#Malshiras:आई,वडील आणि गुरू हेच खरे आपले हितचिंतक::मा.डॉ. दिलीप स्वामी
महादरबार न्यूज नेटवर्क - फेडू समाजाचे ऋण!कणभरी!! या म्हणण्यानुसार माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन माळशिरस तालुका प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका एप्रिल २२ मध्ये सुरू केली आहे आज या अभ्यासिकेत २५० विध्यार्थ्यांचे नोंदणी झाली आहे हळूहळू याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे व आपल्या तालुक्यातील मुलांनीही अधिकारी व्हावं हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन ही मिळणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी हे प्रतिष्ठान सतत प्रयत्न करीत आहे. आठवड्यातून एक दिवस एखाद्या अधिकाऱ्याचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. दिनांक 23 /09/2022 रोजी या प्रतिष्ठामार्फत अकलूज येथील स्मृतिभवन येथे तालुक्यातील 10वी,12वी, पदवी,शिक्षण घेत असलेले तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. सदर शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने अध्यक्ष डॉ दिलीप स्वामी (मुख्यकार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद सोलापूर), तसेच बसवराज शिवप