Posts

Showing posts from September, 2024

#Akluj अकलूज बस डेपो चा कायापालट करणार - भरत गोगावले

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अकलूज बस डेपो साठी नवनिर्वाचित एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री भरत शेठ गोगावले यांना शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त यांच्याकडून आळंदीच्या बैठकीत सत्कार करून निवेदन दिले . निवेदनात म्हटले आहे की अकलूज बस डेपोला पूर्वी जवळपास ११० बस उपलब्ध होत्या पूर्ण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक माता-भगिनी विद्यार्थी हे  लाल परी तून प्रवास करीत असे बस जास्त जुन्या होत गेल्या तशा त्या स्क्रॅप झाल्या नव्या बस उपलब्ध न झाल्याने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी महिलांसाठी अर्ध  तिकीट योजना लागू केली परंतु  लाल परी ची संख्या कमी असल्याने तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या लाल परी ची संख्या कमी आहे त्यामुळे माता-भगिनींना याचा लाभ घेता येत नाही.त्याची संख्या ६० वर आली अकलूज बस डेपोसाठी जवळपास ४५ कर्मचारी अत्यावश्यक आहेत त्यामध्ये लिपिक चालक वाहक वाहतूक नियंत्रक यांचा समावेश आहे.  नव्याने अकलूज डेपोसाठी किमान ५० गाड्या मिळाव्यात त्यामुळे अकलूज बस डेपो हा पूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. नोकरीच्या  शिक्षणनाच्या देवदर्श

#Solapur सोलापूर विमानतळाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Image
सोलापूर हवाई मार्गाने जोडले गेल्याने उद्योग व्यवसायाला चालना मिळणार - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी   सोलापूर दि.29 : नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणाली पद्धत्तीने लोकार्पण झाले. सोलापूर जिल्हा विमान वाहतुकीने जोडला गेल्यामुळे येथील उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच देश विदेशातील विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी हवाई सुविधा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.      यावेळी सोलापूर विमानतळ येथे आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, सोलापूर विकास मंचचे केतन शहा, माजी खासदार डॉक्टर जयासिध्देश्र्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह सोलापुरातील व्यवसायीक, उद्योजक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना हा उपहार मिळाला आहे. सोलापूर ह

#Yavat प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा स्वप्नपूर्ती सोहळा व लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी कि, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असताना सर्वांसाठी घरे देण्याची संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखली आहे. हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने “प्रधानमंत्री आवास योजना – सर्वांसाठी घरे” हे व्यापक अभियान सुरू केले असून, यातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील दौंड तालुक्यातील लाभार्थ्यांचा मेळावा गुरुवार दि. २६ सप्टेंबर २०२४, सकाळी १०.३० वाजता,  श्री. सिद्धेश्वर मंगल कार्यालय, पिंपळगाव, ता. दौंड येथे आयोजित करण्यात आला आहे.    दौंड तालुक्यातील सुमारे ५१ महसुली गावांचा समवेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये असल्याने या गावातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरीद्वारे प्रत्येकी २ लाख ५०

#Chiplun जीवाची पर्वा न करता जनतेसाठी झगडणारा आपला माणूस म्हणजे शेखर सर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - जुलै 2021 च्या  प्रलयकारी पुरानंतर  चिपळूण शहर व परिसरातील  गावांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिक हताश  झाले. परंतु ह्या  प्रसंगांना व कठीण काळाला समोर डगमगून न जाता जनतेमध्ये मोठे धैर्य व आत्मविश्वास जागवला. शासनाची किंवा इतर संस्थेची मदत येण्यापूर्वीच  पूरग्रस्तांना  अन्नाचे पाकीट व पाण्याची व्यवस्था करून दिली . शहर व परिसरातील गावे पूर्व पदावर येण्याकरता  रात्रंदिवस मेहनत घेतली. शासन  सामाजिक संस्था यांच्याकडून जास्त जास्त मदत आणण्यासाठी प्रयत्न केले व यशस्वी ठरले.          फेब्रुवारी 2021 रोजी  तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या  अध्यक्षतेखाली चिपळूण   बचाव समिती व वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत गाळ काढण्याच्या  महत्वपूर्ण विषयासंदर्भात  मंत्रालयात सरांच्या पाठपुराव्यामुळे  निर्णायक   बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने आदल्या दिवशीच सरांना तातडीने  उपचारासाठी मुंबईतील इस्पितळामध्ये ऍडमिट व्हावं लागले  परंतु सरांना  स्वतःवर होणाऱ्या उपचारापेक्षा  दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बैठकीचीच जास्त चिंता लागून राहिली होती सदर बै

#Yavat दौंड तालुक्यात महाआरोग्य शिबीरा चे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा व मोफत उपचार मिळावेत यासाठी दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांच्या संकल्पनेतून व कै. सुभाष आण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून गुरुवार दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत श्री. बोरमलनाथ मंदिर, बोरीपार्धी (चौफुला) येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या महाआरोग्य शिबीरात पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित रुग्णालयांचा सहभाग असून विविध वैद्यकीय तपासण्या, उपचार व नियोजित शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असून सर्व नागरिकांनी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा अशी विनंती आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली आहे. यापूर्वी देखील २०१७ ते २०२० अशा सलग ४ वर्षी हे शिबीर घेण्यात आले होते. तसेच कोविड - १९ च्या कालावधीत आमदार अॅड. राहुल कुल यांनी पुढाकार घेऊन सुमारे २०० व्हेंटीलेटर बेड व १०० बेडचा विलगीकरण कक्ष असे ३०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर चौफुला परिसरात सुरु केले होते. त्यामध्ये सुमारे ३५०० हून कोविडबाधित गोरगरीब रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आम

#Chiplun शेखर निकम यांच्यासारखा आदर्श आमदार लाभणे आमचं भाग्य - चिपळूण तालुका मुस्लिम समाज

Image
सभागृहासाठी सव्वा कोटींचा निधी दिल्याबद्दल सावर्डेत जाऊन सत्कार महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव जो शब्द दिला तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे हीच आमदार शेखर निकम यांची ओळख आहे. त्यामुळे असा आदर्श आमदार आमच्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाला लाभला हे आमचं भाग्य आहे. सरांनी चिपळूण तालूक्यातील मुस्लिम समाजावर  भरभरून प्रेम केलं आणि पावलोपावली सहकार्यही केल.  आता समाजाच्या सभागृहाला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून खास बाब म्हणून तब्बल सव्वा कोटा निधी मिळवला. राज्यात एकाच कामाला एव्हढा निधी मिळवणे हे सोपं नाही. सर यापुढे आपल्याला मंत्री म्हणून पाहायचं आहे. त्यासाठी पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहू अशी ग्वाही चिपळूण तालुका मुस्लिम समाज पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आमदार निकम यांना दिली. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील सर्वागिण विकासासाठी वारेमाप निधी आणण्याचा उच्चांक करणाया आमदार निकम यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चिपळूण तालूका मुस्लिम समाजाकडून अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती करण्यात येत असून त्यासाठी बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीसाठी मोठ्या निधीची आवश

#Malshiras तहसीलदार शेजुळ यांचा वाढदिवस माळशिरस येथे विविध उपक्रमांनी साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार, श्री.सुरेश विठ्ठलराव शेजुळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, संकल्प बहुउद्देशीय संस्था, गुरसाळे व वेध महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने, विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा होत आहे. आज दि.१३ सप्टेंबर रोजी माळशिरस- सिद्धार्थनगर येथे, विविध वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी,संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार,कोळेकर यांच्या हस्ते    वृक्षारोपण करण्यात आली. यावेळी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-विलास एकनाथ भोसले, अजित पवार (सर),मारुती भांगरे (सर), ॲड. नितीन भोसले, अकलूज येथील तुकाराम साळुंखे-पाटील, सुनील ओवाळ,दीपक कांबळे, सुमित धाईंजे,सोमनाथ अशोक धाईंजे,रोहन धाईंजे, सोमा धाईंजे,सूरज कांबळे,आनंद कांबळे,आश्रफ मुल्ला,आतिश कांबळे,राम धाईंजे आदी उपस्थित होते. यावेळी आंबा, जांभूळ,चिंच, आदी, फळझाडांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याची शपथ स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली व तहसीलदार, श्री.सुरेश शेजुळ साहेबांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त केल्या.

#Yavat कानगाव येथे विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या वतीने दप्तर वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप शिवसेना (शिंदे गट)दौंड विधानसभेच्या वतीने कानगाव येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत दप्तर वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेने घेतलेल्या या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयसिंह चव्हाण, विधानसभा समन्वयक नवनाथ जगताप, विधानसभा क्षेत्रप्रमुख हनुमंत निगडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख राहुल फडके, उप तालुकाप्रमुख दिलीप भागवत, शिवसेना शाखाप्रमुख चेतन पासलकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यासह कानगावचे माजी सरपंच संपत तुकाराम फडके, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, संचालक आप्पासाहेब कोऱ्हाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कोऱ्हाळे आणि उपाध्यक्ष योगेश चौधरी यांचीही या कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक श्यामराव जगताप यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्

#Chiplun मुस्लिम समाज यांचेमार्फत बांधण्यात येणाऱ्या सभागृहाला संरक्षक भिंत बांधणेसाठी रु. १ कोटी २५ लक्ष इतका निधी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत उपलब्ध

Image
काम करत राहू,काम करतच राहणार- आ. शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण तालुका मुस्लिम समाजामार्फत बांधण्यात येणाऱ्या सभागृहास संरक्षक भिंत बांधणेस लेखाशीर्ष २५१५ मधून निधी उपलब्ध व्हावा असे मुस्लिमबांधवांमार्फत आमदार शेखर निकम यांना निवेदन प्राप्त झाले होते कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी क्षणाचा विलंब न लावता आपलं कामास १००% निधी प्राप्त करून देऊ अशा शब्द दिला. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण येथील मुस्लिम समाज यांचेमार्फत बांधण्यात येणाऱ्या सभागृहाला संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असून त्यासाठी रु. १ कोटी २५ लक्ष इतका निधी लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात यावा असे मा. उप-मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब यांना तो प्राप्त व्हावा यासाठी पत्र देत पाठपुरावा करत सदर निधी मंजूर करून आणला. हा निधी मंजूर करून आणत सर्व समाजाला सोबत घेत मतदार संघाचा विकास आपण करतो हे सिद्ध केले तसेच त्याच पद्धतीने विकासासाठी आमदार शेखर निकम पायाला भिंगरी बांधून झटत आहेत. आपल्याला सर्व अगड - पगड जाती-धर्माला साथीला घेऊन मतदार संघाचा विकास करायवायचा आहे अन

#Natepute नातेपुते नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी अतुल पाटील यांची बिनविरोध निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अतुल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सत्ताधारी गटात अंतर्गत ठरल्याप्रमाणे अडीच वर्षानंतर म्हणजे ३०आॕगस्ट रोजी मालोजीराजे देशमुख यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.नगराध्यक्षा अनिता लांडगे यांनी सुचक म्हणून उपनगराध्यक्ष या पदासाठी अतुल पाटील यांचे नाव सुचवले त्यास अनुमोदन मा.उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमूख यांनी दिले. अतुल पाटील यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.एकच उमेदवारी अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी बार्शी नगरपरिषदचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी अतुल पाटील यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून निवड केली. यावेळी नगराध्यक्षा अनिता लांडगे,माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, उपसभापती मामासाहेब पांढरे ,ज्येष्ठ नगरसेवक बी वाय राऊत ,माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील जिल्हा नियोजन सदस्य सतिश सपकाळ ,आप्पासाहेब भांड, अतुल बावकर, नगरसेवक अण्णा पांढरे,रणजित पांढरे,अविनाश दोशी,दादासाहेब उराडे,रावसाहेब पांढरे,दिपक काळे,सुरेंद्र सोरटे,माजी नगर

#Baramati चंदुकाका सराफ बारामती यांच्या गणरायाचे पर्यावरण पूरक विसर्जन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - बारामती चे सुप्रसिद्ध असणारी चंदुकाका सुवर्ण पिढी यांनी आपल्या शॉप मध्ये बसविलेला गणेश मुर्ती यांची वारकरी संप्रदाय व पर्यावरण पूरक विसर्जन केल्यामुळे एक सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे यावेळी प्रमुख उपस्थिती  चंदुकाका सराफ चेअरमन श्री किशोरकुमार शहा सर, ब्रांच मॅनेजर रोहित आवदे, ऑपरेशन मॅनेजर शुक्लेश्वर जगताप, कुलदीप जगताप HR सर व मार्केटिंग टीम, व काही सहकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम नियोजन व पार पडला व तसेच बारामती माजी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाले यांचे पूर्ण नियोजन बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले तसेच शहर समन्वयक स्वप्निल जावळे तसेच महिला व बालकल्याण विभाग प्रमुख संतोष तोडकर सर यांचेही मार्गदर्शन मिळाले व आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे अजय लालबिगे व सफाई कर्मचारी वर्ग यांचा चंदुकाका सराफ यांच्या वतीने शाल व रोप देऊन सन्मान करून कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी मार्केटिंग विभाग प्रमुख अमोल पात्रे, कुमार राठोड,सेल्स हेड दिपक वाबळे, रोहित आवदे, शुक्लेश्वर जगताप

#Chiplun तेऱ्ये बुरंबी सुतारवाडीतील ग्रामस्थांनी घेतली आमदार शेखर सर यांची भेट

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम यांची जनसंपर्क कार्यालय,सावर्डे येथे तेऱ्ये बुरंबी सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी भेट घेतली.           भेटी प्रसंगी वाडीतील समस्या ग्रामस्थांनी आमदार महोदय यांच्या कानावर घातल्या व त्या पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी दिले. आमदार श्री.शेखर सर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आपला विकास शेखर सरांच्या माध्यमातूनच होऊ शकतो असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला.            सुतारवाडी ग्रामस्थांना एकत्रित करण्यासाठी विशेष मेहनत V.J.NT सेलचे तालुका उपाध्यक्ष श्री.अजय साबळे यांनी घेऊन यांच्याच सहकार्याने आमदार महोदयांची भेट घेण्यात आली. या प्रसंगी संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर,V.J.NT सेलचे तालुका उपाध्यक्ष अजय साबले,विनायक सुतार,ऋषिकेश सुतार,विशाल सुतार,प्रशांत सुतार,यशवंत कानसरे,विजय घवाळी,सदानंद सुतार,दीपक भूरवणे,सुनील बडद,दत्ताराम मिस्त्री,विष्णू मिस्त्री,प्रभाकर सुतार,नवनाथ कानसरे,चंद्रकांत सुतार,योगेश क

#Natepute जनजागृती चळवळ राबवणे गरजेचे - राजकुमार हिवरकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - राज्याचे शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब यांना शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांनी निर्भया पथक पोस्को कायदा जाणीव जागृती प्रतिबंधात्मक योजना व्यसनमुक्ती अमली पदार्थ चे दुष्परिणाम रस्ता सुरक्षितता व वाहतुकीचे नियम याबाबतचे  मागणी पत्र रामटेक या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीत दिले. सोलापूर जिल्ह्यात तसेच माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील माध्यमिक प्राथमिक ज्युनिअर कॉलेज यामध्ये सर्व मुख्याध्यापकांची वरील विषयांसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे आहे याबाबतचे निवेदन मी शिवसेनेच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय स्वतः आपण व आरोग्यमंत्री सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख ग्रामीण डीवायएसपी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी तालुक्याचे शिक्षणाधिकारी यांना५/४/२०२४रोजी दिलेली आहे  बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल तर जिल्हा तालुका सह प्रत्येक शाळेवर समित्या स्थापन करणे गरजेचे आहे मुलींना गुड टच बॅड टच याची माहिती देणे हा कार्यक्रम कागदपत्रे न राहता तो सामाजिक उपक्रम म्हणून पुढे

#Akluj छ. शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावेत - डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील

Image
मराठा सेवा संघाचा मराठा भूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न महादरबार न्यूज नेटवर्क - छ. शिवाजी महाराज यांनी जिवनात महिलांना माता व भगिनीचे स्थान दिले.त्यांचे कार्यकर्तुत्व नव्या पिढीला ज्ञात होणे गरजेचे असुन त्यांच्या चारीत्र्याची आजच्या पिढीला माहिती दिल्यास महिलांवरील लैंगिक अत्याचार घडणार नाहीत असे विचार मराठा भुषण पुरस्कार प्राप्त डॉ स्वंयप्रभादेवी‌ मोहिते पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. माळशिरस तालुका मराठा सेवा संघाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा मराठा भुषण पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले.डाॅ.स्वंयप्रभादेवी मोहिते पाटील (सामाजिक),डॉ राजीव राणे(वैद्यकीय),ॲड प्रकाशराव पाटील(विधी),मल्ल सम्राट पै.रावसाहेब मगर(क्रिडा), प्रा.उत्तम साव़ंत(शिक्षण),संजय पवार( प्रसिद्धी माध्यम), अजित पराडे(कृषी)यांच्यासह नवनिर्वाचित सांसद धैर्यशील मोहिते पाटील व राज्य शासन शाहिरी पुरस्कार प्राप्त शाहिर राजेंद्र कांबळे यांना सन्मान चिन्ह,फेट,शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी अकलुज

#Chiplun आ.शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कासारकोळवण येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये(अजितदादा गट)जाहीर प्रवेश

Image
कासारकोळवण गावच्या विकासासाठी आपण सदैव कटीबध्द- आ. शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण येथील मुंबईकर प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार श्री.शेखरजी निकम सर यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षामध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला आहे.सावर्डे येथील आमदार श्री.शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्ष प्रवेशासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष संतोष करंबेळे,सचिव राजाराम रावणंग,उपसरपंच प्रकाश तोरस्कर,सेवानिवृत्त शिक्षक राजाराम तोरस्कर,वाडी गावकर सुर्यकांत करंबेळे,ग्रा.पं.सदस्या श्रध्दा करंबेळे आदींनी पुढाकार घेतला तर पक्षप्रवेश कर्त्यांमध्ये मुंबई मंडळाचे अध्यक्ष संतोष करंबेळे,सिताराम करंबेळे,चंद्रकांत गणू करंबेळे,आदिनाथ करंबेळे,वाडी गावकर सुर्यकांत करंबेळे,ओंकार करंबेळे,शंकर भोसले,विलास भोसले,राजाराम रावणंग,राजाराम करंबेळे,निलेश करंबेळे,संजय करंबेळे,आत्माराम करंबेळे,राकेश राजाराम तोरस्कर,चंद्रकांत तुकाराम करंब

#Solapur अटल भूजल ग्राम समृध्द स्पर्धेत माढा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार

Image
भेंड, लोंढेवाडी आणि सोळंकरवाडी ग्रामपंचायतींना पुरस्कार प्राप्त सोलापूर दि.10 (जिमाका):- राज्यस्तरीय अटल भूजल ग्राम समृध्द स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. अटल भूजल ग्राम समृध्द स्पर्धेत सन-2022-23  या वर्षासाठी जिल्हास्तरीय गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भेंड ता . माढा, व्दितीय क्रमांक पुरस्कार लोंढेवाडी ता. माढा, आणि तृतीय क्रमांक पुरस्कार सोळंकरवाडी   ता. माढा  या ग्रामपंचायतींना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे  अध्यक्ष पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील  आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री  दादा भुसे  यांच्या हस्ते पार पाडले .  या सोहळ्यात जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार 50 लाख रूपये, व्दितीय पुरस्कार 30 लाख रूपये आणि तृतीय पुरस्कार  20 लाख रूपये रोख रक्कम ,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह स्वरूपात देण्यात आले. या सोहळ्यात  खासदार भास्कर भगरे  , पाणी पुरवठा स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव  संजय खंदारे ,  भूजल सर्वेक्षण आणि  विकास यंत्रणेचे  आयुक्त पवनीत कौर,  अतिरिक्त संचालक डॉ. विजय पाखमोडे  ,सहसंचाल

#Pune आळंदी ग्रामीण रुग्णालयात बीसीजी लशीकरणास सुरुवात

Image
टीबी मुक्त भारत साठी आरोग्य प्रशासन सज्ज  महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप आळंदी ग्रामीण रुग्णालयात बीसीजी लशीकरणास माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील यांचे हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. टीबी मुक्त भारत साठी प्रत्येक्ष १८+ बीसीजी लसीकरण अभियान राबवून टीबी मुक्त भारत व्हावा यासाठी Adult बीसीजी लसीकरण करण्यास मंगळवारी ( दि. १० ) लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले. या प्रसंगी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, गोविंद ठाकूर तौर, अर्जुन मेदनकर, रवींद्र जाधव, गोविंद महाराज गोरे, विलास वाघमारे आदीसह लाभार्थी उपस्थित होते. लशीकरण मोहीम पुढील काही महिने सुरु रहाणार असून पहिल्या दिवशी ६० लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली. ज्यांचे वय १८ वर्षांवरील आहे. अशा लाभार्थ्याना लस घेण्याचे आवाहन डॉ. उर्मिला शिंदे यांनी केले आहे. याशिवाय पूर्वीच्या टीबी बरे झालेल्या रुग्णांनी,  टीबी रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीं, ६० + वय

#Malshiras पिलीव येथे शिवनेरी दहिहंडी चा बिग बजेट कार्यक्रम संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील शिवनेरी दहिहंडी हा फेस्टिवल माळशिरस तालुक्यातील मानाची दहिहंडी फेस्टिवल म्हणून याचा उल्लेख केला जातो.गेली ५ वर्षा पासून हि परंपरा अखंडित पणे शिवराज पुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे सामाजिक भान ठेवून अबाल वृद्ध सर्व परीवाराने एकत्र बसुन बघता यावा असा हा बिग बजेट कार्यक्रम अशी या शिवनेरी दहिहंडी कार्यक्रमाची ओळख निर्माण झाली आहे. पुणे, मुंबई, बारामती याठिकाणी मोठे मोठे दहिहंडी चे कार्यक्रम होत असतात आज माळशिरस तालुक्यात सुद्धा अशाच पद्धतीचे कार्यक्रमाचे  आयोजन माळशिरस तालुक्यातील नेत्यांनी करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याच माता, भगिनी,अबाल वृद्ध शहरी भागात जे मनोरंजन होते त्याच मनोरंजनाची अनुभुती ग्रामीण भागात घेतील आणि हाच या फेस्टिव्हलचा उद्देश आहे असे शिवराज पुकळे यांनी बोलताना सांगितले.या कार्यक्रमाचे  महिलांच्या हस्ते पुजन करुन महिलांना सन्मान देण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमामध्ये घुंगराच्या तालावर थिरकण्यासाठी महाराष्ट्राची लोककला लावण्या घेण्यात आल्या.तसेच महिलांच्या आवडीच्या विविध सिरीयल फेम कार

#Pune वारकरी संप्रदायातील संतांचे अधिष्ठान प्रभावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
वारकरी संप्रदाय, संत परंपरा, मराठी संस्कृतीचे वैभव महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप वारकरी संप्रदायातील संतांचे अधिष्ठान आणि योगदान हे राजकीय अधिष्ठाना पेक्षा खूप मोठे आणि प्रभावी आहे...महाराष्ट्र ही संत भूमी आहे... येथे संत परंपरा लाभली आहे... आपण संतांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. महाराष्ट्रातील संत परंपरेला दंडवत, वारकरी संप्रदाय व संत परंपरा ही या महाराष्ट्राचे मराठी संस्कृतीचे वैभव आहे... ते जतन करून वाढविण्याची गरज आहे... ते कार्य वारकरी संप्रदायाचे माध्यमातून आपण करत आहात त्यामुळे वारकरी संप्रदायाचे मनापासून अभिनंदन करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत कोयना विभाग वारकरी मंडळाचे वतीने वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांतिब्रह्म मारूती महाराज कुरेकर यांच्या ९३ व्या तसेच रामायणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूरकर यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन आणि वारकरी संत पूजन सोहळ्यात मारुती महाराज कुरेकर यांना शांतीब्रम्ह आणि रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प

#Chiplun रंजिता चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित तालुकास्तरीय घरगुती गौराई व गणपती सजावट स्पर्धा २०२४

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  मंगलमयी गणेश उत्सवातला आनंद द्विगुणित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील सामाजिक क्षेत्रात आघाडीवर राहून विविध उपक्रम राबविणाऱ्या रंजिता चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने चिपळूण तालुकास्तरीय घरगुती गौराई गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे भाविकांनी ९६२३११०८२० या व्हाट्सअप क्रमांकावर ज्या घरी गणपती किंवा गौरी गणपती असतील तसा स्पष्ट उल्लेख करीत आपलं नाव पत्ता व फोन नंबर पाठवावा परीक्षक स्पर्धकांच्या घरी फोन करून परीक्षण करण्यासाठी येतील. प्रथम क्रमांक चांदीची गणेश मूर्ती द्वितीय क्रमांक चांदीची लक्ष्मी मूर्ती तृतीय क्रमांक चांदीचे त्रिशूल सहा उत्तेजनार्थ चांदीचे मोदक गौराई सजावट व गणपती सजावट दोन्हीचे वेगवेगळे क्रमांक काढण्यात येतील प्रत्येक स्पर्धकास प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येईल स्पर्धेतील सहभाग नोंदणीसाठी शेवटची तारीख १०सप्टेंबर असून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्षा रंजिता ओतारी यांनी केले आहे.

#Yavat दौंड प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचा सन्मान

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप सुवर्णकन्या फाउंडेशन संस्था व दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद असल्याचे मत दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी व्यक्त केले. खामगाव ता.दौड येथे सुवर्णकन्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील विविध सेवाभावी संस्था प्रशासकीय क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सुवर्णकन्या फाउंडेशनच्या वतीने प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड तालुका यांना शिवस्वराज्य जीवनगौरव पुरस्कार देऊन आज दि. १ सप्टेंबर रोजी खामगाव येथील अमोल मंगल कार्यालय येथे दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाला सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडियाचे अध्यक्ष संदीप सोनवणे सचिव राहुल कुमार अवचट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान सुवर्णकन्या फाउंडेशनच्या माध्यमातून लष्करातील सेवानिवृत्त जवान यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. खामगाव परिसरातील शिक्षण आरोग्य प्रशासकीय सामाजिक महिला व बालविकास राजकीय सांप्रदायिक क्षेत्रात काम करत असलेल्

#Yavat अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्ष पदी मयुर गुजर यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर व जिल्हा कार्यकारिणी कार्यकारिणीची बैठक झाली या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दिलीपदादा जगताप,राष्ट्रीय चिटणीस श्री दशरथ पिसाळ व महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख श्री अनिल ताडगे, संस्थापक सदस्य श्री जगजीवन काळे यांच्या  प्रमुख उपस्थितीत  सर्व पदाधिकारी यांच्या एक मताने श्री मयुर  सोमनाथ गुजर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व नियुक्तीचे पत्र मा. दिलीपदादा जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे मा. अध्यक्ष श्री वैभव शिळीमकर, कार्याध्यक्ष श्री मंगेश साखरे, संपर्क प्रमुख राजेश केदारी व राजेंद्र पासलकर, उपाध्यक्ष श्री सुभाषराव ढमाले, उपाध्यक्ष श्री अभिजीत ताठे, पुणे शहर महिला अध्यक्षा सौ.आरतीताई मारणे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. ज्योतिताई कोंडे, जिल्हाध्यक्ष पुणे श्री. प्रशांत वांढेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष पुणे तुषार शेळके, जिल्हा सरचिटणीस दुष्यंतराजे जगताप व महासंघाचे अनेक सभासद,कार्यकर्ते उपस्थित होते.

#Chiplun नांदिवसे ग्रामपंचायत कार्यालय व विविध विकास कामे ग्रामस्थांच्या उपस्थितीत आ. शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

Image
सुंदर,सुसज्ज व सोईसुविधेने नटलेली ग्रामपंचायत म्हणजे गाव विकासाचा मजबुत पाया - आ. शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार शेखर निकम  यांच्या प्रयत्नातून नांदिवसे ग्रामपंचायत कार्यालय इमारत व विविध विकास कामे भूमीपुजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.        अनेक वर्ष ग्रामपंचायत इमारत सुसज्ज व मोठी व्हावी असे सर्वच ग्रामस्थांचे स्वप्न होते.ग्रामपंचायत चालवताना जागा कमी असल्याने कार्यालयीन कामे करणे खूप अडचणीचे ठरत होते.रस्त्यांची कामे होणे सुद्धा अत्यंत गरजेचे होते.ग्रामस्थांच्या या मागणीचा व अडचणी,गरज लक्षात घेता नूतन ग्रामपंचायत इमारत मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार श्शेखरजी निकम  यांचे आभार मानले यावेळी आमदार शेखर निकम यांनी मार्गदर्शन करताना आनंद व्यक्त केला व झालेल्या विकास कामे व मंजूर झालेल्या विकास कामाचा सविस्तर आढावा घेतला तसेच उर्वरीत विकास कामांची माहिती घेतली.यावेळी श्री.प्रकाश शिंदे यांनी सूत्रसंचालन करताना सांगितले कि या आ

#Chiplun चिखली दहागांव बौद्धजन विकास मंडळांचे पदाधिकारी सभासद व कार्यकर्ते यांचा आमदार शेखर निकम यांना बिनशर्त पाठींबा

Image
सर्व जाती धर्माच्या लोकांना साथीला घेत मतदार संघाचा कायापालट करणार - आ.शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  संगमेश्वर तालुक्यातील चिखली दहागांव बौद्धजन विकास मंडळाचे पदाधिकारी,सभासद व कार्यकर्ते (स्थानिक व मुंबई) यांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मुंबई येथे आमदार श्री.शेखर निकम सर यांची भेट घेऊन बिनशर्त पाठींबा जाहीर केला. आ.शेखर निकम  यांनी गेल्या दहा वर्षामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये तेढ निर्माण न करता सर्वाना एकत्रीत साथीला घेऊन सर्व जाती धर्मातील लोकांच्या अडी-अडचणी व मतदार संघातले प्रश्न लक्षात घेऊन त्याचा पाठपुरावा करत तसेच अधिवेशनामध्ये मांडत ते कसोशीने सोडवले आहेत.त्यांनी आतापर्यंत केलेला वाडी वस्त्यांतील नियोजनबद्ध विकास आणि कोणतीही अडचण लिलया सोडवली आहे.तसेच न भूतो न भविष्यती अशी चौदाशे कोटींपेक्षा जास्तीचा निधी मंजूर करत मतदार संघाचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठेऊन ते पुर्ण करण्याचे दृष्टीने कमालीचे प्रयत्नशील आहेत. सर्व सामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारा शांत संयमी नेता आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस प

#Yavat श्री. क्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरात वन उद्यानाचा विकास करण्यासाठी २ कोटींचा प्रस्ताव - आमदार राहुल कुल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पांडवकालीन श्री. क्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरातील वन उद्यानाचा विकास व्हावा म्हणून नुकतेच वनमंत्री मा. नामदार श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना दौड चे आमदार राहुल कुल यांनी  निवेदन दिले होते. त्याबाबत  वन विभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी साहेब यांना बैठक घेण्याचे आदेश पर्यटन मंत्री यांनी दिले होते. त्यानुसार दुरदृश्य प्रणालीद्वारे दि .२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.   सदर बैठकीत श्री. क्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वन जमिन असून या ठिकाणी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणवर भाविक भक्त येत असतात, श्रावण महिन्यात मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते. भाविक भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी वन उद्यानाचा विकास करण्यासाठी २ कोटींचा निधी मिळावा अशी मागणी केली. यावेळी प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी साहेब यांनी २ कोटींच्या कामाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीला मुख्य वन संरक्षक पुणे श्री. एन.आर. प्रवीण, उपवन संरक्षक पुणे श्री. महादेव म

#Natepute नातेपुते पोलीस स्टेशन कडून निर्भया पथकाविषयी शाळेमध्ये मार्गदर्शन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक २/९/२०२४  रोजी नातेपुते येथील शाळा, महाविद्यालय तसेच एसटी स्टँड परिसर येथे जाऊन निर्भया पथक मार्गदर्शन तसेच सूचनाबाबत फलक लावण्यात आले असून त्यावर संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे.  संदर्भान्वये मदतीकरिता कॉल प्राप्त होतात त्याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी सांगितले.

#Solapur सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - सर्वसामान्य माणसांचा आधार तर गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून समजले जाणारे वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे  आपल्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात कार्यतत्पर असणारे  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करून गुन्हेगारांचे मत परिवर्तन करून त्यांना एक चांगला माणूस म्हणून  समाजात ताठ मानेने जगता यावं म्हणून तसेच त्यांची मानसिकता बदलून जगण्याची   नवी  संधी नवी उमेद प्राप्त करून देऊन त्यांना गुन्हेगारी प्रवृत्ती पासून रोखण्या चा प्रयत्न करणारे सण उत्सव मिरवणुकीत सहभागी होऊन भाईचारा निर्माण करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून  आदर्श पोलीस ठाण्यासाठी नेहमीच  प्रयत्न करणारे आपल्या जबाबदारी सह सामाजिक बांधिलकी चे भान ठेवून जातीय सलोखा राखून आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नुकताच मंद्रूप  पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेले नूतन  सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यां

#Solapur नातेपुते येथील राहुल राजेंद्र काळे यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान

Image
                        महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते नगरीचे प्रगतशील बागायतदार  राहुल राजेंद्र काळे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन(आत्मा) सोलापूर यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , पुण्याचे आत्मा संचालक अशोक किरनळी पुणे, सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसने, सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी आत्मा मुकुंद मुकणे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. राहुल राजेंद्र काळे यांनी आतापर्यंत द्राक्ष पिकामध्ये पाऊस व गारापासून संरक्षण होण्यासाठी संरक्षित कागदाचा वापर व जमिनीलगत प्लास्टिक आच्छादनाचा वापर केला तसेच डाळिंब पिकामध्ये एक खोड या पद्धतीचा अभिनव प्रयोग करून विक्रमी उत्पादन घेतले तसेच यशस्वी प्रयोग एक खोड डाळिंब पद्धतीचा एक  घेण्यासारखा आहे तसेच शेतीमध्ये भौतिक पद्धत, सेंद्रिय निविष्ठाचा वापर,निंबोळी अर्क,दशपर्णी अर्क, सोलर ट्रॅप, फेरोमेट्रॅप,वारा प्रतिबंधक बेल्ट प्लास्टिक मल्चिंगचा व

#Mumbai आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शखाली भाजपा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी,कामोठे मंडल संपर्कप्रमुख नितीन कांदळगावकर ,  पनवेल विधानसभा विस्तारक सागर मोरे , जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, कामोठे मंडल सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, कामोठे मंडल सरचिटणीस विजय चिपळेकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना सध्या प्रगतीपथावर असून त्यांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत सामान्य माणसांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांना विशेष मोहिमा देण्यात आलेले आहेत याबाबत या बैठकीत आढावा आणि मार्गदर्शन करण्यात आले. भाजपाचे सामान्य माणसाबद्दलची असलेली चांगली आणि योग्य भूमिका शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वच पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन केले यावेळी  सन्मानीय नगरसेवक, सन्मानीय पदाधिकारी उपस्थित होते.

#Indapur इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजकुमार थोरात तर उपाध्यक्षपदी शहाजीराजे भोसले यांची निवड

Image
इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर महादरबार न्यूज नेटवर्क - मुंबई मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न इंदापूर तालुका पत्रकार संघाची द्वैवार्षिक निवडणूक १ सप्टेंबर २०२४ रोजी भरणेवाडी ग्राम सचिवालयात सकाळी ११ते दु. १२ यावेळेत बिनविरोध पार पडली. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एम.जी.शेलार ( दौंड ) व सह.निवडणूक निर्णय अधिकारी रवी पाटील ( शिरूर ) यांनी काम पाहिले. इंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नव-निर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नव निर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे - राजकुमार थोरात - अध्यक्ष शहाजीराजे भोसले - उपाध्यक्ष शत्रुघ्न ओमासे - उपाध्यक्ष गजानन टिंगरे - उपाध्यक्ष तात्यासाहेब घाटे - सचिव प्रदिप तरंगे - सहसचिव हरिदास वाघमोडे - खजिनदार महेश गडदे - सह.खजिनदार धनंजय थोरात - संघटक बाळासाहेब धवडे - संघटक संभाजी रणवरे - सह.संघटक संतोष भरणे - समन्वयक डॉ. विकास शहा - सल्लागार मान्यवरांचे व पत्रकारांचे आभ

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

Image
नातेपुते शहरात पंढरपुर — आळंदी रोडवरचा थरार महादरबार न्यूज नेटवर्क - राज्यात चालू महीला अत्याचार प्रकरणी नातेपुते पोलिस अलर्ट मोडवर असून आज पोलिसांनी शंकरराव मोहीते पाटील महाविद्यालय ,डाॅ.बा.ज.दाते प्रशाला,बसस्थानक परीसर, दहीगांव रोड परीसरात रोडरोमियोना चांगलाच चोप दिला. दाते प्रशालेचा समोर पोलिसगाडी आल्या बरोबर रोडरोमियोनी धूम ठोकली परंतू नातेपुते पोलिसस्टेशनचे सपोनी महारूद्र परजणे यांनी शहरातून जाणारा पंढरपूर. आंळदी रोडवर  पोलिस व रोडरोमियोचा पाठलाग करतानाचा थरार पहायला मिळाला. रस्तावर रोडरोमियो पूढे पोलिस मागे पाठमाग करत असतानाचा थरार नागरीकांनी अनूभवला यामूळे नागरीकानी पोलिसांचे कौतूक केले अशी मोहीम सतत राबवली पाहीजे तरच रोडरोमीयोना आळा बसेल अशी भावना अनेक नागरीकांनी व्यक्त केली. नातेपुते शहरात ग्रामीण भागातून मूल मूली शिकण्यासाठी यैत असतात,त्याना जाताना येताना,बसस्थानकावर रोडरोमियो सतत अनेक हावभाव करून सतत ञास देत असतात यांचा बदोबस्त नातेपुते पोलिसांनी केल्याने नातेपुते समाधान व्यक्त होत आहे यावेळी पोलिसांनी अनेक रोडरोमियोवर  प्रतिबंधक कारवाई केली आह

#Chiplun संगमेश्वर तालुक्यातील मुचरी पंचायत प.स. गणातील काटवली कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पक्ष प्रवेश

Image
आपणास दिलेले शब्द मी पुर्ण करण्यास कायम कठीबद्ध- आ. शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  सावर्डे येथील आ. शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन संगमेश्वर तालुक्यातील मुचरी प.स.गणतील काटवली पडयाळ वाडीतील माजी सरपंच भास्कर सुवरे ,ग्रा.प.सदस्य सुभाष पडयाळ,दिपक सुवरे,संकेत नाचरे,विजय सुवरे,निलेश पडयाळ,रूपेश गोमाणे,संजय पडयाळ विजय माचिवले यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्यावर प्रवेशकर्त्यांचे केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार शेखर निकम यांनी त्यांचे  जंगी स्वागत करण्यात आले. आमदार शेखर निकम यांचे  अगोदरपासून गावागावात विकास करण्याचे ध्येय होते आणि त्या सानिध्यातून त्याचे समाजकार्य चालूच होते, मात्र आमदार होण्याची संधी त्यांना जनतेच्या माध्यमातून मिळाली. जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आमदार झाल्यापासून त्यांनी प्रत्येक गावात नियोजनबद्ध असा विविध विकास कामाचा झपाटा लावला. त्यातून त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळीच भूरळ पाडली व जनतेमध्ये छाप पाडली.ग्रामिण भागातील विविध विकास कामे करत तसेच बरेचशे प्रलंबीत प