Posts

Showing posts from January, 2022

#Natepute:बायडाबाई पाटील यांची कारुंडे ग्रामपंचायत सरपंच पदी बिनविरोध निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - कारुंडे येथील लोकनियुक्त सरपंच अमर महादेव जगताप यांनी गाव पातळीवर ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. आज दि. 31 जानेवारी रोजी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कारुंडे येथे निवड प्रक्रिया राबवली होती. यावेळी सरपंच पदासाठी  बायडाबाई पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चव्हाण यांनी दुपारी दोन वाजता बिनविरोध सरपंच पदी बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांचे नाव घोषित केले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री चव्हाण यांना  सरपंच निवडीसाठी तलाठी लोखंडे, ग्रामविकास अधिकारी मोरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले . सरपंच निवडीनंतर दोन्ही पार्टीतील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सरपंच निवडीनंतर श्री नाथ मंदिर येथे जाऊन नूतन सरपंच यांनी श्री नाथ चरणी आशीर्वाद घेतले. बिनविरोध सरपंच निवडीबद्दल सरपंच बायडाबाई पाटील यांच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.   यावेळी माजी सरपंच हनुमंत पाटील,  माजी सोसायटी चेअरमन सुभाष पाटील, माजी सरपंच अमर जगताप, माजी उपसरपंच महादेव रुपनव

#Satara:माजी विद्यार्थ्यांनी बदलला शाळेचा चेहरामोहरा...

Image
      वैयक्तिक देणगीतून रंगवली शाळा महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे   वावरहिरे ता.माण येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री पाणलिंग विद्यालयाचा चेहरामोहरा माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्तपणे देणगीतून बदलला आहे.या शाळेत वावरहिरे तसेच आजूबाजूच्या परिसरातून शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात.शाळा गेले काही दिवसात मोडकळीस आलेली असतानाच वावरहिरे गावातीलच काही चांगल्या हुद्द्यावर कार्यरत असणारे माजी विद्यार्थी शाळेचं ऋण फेडण्यासाठी पुढं सरसावले असून त्यांनी स्वखर्चातून शाळेच्या इमारतीसंदर्भात बांधकाम आणि रंगरंगोटी करण्याचं काम सुरू केलं असून ते एक तृतीयांश टक्के काम पूर्णत्वाला गेले असून आपली शाळा सुंदर शाळा व्हावी यासाठी अनेकजण माजी विद्यार्थी सढळ हाताने मदत करत शाळेला नटवण्यासाठी प्रयत्नरत आहे. अगदी याचप्रमाणे या पाणलिंग विद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे डंगिरेवाडी गावचे सुपुत्र आणि या पाणलिंग विद्यालयाचे माजी विद्यार्थी कलर कॉन्ट्रॅक्टर श्री.दुर्योधन पांडुरंग काळूखे हे बंगळुरू येथे चांगल्या पद्धतीने रंगकाम व्यवसाय करत आहेत,तर श्री.लालासाहेब दादा

#Chiplun:चिपळूणमधील दोन गावांना ६५ वर्षांनी महाजनकोकडून मुबलक पाणी मिळणार

Image
आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून बाबू साळवी यांच्या प्रयत्नांना यश महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव तालुक्यातील पोफळी सय्यदवाडी व कोंडफणसवणे या दोन गावांच्या पाण्याचा प्रश्न महाजनकोच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत सुटला आहे. हा प्रश्न  आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे युवा नेते व पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांच्यासह या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे या दोन गावांना आता ६५ वर्षांनी मुबलक पाणी मिळणार असल्याने येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पोफळी सय्यदवाडी व कोंडफणसवणे या दोन गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. कोयना प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर प्रकल्प बाधित गावांना महाजनकोकडून पाणी मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. मात्र, हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. यामध्ये आमदार शेखर निकम व राष्ट्रवादीचे युवा नेते पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांनी लक्ष घातले. इतकेच नव्हे तर महाजनकोकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.  यानुसार आमदार निकम यांच्या पुढाकाराने नुकतीच पोफळी येथे म

#Natepute:नातेपुते येथे पत्रकारांच्या वतीने पेपर विक्रेत्यांचा सन्मान

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपल्या व्यवसायिक कार्यास प्राधान्य देऊन नागरिकांना रोज जगात चाललेल्य घडामोडीची व सामाजिक राजकीय आध्यामिक  वर्तमानाची माहिती मिळणाऱ्या वृत्तमानपत्राची विक्री करणाऱ्या नातेपुते येथील सुरेश दळवी, सागर पोटे, संतोष दळवी, संकेत दळवी, ज्ञानेश्वर भांड, पिंटू खोले, लक्ष्मण सोनवळ या पेपर विक्रेत्यांचा नातेपुते येथील गणेश मंदिरात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी नातेपुते येथील पत्रकारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार श्रीकांत बाविस्कर, अभिमन्यू आठवले,विलास भोसले, मनोज राऊत,उमेश पोतदार, प्रमोद शिंदे, श्रीराम भगत महाराज, अमित सोरटे, हनुमंत माने उपस्थित होते.

#Malshiras:माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले

Image
सत्ताधाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने थोबाडले - आ. राम सातपुते महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे ठाकरे पवार सरकारने हुकूमशाही पद्धतीने आमचे केलेले निलंबन आज सुप्रीम कोर्टात रद्द झाले विधानसभा कोणाच्या बापाची जाहागिरी नाही आम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे आजचा निर्णय म्हणजे सत्ताधाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने थोबडले आहे असे माळशिरस चे आमदार राम सातपुते यांनी 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले सन 2021 मध्ये भाजपच्या आ. राम सातपुते आ. आशिष शेलार , आ. गिरीश महाजन ,आ. अतुल भातखळकर, आ. डॉ. संजय कुटे, आ. जयकुमार रावल, आ. नारायण कुचे ,आ. पराग अळवणी, आ अभिमन्यू पवार ,आ. योगेश सागर, आ. हरीश पिंपळे ,आ. बंटी भांगडिया या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते सभागृहात पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षण व इम्पिरिकल डाटा या विषयावर चर्चा सुरू असताना अभूतपूर्व गोंधळ झाल्याबद्दल या बारा आमदारांवर गैरवर्तनाचा ठपका ठेवून राज्य सरकारने या बारा आमदारांचे निलंबन केले होते यानंतर या बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी वारंवार विनंतीही करण्यात आ

#Pune:प्रजासत्ताक दिनानिमित्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम अशा डिगेवस्ती मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना टेलर ऑर्गनायझेशन संस्थेचे  लोकेश बापट सर व तुकारामदादा कोकरे-पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख- ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या माध्यमातून डिगेवस्ती येथील मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले आहे. यावेळी सरपंच-संतोष कोकरे, पोलीस पाटील- विलास कोकरे, सदस्य-सुरेखा तुकाराम कोकरे, मुख्याध्यापक- दिलीप गायकवाड सर,नागनाथ कोळी सर सामाजिक कार्यकर्ते-रामचंद्र कोकरे व डिगेवस्ती ग्रामस्थ उपस्थित होते वेल्हे तालुक्यामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्रजासत्ताक दिना निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची डिगेवस्ती, टेकपोळे ,माणगाव, पोळे ,ठाणगाव, शिरकोली ,गिवशी ,आंबेगाव  वडघर ,चिमकोडी,येथे प्रतिमा वाटप करण्यात आले तुकारामदादा कोकरे-पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख- ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, नथुराम डोईफोडे-युवक अध्यक्ष पुणे जिल्हा  व अध्यक्ष वेल्हे  तालुका ,युवक अध्यक्ष वेल्हे तालुका-संजय हिरवे यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आ

#Solapur:प्रशांत माळवदे यांना सुमंगलाय गुणवंत पत्रकार पुरस्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - सोलापूर जवळील शिंगडगाव येथील एस एस कलशेट्टी प्रतिष्ठानच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना  मंगलमलाय गुणवंत पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.  यावेळी गौरव प्रमाणपत्र, ब्लूटूथ,शाल, श्रीफळ, हार व दिवाळी अंक भेट देऊन पत्रकारांना सन्मानित केले होते. यावेळी  माळवदे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या निष्ठा पूर्वक कामाची, कार्याची आम्ही दखल घेत आहोत .या आपल्या विधायकतेतून समाज आणि राष्ट्राची मोठी प्रगती होणार आहे. यावर आमचा विश्वास आहे . कोविड -19 च्या काळात आपण केलेले कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच आपणास सुमंगलाय गुणवंत पत्रकार पुरस्कार सन्मान देताना मनस्वी आनंद होत आहे तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करत असताना भविष्यात समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वस्तुनिष्ठ ,दृष्टिकोन समोर ठेवून आपल्या हातून समाजसेवेचे उत्तुंग कार्य घडो हीच सदिच्छा असे मत अध्यक्ष प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले. या पूर्वी हि पत्रकार सुरक्षा समितीचा आदर्श पत्रकार पुरस्कार, ओबीसी फाउंडेशन समाजसेवक पुरस्कार, हिंदुस्तान 2

#Satara:युवकांनी प्रजासत्ताक दिनी केले रक्तदान

Image
 महादरबार न्यूज नेटवर्क - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून थदाळे तालुका मान येथे  करण्यात आले होते. रक्ताचा तुटवडा भासत असल्याने येथील श्रीनाथ तरुण मंडळ यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थदाळे येथे केले होते. शिवशंभो रक्तपेढी मोहोळ यांनी रक्त संकलित केले रक्तदान हे श्रेष्ठदान हा संदेश घेऊन  गावातील पन्नास नागरिकांनी रक्तदान केले.  यावेळी सरपंच हनुमंत शिंगाडे सार्थक वावरे शुभम शिंगाडे तसेच जगदाळे गावातील ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास शुभम शिंगाडे व सार्थक वावरे यांचे मोठे योगदान लाभले.

#Natepute:महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी प्रमोद शिंदे यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  महाराष्ट्र पत्रकार संघ माळशिरस तालुकाध्यक्षपदी एकमताने पत्रकार प्रमोद ज्ञानदेव शिंदे यांची निवड करण्यात आली.ही निवड महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. महाराष्ट्र पत्रकार संघ गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. दरवर्षी महाराष्ट्रभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटात घेतला जातो.दरवर्षी महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्यकारिणी राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांचा अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात येत असते.  याहीवर्षी महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये माळशिरस तालुका  कार्यकारणी ही जाहीर करण्यात आली या कार्यकारणीत पुन्हा एकदा पत्रकार संघामध्ये चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल प्रमोद शिंदे यांना तालुका अध्यक्ष पद देण्यात आले आहे.निवडीनंतर प्रमोद शिंदे म्हणाले की राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात पत्

#Satara:"दहिवडी कॉलेजमध्ये मतदार साक्षरता दिन उत्साहात साजरा.."

Image
नवमतदार आणि विद्यार्थ्यांनी योग्य उमेदवार पाहून मत न विकता ही प्रक्रिया पार पाडावी- नायब तहसीलदार शैलेश व्हट्टे महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक आधार असलेल्या मतदान प्रक्रियेचा विद्यार्थी वर्गाला आणि नवमतदारांना जाणीव होऊन त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, यादृष्टीकोनातून दहिवडी कॉलेजमध्ये १४वा राष्ट्रीय मतदार साक्षरता दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात आला.नवमतदारांना मतदान प्रक्रिया समजावी आणि लोकशाही बळकट व्हायला मदत व्हावी या दृष्टीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख या नात्याने  माण तालुक्याचे नायब तहसीलदार शैलेश व्हट्टे हे मार्गदर्शन करताना म्हणाले की नवीन मतदार लोकांना मतदान प्रक्रियेविषयी सहसा माहिती नसते,मतदान करण्याचा अधिकार प्राप्त व्यक्तीने आपलं मत कुणाच्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार पाहून दिले पाहिजे,जो उमेदवार खऱ्या अर्थाने योग्य आणि लोकांची काम करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी कटीबद्द असले पाहिजे.आपलं मत कोणत्याही किंमतीला न विकता उमेदवाराची सूज्ञता पाहून मतदान प्रक्रिया पार पाडल

#Satara:दहिवडीच्या राजकारणात नातवाने जपला आजोंबाचा राजकीय वारसा...

Image
पत्रकार महेश जाधव यांची नगरसेवक पदाला गवसणी;पक्षनिष्ठेचे मिळाले फळ महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे दहिवडी ता.माण नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसने माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्तांतर घडवले.या निवडणूकीत व दहिवडीच्या राजकारणात पक्षनिष्ठा राखत आजोबा स्व.डॉ.शामराव जाधव यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम नातू महेश जाधव याने केले आहे. नगरपंचायतीच्या महत्वपूर्ण लढतीत राष्ट्रवादीतर्फे महेश जाधव यानी भाजपच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करत नगरसेवक पदाला गवसणी घातली आहे. महेश जाधव यांचे युवासंघटन मजबूत असल्याने लहान वयातच राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत नगरपंचायतीत प्रवेश केला आहे.महेश जाधव यांचे आजोबा स्व.डॉ.शामराव जाधव हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विचार धारेवर तसेच स्व. सदाशिवराव पोळ यांच्या समवेत राष्ट्रवादी पक्षाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. दहिवडी सह माण तालुक्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली. मात्र या जाधव परिवाराने राष्ट्रवादी पक्षाची साथ कधीही सोडली नाही.या कुटुंबीयांनी राष्ट्रवादी पक्षा

#Chiplun:अद्यावत आणि सुसज्ज असा 'वैकुंठरथ' चिपळूण शहरासाठी उपलब्ध

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब संचलित असलेल्या वैकुंठरथाचे लोकार्पण स्व गोविंदराव निकम जयंती दिनी जिल्हाधिकारी व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केले. मतदारसंघाच्या विकासाबरोबर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी गत दोन अडीच वर्षात अनेक प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे ज्या ज्या ठिकाणी शासकीय निधीची अडचण निर्माण होते त्या त्या वेळी आपल्या स्वतःच्या खिशातून अथवा सह्याद्रीच्या माध्यमातून सामाजिक काम मार्गी लावली आहेत शहरातील अशीच एक समस्या त्यानी आपल्या माध्यमातून सोडवली आहे.        शहराची लोकसंख्या आणि विस्तार ही वाढत आहेत त्या मुळे अनेक प्रश्न आणि समस्या पुढे येत असताना सध्या वैकुंठरथ आवश्यक असल्याचे अनेकांनी आमदार निकम यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. आमदार निकमानी लगोलग अपक्याकडे असणारी ४०७ रुग्णवाहिका  उपलब्ध करून ती चिपळूण लायन्स क्लबकडे दिली चिपळूण लाय

#Parbhani:होळकर कालीन धान्य तारण योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा- सखाराम बोबडे पडेगावकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - शेतकऱ्याच्या हिताची असलेली धान्य तारण योजना राजे मल्हारराव होळकर यांनीच सुरू केली होती. आज वखार महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धान्य तारण योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी शनिवारी गंगाखेड येथे शेतकरी कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना  व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाखेड येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात धान्य तारण योजनेच्या जनजागृतीसाठी शेतकरी  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमापूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.  पुढे बोलताना बोबडे म्हणाले की वखार महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणारी धान्य तारण योजना एक आदर्श योजना आहे. हि शेतकऱ्यांच्या हिताची योजना असून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे .योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास शेतकरी आत्महतेचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होणार

#Chiplun:राज्यस्तरीय इंस्पायर अॅवाॅर्ड प्रदर्शनाकरिता कु. राजीव गुरव याची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी राजीव रवींद्र गुरव याची राज्यस्तरीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनाकरिता निवड झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ७७ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर होणाऱ्या प्रदर्शनासाठी झाली आहे. राजीव याने बनवलेल्या ‘मल्टिपर्पज कोकण समृद्ध अपराटस’ या मॉडेल ची निवड राज्यस्तरासाठी झाली आहे.राजीव ने बनवलेल्या मॉडेल च्या साहाय्याने नारळ सोलणे, नारळ फोडणे,नारळ पाणी संकलित करणे,गाळणे,खोबरे खवणे, हिर काढणे, पाती साफ करणे,सुपारी सोलणे, सुपारी फोडणे,केरसुणी बांधणे आदी गोष्टी एकाच यंत्राने करता येत आहेत.त्याच्या ह्या मॉडेल ची दखल घेऊन राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. राजीव गुरव हा इयत्ता १०वी मध्ये शिक्षण घेत आहे.राजीव याला विज्ञान शिक्षक विठ्ठल भोईर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष आनंद साठे, उपाध्यक्ष मनोज शिंदे व इतर संस्था संचालक ,मुख्याध्यापक मनोजकुमार नार्वेकर, पर्यवेक्षक गणेश शिंदे यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

#Malshiras:माळशिरस नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा

दोन पती पत्नी नगरसेवक  महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे माळशिरस नगरपंचायत वर भारतीय जनता पार्टीचा दहा जागा मिळवून एकहत्ती सत्ता घेतली असून राष्ट्रवादीचे दोन , महाराष्ट्र विकास आघाडीचे दोन व अपक्ष तीन असे विजयी उमेदवार झालेले आहेत.  माळशिरस नगरपंचायत भाजपकडून आप्पासाहेब देशमुख संजीवनी ताई पाटील मिलिंद कुलकर्णी यांच्या गटाच्या दहा जागा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुकाराम देशमुख गटाच्या दोन जागा महाराष्ट्र विकास आघाडी माणिकराव वाघमोडे गटाच्या दोन जागा व अपक्ष तीन जागा निवडून आल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. यामध्ये राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख तुकाराम देशमुख यांचा पराभव झाला तर महाराष्ट्र विकास आघाडीचे माणिकराव वाघमोडे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले तसेच भाजपच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी सावंत यांचे चिरंजीव आकाश सावंत हे पराभूत झाले तसेच माजी नगराध्यक्ष लतादेवी सीद  यांचे दीर रामचंद्र सीद हेही पराभूत झाले आहेत तर माजी नगराध्यक्ष द्रुपदी देशमुख यांचे चिरंजीव विजय देशमुख हे विजयी झाले आहेत. माळशिरस भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व त्यांच्या

#Natepute:धर्मपुरी ग्रामपंचायत उपसरपंच सौ. सुनिता भागोजी माने यांना सहीचे अधिकार

महादरबार न्यूज नेटवर्क - विवेक खरात धर्मपुरी गावचे सरपंच अपात्र ठरल्यानंतर ग्रामपंचायत सहीचा अधिकार कोणाला की प्रशासक नेमणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच गावगाड्यात चर्चा सुरू होती की काहीही झाले तरी उपसरपंच यांना सहीचे अधिकार मिळणार नाहीत. अखेर ग्रामपंचायत खाते चालवण्याबाबत पंचायत समिती माळशिरस गटविकास अधिकारी वर्ग १,  श्रीकांत खरात यांनी दिनांक- १७ जानेवारी २०२१  रोजी ग्रामपंचायत ठराव क्रमांक १९२ नुसार ग्रामपंचायत खाते चालविण्याचा अधिकार उपसरपंच सौ सुनिता भागोजी माने व ग्रामविकास अधिकारी विलास मोरे यांना दिले बाबत चे पत्र दिले आहे. ग्रामपंचायत सहीचे चे अधिकार मिळण्यासाठी प्रदीप झेंडे, शहाजी मदने, नामदेव निटवे, नितीन निगडे, किरण पाटील, संतोष ठेंगील, गजानन पाटील, संजय झेंडे यांनी प्रयत्न केले . गावातील उलट-सुलट चर्चा यांना पूर्णविराम मिळाला आहे. आमचा संविधानावरील विश्वास कायम आहे. आम्हाला न्याय संविधानामुळे मिळाला आहे.   प्रदीप झेंडे सामाजिक कार्यकर्ते

#Malshiras:मेडद सरपंचपदी नाथा आबा लवटे पाटील

मेडद येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत नाथाआबा लवटे पाटील यांनी सौ. लता विजय तुपे यांचा एक मतांनी पराभव करून विजयी झाले  महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे मेडद ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच युवराज झुंजे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदी नाथाआबा लवटे पाटील विजयी झालेले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोमवार दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा माळशिरस मंडल अधिकारी एस के खंडागळे, यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची सरपंच निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सरपंच पदासाठी नाथाआबा लवटे पाटील व सौ. लता विजयराव तुपे यांनी अर्ज दाखल केले होते. छाननी होऊन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला दोन वाजता सुरुवात झाली गुप्त मतदान घेण्यात आले त्यामध्ये नाथआबा लवटे पाटील यांना सात मते तर सौ लता विजयराव तुपे यांना सहा मते पडली निवडणूक निर्णय अधिकारी एस के खंडागळे यांनी नाथा आबा लवटे पाटील यांच्या सरपंच पदासाठी विजय असल्याची घोषणा केली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरता फोंडशिरस मंडल अधिकारी एस. टी. चव्हाण, ग्रामसेवक आर्.एम. चव्हाण, तला

#Solapur:जनशक्ती संघटना सोलापूर जिल्ह्यातील कार्यकारणी जाहीर

महादरबार न्यूज नेटवर्क - जनशक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  १५ जानेवारी २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची विचार विनिमय बैठक घेण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाबाराजे कोळेकर, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली. माढा तालुका अध्यक्षपदी बिरूदेव दादा शेळके व पंढरपूर तालुका संघटक पदी विकी भाऊ घाडगे, मोहोळ तालुका युवक अध्यक्षपदी लखन पेढे यांची निवड करण्यात आली यावेळी जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#Yavat:अविनाश सांगोलेकरांच्या सामाजिक राजकीय गझला विचारप्रवर्तक - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप " गझल म्हणजे प्रेम , विरह असं असताना अविनाश सांगोलेकरांच्या गझला मात्र विचारप्रवर्तक असा सामाजिक - राजकीय आशय व्यक्त करतात. त्यांचं  हे वेगळेपण सुरेश भटांची गझलपरंपरा अधिक समृद्ध करेल ", अशा आशयाचे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांनी दि (१६) रोजी काढले.ते खुटबाव येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांच्या ' अविनाशपासष्टी ' ह्या गझलसंग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर बोलत होते. त्याचे आयोजन मुंबई येथील ग्रंथाली आणि पुणे येथील ' माझी गझल ' ह्या दोहोंच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात  एस.एम.जोशी सभागृहात करण्यात आले होते. ठाणे येथील प्रसिद्ध कवी - गीतकार अरुण म्हात्रे ह्यांनी सुरेश भट , भीमराव पांचाळे ह्यांच्या मराठी गझलेतील योगदानाचा संदर्भ देत सांगोलेकरांच्या योगदानावरही प्रकाश टाकला.ते म्हणाले , " काळाच्या कसोटीवर उतरतील , असे किमान पंधरा - वीस तरी शेर सांगोलेकरांच्या ' अविनाशपासष्टी ' ह्या गझलसंग्रहात नक्कीच आहेत."  प्रारंभी ग्र

#Natepute:रस्ता खुला करण्यासाठी केलेले गुरसाळे ग्रामस्थांचे आत्मदहन प्रशासनाच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित

महादरबार न्यूज नेटवर्क - सध्या ऊस कारखाने चालू आहेत शेतकऱ्यांना यांच्या शेतातील ऊस कारखान्याला घालवण्यासाठी तसेच येण्या जाण्यासाठी रस्ता संतोष पाटील यांनी अडवणूक केल्याने संतप्त झालेल्या गुरसाळे  येथील ग्रामस्थांनी सामूहिक रस्ता खुला करून न दिल्यास आत्मदहन करणार असल्याचे निवेदन तहसील कार्यालय येथे दिले होते.  गुरसाळे गावच्या ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेत तहसील कार्यालय माळशिरस ,पंचायत समिती जिल्हा परिषद बांधकाम विभाग, शेती महामंडळ या विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दगडी खान ते पालखी पार रस्त्याच्या मध्यभागी संतोष पाटील यांनी नारळाचे झाड लावून वाहतुकीस अडथळा केल्याचे दिसून आले.  रोजगार हमी रस्ता कुठल्या गटातून गेला हे पाहण्यासाठी व त्याची शहानिशा करण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व शेती महामंडळ यांच्याकडून सर्व माहिती घेण्यासाठी वेळ लागत असल्याने सुट्टीचे दिवस सोडून दहा दिवस लागतील तोपर्यंत आपले सामूहिक आत्मदहन स्थगित करावे अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता अशोकराव रणवरे  यांच्या सहीने नायब तहसीलदार सानप यांनी आत्मदहन क

#Natepute:विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश - बाबाराजे देशमुख

महादरबार न्यूज नेटवर्क - कोरोनाची भयानक परिस्थिती होती.यामुळे शाळा बंद होत्या.तरीही विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत  चांगले यश मिळविले असे मत माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी व्यक्त केले. ते इंटरनॅशनल टॅलेंट सर्च इक्झामच्यावतीने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी 'गौरव गुणवंताचा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इ.५ वी,इ.८ वी मधील शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बाबाराजे देशमुख पुढे बोलताना म्हणाले,कोरोना काळात सर्वांवर वाईट वेळ आली होती.लाॅकडाऊन मध्ये सर्वजणच घरी असल्याने अभ्यासाला अडथळे आणि शाळा बंद अशा काळात मनोबल टिकवून विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चांगले यश मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले. सपोनि मनोज सोनवलकर म्हणाले,स्वतः मी देखील ग्रामीण भागातूनच आलेलो आहे.शाळेत असताना पाठीमागील रंगेत बसलेलो असायचो.कार्यक्रमात पुढची खर्ची आपणास कधी मिळेल असे वाटायचे यातुन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला व यशस्वी झालो.तुम्

#Thane:भिवंडीतील युवा कवी मिलिंद जाधव यांची मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मंध्ये नोंद

Image
''सर्वोत्कृष्ट कवी''  पुरस्काराने सन्मानित  महादरबार न्यूज नेटवर्क - भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहणारे युवा कवी  व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भिवंडी तालुका सचिव मिलिंद सुरेश जाधव यांची मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड  मध्ये  नोंद झाली असून  बेस्ट अचिव्हर्स अवॉर्ड- २०२१ मधील ''सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार'' त्यांना प्रदान करण्यात आला आहे. युवा कवी मिलिंद जाधव हे भिवंडी तालुक्यातील समतानगर, पडघा या ग्रामीण भागात  राहत असून ''लोकधारा प्रतिष्ठान''ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ते विविध विषयावर उत्तम कविता लिहून  प्रबोधन करीत असतात. त्यांचा सामाजिक तसेच  विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध कवी, साहित्य संमेलनात त्यांचा  सहभाग असून विविध विषयांवर प्रबोधनात्मक कविता शाळेत  तर विविध ठिकाणी सादर करीत प्रबोधन करीत असतात. एवढंच नव्हे तर, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे  एक युवा कवी  म्हणून त्यांची ओळख आज इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते. अनेक कार्यक्रमात ते सूत्रसंचालनाची धुरा सुध्दा सांभाळत असतात.  म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन  भिवंड

#Natepute:नवोदय परीक्षेनंतर सार्थक पाटील चे शिष्यवृत्ती परीक्षेतही घवघवीत यश

महादरबार न्यूज नेटवर्क - सन  २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राध्यापक दुर्योधन पाटील (फडतरी )यांचे चिरंजीव सार्थक पाटील याने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सार्थक पाटील हा इयत्ता  पाचवी मध्ये डॉ. बा. ज.दाते प्रशाला नातेपुते मध्ये शिकत होता. त्याच्या यशामध्ये त्याचे बारड सर,कुंभार सर, विकास काळे सर, सौ कथले मॅडम  तसेच आई सुगंधा मॅडम या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. या अगोदर झालेल्या नवोदय परीक्षेमध्ये सार्थक पाटील याची निवड पोखरापूर या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी झालेली आहे.त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

#Natepute:मोरजाई विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

महादरबार न्यूज नेटवर्क  :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत सन २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले. विद्यालयातील आठ विद्यार्थी या परीक्षेत पास झाले त्यापैकी कुमारी नीलम दिलीप सुळ हिने ग्रामीण सर्वसाधारण जिल्हा यादीत २०८ गुणासह तर कुमारी भूमिका छगन वावरे १७२ गुणासह जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना  आत्तार  एफ एच व  रुपनवर एस डी यांनी मार्गदर्शन केले.                                        यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेचे अध्यक्ष  संग्राम सिंह जयसिंह मोहिते-पाटील,  मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,  संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव  हर्षवर्धन खराडे, प्रशालेचे मुख्याध्यापक  विकास सूर्यवंशी तसेच प्रशाला समिती सभापती व सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

#Natepute: घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासाच्या आत अटक

नातेपुते पोलिसांची दमदार कामगिरी महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते पोलीस ठाणे हदिदतील इश्वरपिंड पळसमंडळ ता माळशिरस येथिल राहणारे पांडुरंग मारुती बिचुकले हे मुलीचे डिलीवरीकरीता दिनांक ०९ /०१/२०२२ रोजी नातेपुते येथील दवाखान्यात गेले असता रात्रीचे एक वाजता फिर्यादिचे चुलत भाऊ लक्ष्मण बाळु बिचुकले यांनी फिर्यादिस फोन करुन सांगितले कि तुमचा दरवाज्याचे कुलुप तुटलेले दिसुन येत आहे मि आत जाऊन पाहिले असता बेडरुमच्या खोलीतील सामान आस्तावेस्त पडले आहे लाकडी कपाट उघडलेले आहे तुमच्या घरात चोरी झाली आहे. असे सांगितल्याने फिर्यादिने घरी जाऊन पाहिले असता कपाटातील ठेवलेल्या एका चैनच्या आदित्य ज्वेलर्स नावाच्या पोकेट मध्ये  १ ) ५०,००० / - रुपये सोन्याचे मनी लहाण मुलाचे कानातील रींग असे दोन तोळाचे वजनाचे  २ ) ७,५०० / -रुपये बॉस्केट रिंगा तीन ग्रॅम वजनाचे  ३ ) ६,००० / - चांदिचे पैंजन जोड वापरते  ४ ) २,००० / - रुपये रोख रक्क्म असा एकुण ६७,६०० / - रुपयेचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरात प्रवेश करुन चोरुन नेला आहे म्हणुन वगैरे ची फिर्याद नातेपुते पोलीस ठाणे गु र नं ०५/२०२२ भादवि कलम ४५७ ३८० प्रमाणे दिन

#Pune:मुलखावेगळा माणूस : छायाचित्रातून उलगडले आगळे व्यक्तीमत्व डॉ. दीपक बुंदेले

दीपक बुंदेले ह्यांच्या उपक्रमाची आठ "वर्ल्ड रेकॉर्ड्स" व "इंडिया बुक ऑफ रेकॉड्स मधे नोंद महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी दीपक बुंदेले ह्यांना सन्मान पत्र देऊन केला खास गौरव आपण जर आजुबाजुच्या जगात डोकावले तर जाणवते की सर्वसामान्यपणे माणूस एका विशिष्ठ चाकोरीतच जगत असतो, 'जरा हटके' दैदिप्यमान कामगिरी करुन जीवन जगणारे काही 'अलग आदमी ' असतात. होय अश्याच 'अलग आदमी' ची मी आज महाराष्ट्राला ओळख करुन देणार आहे, ती व्यक्ति म्हणजे दीपक बुंदेले. दीपक बुंदेले लेखन असू दे वा वकृत्व(निवेदक) असू दे वा छायाचित्र असू दे वा अजुन कोणतेही क्षेत्र दे, बुदधी व्  मेहनतीच्या जोरावर कायम चमकतच असते. यश म्हणजे प्रचंड पैसा असणे असे नव्हे, हे दीपक बुंदेले ह्यांचे यश सांगते त्यांच्या वाटचालीवर टाकलेला प्रकाशझोत.  दीपक बुंदेले हे एका वेगळ्याच संग्रहाने प्रसिद्धीच्या झोतात येतायेत. साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वी त्यानी विविध वर्तमान पत्रात पत्रलेखनाला सुरुवात केली, पुण्यातील विविध नागरी प्रश्नावर आधारीत अशी त्यांच

#Satara:मकरसंक्रांतीनिमित्त माण तालुक्यातील महत्वाची धार्मिक स्थळे राहणार बंद

मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी यांचे स्थानिक प्रशासनाला आदेश महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे  कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला लक्षात घेता मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जिल्हाप्रशासन सजग झाले असून मकरसंक्रांतीनिमित्त माण तालुक्यात सुमारे एक ते दीड लाख महिला या माण तालुक्यातील विविध धार्मिक ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात,त्यामुळं होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासन सज्ज झाले असून माण तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला आस्थापना व जमावबंदीचे आदेश मा.जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.  माण तालुक्यातील कुलकजाई येथील सीतामाई मंदिर,शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर आणि गोंदवले येथील ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर या महत्वाच्या आणि प्रसिद्द असणाऱ्या देवस्थानला भेट देण्यासाठी आणि दर्शनासाठी मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त मोठी गर्दी होत असते, कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता गर्दी होऊन अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत असतो,त्यामुळं जिल्हाधिकारी यांनी स्थानिक तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना या महत्वाच्या ठिकाणी जमावबंदी आ

#Yavat:अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुक्याच्या वतीने उंडवडीत जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

महादरबार न्यूज - संतोष जगताप  अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड तालुका पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन दौंड तालुका आणि ग्रामपंचायत कार्यालय उंडवडी यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती उंडवडी ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी करण्यात आली. उंडवडी गावचे सरपंच सौ दीपमाला सतीश जाधव आणि मराठा महासंघ हवेली तालुक्याचे उपाध्यक्ष अतुल मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दौंड तालुका युवक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.यावेळी जयंती बद्दल मार्गदर्शन मनोगत जिल्हाध्यक्ष मयूर आबा सोळसकर यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष मयूरआबा सोळसकर, पोलिस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन दौंड तालुका अध्यक्ष सचिन गुंड, युवक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, उद्योग व्यापार आघाडी अध्यक्ष सुरज चोरगे, शेतकरी मराठा महासंघ दौंड तालुका अध्यक्ष विशाल राजवडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष समीर लोहकरे, दौंड तालुका मराठा महासंघ कार्याध्यक्ष दत्ताशेठ महाडिक, दौंड तालुका विद्यार्थी आघाडीचे सचिव श्रीकांत जाधव, उद्योग व्यापार आ

#Yavat:PMRDA च्या लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये तातडीने वर्ग करावेत -आमदार राहुल कुल

महादरबार न्यूज - संतोष जगताप पुणे महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील दौंड तालुक्यातील लाभार्थ्यांना वर्क ऑर्डर मिळाल्या असून अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे  सुरू आहेत. अनेक घरकुलांचे  प्लिंथ लेव्हल पर्यंतचे काम पूर्ण झाले असुन संबंधित यंत्रणेमार्फत स्थळ पाहणी, जिओ टॅगिंग आदी प्रक्रिया पूर्ण होऊन २-३ महिन्यांचा कालावधी लोटला आहे परंतु अद्यापही  त्यांच्या खात्यावर एकूण २.५ लक्ष अनुदानापैकी १ लक्ष रुपये अनुदानाचा पहिला हफ़्ता जमा झालेला नाही त्यामुळे पुढील कामे प्रलंबित आहेत अनुदानाचा पहिला हफ़्ता तातडीने वर्ग करण्यात यावा यासाठी आज PMRDA चे आयुक्त डॉ. सुहास दिवसे साहेब यांची आमदार राहुलदादा कुल यांनी भेट घेतली व लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये तातडीने वर्ग करणे बाबत संबंधिताना आदेश द्यावेत.