Posts

Showing posts from September, 2023

#Natepute:गांधी जयंतीच्याच दिवसी पिंपरी ग्रामपंचायतीच्या बंद पडलेल्या पाणी पुरवठ्या साठी ग्रामस्थांचे बोंबाबोंब व मटका फोड आंदोलन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - गेली २० दिवस सरपंच उपसरपंच अधीकारी शिपाई यांच्या मनमानी कारभारा मुळे लोकांना पिण्याचे पाणी सुटलेले नाही यांच्या अंतर्गत वादाचा ग्रामस्थांना फटका बसत आहे पाणी उशाला व कोरड घशाला असा प्रकार झालेला आहे. त्यामुळे लोक वैतागुन या ग्राम पंचायतीच्या विरोधात बोंबाबोंब व मटका फोड आंदोलन करणार आहेत गांधी जयंतीचे औचित्य साधून मोर्चा आयोजीत केलेला आहे तशा प्रकारचे निवेदन रुपी अर्ज ग्रामपंचायत पिंपरी व नातेपुते पोलीस स्टेशन नातेपुते यांना लेखी निवेदन दिलेले आहे.  या निवेदनावर जनतेच्या मनातील सरपंच हनुमंत शिवाजी शिंदे, हनुमंत श्रीरंग कर्चे,  आप्पासाहेब बबन कर्चे, पुथ्वीराज उर्फ बबलू दत्तू कर्चे यांच्या सही आहेत व त्यांनी प्रत्यक्ष समोर हजर राहून निवेदन दिलेले आहे . या वेळी बोलताना आप्पासाहेब कर्चे यांनी सांगितले की ४ दिवसाला सुटणारे पाणी १५ ते २० दिवस पाणी येत नाही वारंवार प्रशासनातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक शिपाई यांच्यात कशावरून तरी वाद होतात तो त्यांचा अंतर्गत विषय आहे पण त्याचच भांडवल करत लगेच ग्रामस्थांना बेठीस धरत कोणतीही पुर्व कल्पना सुचना अर्ज न देता लगे

#Yavat:यवत येथील गणेश विसर्जनाच्या वेळी वरून राजाचे आगमन भाविकांमध्ये उत्साह तरुणाई थिरकली नृत्यावर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथील गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्थीचे दिवशी उत्साहात पार पडले निरोप देण्यासाठी डबल वृत्तांची गर्दी होती गणपतीचे विसर्जनासाठी यवत मध्ये सकाळपासूनच कार्यकर्ते मंडळांची लगबग चालू होती विसर्जन लहान मोठे मंडळांनी दुपारी सेवा तेथील कॅनलला  केले तसेच सोयीनुसार आपल्या जवळपासच्या ठिकाणी तलावात केले. तेथील विसर्जन मुख्य विसर्जन सोहळा संध्याकाळी सात वाजता सुरू झाला नूतन तरुण मंडळ, हनुमान तरुण मंडळ स्टेशन, अमर तरुण मंडळ नवयुग तरुण मंडळ, व राजा शिवछत्रपती मंडळ या या मंडळाची संध्याकाळी सातच्या दरम्यान विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली वरून वरुणराजाने सकाळी सुद्धा हजेरी लावली होती परंतु संध्याकाळी सुद्धा करून राजाने बरसायला सुरुवात केली होती त्यामुळे सर्वच जणांना डॉल्बीवर नसण्यात खूप प्रोत्साहन मिळत होते पडलेल्या पावसामुळे  मुक्तपणे गुलालचे उधळण केल्यामुळे तरुणांच्या  उत्साह जाणवत होता. श्रीनाथ गणेश मंडळ त्रिमूर्ती गणपती मंडळ  यांच्या गणेशाचे विसर्जन सुद्धा यवत येथील मुख्य रस्त्याने रस्त्याने जाऊन केले येथ

#Yavat:दौंड तालुक्यातील अविरत ३५ वर्ष गौरी गणपतीचे सेवा करणारे कचरे कुटुंबीय तर ग्रामीण संस्कृती जोपासणारे पवार कुटुंब

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील वरवंड येथील मा सरपंच संतोषकुमार कचरे हे गौरी गणपती ची अत्यंत सुरेख आरास करतात. श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वांच आतुरतेने ज्याची वाट पहातो त्या गौरी आवाहनाच्या तयारीची होत असते.पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी, देवी पार्वती कैलास पर्वतावरून पृथ्वीवर अवतरली अशी आख्यायिका आहे.शिवाय, काही भागात गौरी पूजनाला देवी लक्ष्मीच्या उपासनेचे रूप मानले जाते. श्रीगणेशाप्रमाणेच माता गौरीची मूर्तीही मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात घरी आणली जाते.गौरी आवाहनाच्या दिवशी भाजी भाकरीचा नैवद्य दाखविला जातो.दुसऱ्या दिवशी पुरण पोळी चा नैवद्य दाखविला जातो.त्याच दिवशी महिला मोठ्या संख्येने  हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले..वरवंड येथील मा.सरपंच संतोषकुमार कचरे यांच्या परिवाराने मोठ्या थाटामाटात गौरी आवाहनाच्या नियोजन केले.गेली अविरत ३५ वर्षे कचरे परिवार गौरी आवाहनाचे नियोजन करत आहे.  हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल

#Malshiras:माळशिरस तालुक्यातील नंदीवाले समाज्याच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार - आ रामभाऊ सातपुते

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील  अनेक  गावात  नंदीवाले समाजातील लोक  राहतात. खरे तर हा समाज अतिशय  प्रतीकुल परिस्थिती  जगतो .जगण्यासाठी सतत  हया गावातुन त्या गावात कामधंदा  करण्यासाठी हे लोक सतत भटकंती  करतात .त्यांचा समावेश  खरेतर व्हि जे एनटी मध्ये  होतो पण भक्कम  शैक्षणिक  पुरावे नसल्यामुळे  हया लोकांचे ,विदयार्थनचे जातीचे दाखले  मिळत नाहीत यामुळे  या जमातीतील लोक शैक्षणीक सुविधापासुन वंचीत आहेत  तसेच  इतर शासकीय सुविधा  सुद्धा  मिळत नाहीत. याविषयी  नुकतेच  कुसमोडचे माजी उपसरपंच संजय पाटील यांनी आमदार  रामभाऊ सातपुते  यांच्याकडे  या समाजबांधवांनची व्यथा मांडली यानंतर  आ रामभाऊ सातपुते  यांनी  येत्या  हिवाळी अधिवेशनात  मी नंदीवाले समाज्याच्या जातीच्या  दाखल्याचा प्रश्न  नक्की  मांडतो तसेच या समाज्याला आपण नक्कीच जातीचे दाखले  मिळवुन  देणार असल्याचे  त्यांनी  सांगितले.  तर याविषयी कुसमोडच्या  माजी उपसरपंच  राणी पवार  यांनी आ रामभाऊ सातपुते  यांनी आमच्या  समाज्याचा  हा प्रश्न  सोडवुन समाज्याला प्रवाहात आणणयाचे काम करावे आणी ते नक्की  हे काम करती

#Patas:नागेश्वर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय व कै.मधुकरराव गंगाजीराव शितोळे उच्च माध्यमिक विद्यालय पाटस मध्ये युगप्रवर्तक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीच्या निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाहुण्याच्या हस्ते कर्मवीर आण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेषभुषा व आदिवासी वेषभुषा परिधान केल्या होत्या.  तसेच लेझीम पथक,झांज पथक यांच्या मिरवणुकीमध्ये कसरती घेण्यात आल्या व त्याच बरोबर प्लॅस्टिक वापरावर बंदी घालावी यासंदर्भात उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभुषा करुन माऊली गित सादर केले त्याचबरोबर दांडिया मध्ये मुलींनी सहभाग घेतला होता. खूप उत्साहात,कर्मवीरांच्या घोषणा देत मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीसाठी डीजे हितचिंतक नितीन पोळ यांनी तर ट्रॅक्टर  पांडुरंग जगताप यांनी मोफत दिले तसेच शाळेच्या व मंजिल महीला बचत गट यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्य

#Chiplun:कोकणवासीयांच्या समस्या दूर करण्यास बळ देण्यासाठी आ.शेखर निकम यांचे गणरायाला साकडे

Image
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या घरी गणराय विराजमान महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव येथील चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून निकम दांपत्याने आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत जल्लोषात केले आहे. तसेच गणपती बाप्पाच्या पाहुणचाराची जय्यत तयारी केली आहे.      साध्या सरळ सजावटीत व हार फुलांच्या माळांनी सजलेल्या आरासमध्ये विराजमान झालेल्या गणरायाची प्रसन्न मुद्रा पाहून दर्शनासाठी येणाऱ्या आप्तेष्ट व मित्रमंडळींना देखील भुरळ पडत आहे. यातच नेहमीच आपल्या राजकीय धकाधकीच्या जीवनात व्यस्त असलेल्या निकम दाम्पत्यांना निवांत वेळ काढून बाप्पाच्या सेवेत रममाण झालेले पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.       यंदा आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत शेखर निकम यांनी आपल्या कोकणवासीय बांधवांसाठी त्यांच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी कृपाशिर्वाद मागितला. त्यांच्या समस्या, संकटं दूर करण्यासाठी राजकीय पक्षात राहून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ

#Natepute:वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नातेपुते नगरपंचायतीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडून २ कोटी ९० लाखाचा थेट निधी मंजूर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते ता- माळशिरस येथील नातेपुते नगरपंचायतीला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नातेपुते नगरपंचायतीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडून २ कोटी ९० लाखाचा थेट निधी मंजूर झाल्याची माहिती आज माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील साहेब यांनी आज प्रसार माध्यमांना दिली. ते पुढे म्हणाले की,दिनांक २ मार्च २०२३ रोजी नातेपुते नगरपंचायतीला निधी मिळण्याबाबत तात्कालीन नगराध्यक्ष उत्कर्षराणी पलंगे व उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर स्वतः सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे नेते प्रा. शिवाजीराव सावंत सर यांच्याकडे निधीचे पत्र घेऊन गेलो. असता त्यावर त्यांनी तात्काळ आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडे ६/३/२०२३रोजी शिफारस करून त्यावर राज्याचे कार्यसम्राट आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी माळशिरस तालुक्यातील विकास कामांसाठी विशेष बैठक आयोजन करून दिनांक १०मार्च 2023 रोजी केले. या बैठकीत शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवा

#Natepute:दत्तनगर गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी संजय पवार तर,खजिनदारपदी निलेश बनसोडे यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - सालाबादप्रमाणे यावर्षि झालेल्या मंडळाच्या मिटिंगमध्ये एकमताने दत्तनगर गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी संजय पवार,तर खजिनदारपदी निलेश बनसोडे यांची निवड करण्यात आली,यावेळी सोमवार दि..२५ रोजी जादूगार शालिमार(कोल्हापूर)याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी , बापु कूभांर,गणेश देशपांडे,. किशोर कारंडे, ज्ञानेश्वर सर्जे ,अनंतराव कोळी ,निलेश झगडे ,  दत्तात्रय स्वामी ,आदित्य दाभोळे ,रघुनाथ लांडगे , पंडित बोराडे , आदि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

#Mumbai:संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त डोंबिवली नाभिक संघटनेचे विविध कार्यक्रम संपन्न

Image
पालखी दिंडी, कीर्तन सोहळा, नाभिक समाजातील मुलांसाठी वह्या वाटप व गुण  गौरव सोहळा व महाप्रसादाचे आयोजन फोटो ओळ- बंधू चव्हाण-सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट समन्वय- सलून ब्युटीपार्लर असोसिएशन ( महाराष्ट्र राज्य) महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  डोंबिवली  येथे सालाबादप्रमाणे यंदाही दि. ११ सप्टेंबर २०२३ सोमवारी संत सेना महाराज यांच्या ६५३ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ह. भ .प. हनुमंत तावरे महाराज यांच्या भजनी मंडळाने भजन सादर करून संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी व दिंडी काढण्यात आली . तसेच ह भ .प. धनंजय अमळनेरकर महाराज यांचे कीर्तन व  त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेना सचिव दीपेशजी म्हात्रे समाजसेवक, प्रल्हादजी म्हात्रे, राष्ट्रीय नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष अरुणजी जाधव, सचिव  महेंद्र जाधव, सिने हेअर आर्टिस्ट बंधू चव्हाण , क्राईम बॉर्डर चे संपादक /ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वखरे व मान्यवरांच्या हस्ते समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच त्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. नाभिक समाज संघटना डोंबिवलीचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत, सचिव मंगेश पोफळे

#Mumbai:नगरपंचायत हद्दीतील शासकीय जागेची मोजणी करा - राजकुमार हिवरकर पाटील

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालुक्यातील असणाऱ्या चार नगरपंचायती मधील अकलूज, नातेपुते, माळशिरस, महाळुग या नगरपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अध्यादेश काढलेला आहे. चारही नगरपंचायतीमध्ये अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत सदर अर्जाच्या अनुषंगाने मोजणी करणे गरजेचे आहे. शासन निर्णयाप्रमाणे आपण २०११ पर्यंतच्या अतिक्रमण नियमानूसार  करावे. आपण समितीचे अध्यक्षआहात तरी प्रकरण निहाय आवलोकन करून त्याचा अहवाल नगरपंचायतीकडे व अध्यक्ष असणारे उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्याकडे सादर करण्यात यावा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या विचाराने शासन आपल्या दारी ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये अर्ज केलेल्या नागरिकांना त्यांची घरे नियमित करण्यासंदर्भात मोजणी होणे आवश्यक आहे तरी सदर विषयानुसार तात्काळ मोजणी करण्यात यावी अशी मागणी माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी निवेदनाद्वारे उपसभापती निलम गोरे  यांच्याकडे केली

#Pune:धनगरवाड्यांच्या उन्नतीसाठी विकासनिधी उपलब्ध करून देणार- आ. शेखर निकम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण तालुक्यातील पुणेस्थीत धनगर समाजाने पुणे कर्वे नगर या ठिकाणी दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला चिपळूण तालुक्यातील पुणे या ठिकाणी राहणा-या चाकरमान्यांनी भरभरून प्रतिसाद देत प्रचंड गर्दी करत कार्यक्रम यशस्वी केला. चिपळूण तालुक्यातील धनगरवाड्यांच्या दुर्लक्षीत विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात यावा तसेच चिपळूण तालुक्यातील डोंगररांगांत राहणा-या धनगर बांधवांसी रस्ते आणि पाणी या मुलभूत गरजा पुर्ण कराव्यात या मागण्या प्रामुख्याने मांडण्यात आल्या त्यासाठी आमदार शेखर निकम यांनी राज्य सरकारच्या पातळींवर विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी या कार्यक्रमागरम्यान धनगर बांधवांकडून करण्यात आली तर पेढांबे, गाणे, खडपोली, शिरगांव , ओवळी, नांदीवसे, कुंभार्ली, कोळकेवाडी आदी वाड्यांसह इतर धनगरवाड्या दर्जेदार रस्त्यांनी जोडण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी या धनगरवाड्यांचा पाण्याचा प्रश्न ही निकाली काढून कायमस

#Chiplun:कळंबुशी येथे ऋण फाउंडेशन तर्फे घरगुती गणपती आरास स्पर्धाचे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव नव्याने नोंदणी होत असलेले ऋण फाऊंडेशन व राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा अंकिता ताई चव्हाण आयोजित संगमेश्वर तालुका अंतर्गत मर्यादित गणपती बाप्पा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गणपती बाप्पा ची मूर्ती आणि आसन करीता केलेली सजावट याचे फोटो स्पर्धकाने संपूर्ण नाव गावासह वरील व्हॉटसअप नंबर वरती टाकावे व ते फोटो अंकीता ताई चव्हाण फेसबुक पेज वरती पोस्ट केले जातील मिळणाऱ्या लाईक्स च्या जोरावर स्पर्धेचे विजेतेपद निवडले जाईल. यामधे प्रथम,द्वितीय,तृतीय असे क्रमांक व त्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह दिले जाईल. ह्या स्पर्धेत सहभागी होताना बाप्पा सोबत बाप्पा चा सजावट सोबत फोटो व तुमचे नाव,गाव whtspapp नंबर वरती दिनांक २१ सप्टेंबर सायं.७.०० पूर्वी whtspapp करायचं आहे. ही स्पर्धा पूर्णपणे विनामुल्य प्रवेश आहे. Watsapp नंबर अक्षय चव्हाण- 9322784726

#Yavat:यवत येथील आठवडे बाजारात टोमॅटोची कवडीमोल दराने विक्री

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथील आठवडे बाजारात टोमॅटो अक्षरशः  फेकून देण्याची वेळ आली  ज्या टोमॅटो ने ऑगस्ट महिन्यात उच्चचा कि दर गाठला होता ,टोमॅटो चोरून नेऊ नये म्हणून सीसीटीव्ही लावले होते ऑगस्टमध्ये टोमॅटो २०० रुपये किलो होते ,तेच टोमॅटो आज २ रुपये किलोने जात आहे त्यामुळे  शेतकरी वर्गात नाराजी आहे, ऑगस्टमध्ये २००रुपये किलोने विकून शेतकरी ठराविक करोडपती  झाले होती त्याच टोमॅटोला आज फेकून देण्याची वेळ आली आहे टोमॅटोचा वर होणारा खर्च हा सुद्धा शेतकऱ्याला मिळू शकत नाही. टोमॅटोचा खर्च काढणीचा खर्च परवडत नाही ,त्यामुळे टोमॅटो जनावरांना टाकण्यात येत आहेत, काही लोकांनी लोकांनी ऑगस्ट महिन्यात टोमॅटो खाणे सोडून दिले होते, शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की टोमॅटोला  हमीभाव द्यावा  टोमॅटो लागवड डी चा सुद्धा खर्च आता निघत नाही ,त्यामुळे जगाच्या पोशिंदेला आर्थिक पाटबळ सरकारने दयावे. सद्य टोमॅटो उत्पादक शेतकरी चे नुकसान मोठे होत आहे आणि विकणारा  चे पण नुकसान आहे तोटा जास्त फायदा कमी शिंदे दीपक वरवंडं - व्यापारी.

#Chiplun:आमदार शेखर निकम मित्र मंडळ चिपळूण दहीहंडी उत्सव २०२३ उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव आमदार शेखरजी निकम  यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण शहर श्री.शेखर निकम मित्र मंडळ  दहीहंडी उत्साहात गुरुवार दि.७/०९/२०२३.. रोजी साजरी झाली. कार्यक्रमाला उपस्थित चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम  यांची प्रमुख उपस्थिती सोबत मान्यवर माजी सभापती चिपळूण सौ.पूजा ताई निकम मॅडम, मिलिंद शेठ कापडी, नितीन (अबुशेठ) ठसाळे, दशरथ शेठ दाभोळकर, डॉ.राकेश चाळके, रियाज भाई खेरटकर, मंगेश शेठ माटे, रिहानाताई बिजले, दिशाताई दाभोळकर, सीमाताई चाळके, सई निकम, मोडक मॅडम, पुनम भोजने, डॉ.समीना परकर, निलेश कदम, समीर जानवलकर, किशोर रेडीज, इम्रान कोंडकरी, बरकत पाते, अमित कदम, नुरभाई बिजले, सिकंदर चिपळूणकर, इकबाल मुल्ला, राजू सुतार, अजिंक्य शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी माजी मा.आमदार श्री.रमेशभाई कदम, रामदास राणे, विजय चितळे, बाळशेठ कदम, राजू देवळेकर, आशिष खातु, रमेश खळे, रतन दादा पवार, सतीश (अप्पा) खेडेकर, डॉ.कृष्णकांत पाटील, विलास चिपळूणकर, श्री.कोकरे महाराज, दीपिका ताई कोतवडेकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यश

#Mumbai:ग्लोबल विनर्स यांचेमार्फत सामाजिक उपक्रमांर्तगत सहाय्य

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव गुरुवर्य  शशिकांत खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली (विनर्स आध्यात्मिक व्यवसाय प्रशिक्षक) तसेच सुप्रिम साकार मिशन व ग्लोबल विनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळा येथील पारस बालभवन या आश्रम शाळेत भेट देण्यात आली होती. सदर आश्रमशाळेच्या आवश्यकता व मागणीनुसार त्यांचेकडील अन्नसाठयाकरिता डिप फ्रिजर उपलब्ध करुन देण्यात आला. या कार्यक्रमास सुप्रसिध्द अभिनेते  रणजीत जोग यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दिप प्रजवलन करुन भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर भारतमातेच्या आरतीचे महत्त्व विशद करुन सामुहिक आरती घेण्यात आली. तदनंतर सुप्रिम साकार मिशनचे संस्थापक श्री. घनश्याम शर्मा यांनी विनर्स एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक गुरुवर्य श्री. शशिकांत खामकर यांच्या कार्याबाबत माहिती विशद केली. त्यानंतर ग्लोबल विनर्स परिवारातील काही सदस्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तदनंतर शाळेचे संस्थापक श्री व सौ गुंजाळ यांना तसेच उपस्थित मान्यवर श्री. रणजीत जोग यांना ध्वजांकित स्कोल देवून स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमात व

#Varvand:वाढदिवसाचे औचित्य साधून स्पर्धा चे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष मा.सौ.योगिनीताई दिवेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष, स्वयंसिद्धा फाउंडेशन आणि चंद्रभागा महिला पथसंस्था केडगाव याच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ.योगिनीताई दिवेकर यांच्या वाढदिवसानिमित्त "RUN FOR WOMEN'S HEALTH"."एक धाव स्त्री शक्तीसाठी"  भव्य मॅरेथॉन स्पर्धा व "चला स्वतः सोबत निसर्गाची पण काळजी करूया" या उद्देशास अनुसरून बुधवार(दि६रोजी) मॅरेथॉन-2023  स्पर्धेचे व “वृक्षारोपण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर “मॅरेथॉन-२०२३ या स्पर्धेमध्ये ५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धा तीन किलोमीटर मॅरेथॉन धावणे व पाच किलोमीटर मॅरेथॉन धावणे अशा दोन गटांमध्ये विभागल्या होत्या पाच किलोमीटर धावणे मॅरेथॉन मुले १) मखरे सुशांत मनोहर -  प्रथम क्रमांक २) करे गणेश सोपान -   द्वितीय क्रमांक 3) शिंगटे ओंकार शिवाजी -   तृतीय क्रमांक  ४) लोखंडे प्रणव गोपीनाथ -   उत्तेजनार्थ पहिला   ५) केसकर मारुती नाम

#Chiplun:देवरूख शहराच्या विकासासाठी कायमस्वरूपी कटीबद्ध- आ. शेखर निकम

Image
देवरूख येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दहीहंडी कार्यक्रमात आ. शेखर निकम यांचा सत्कार      महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन केलं आपणा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देत असताना या देवरुख शहराचा विकास करणे हेच काम आपल्याला पुढील काळात महायुतीच्या माध्यमातून करायचे आहे आणि आम्ही ते निश्चितच करू, असे प्रतिपादन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी देवरुख येथे केले.       संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व देवरुख शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावतीने काल गुरूवारी देवरुख छत्रपती शिवाजी महाराज चौक नजीक उभारण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमाप्रसंगी आमदार शेखर निकम यांचा सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. देवरुख शहराच्या विकासाकरिता आमदार शेखर निकम यांनी चार कोटी मंजूर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याच्या वतीने आमदार श्री. निकम यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्कारला

#Chiplun:बौध्दजन हितसंरक्ष समितीने मानले आमदार शेखर निकम यांचे आभार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव अडरे बौद्ध मंडळ, अडरे तथा चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, शाखा अडरे यांच्या वतीने आज चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम सर यांचे कामाबद्दल आभार मानण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कांबळे, सरचिटणीस सचिन कांबळे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष रमेश कांबळे, तसेच इतर पदाधिकारी संदेश पवार सर, नितीन कांबळे, विजय कांबळे, विजय बंडू कांबळे, संतोष कांबळे, मिलिंद कांबळे व अभियंता देवेश जाबरे आदी उपस्थित होते.

#Natepute:भारतीय मातंग युवक संघटनेच्या मागणीला यश - केतन यादव

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - दहिगाव ता - माळशिरस येथे भारतीय मातंग युवक संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख केतन यादव यांच्या  वतीने दहिगाव येथील  नातेपुते वालचंदनगर रोडवरती गतिरोधक बसवण्यात यावे.काही दिवसांन पुर्वी ह्या मागणीसाठी कार्यकारी अभियंता  सार्वजनीक बांधकाम विभाग अकलूज  यांच्या कडे  संघटनेच्या वतीने मागणीचे निवेदनं देण्यात  आले होती. व या मागणीची दखल घेत दि -०६ सप्टेंबर २०२३ रोजी दहिगाव येथील नातेपुते वालचंदनगर रोडवरती दहिगाव हायस्कूल  दहिगाव ,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चौक व अंगणवाडी येथे प्रामुख्यानें गतिरोधक बसण्यात आले. यावेळी केतन यादव म्हणाले की ह्या मागणीसाठी सतत आम्ही पाठपूरावा करून हे काम आज पुर्ण झाले  आहे. या यशा मध्ये भारतीय मातंग युवक संघटणे सह या मध्ये दहिगाव  ग्रामस्थ व  महाराष्ट्र सेवा दलातील कार्यकर्त्यांचा ही वाटा आहे.

#Mumbai:संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभाग उपाध्यक्षपदी महेंद्र मनवे यांची नियुक्ती

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभाग  उपाध्यक्षपदी श्री महेंद्र मनवे यांची  नियुक्ती झाली आहे. मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्येक्ष मा.ना.श्री.सुनिलजी तटकरे साहेब आणि संगमेश्वर चिपळूण विधानसभा लोकप्रिय आमदार मा.श्री.शेखर गोविंदराव निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुक्याचे मुंबई विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क प्रमुख श्री सुरेश घडशी यांच्या नेत्रुत्वाखाली मुंबई येथे त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. हे पत्र स्वीकारताना श्री.एकनाथ मनवे (गावकर )श्री तानाजी मनवे (गावकर ) ,श्री.मोहन मनवे (गावकर ),गोपाळ मनवे(गावकर ),शांताराम घाणेकर,अशोक तांबे ,प्रदिप जोशी,वसंत मनवे,चंद्रकांत घाणेकर,प्रमोद जोगळे,विलास मनवे मौजे असुर्डे मनवेवाडी मधील तसेच गुरववाडी /मधली मनवे गावगावकरी मंडळी तसेच महेंद्र मनवे यांच्यावर नितांत प्रेम करणार मित्रपरिवार त्याच बरोबर धामणी जोगळेवाडीतील   प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी महेंद्र मनवे  यांनी सतत ४ वर्षे कार्यकर्ता म्हणुन आमदार शेखर निकम सर ह्यांचे

#Akluj:सुरेशआबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात 123 रक्तदात्यांनी रक्तदान केले.चाकोरे परिसरातील सर्वच जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या,पेन,शालेय साहित्य व खाऊ वाटप व शिक्षक दिनानिमित्त जि.प.शाळा,चक्रेश्वर माध्य. विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.     यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमापूजन केले.शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.राधाकृष्णन व शिक्षक दिनाविषयी भाषणे केली.जि.प.आदर्श प्राथ.शाळा व चाकोरे ग्रामस्थांतर्फे सुरेशआबा पाटील यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जयराम कुंभार,जिवन जानकर,विरेंद्र वाघमारे,चाकोरे गावातील विविध संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.जिवन जानकर,विरेंद्र वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे,जयराम कुंभार इ.मनोगत व्यक्त केले.             कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पठाण सर,राजगुरू सर,क्षीरसागर सर,सपकाळ मॅडम,गायकवाड मॅडम व चाकोरे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.कार्यक्रम

#Malshiras:पिलीव येथील रस्त्याचे स्वखर्चातुन ग्रामस्थांनी केले मुरुमीकरण

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पशु वैद्यकीय दवाखान्यापासून महालक्ष्मी देवी कडे जाणार रस्ता जामदार वस्ती येथे खुप खराब झाला होता मोठया प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले होते पावसामुळे चिखल दल दल झाली होती.त्यामुळे लक्ष्मी देवीला जाणारे भाविक भक्त,तसेच एक नंबर वार्डतील नागरिकांची ह्या रस्त्यावर वाहने ,मोटारसायकल,शाळेतील मुलांच्या सायकली चालवताना खूप मोठी कसरत करावी लागत होती.ही बाब वार्डतील जहागिरदार पार्टीचे माजी उपसरपंच मोहन तात्या करांडे यांच्या लक्षात आली व त्यांनी तात्काळ पार्टीचे नेते संग्रामसिंह जहागिरदार यांचे निदर्शनास आणून दिली.यावेळी संग्राम दादा व मोहन तात्या करांडे यांचे मार्गदर्शनाखाली ह्या रस्त्याचे स्वखर्चातुन मुरुमीकरण केले . यावेळी भा ज प शहर अध्यक्ष राजाभाऊ करांडे, उमेश बोडरे, दत्तात्रय बोडरे , नानासाहेब मदने, समशेर सिंग राजपूत, शरद जामदार,गजानन जनवर,सूरज करांडे,अनंत जामदार ,प्रमोद भैस , मोहसिन शेख, रणधीर सिंह जामदार, श्याम उपाध्ये,विजय करांडे, यांनी परिश्रम घेतले व सहकार्य केले आणि अडचणीच्या ठिकाणी मुरुमीकरण

#Pandharpur:श्री संत नामदेव महाराज यांची जयंती सोहळा शासकीय स्तरावर साजरी करावी - राष्ट्रीयअध्यक्ष डॉ. नारायण पाथरकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य यांची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक ३ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत योगा भवन पंढरपुर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायणराव पाथरकर होते.तर प्रमुख पाहुणे संत नामदेव महाराज यांचे 17 वे वंशज  हभप मुकुंद महाराज नामदास व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे हे होते. यावेळी एस एस टोनी,  रेखा वर्मा, बलजीतसिंग खुरपा, राजपाल जी, मनोज भांडारकर, अनिल गचके, नंदकुमार कोडनुसार,दिनकर पतंगे,कैलास धोकटे संतोष मुळे, राजेंद्र धोकटे, गणेश उंडाळे,सूर्यकांत भिसे  आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ.पाथरकर म्हणाले की राज्य सरकारने येत्या कार्तिक एकादशीला संत नामदेव महाराज यांची जयंती सोहळा शासन स्तरावर साजरी करण्यात यावी असा ठराव मंजूर केला. संपूर्ण देशात शिंपी समाज विविध  पोट जातीत रोटी बेटी व्यवहार करने व विखुरलेला समाज संघटन करून एकाच छताखाली काम करण्याचा ही निर्णय घेतला पंढरपुर येथे संत नामदेव महाराज यांचे स्मारक तात्काळ करण्यास

#Malshiras:पै.दत्ता भाऊ रुपनवर पाटील यांचा वाढदिवस मित्रांनी केला साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते तालुका माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच युवकांचे आधारस्थान दत्ता भाऊ रुपनवर पाटील यांचे सामाजिक काम महाराष्ट्रभर सुरू आहे. दत्ता भाऊंचा वाढदिवस त्यांच्या जवळच्या मित्रमंडळी कडून माळशिरस येथे साजरा करण्यात आला. यावेळी टी डी ठवरे साहेब माजी सरपंच खुडूस, हनुमंत ठवरे पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष मेंढपाळ आर्मी, हनुमंत माने संपादक साप्ताहिक महादरबार, रामभाऊ सरगर, पै. महावीर वाघमोडे इ उपस्थित होते.

#Chiplun:कालुस्ते गावाला पोसरे सब स्टेशन येथुन वीज पुरवठा होणार

Image
१२लाखांचा निधी मंजूर: ग्रामस्थांनी मानले आ. शेखर निकम यांचे आभार महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव कालुस्ते गावात गेले अनेक वर्षे विजेची समस्या भेडसावत होती अनेक वर्षे पोसरे सब स्टेशनवरुन कालुस्ते गावाला विजेचा पुरवठा करावा अशी मागणी होती.यावेळी गावातील ग्रामस्थ यांनी आमदार श्री.शेखरजी निकम सर यांच्याकडे सदर प्रश्न मार्गी लागण्यासाठी मागणी केली. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून पोसरे सबस्टेशन येथून विज पुरवठासाठी जिल्हा नियोजन मधून १२ लाखाचा निधी मंजूर केल्याबद्दल व गावातील इतर कामासाठी निधी दिल्याबद्दल ग्रामस्थ यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.शेखरजी निकम सर यांचे आभार मानले. यावेळी हुसेन अब्बास परकार,अहमद अब्दुल गफार परकार,अब्दुल लतीफ हसन परकार,मेहमूद उमेर परकार,गुलाम अब्दुल कादिर परकार,अब्दुल रज्जाक इस्माईल,उमर सुर्वे,सज्जिद अब्दुल रज्जाक परकार,मुश्ताक अली सुर्वे,नुर बिजले आदी मान्यवर उपस्थित होते..

#Chiplun:चिपळूण शहराच्या विकासासाठी शासनाच्या ठोक तरतुदी अंतर्गत ६ कोटींचा निधी मंजूर

Image
आमदार शेखर निकम यांची पत्रकार परिषदेत माहिती महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव शासनाच्या ठोक तरतूदीअंतर्गत चिपळूण शहरासाठी एकूण ६  कोटींची विकासकामे मंजूर झाली असून त्यामध्ये अल्पसंख्यांक समाजातील कब्रस्तान, गांधारेश्वर, रामतीर्थ सुशोभिकरणासह विविध कामांचा समावेश आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी आतापर्यत एकून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश आले असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले की, शहरातील विविध विकासकामांना चालना देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून शहरातील प्रलंबित प्रश्नांमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विषय मार्गी लागला आहे.  यापुढील काळात मिनी थिएटर, पेठमाप - मुरादपूर पुलाच्या दोन्ही बाजूच्या ऍप्रोच रोडसह अन्य विकास प्रकल्पांचाही समावेश आहे. नुकतेच शहर विकासासाठी सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यामध्ये अल्पसंख्यांक समाजातील कब्रस्थान सुशोभिकरण, रस्ते, पाखाडी गटारे, संरक

#Mumbai:इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देणार - मा. अजितदादा पवार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव पुणे जिल्ह्याच्या इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, श्री. मार्लेश्वर देवस्थान आदी क्षेत्रांना ऐतिहासिक, आध्यात्मिक, पुरातत्वीय वारसा आहे. या क्षेत्रांचा विकास करताना पुरातत्वीय महत्व, ऐतिहासिक सौंदर्य जपण्यात यावे,नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ वास्तूशी मिळते-जुळते असावे , अशा सूचना करत इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्रांचा परिपूर्ण आराखडा सबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करून तो सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांनी दिले. दरम्यान या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करण्यात येईल असे  उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत आश्वस्त केले. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक स्थ

#Satara:उद्यानविद्या महाविद्यालयातील उद्यानदूतांकडून वृक्षारोपण

Image
उद्यानदूतांनकडून वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमातुन जनजागृती महादरबार न्यूज नेटवर्क - मुरबाड (वा) तालुक्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत व यशोदीप सामाजिक विकास संस्था, कराड संचलित उद्यानविद्या महाविद्यालय सरळगाव येथील उद्यानदूतांनी मुरबाड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पऱ्हे येथे नागरिकांच्या व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्तेे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उद्यानदूतांनी काजू,आंबा, शिताफळ,चिंच,चिकु,पेरु,इ.या झाडांची निवड केली होती. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत पऱ्हे सरपंच सोमनाथ चव्हाण, उपसरपंच चंद्रकांत मोहपे, ग्रा.पं.सदस्य सिमा मोहपे, ग्रामविकास अधिकारी दिपक शिंगाडे, जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षिका शमशाद शेख, लता फर्डे, महिला विकास आघाडीच्या अध्यक्षा संगिता मोहपे त्याचबरोबर उद्यानदूत संदेश आहेर, आशुतोष खुस्पे, अरुण निगुडे, वैष्णव तळेकर, रणजित झिरपे, उमेश कत्ती तसेच गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्यानदूतांनी जिल्हा

#Pune:पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी हरिष पाटणे यांची बिनविरोध निवड

Image
पुणे, दि.1 : प्रसारमाध्यमांतील पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी हरिष पाटणे यांची निवड करण्यात आली. विभागीय माहिती कार्यालय पुणे येथे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर  यांच्या उपस्थितीत अध्यक्ष निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.  बैठकीस समितीचे सदस्य गोरख तावरे, अमन सय्यद, चंद्रसेन जाधव, सुनित भावे,  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम 2007 नुसार ही समिती गठित करण्यात आली आहे. श्री. पाटणे हे सातारा येथे दै. पुढारीचे आवृत्ती प्रमुख म्हणून कामकाज पाहतात. प्रारंभी उपसंचालक (माहिती) डॉ.  पाटोदकर यांनी उपस्थित समिती सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. श्री. पाटणे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समिती सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.