेटी प्रसंगी केले कार्यकर्त्यांना आवाहन महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव आपण आपापल्या भागातील मातब्बर कार्यकर्ते असून महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांना भरघोस मतदान मिळावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी चिपळूण दौऱ्यादरम्यान सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्या कार्यालयास सदिच्छा भेटी प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. तत्पूर्वी चिपळूण महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सुरुवातीला आमदार शेखर निकम यांच्यासह माजी सभापती विजय गुजर, माजी उपसावती सूर्यकांत खेतले आदींनी आमदार नितेश राणे यांचे स्वागत केले. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले की, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतर्फे ना. नारायणराव राणे यांना उमेदवारी मिळाली आहे. आपण आपल्या भागातील मातब्बर कार्यकर्ते असून महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांना भरघोस मतदान कसे मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्

#Madha माढा मतदारसंघातून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा अर्ज दाखल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी  मंगळवारी माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग राठोड यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी आ. बबनदादा शिंदे, आ. जयकुमार गोरे,आ.शहाजी बापू पाटील,आ. संजय मामा शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

#Madha माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - बहुचर्चित असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी अर्ज स्वीकारला. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, अनिल कोकीळ, काका साठे तसेच शरद पवार गटाचे पदाधिकारी , मोहिते पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Yavat यवत - जेजुरी एसटी सेवा सुरू करावी

Image
नागरिकांची मागणी महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथून जेजुरी ला जाण्यासाठी एसटी सेवा चालू करावे अशी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे. या मागणीला होता जास्त जोर होत आहे यवत येथून जेजुरीला जाण्यासाठी माळशिरस मार्गे जवळचे अंतर आहे, पूर्वी सकाळी ९ला दुपारी १ ला व ५ वाजता अश्या ३फेऱ्या जेजुरीला   जाण्यासाठी बस होत्या. प्रवाशांची संख्या आता पूर्वीपेक्षा जास्त आहे. यवत वरून माळशिरस  मावडी पिंपरी  नायगाव, पिसर्वे,या भागातील शेतकरी व कामगार वर्ग व तेथे येत असतो. यवत हे पुणे सोलापूर रस्त्यावर असणारं गाव आहे तेथून जेजुरीला भाविक जात असतात परंतु त्यांना जेजुरीला जाण्यासाठी यवतवरून  कोणतेही वाहन नाही त्यामुळे यवत जेजुरी एसटी सेवा सुरू करावी . जेजुरी जाण्यासाठी भाविकाच्या मागणीचा  मागणीचा विचार करून एसटी महामंडळाने एसटीच्या फेऱ्या परत चालू कराव्यात . एसटी महामंडळाने  यवत-जेजुरी फेऱ्या परत चालू सुरु कराव्यात अशी  मागणी होत आहे. शेतकरी  कामगारांना भाविकांना या सोयीचा फायदा होईल. शेखर साळुंखे - व्यापारी

#Chiplun मनोज शिंदे यांची माखजन हायस्कुल च्या शाळा समिती अध्यक्षपदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल मधील शाळा समिती च्या अध्यक्षपदी संस्था संचालक श्री मनोज दत्ताराम शिंदे यांची निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या संस्थेच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.      मनोज शिंदे मागील कार्यकारी मंडळात संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. या शाळा समितीत संस्थेकडून मनोज शिंदे अध्यक्ष व दीपक शिगवण , सुभाष सहस्त्रबुद्धे, हनीफ म्हाते यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. निवडीबद्दल मनोज शिंदे यांच्या सह अन्य सदस्यांचे अभिनंदन होत आहे.

#Natepute दहिगांवच्या तन्वी खिलारे व प्रसन्न खिलारे यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नुकत्याच झालेल्या नवोदय वि‌द्यालयाची  परिक्षेमध्ये दहिगाव  ता.माळशिरस यैथील जि.प.शाळेतीलकुमारी तन्वी नागेश खिलार हिची पोखरापूर जिल्हा सोलापूर ,येथे तर  प्रसन्न संतोष खिलारे याची सातारा या ठिकाणी नवोदय विद्यालयात पूढील शिक्षणासाठी निवड झाली.आहे त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वञ कौतूक होत आहे. या यशाबद्दल तन्वी  खिलारे ,प्रसन्न खिलारे यांचे जिल्हा परीषद सदस्या ऋतुजाताई मोरे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी  जि.प. सदस्या ऋतुजाताई मोरे,अश्विनी खिलारे, सुषमा खंडागळे, वर्षा मोरे, सुषमा कदम, मंजुश्री टिकले, दुर्गा पाटील , शिंदे ,माधुरी खिलारे, सारिका रणदिवे, दिपाली केंद्रे, अर्चना सोरटे, वैशाली कांबळे, उमा साळवे, सविता कारंडे, नंदा सुळके, वैशाली साळवे, शुभांगी खिलारे अश्वीनी मोरे,सारीका सोरटे,अनिता दनाणे,अमृता खिलारे,शिंदे,ओलेकर मॅडम आदि तसेच अंगणवाडी सेवीका , पर्यवेक्षीका उपस्थित होत्या .

#Beed जेष्ठ नेते संतोषबापु जेथलिया यांची राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष सुनिलजी तटकरे व माजी मंत्री प्रकाशदादा सोंळके यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषबापु जेथलिया यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उघोग आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती केल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष सुभाष जी मालपाणी यांनी दिले आहे. विद्यार्थी दशेत पासुन ते आज पर्यंत पवार कुंटूंब यांच्या विचारांवर चालणार्या अभ्यासु, विचारवंत वक्ते  असलेल्या, अष्टपैलू  सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार , प्रसिद्ध व्यापारी संतोषबापु जेथलिया यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उघोग आघाडी प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करून यांना माजी मंत्री प्रकाशदादा सोंळके यांनी न्याय दिला आहे. आठरा पगड जाती जमाती,सर्व धार्मिय बांधव यांना बरोबर घेऊन चालणार्या दिशादर्शक अशा जेष्ठ कार्यकर्ते यांना न्याय मिळाल्याची भावना समाजाच्या सर्व थरातून व्यक्त होत आहे. या निवडीचे व्यापारी महासंघ माजलगाव.माहेश्वरी सभा बीड जिल्हा, तालुका पत्रकार संघ, माहेश्वरी माजलगाव तालुका सभा,

#Malshiras किरण रायझुबे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पाच पिंपळा ता. परांडा येथील किरण रायझुबे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. त्यांनी या परीक्षेमध्ये राज्यात आठवा क्रमांक मिळविला  आहे तसेच एस.बी.सी कॅटेगरीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा लोंढे वस्ती कारुंडे , माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षण श्री नागेश विद्यालय जामखेड, कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज शेळवे पंढरपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरींग पुर्ण झाले. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

#Chiplun संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे रांबाडेवाडी (मधलीआळी) ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( अजित पवार गट) पक्ष प्रवेश

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे येथील रांबाडेवाडी (मधलीआळी) ग्रामस्थांनी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर व गावातील व वाडीतील झालेल्या विकास कामांवर प्रेरीत होवून राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहिर प्रवेश केला. आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून आपण माझ्यावर विश्वास ठेवून आज माझ्या सोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला कोणत्याही प्रकारची तडा जाणार नाही व कायमस्वरुपी अडीअडचणींमध्ये आपल्या सोबत राहून आपला योग्य तो सन्मान पक्षामध्ये केला जाईल असे सांगितले. प्रवेशकर्त्यांमधे वायंगणे रांबाडेवाडी (मधलीआळी) स्थानिक ग्रामस्थ, महिला व मुंबई मंडळाचे पदाधिकारी गोपाळ रांबाडे, अनंत रांबाडे, गंगाराम रांबाडे, मंगेश रांबाडे, यशवंत रांबाडे, सुनिल रांबाडे, प्रमोद रांबाडे, दत्ताराम रांबाडे, नामदेव रांबाडे, चंद्रसेन रांबाडे, सुरेश रांबाडे, दत्ताराम रांबाडे, शांताराम रांबाडे, संजय रांबाडे, रुपेश रांबाडे, हेमंत रांबाडे, वसंत रांबाडे

#Chiplun संगमेश्वर तालुक्यातील माखजन राधाकृष्ण मंदिर येथे बाल प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त आमदार शेखर निकम यांची सदिच्छा भेट

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील राधाकृष्ण मंदिर येथे बाल प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने आमदार शेखर निकम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कार्यक्रमात ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांना श्रीफळ, देत सन्मानित केले. तसेच रत्नागिरी जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुशील भायजे, माखजन गावचे सरपंच महेश बाष्टे, गणपत चव्हाण,अजिज आलेकर, माजी जि.प.सदस्य दीपक जाधव, आंबव  गावचे सरपंच शेखर उकार्डे,नितीन सागवेकर,अभी आंबवकर, संतोष पाडळकर,किशोर तांबट,योगेश,शशिकांत घाणेकर, अमित माचिवले,बबु कवळकर, मनोहर खातु, विशाल राजणे,भोजने,मंदार बेलवलकर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

#Baramati बारामती येथील रमजान ईद सणानिमित्त विविध मस्जिदीना सदिच्छा भेट देवुन मुस्लिम बांधवांना सौ सुनेत्रा पवार यांनी शुभेच्छा दिल्या

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विशेष प्रतिनिधी विलास गुरव रमजान ईद, मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या या सणाच्या निमित्ताने त्यांच्या आनंदात मला सहभागी होता आले असे सौ. सुनेत्रा पवार म्हणाल्या त्या  निमित्ताने शहरातील यादगार मस्जिद, बागवान मस्जिद, चांद शहा वली दर्गा व कब्रस्तान, मक्का मस्जिद, फातिमा मस्जिद, शगनशाह दर्गा मस्जिद, मदिना मस्जिद, इदगाह मैदान येथे जाऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. माझ्या शुभेच्छांचा सर्वांनी आनंदाने स्वीकार करून मलाही शुभेच्छा दिल्या. इदगाह मैदान येथे इदगाह कमिटीच्या वतीने सुनेत्रा पवार यांचा सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणासह मुस्लिम बांधवांसाठी विविध ठिकाणी झालेल्या विकास कामांची माहिती मुस्लिम बांधवांनी दिली. विविध मस्जिदना दिलेल्या शुभेच्छा भेटीप्रसंगी इम्तियाजभाई शिकीलकर, झाकीरभाई शेख, अल्ताफ सय्यद, अमजद बागवान, शाकीर बागवान, वसीम बागवान, हुसेन पठाण, परवेज सय्यद, युसुफ इनामदार, तन्वीर इनामदार, शौकत बागवान, यास्मिन सय्यद  यांच्यासह उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

#Baramati चंदुकाका सराफ प्रा. लि. यांचे वतीने विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बारामतीच्या चंदुकाका सराफ प्रा लि या सुवर्णपेढीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरावागज येथील विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले. महात्मा फुलेंनी शिक्षण विषयक धोरणात्मक बदल करून अनिष्ट चालीरीती रूढी प्रथांना बगल देऊन अशिक्षितांना शिक्षित करण्यासाठी दिलेलं योगदान सह्याद्री प्रमाणे मोठे आहे. अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढून त्यांनी भारत वर्षांवर उपकारच केले होते. अनेक अनाथ बालकाश्रम, व सत्यशोधक समाजाची स्थापना करून लोकांना एकत्रित करून सर्व प्राणीमात्रांना ईश्वराची लेकरे मानून संपूर्ण मानव जातीसाठी कार्य करून साहित्य निर्मिती देखील केली. अशा महामानवांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सुवर्णपिढीने पुढाकार घेऊन सदरील शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करून एक प्रकारे वाचनाची गोडी निर्माण करण्याकरिता केलेला एक विशेष प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी चंदुकाका सराफ प्रा लि चे सेल्स हेड श्री दीपक वाबळे, मार्केटिंग विभाग प्रमुख श्री कुलदीप बावणे, श्री कुमार राठोड  या

#Indapur कळस येथे अवैध दारू भट्टीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड यांचा छापा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - दि 08/04/2024  रोजी सकाळी श्री विजय रोकडे  निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क दौंड यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की मौजे कळस गावचे हद्दीत बिरोबा मंदिर चे बाजुला इसम नामे बापु  मल्हारी खोमने रा.शेळगांव हा अवैध दारू भट्टी काढत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळालेने त्यांनी तात्काळ जवान श्री केशव वामने  यांना दोन पंच बोलविण्यास सांगून  स्टाफ व दोन पंच यांना सोबत घेऊन माहिती  मिळाले  ठिकाणी  जाऊन 5.00 वा चे सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी प्रत्येकी 200 लिटर चे 10 कच्चे रसायन चे ब्यालर त्यात एकूण 2000 लिटर कच्चे रसायन त्याची किंमत अंदाजे 70,000/- तसेच तयार हातभट्टी दारू 20 लिटर त्याची किंमत 2000 रु,दारू गाळण्यासाठीचा एक लोखंडी ब्यारेल किंमत 2000 रु, दारू काढण्यासाठी लागणार चाटु व थाळी किंमत 2500 रु, असा एकूण 88100 रु चा मुद्देमाल मिळून आला असून, सदर ठिकाणी मिळून आलेले कच्चे रसायन दोन पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आले तसेच तयार हातभट्टी 15 लिटर दारू जप्त करण्यात आली असून सदर दारू भट्टी काढणारा इसम नामे  बापु मल्हारी खोमने रा- शेळगांव ता. इंदापूर जी

#Yavat दौंड तालुक्यातील सर्वच आठवडे बाजारांना वाढत्या उन्हाचा फटका

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत,वरवंड  केडगाव ,पाटस, राहू ,कुरकुंभ हे आठवडे बाजारात वाढत्या उष्णतेमुळे ग्राहक बाजारात फिरकतच नाहीअसे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे.                             Advertisement  तालुक्यातील या सर्व बाजारात  दुपारची ग्राहक नगण्य असतात. वाढत्या उष्णतेची तापमानामुळे ग्राहक कमी होत आहे व्यापारी वर्ग तरकरी ,फळे मिठाई ,धान्य, कपड्याचे विक्रेते दुपारचे ग्राहक विना बाजरात बसलेले असतात.  तापमान ३८ ते ४० डिग्री सेल्सिअस आहे त्यामुळे उन्हाने सर्वांचीच हालत बेकार होत आहे . उष्णतेमुळे बाजारात व्यापारी प्लास्टिकचे छत टाकून आपले दुकाने लावतात. सकाळी व्यापारी बाजारात लवकर येतात आपले दुकाने लावतात परंतू संध्याकाळीच बाजारात गर्दी वाढत असते. यवत येथील आठवडे बाजारात लोक संध्याकाळी ५नंतर येतात वाढत्या तापमानामुळे बाजारातील गर्दी सुद्धा कमी होत आहे. दुपारचे  ग्राहक कमी असतात गवार ,मिरची ,भेंडी, दोडका,कारले, या तरकारीचे वजन घटतात.उष्णता वाढली  तर तरकारीचे दर वाढतील. दीपक शिंदे (तरकारी व्यापारी)वरवंड

#Chiplun येडगेवाडी नळपाणी योजनेची रत्नागिरी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी केली पाहणी

Image
पाणी साठ्याबाबतच्या केल्या सूचना महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी नळपाणी योजना कामाची रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी येडगेवाडी येथील योजनेसाठी खोदलेल्या विहीरीची पाणी पातळी पाहिली तर प्रस्तावीत पाचांबे गायकवाडवाडी येथील विहीरीच्या जागेची ही पाहणी केली.                           Advertisement  येडगेवाडीडीतील जिल्हा परिषद मालकीच्या विहीरीची पाहणी करुन येथील विहीरीची पाणी पातळी तपासण्याचे आदेश या पाहणी दौ-यात दिले तर नविन विहीर खोदकाम झालेल्या विहीरींची घेण्याच्या सूचना पाणी पुरवठा अधिका-यांना दिल्या आहेत. एप्रिल अखेरपर्यंत सर्व तपासण्या पुर्ण करुन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना या पाहणी दौ-यावेळी दिल्या. संगमेश्वर ( देवरुख ) पाणी पुरवठा उप अभियंता अविनाश जाधव यांनी दि.२९ मार्च २०२४ रोजी येडगेवाडी नळपाणी योजना कामातील विहीरीची घेतलेली आहेत. या टेस्टमध्ये दिवसाला ३५०० लिटर पाणी उपलब्ध होत असल्याचा अहवाल कनिष्ठ भुवैज्ञानिक यांना सादर केलेला आहे.

#Chiplun नारडुवे सड्येवाडी येथे गणेश मित्र मंडळ आयोजित सत्यनारायण महापुजेस आमदार शेखर निकम यांची सदिच्छा भेट

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव तालुक्यातील नारडुवे सड्येवाडी येथील गणेश मित्र मंडळ आयोजित सत्यनारायण महापुजेस चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार शेखर निकम  यांनी भेट दिली.                           Advertisement  ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांनी कार्यक्रमास दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल तसेच त्यांनी केलेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त करुन त्यांचे आभार मानले व त्यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.या कार्यक्रमाच्यावेळी आमदार शेखर निकम  यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला,गावातील विकासकामांबाबत चर्चा केली,अडीअडचणी जाणून घेतल्या व उर्वरीत विकास कामे व गावाचा विकास पुढील येणा-या काळात निश्चित टप्या-टप्याने पुर्ण करु असा ग्रामस्थांना विश्वास दिला. यावेळी सरपंच कृष्णा जोगळे, उपसरपंच विजय जोगळे, रत्नागिरी जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुशिल भायजे,गणपत चव्हाण,संतोष विरकर,अर्जुन जोगळे,महादेव मदगले (गाव प्रमुख),दिपक मदगले (वाडी प्रमुख),चंद्रकांत पवार,भिकाजी जोगळे,कृष्णा जोगळे,गुलाबराव सुर्वे,गावकरी मंडळी,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित

#Solapur सोलापूर लोकसभेसाठी रिक्षाचालकांचा प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा

Image
मुद्द्याचं बोला ओ अभियानांतर्गत साधला संवाद महादरबार न्यूज नेटवर्क - सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणितीताईं शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सर्व चालकांच्या वतीने मतांची ओवाळणी देऊन प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला. मागील दोन वर्ष भाजपच्या खासदारांनी कोणतेही विकासाचे काम केलेले नाही. भाजपकडून केवळ फसवी आश्वासने देण्यात आली. त्यामुळे यावेळी सोलापूरची लेक म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनेच्या वतीने करण्यात आला. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेच्यावतीने बुधवारी प्रणिती ताई शिंदे यांच्याशी संवाद साधून आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच आजपासून प्रणिती शिंदे यांचा प्रचार सुरू करणार असल्याचेही रिक्षा चालकांनी स्पष्ट केले. मुद्द्याचं बोला ओ या अभियानांतर्गत संवाद साधत असताना रिक्षा चालकांनी यावेळी त्यांच्या दैनंदिन व्यवहारा

#Phaltan महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला फलटण तालुक्यातून एक लाखाचे लीड देणार - युवा नेते निवृत्ती खताळ सर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - फलटण तालुक्याचे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार साहेब गट (मा.वि.) माजी फलटण तालुका अध्यक्ष निवृत्ती खताळ (सर) यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी जो कोणता उमेदवार देतील त्या उमेदवाराला फलटण तालुक्यातून एक लाखाचे लीड देण्यासाठी आम्ही फलटणकर तसेच फलटण तालुक्यातील सर्व सामान्य जनता प्रयत्न करेल असे आश्वासन फलटण तालुक्याचे युवा नेते निवृत्ती खताळ (सर) यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले.                             Advertisement  तसेच ते पुढे म्हणाले की संपूर्ण माढा मतदार संघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या मतदारसंघांमध्ये आपण जर जास्त विचार केला तर माढा लोकसभा मतदार संघामध्ये ओबीसी मतदार बंधू भगिनी खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्या अनुषंगाने जर महाविकास आघाडीने आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी जर ओबीसी समाजाचा उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये दिला तर नक्कीच माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विजयाची तुतारी नक्कीच वाजेल. संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जनतेच

#Natepute देवबा सुळवस्ती शाळा आदर्श शिक्षक पुरस्काराने अभिमान लोंढे सन्मानित

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा देवबा सुळवस्ती  (मोरोची)शाळेला 25 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त शाळेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन, माजी शिक्षक मेळावा, माजी विद्यार्थी मेळावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून लोंढे वस्ती (कारूंडे )शाळेतील उपशिक्षक श्री अभिमान सोपान लोंढे यांना जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा देवबासूळ वस्ती शाळेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .                         Advertisement  याप्रसंगी देवबा सूळ वस्ती शाळेचे संस्थापक आदरणीय जालिंदर तात्या, शाळा व्यवस्थापन समितीचे कर्तव्यतत्पर अध्यक्ष आदरणीय श्री . दड्स सर, प्रमुख पाहुणे झेंडे साहेब आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण चा सोहळा पार पडला. याचवेळी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ही मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी माजी शिक्षक मिळावा, आणि माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहामध्ये प्रसन्न वातावरणात जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा देवबा सुळवस्ती (मोरोची) येथे साजरा केला य

#Chiplun सरंद येथील गुरववाडी येथे नवीन सभामंडपाचे उद्घाटन पूजा निकम यांच्या हस्ते संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव येथील सरंद गावातील गुरववाडी येथे नविन सभामंडप उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन पूजा शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले.                                Advertisement       सरंद गावातील गुरववाडी नेहमीच आपल्या चांगल्या कामांमुळे चर्चेत असते. इथे आजही एकत्र कुटुंब पद्धती दिसून येते. येथील रहिवासी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. कोणताही सण असो, उपक्रम असो की कार्यक्रम असो सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात. यावेळी कामानिमित्त मोठ्या शहरात गेलेले चाकरमानी सुद्धा न चुकता गावी येऊन आनंदात सहभागी होतात.      सदर वाडीत राहणाऱ्या रहिवाशांना कोणतेही कार्यक्रम घेण्यासाठी, सभा आयोजित करण्यासाठी तसेच मुलांना देखील अभ्यासासाठी एखाद्या सभागृहाची आवश्यकता होती. हिच गरज ओळखून सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन आ. शेखर निकम यांच्या सहकार्याने सभामंडप उभारला. शनिवार दि. ३० रोजी चिपळूण पंचायत समितीच्या मा. सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्षा पूजा शेखर निकम यांच्या हस्ते या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले.

#Yavat श्री साई भंडारा उत्सव यवत येथे साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  संतोष जगताप  श्री क्षेत्र शिर्डी निवासी  साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळा व दरवर्षी साजरा केला जाणारा एकनाथषष्ठी निमित्त श्री साई भंडारा उत्सवाचे आयोजन यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे करण्यात आले होते.                            Advertisement    उत्सवाचे हे २० वे वर्ष असुन यवत येथील साईभक्तांकडून मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गुरुपौर्णिमा निमित्त श्री साईबाबा पालखी सोहळा समिती, पुणे पालखी सोहळ्यात यवत परिसरातील भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होत असुन गावातील नागरिकांनाही श्री साई पादुकांच्या दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून दरवर्षी रंगपंचमी व एकनाथषष्ठी निमित्त श्री साई भंडारा उत्सव साजरा करण्यात येत असतो या निमित्ताने प्रथम दिवशी श्री साई पादुकांचे आगमन , दैनंदिन आरत्यांसह रात्री ह.भ.प दीपक महाराज मोटे  यांचे सुश्राव्य किर्तन झाले तर दुसऱ्या दिवशी पहाटे कांकड आरती, रुद्रअभिषेक , श्री साईसच्चरित पारायण, श्री साईसत्यनारायण महापुजा , माध्यांन्ह आरती , महाप्रसादासह भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी दिपोत्सव करुन धुपार