Posts

Showing posts from October, 2023

#Yavat:झेंडूच्या फुलांचे आवक जास्त असल्यामुळे दर कोसळले

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर विजय दशमी दशमी म्हणजे दसरा संपूर्ण महाराष्ट्रात  साजरा केला जातो नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विजयादशमीच्या  सण येतो त्या दिवसालादसरा म्हणतात. या दिवशी लोक म्हणून नवनवीन वाहन खरेदी करतात साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त असल्याने त्या सणाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे  सणाला झेंडूच्या फुलाची खूप महत्व आहे दौंड तालुक्यातील यवत येथे झेंडूचे बाजारपेठ मोठी भरली जाते . पुण्याला सुद्धा  येथून सर्व प्रकारचे फुले जात असतात  झेंडू ची लागवड येथील शेतकरी करतात दिवशी विजयादशमी दिवशी झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व असते झेंड पुणे येथील मार्केटला यवत भागातून सोलापूर नगर बारामती जवळपासचे बरेच व्यापारी झेंडू घेऊन जात असतात पुणे मार्केटला विदर्भातून मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची आवक होत आहे झेंडूच्या फुलाच्या आवक दोन-तीन दिवसापासूनच पुण्याच्या मार्केट यार्डला सुरू आहे दिनांक २२ , २३ ला या यवत व यवत परिसरतील झेंडूचे आवक पुण्याला होते. शेतकऱ्यांनी फुले साठवून ठेवून नंतर एकदम तोडल्यामुळे बाजार खूपच कमी होत गेले दोन दिवसापूर्वी झेंडूचा फुलाचा बाजा

#Natepute:विभाग व राज्यस्तरावर दाते प्रशालेचा दबदबा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते येथील डाॅ.बा.ज.दाते.प्रशालेतील  बाॅक्सींग,वूशु,मैदानी हर्डर्स,जूदो या स्पर्धा प्रकारात २१विद्यार्थाची निवड विभागीय स्तरावर झाल्याने जिल्हा स्तरावर दाते प्रशालेचा दबदबा निर्माण झाला आहे. या स्पर्धैत बाॅक्सीगमध्ये साईराज ननवरे,कौशल्य जगदाळे,श्री पलंगे,सिध्दार्थ बनसोडे,शंभुराजे चांगण,गणेश महानूवर,वेदांत काळे,यश ठोंबरे,रोहन दडस, सलोनी ठोंबरे,प्रणिती  झेंडे,प्रणव वावरे,सृष्टी महारनवर.यांची विभागस्तरावर निवड झाली आहे (वूशू) या क्रिडा प्रकारात साईराज ननवरे,कौशल्य जगदाळे,शूभम खूडे,भूमी काळे,रूतूजा पांढरे यांची विभागस्तरावर निवड झाली आहे. (जूदो) या स्पर्धेत रोहन दडस,भूमी काळे यांची विभागस्तरावर निवड झाली आहे. तर मैदानी हर्डल्स १००मि.या क्रिडा प्रकारात आदित्य माने यांची विभागस्तरावर निवड झाली आहे. या  विध्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक राजेंद्र काळे,सतिश राऊत,अमोल पिसे,रितू पिसे,यानी मार्गदर्शन केले. या विद्यार्थाचे नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमूख,व्हा.चेअरमन संतोष काळे,सेक्रेटरी महेश शेटे, मूख्याध्यापक

#Yavat:गोरक्षकांचा यवत पोलीस ठाण्यावर मोर्चा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये गोरक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ गोरक्षकांनी यवत पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.यावेळी विविध मागण्याचे निवेदन यवत पोलीस पोलिसांना विश्व हिंदू परिषदेच्यावतीने देण्यात आले. यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी  गोरक्षकांना हीनपणाची वागणूक देत आहेत, गोरक्षकांवर गुन्हे दाखल करतात, कसायांवर गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होत नाहीत असे मत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. गोरक्षकांवर झालेले खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी गोरक्षकांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारा विरोधात घोषणाबाजी केली. अखिल भारत कृषी गो सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा संस्थापक पंडीत दादा मोडक व विश्व हिंदू परिषद चे जिल्हा अध्यक्ष गणेश आखाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

#Yavat:नवरात्र उत्सवामुळे यवतमधील वातावरण भक्तीमय झाले

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथील नवरात्र उत्सवची सुरवात अश्विन शुद्ध १ला झाली त्याच दिवशी दि १५ ला घटस्थापनाला झाली. त्या दिवसापासून यवत येथील वातावरण भक्तीमय मंगलमय झालेले आहे. यवत येथील महालक्ष्मीमाता मंदिर सर्व जुने आहे नवसाला पावणारी देवी म्हणून तिचं नाव लौकिक आहे बऱ्याच दूरवरून लोक महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी यवत येथे येतात पुणे ,मुंबई, कोकण   सोलापूर नगर जिल्ह्यातील भाविक ,दर्शनासाठी येत असतात. महालक्ष्मी मंदिरात घटस्थापने नंतर पंचमीला देवीची गावातून मिरवणूक होते यवत चे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदीरात नवरात्र उत्सवा दरम्यान आकर्षक  विद्युत रोषणाई, फुलांनी मंदीर  सजविले जाते. महालक्ष्मी नगर मध्ये महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे तेथेही आकर्षक विद्युत रोषनाई केली जाते. श्री तूकाई देवी तिथे नवरात्र उत्सव  साजरा करतात आसरा मित्र मंडळातर्फे नवरात्र उत्सव साजरा करतात  यवत येथील श्री काळुबाई माता मंदिर येथे सुद्धा  नवरात्र साजरी केले जाते. यवत येथील तुळजाभवानी  मंदिर यवत येथील गावातच आहे तुळजाभवानीचे मंदिर जवळपास कुठे नसल्याने भाविक येथे दर्श

#Natepute:मनोज जरांगे यांचे नातेपुते येथे स्वागत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करताना मनोज जरांगे पाटील नातेपुते येथे आले त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतेषबाजी व हलग्याच्या कडकडाटाने अवघा प परीसर दणाणून गेला.प्रारंभी छञपती शिवाजी महाराज यांच्या पूतळ्यास मनोज जरांगे   यांनि पूप्षहार   घातला.नातेपुते येथील लोकशाहिर आण्णाभाऊ साठे चौकात मराठा समाज  प्रचंड सख्येने स्वागतासाठी जमला होता. या प्रसंगी नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमुख,माजी सरपंच अमर‌शिल देशमुख, दहीगांवचे माजी  सरपंच रणधीर पाटील, शिवप्रसादचे चेअरमन शरद मोरे ,अॅड शिवाजीराव पिसाळ,राजाभाऊ देशमूख,धनाजी देशमूख,रणविर देशमूख,उत्तम सावंत,विजय पिसाळ, सूशांत पाटील,बाळासाहेब कदम,विनायक सूर्वे,प्रणव थोरात, विश्वजित पिसाळ, सोमनाथ निकम, हनुमंत साळूखे, केदार जग‌ताप, सत्यजित सावंत , सागर सुरवसे, सतीश निकम, , अभय देशमुख, , सुनिल देशमुख, अप्पा देशमुख, सागर कोरटकर,, अमित देशमुख, तूषार निकम्, जयदीप पवार अनिल पवार, अनिल जाधव,आकाश सांळूखे इ.उपस्थित होते.

#Malshiras:माळशिरस तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशमुखवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

Image
सरपंच व सदस्य पदासाठी शेकडो अर्ज दाखल महादरबार न्यूज नेटवर्क - आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देशमुखवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी केवळ एकच अर्ज आल्याने व नऊ सदस्याच्या जागेसाठी नऊच अर्ज आल्याने या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध हे स्पष्ट झाले असून केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे. सरपंच पदासाठी प्रतिमा अविनाश देशमुख यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची सुरपंच पदासाठी बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट झाले आहे .तर बिनविरोध निवड होणारे उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक विक्रम विष्णु भगत, प्रियंका भाऊसाहेब भोसले शुभांगी अजित महारनवर प्रभाग क्रमांक दोन रुपाली महेश जगदाळे आनंदराव हरीबा देशमुख, जयश्री दिपक धुमाळ,प्रभाग क्रमांक तीन ज्ञानेश्वर विठ्ठल जगदाळे,अस्मिता योगेश भगत,मनिषा सतिष जगदाळे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एस पी रणदिवे यांनी तर सहाय्यक म्हणून आर टी पवार यांनी काम पाहीले. माळशिरस तालुक्यातील 10 ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सरपंचपदासाठी  38 तर सदस्य पदासाठी ४०० अर्ज दाखल माळीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी2 ,सदस्यासाठी 44,लवंग ग्रामपं

#Varvand:दौंड ला कुरकुंभ फिडरच्या दाब वाहिनीचे भुमीगत कामांचे भूमिपूजन

Image
        महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर दौंड विद्युत उपकेंद्रतून निघणाऱ्या २२ केव्हीए क्षमतेच्या वाहीणीचा पोकार लाकूड वखार ते दौंड पोलीस स्टेशन व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उद्यान समोरील कुरकुंभ फिडरच्या उच्चदाब वाहिनीचे भुमीगत करण्याच्या कामांचे भूमिपूजन  आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते करण्यात आले.   यामुळे दौंड व्यापारी पेठेतील व शहर परिसरातील वाहिनी तुटून वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे तसेच पथदिवे बसविण्याचे काम देखील होणार आहे. सदर कामाकरीता एकूण खर्च २ कोटी २४ लाख अपेक्षित असून, त्यापैकी १ कोटी ९२ लाख रूपये महावितरणच्या देखभाल दुरुस्ती योजनेमधून तर उर्वरित ३२ लाख रूपये जिल्हा नियोजन समिती कडून  उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर कामाच्या भूमिपूजन प्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री. प्रेमसुखजी कटारिया, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. संदिप दरवडे, उपकार्यकारी अभियंता श्री. विक्रम चव्हाण, दौंड शहर अभियंता श्री. बशीर देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. हरिभाऊ ठोंबरे, माजी नगरसेवक श्री. बबलू कांबळे, श्री. शहनवाज पठाण, श्री. अमोल काळे,

#Chiplun:माचाळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आहाराचे साहित्य वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव कोचरी ता.लांजा येथील सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल कोचरीच्या माचाळमधील विद्यार्थ्यांच्या आहाराचे साहित्य वाटप केले. तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के, सरपंच पूजा कांबळे, हरेष जाधव, विकास सोसायटीचे अध्यक्ष शैलेश घाग, सामाजिक कार्यकर्ते वसंत बेंद्रे, लवू धावडे, संभाजी बाईंग, मनोज बाईंग, उपसरपंच किरण दाभोळकर, माजी सरपंच प्रदीप घाग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताराम बेंद्रे, शाहनवाज सारंग, संदेश कांबळे, मुख्याध्यापक बिजम सर तसेच इतर मान्यवर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

#Natepute:शिवसेनेच्या वतीने दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नातेपुते येथे चनाडाळीचे वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि नाफेडतर्फे साठ रुपये किलो दराने नागरिकांसाठी दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारत डाळच्या नावाने चणाडाळ विक्री माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कार्यसम्राट आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत , तसेच सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या नेतृत्वात माळशिरस तालुक्यातील तमाम जनतेस आज दिनांक १७/१०/२०२३ रोजी भारत सरकार ग्राहक व्यवहार विभाग आणि  नाफेडतर्फे 60 रुपये  किलो या दराने चणाडाळ विक्री करण्यात आली. यावेळी उद्घाटन प्रसंगी नातेपुते नगरीचे रावसाहेब पांढरे होते. राजकुमार हिवरकर पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यासाठी नातेपुते नगरीमध्ये नऊ टन चना डाळ विक्री करण्यात येणार आहे.  त्यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ श

#Yavat:आदर्शवत विवाह सोहळा शेलार व सोनवणे कुटुंबाचा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप विवाह प्रसंगी महागड्या वस्तू आणी भांडी मुलीस भेट देण्याऐवजी दोन्ही कुटुंबाचे आदर्श असलेले थोर सामाजिक समाज सुधारक यांची पुस्तके  आणी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व प्रतिमा भेट दिल्या. आदर्शवत उदाहरण असल्याचे मत दौंडच्या माजी आमदार रंजना कुल यांनी वधूवरास शुभेच्छा देताना व्यक्त केले आहे. जेष्ठ पत्रकार एम. जी. शेलार यांचा नातू पृथ्वीराज आणी जितेंद्र सोनवणे यांची कन्या साक्षी यांचा विवाह सोहळा यवत येथे पार पडला. विशेष बाब यावेळी मुलीस उंची फर्निचर, कपाटे, फ्रीज, भांडी ऐवजी थोर सामाजिक समाज सुधारकांची चरित्र, भगवान बुद्ध यांचे विषयी पुस्तके, शाहू, फुले, आंबेडकर याचेवरिक  सर्व चरित्र आणी वांगमय, भगवान बुद्ध आणी आंबेडकर यांचे धातूचे अर्ध पुतळे भेट देण्यात आले. उपस्थित लोकांना हे पाहिल्यावर पुस्तक प्रदर्शन वाटले, परंतु झाली ऐवजी पुस्तके, प्रतिमा आणी पुतळे भेट दिल्याचे पाहून उपस्थितनी प्रशसा केली. कुल पुढे म्हणाल्या, एम. जी. दीर्घाकाल सरळ मार्गी आणी चांगली पत्रकारिता करीत आहेत, सोनवणे हेही चळवळीतील कार्यक्रयते आहेत. त्यांचा हा

#Yavat:लोकसहभागातून रोटी येथे ४० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाणी पोहोचले

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनेअंतर्गत दौंड तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या रोटी ता. दौंड येथे वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावाच्या पोटचारीतून  ४० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाणी पोहोचले, यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून १ किलोमीटर लांबीच्या या पोटचारीच्या दुरुस्तीसाठी काम हाती घेण्यात आले व ३-४ महिन्यांच्या कालावधी नंतर हे काम पूर्ण झाले. रोटी गाव तलावात हे पाणी पोहोचले व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आमदार राहुल कुल यांच्या हस्ते जल पूजनाचा कार्यक्रम पार पडला. रोटी हे जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील दौंड तालुक्यातील शेवटचे गाव या ठिकाणी पाणी पोहोचविण्यास अनेक अडचणीं येत होत्या परंतु रोटी गावातील तरुणांनी श्रमदान व लोकसहभागातुन जलसंधारणाची चळवळ उभी करून गावाचा कायम दुष्काळी शिक्का पुसण्याचा निर्धार केला याआधी हिंगणी गाडा शाखा अंतर्गत सुमारे ९ किमी लांबीच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम करून जनाई शिरसाई उपसा सिंचन योजेनचे पाणी मौजे रोटी येथे आणण्यात त्यांना यश आले होते याकामी पाटबंधारे विभागाशी पाठपुरावा, समन्वय करून आव

#Yavat:म्हशीला आठ पाय, दोन शेपुट असे दोन पारडे एकमेकांना चिकटलेले व्यंग असे पारडू

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील टेळेवाडी येथील शेतकरी आप्पासाहेब आबासाहेब थोरात यांच्या म्हशीला आठ पाय, दोन  शेपुट असे दोन पारडे एकमेकांना  चिकटलेले व्यंग पारडू झाले असून या म्हशीची प्रसूती डॉ.बबनराव तेजनकर (निवृत्त पशुधन विकास अधिकारी )यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष किसन बडेकर( पशुधन पर्यवेक्षक) तसेच डॉ. शांताराम अंकुश वाघमोडे (पशुधन पर्यवेक्षक) यांनी खूप मेहनत घेऊन अतिशय क्लिष्ट व किचकट असणारी प्रसूती व्यवस्थितपणे पार पाडली या प्रसूती नंतर म्हशीची प्रकृती स्थिर आहे.म्हशीची प्रसूती झाल्यानंतर चिंताग्रस्त कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद चेहऱ्यावर दिसत होता. जनावरांवरही माणसांसारखे प्रेम करणारे शेतकरी कुटुंब आहे. म्हैस सुखरूप दिसल्याचे पाहून घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आत्ता च्या काळात जनावरांचे बाजार हे वाढलेले असून गरीब कुटुंबीयांना एक जनावर जरी दगावले तरी त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडून जाते. अशा प्रकारचे व्यंग अनुवंशिक किंवा गुणसूत्रातील दोषांमुळे जन्माला येत असतात

#Malshiras:लांडग्याला हुस्कवण्यासाठी हातात काठी घ्या - आमदार गोपीचंद पडळकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - गेम चेंजिंग होईल या भीतीने समाजाला त्यांच्या हक्कापासून जाणून-बुजून दूर ठेवण्याचे कपटी कारस्थान यापूर्वी प्रस्थापितांनी केले. धनगर आणि धनगड यातील "र" व "ड" च्या खेळात समाजाला अडकवण्याचे काम केले. त्यामुळे इथून पुढे समाजाने प्रस्थापितांच्या षडयंत्राला बळी न पडता  आरक्षणाच्या आड येणाऱ्या लबाड लांडग्यासाठी काठी हातात घेऊन आपली धनगरी ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. अशी गर्जना आमदार गोपीचंद पडळकर यांनी विझोरी तालुका माळशिरस येथील जाहीर सभेत केली. धनगर समाजाची एस.टी. आरक्षण अंमलबजावण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या धनगर जागर यात्रेची सुरुवात विझोरी तालुका माळशिरस झाली. त्यावेळी आयोजित जाहीर सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर समाज बांधवांना मार्गदर्शन करत होते.यावेळी माळशिरस , सांगोला , पंढरपूर तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पडळकर यांनी धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम प्रस्थापितांनी केल्याचा आरोप करीत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला व चौफेर टीकास्त्र डागले. आ.पडळकर म्हणाले

#Chiplun:सरंद ग्रामदैवत नवरात्रोत्सव घटस्थापना सोहळा उत्साहात प्रारंभ

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुसंस्कृती परंपरेनुसार शारदीय नवरात्रोत्सव, घटस्थापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील संरद ग्रामदैवत श्री वाघजाई देवी,श्री    पावनाई देवी,श्री नवलाई देवी,श्री चंडकाई देवी, आणि श्री केदार देव या देव- देवींची अलंकार परिधान करून प्राचीन परंपरेनुसार गाव घरामध्ये घटस्थापना करण्यात येत असते. हा नवरात्रोत्सव सोहळा दि. १५ ते २४ ऑक्टोबर पर्यंत समस्त गावकरी यांच्या भक्तिभावाने आनंदाने साजरा करण्यात येतो. या नवरात्र उत्सवात दररोज सायंकाळी ७ वाजता महाआरती सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच आलेल्या सर्व भाविकांना प्रत्येकी गाव-वाडीमार्फत राञी चहा व नाष्टा ची व्यवस्था केली जाते.पाचव्या व सातव्या माळेला कोकणातील प्रसिद्ध असे लोक कलाकृतीचे सादरीकरण होत असते. या संपूर्ण काळात गावातील ग्रामस्थ, तरुण- तरूणी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

#Natepute:दाते प्रशालेत आजी-आजोबा दिन साजरा

Image
आजी-आजोबांची शाळेत रंगली स्पर्धा महादरबार न्यूज नेटवर्क - येथील डाॅ.बाळकृष्णाजयवंत दाते प्रशालेत  'आजी-आजोबा दिन हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी विविध खेळांच्या स्पर्धेत सहभागी होऊन नातवांसोबत आजी आजोबाही शाळेत रममाण झाले. अनेकांना आपल्या बालपणीचे दिवस आठवून 'लहानपण देगा देवा, मुंगी 'साखरेचा रवा' या अभंगातील ओळींचा खऱ्याअर्थाने प्रत्यय आला. या शाळेत आजी- आजोबा दिन या नावीन्यपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रत्येक कुटुंबातील वयस्क आजी-आजोबांना शाळेमध्ये आमंत्रित केले होते. जवळपास १००-१५० वयस्कर व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होते. प्रारंभी त्यांचे   स्वागत करण्यात आले.नंतर  विद्यार्थ्यांनी आशीर्वाद घेतले. शाळेत लहान मुलांसाठी ज्याप्रमाणे विविध खेळांचे आयोजन केले जाते, त्याप्रमाणे आजी-आजोबांसाठी संगीत खुर्ची, बादलीत बाॅल टाकणे,लिंबू चमचा आदि खेळ येण्यात आले, डाॅ.बा.ज.दाते प्रशालेत  आयोजित आजी-आजोबा दिन उत्सवात सहभागी होऊन खेळ खेळताना विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा.बालपणाच्या आठवणीत रममाण झाले. बादलीत चेंडू फेकण

#Malshiras:तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियाना अंतर्गत पंचायत समिती माळशिरस येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील केंद्र शाळेत प्रथम क्रमांक आलेल्या माता पालकांचा तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती . या पाककृती स्पर्धेमध्ये ज्योती अंकुश फाटे (कोळेगाव )यांचा प्रथम क्रमांक आला आहे .तर अर्चना नानासाहेब निकम (खंडाळी बोरगाव )यांचा द्वितीय क्रमांक आला आहे. तर शोभा तानाजी वाघमोडे( पाटील वस्ती साठ फाटा) यांचा तृतीय क्रमांक आला आहे. या स्पर्धेचे परीक्षण आय .सी. डी. एस . विभागाच्या एस .जी. कुलकर्णी ,आर. पी. चव्हाण, एम. एस. सोनार, एम .बी .वाळकोळी, एस. के. नदाफ ,एस.ई.राऊत यांनी केले. सदर स्पर्धा अधिक्षक शालेय पोषणचे मयूर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या स्पर्धेसाठी बी .आर. सी. विषय तज्ञ चंदनशिवे सर, घुले सर, केंद्रप्रमुख प्रकाश कांबळे ,केंद्रप्रमुख धनाजी वाघमोडे ,केंद्रप्रमुख दगडू पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी तालुक्यातील माता पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर स्पर्धेचे प्रास्ता

#Natepute:वैद्यकीय मदतीत राजकुमार हिवरकर यांचे काम दमदार - केतन यादव

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब . आरोग्य मंत्री श्री.तानाजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील जनतेला डायरेक्ट वैद्यकीय मदत करणारे शिंदेगटाचे शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख श्री. राजकुमार हिवरकर साहेब हे माळशिरस तालुक्यातील गरीब गरजूंना आरोग्याच्या बाबतीत रात्रन दिवस मदत व्हावी यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे व सर्वसामान्यांचे आरोग्यदुत शिवसेना तालुकाप्रमुख श्री.राजकुमार हिवरकर साहेब हे आहेत. असे सामाजिक कार्यकर्ते केतन यादव हे आज नातेपुते येथील शिवसेनाभवन येथे  तालुकाप्रमुख श्री.राजकुमार हिवरकर साहेब यांच्या भेटी दरम्यान पत्रकारांशी व कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रातील मदत कार्य पाहून मी साहेबांच्या भेटीला आलो आहे. व हा सत्कार त्यांच्या कार्याचा आहे. व ज्यांना आजपर्यंत दवाखान्यात साहेबांनी मदत केलेली आहे त्या गरीब व सर्वसामान्य जनतेच्या वतीने हा सन्मान आम्ही केला आहे. असेही ते म्हणाले.

#Chiplun:कोंडीवरे गावातील माजी पं.स. सदस्य जाकीर शेकासन यांच्या समवेत सरपंच सायली केंबळे, उपसरंपच, ग्रा.पं. सदस्य, प्रतिष्ठीत व्यक्ती आणि ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

Image
राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देऊ - आ.शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, सरपंच, उपसरंपच, सदस्य आणि ग्रामस्थांनी जनसंपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेश कर्त्यांचे निकम यांनी जोरदार स्वागत करुन कोंडीवरे गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असा शब्द दिला. प्रवेशावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, मला तुमचा अभिमान आहे आपल्या गावातील अनेक नाराजीच्या बातम्या येत होत्या. आपणास अनेक आमिषे दाखवण्यात आली. मात्र, आपण ती न स्वीकारता केवळ आणि केवळ विकासाला प्राधान्य देत कोणत्याही दबावाला न झुकता मला साथ देत आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे यासाठी आपले कौतुक आहे. तुम्हा सर्वांचा मानसन्मान ठेवला जाईल, असा विश्वास आ. शेखर निकम सर्व ग्रामस्थांना दिला. गावाच्या विकासासाठी तुम्ही आलात. त्या विकासासाठी आपण लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. आपल्या येथे राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्यात येते, हे सर्वांनाच माहीत आह

#Natepute:नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन द्वारे मागणी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -                     नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई होणे बाबत शिवसेना माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडून  शिंदे गट शिवसेनेकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करवी नातेपुते नगरपंचायतीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख यांच्या मागणीनुसार २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी स्टेट लाईटसाठी मंजूर केलेला आहे. परंतु नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व पदाधिकारी यांनी प्रोटोकॉल प्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व दुसरे उपमुख्यमंत्री यांचा फोटो न लावता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केलेला आहे ही वृत्ती अतिशय खेदजनक आहे अशी वृत्ती वेळीच न ठेचल्यास भविष्यात राज्यात असाच पायंडा पडेल अशी भीती आहे त्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना गडचिरोली येथे बदली करावे. अशी मागणी तमाम शिवसैनिक व मुख्यमंत्र

#Natepute:नातेपुते ग्रामीण रुग्णालय येथे शंभर खाटांचे महिला हॉस्पिटल मंजूर

Image
राजकुमार हिवरकर पाटील यांच्या मागणीला यश महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते हे गाव सातारा पुणे सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर असल्याने तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सोलापूर जिल्हा आगमनाच्या पहिल्या मुक्कामाचे ठिकाण आहे नातेपुते गावाच्या आजूबाजूला शंभर ते दीडशे किलोमीटरवर कुठेही महिला हॉस्पिटल नाही त्यामुळे महिलांचे होणारे हाल होतात.माढा येथे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत माळशिरस तालुक्यात नातेपुते या ठिकाणी महिलांसाठी शंभर खाटांचे हॉस्पिटल व्हावे यासाठी चर्चा होऊन शिवाजीराव सावंत यांनी आरोग्यमंत्र्यांशी बोलणे करून मंजुरी देण्याबाबत कळविले होते. नातेपुते ग्रामीण रुग्णालयात १०० खटांचे महिला हॉस्पिटल मंजूर करावे यासाठी राजकुमार हिवरकर पाटील यांनी थेट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली आरोग्यमंत्री तानाजी सावंतसाहेब यांनी तात्काळ मंजुरी देऊन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ राधाकिसन पवार आरोग्य सेवा पुणे मंडळ यांनी त्याच दिवशी मंजुरी बाबतचे पत्र सोलापूर जिल्हा शल्यशिक्षक डॉ.धनंजय पाटील य

#Pune:माळशिरस तालुक्याच्या वतीने चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री मेघराज  राजेभोसले साहेब यांची  पुणे येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात गायक केतन यादव यानी भेट घेतली. माळशिरस तालुक्यातील कलाकारांच्या वतीने गायक केतन यादव यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  लेखक ओंकार मिसाळ इ. उपस्थित होते.

#Solapur:गांधीजींचे सत्य, अहिंसा व शांती चे तत्व जीवनात उतरवावे - अंकुश चव्हाण यांचे प्रतिपादन

Image
केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे “गांधी विचार संवाद” कार्यक्रम सोलापूर, दि. २ : राष्ट्रपिता गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढलेल्या लढाईत विरोधकांचा कधीही द्वेष केला नाही. त्यांच्या आंदोलनात हिंसा नसल्याने संपूर्ण विश्वाने त्यांना सामावलेले आहे. त्यामुळे महात्मा गांधीजी यांचे सत्य, अहिंसा व शांतीच्या तत्वांना जीवनामध्ये समाविष्ट करावे, असे प्रतिपादन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केले. भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो यांच्या वतीने बोरामणी येथील ग्लोबल विलेज पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीनिमित “गांधी विचार संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री चव्हाण बोलत होते.      यावेळी वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. चंद्रकांत चव्हाण दिवंगत बी. एल. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिकेत चनशेट्टी, प्राध्यापक डॉ. धायगुडे, एचडीएफसी बँकेचे सीएसआर प्रमुख अंकुश आमले, हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. वैद्य, ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या असद नद

#Natepute:जिल्हास्तरीय बॉक्सींग स्पर्धेमध्ये डॉ. बा. ज दाते प्रशालेचे वर्चस्व

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मोडनिंब येथे झालेल्या बॉक्सींग स्पर्धेमध्ये डॉ. बा. ज दाते प्रशालेचे १३ विदयार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली त्यामध्ये  - रोहन दडस, वेदांत काळे, यश ठोंबरे . श्री पलंगे, गणेश महारनूर, प्रणव वावरे, सिध्दार्थ बनसोडे, कौशल्य जगदाळे, साईराज ननवरे, शंभुराजे चांगण. कु. सृष्टी महारनवर, प्रणिती झेंडे, सलोनी ठोंबरे या  विद्यार्थ्यांची विभागस्तरासाठी निवड झाली. तसेच जिल्हयामध्ये द्वितीय क्रमांक आलेले विदयार्थी पुढील प्रमाणे-  शिवम सांवत, अर्णव उराडे, गंधर्व कोल्हाळे, राजवर्धन चिंचकर, यशराज रूपनवर, तन्मय बरडकर, ओमप्रसाद पांढरे, गौरव कर्चे, चैतन्य मुळे, सिध्देश कदम, सुशांत पाठक, कुणाल चव्हाण, अभिषेक पांढरे, विश्वजित बागाव कृ. जानवी, लाळगे, तन्वी शिंदे, भुमी काळे, स्नेहा कोरटकर यांचा जिल्ह्या त द्वितीय क्रमांक. वरील सर्व विदयार्थ्यांना  राजेंद्र काळे, सतीश राऊत, अमोल पिसे यांचे मार्गदर्शन लाभले.  सर्व विदयार्थी व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन  धैर्यशील  देशमुख व्हा.चेअरमन संतोष काळे.सेक्रेटरी महेश शेटे. मुख्याध्

#Yavat:खंबेश्वर शिक्षण संस्था, खामगाव मध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नवीन शिक्षण धोरणात अनेक चांगल्या संकल्पना मांडलेल्या असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास करणे व त्याचे भवितव्य उज्ज्वल घडणे शक्य आहे. परंतु त्यासाठी शिक्षकांची मनोभूमिका बदलणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांची भूमिका या धोरणाच्या अंमलबजावणीत अत्यंत महत्त्वाची असणार आहे,"असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. अ ल देशमुख यांनी केले. खामगाव,ता. दौंड, जि. पुणे येथे खंबेश्वर शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमधील शिक्षकांची नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षकांची भूमिका याविषयी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री माणिकराव नागवडे, कार्याध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे,सचिव विकास जगताप, मुख्याध्यापक श्री नेवसे व अन्य पदाधिकारी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेत आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे मा. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य श्री प्रसेनजीत

#Mumbai:सुशील भायजे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव येथील युवा नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुशील भायजे यांची रत्नागिरीच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.        सुशील भायजे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आजपर्यंत त्यांनी राजकीय व सामाजिक कामातून आपली राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रती असलेली निष्ठा सिद्ध केली आहे. त्यांच्या या निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची दखल घेऊन पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना पद देण्याचे निश्चित केेले व वरिष्ठांच्या मतानुसार सुशील भायजे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.       सुशील भाजये यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करताच त्यांना पै- पाहुणे, नातेवाईक आणि मित्र मंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.

#Yavat:महात्मा गांधी स्वच्छ अभियान अंतर्गत भोसलेवाडी झाली सुंदर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप  २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचा औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड त व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेवाडी व अंगणवाडी विद्यार्थी व शिक्षक तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती लहान मुले यांनी शाळेच्या सभोवताली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. हातात झाडू घेऊन सर्वच गावातील नागरी लोकांनी या मोहिमेत सहभागी झाले होते व संपूर्ण परिसर स्वच्छ केला. आजूबाजूचा सर्व कचरा गोळा करून पेटवून देण्यात आला. आपले परिसर व सोबत आलती शाळा गावातील वस्ती हे स्वच्छ करण्यात आले यातून एकच सामाजिक संदेश देण्यात आला की आपण स्वच्छता केल्याने आसपासचा परिसर सुंदर स्वच्छ होतो हे पटवून देण्यात आले. आपला परिसर व त्यांची करावी त्यासाठी गावची सर्व नागरिक ते सर्व नागरिकांनी यात सहभागी झाले होते. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष समीर लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील जगताप, ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी लोहकरे,तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश जी गडदे,तानाजी ठोंबरे सर, म्हेत्रे मॅडम,माने मॅडम,छाया गुंड मॅडम,यशोदा नवसकर,सा

#Baramati:चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि यांचा स्वच्छतादिनी बारामतीत उत्स्फूर्त सहभाग

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - बारामती नगरपालिकेच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता हीच सेवा मानून चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बारामती नगरपालिकेच्या गणेश मार्केट येथील स्वच्छता केली. यामध्ये एकूण 50 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. बारामती  नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषदा,पंचायत समिती, नगरपालिका,कटक मंडळे व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून स्वच्छता केली जाते. बारामती शहरातून या आवाहनाला प्रचंड मोठा प्रतिसाद देण्यात आला. चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि यांचे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान असते. "याआधीही सामाजिक कार्य करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील होतो आणि भविष्यात देखील सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही उत्स्फूर्त सहभाग नोंदवणार असल्याचे मत या सुवर्णपेढीचे चेअरमन श्री. किशोरकुमार शहा यांनी सांगितले." या स्वच्छतेसाठी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे सर, सुरेश जोगदंड,सेल्स हेड दीपक वाबळे,ए