#Malshiras:माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते यांनी सामान्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनाला धरले धारेवर
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते हे जिल्हा नियोजन समीतीच्या बैठकीत आज अतिशय आक्रमक झाले यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलसाठी सिटी स्कॅन मशीन ही जिल्हा नियोजन समीतीच्या निधीतुन ताबडतोब खरेदी करावी.तसेच आरोग्य सुविधा दुर कराव्यात व कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी त्यांनी लावुन धरली.यामध्ये आ रामभाऊ सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी एकमेव शासकीय रुगणालय म्हणून सिव्हिल हॉस्पिटल आहे मात्र याठिकाणी सिटी स्कॅन मशीन नाही ती अनेक वर्षापासून बंद आहे याठिकाणी जिल्हाभरातुन शेकडो रुग्ण दररोज येतात मात्र सिटी स्कॅन मशीन नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना ना ईलाजाने बाहेर उपचार करावे लागतात आर्थीक परिस्थिती नसतानाही रुगणांची एक प्रकारे पिळवणूकच होत आहे यामुळे सिव्हिल हॉस्पिटल साठी आरोग्य विभागकाडुन सिटी स्कॅन मशीन मिळत नसेल तर ती मशीन जिल्हा नियोजन समीतीच्या निधीतुन खरेदी करावी अशी आक्रमक भुमिका माळशिरसचे आ रामभाऊ सातपुते यांनी सोलापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच