Posts

Showing posts from April, 2022

#Malshiras:माळशिरस पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  इस्लाम धर्मात हिजरी नुसार वर्षात बारा महिने असतात त्यापैकी  ९ वा महिना म्हणजे रमजान महिना असतो  या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण महिने रोजे( निरंकार उपवास )करतात (रोजे)  उपवास करून उपवासी राहतात जेणे करुन    जे गोरगरिब  दीन दुबळे असतात त्यांना एक वेळचे जेवण ही प्राप्त होत नाही अशा गोरगरिबांच्या उपाशी  पोटाची  जाणीव  व्हावी  आणि त्यांना निरंतर  मदत करावी म्हणुन ईश्वराने इस्लाम  धर्माला  रोजे करणे  सक्तीचे केले आहे शिवाय या  रोजा च्या  च्या माध्यमातून ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मुस्लिम बांधव रोजे करत असतात आणि प्रत्येक जण या रोजेदारांना आपल्या परीने इफ्तार  पार्टी देत असतात. या रोजाचे इतके महत्व आहे की ज्यांनी कोणी रोजेदाराला  रोजा सोडताना एक खजूर खाऊ घातला तर ईश्वर तो  खजुर खाऊ घालणाऱ्या ला सत्तर खजूर खाऊ घालण्याचे पुण्य प्राप्त करून देतो अशी आख्यायिका  आहे त्या अनुषंगाने दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड व त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्या वतीने माळशिरस येथी

#Tuljapur:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेकरवाडी येथे जंतनाशक गोळी वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - दि. २६ एप्रिल २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेकरवाडी येथे जंतनाशक गोळी वाटप करण्यात आली. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, उस्मानाबाद अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली.            राष्ट्रीय जंतनाशक मोहीम ही दि. २५ एप्रिल ते २ मे २०२२ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. कुपोषण आणि रक्तक्षय होऊन त्यांना सतत थकवा जाणवू नये म्हणून या जंतनाशक गोळ्या देण्यात येतात. त्यांची शारीरिक वाढ व मानसिक विकास चांगले पूर्णतः होण्यासाठी या गोळ्या वाटत केल्या जातात.          यावेळी काक्रंबावाडी येथील शिक्षणप्रेमी महेश बजरंग कोळेकर यांच्या हस्ते या जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जेटीथोर सर, गुरव सर तसेच काक्रंबावाडी येथील ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Satara:आकाश दडस यांना राज्यस्तरीय ' आदर्श पत्रकार ' पुरस्कार जाहीर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - माण तालुक्यातील येळेवाडी गावचे सुपुत्र माण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार आकाश दडस यांना कोल्हापूर येथील संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण  २८ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता कोल्हापूर येथे विविध मंत्री अभिनेते व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आकाश दडस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ जर्नालिझम मास कमुनिकेशन पदवीचे शिक्षण घेतले आहे तर पुण्यश्लोक आहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठातून मास्टर मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून माण तालुक्यातील विविध विषयावर स्वतंत्रपणे लेखन करत आहेत. त्यांनी माण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद सुद्धा भूषवले आहे.  पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काम करताना पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी विविध मागणीचे निवेदन देऊन सुद्धा शासन दरबारी मांडले आहेत. आकाश दडस यांनी  आतापर्यंत दुष्काळ, पाणी प्रश्न, मेंढपाळांची प्रश्न अशा विविध विषयांवर निर्भीडपणे लिखाण केले आ

#Solapur:सोलापूर सोशल फाउंडेशन चे "श्रीमंती सोलापूरची" पुरस्कार जाहीर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या श्रीमंती सोलापूरची या पुरस्कारांसाठी सहा जणांची निवड जाहीर करण्यात आली असून येत्या गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील ७५ गुणवंतांना या वर्षभरात श्रीमंती सोलापूरची पुरस्कार देऊन गौरवण्याचा निर्णय फाऊंडेशनने घेतला असून या पूर्वी पाच जणांना सन्मानित करण्यात आले आहे. आता अजून सहा जणांची निवड करण्यात आली आहे. या वेळच्या पुरस्कारांच्या मानकऱ्यांत तालवाद्य वादक नागेश रमेश भोसेकर, तरुण सुंद्रीवादक कपील विष्णू जाधव, आकाशवाणी सोलापूर केन्द्रातील अभियंता दिलीप शिवदास मिसाळ आणि पर्यावरण व वन्यजीव संरक्षक संतोष महादेव धाकपाडे यांचा समावेश आहे. सोलापूरचे ध्वनिमुद्रिका संग्राहक श्री. मोहन सोहनी आणि जयंत राळेरासकर यांना हा पुरस्कार  संयुक्तपणे दिला जाणार आहे.              या पुरस्कारांचे वितरण गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटर

#Kolhapur:जनप्रेरणा मल्टिपर्पज निधी बँकेच्या उद्घाटनला कोल्हापूर येथे उपस्थित रहा - अमोल गावडे

Image
आकाश पुजारी यांच्या शुभहस्ते २९ एप्रिलला होणार उद्घाटन महादरबार न्यूज नेटवर्क - जनप्रेरणा मल्टिपर्पज अर्बन निधी लि. बँकेच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन  २९ एप्रिल रोजी गाळा नं.१, माणिक चेंबर जसवंत स्वीट समोर जनता बाजार चौक कोल्हापूर येथे सकाळी ११:०० वा. होणार असल्याची माहिती बँकेचे संचालक अमोल गावडे यांनी दिली. जनप्रेरणा मल्टिपर्पज अर्बन निधी बँक अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर शाखा काढून बँकेची सेवा शहरी व ग्रामीण भागात देणार आहे. म्हणून जनप्रेरणा समूहाचे संस्थापक आकाश पुजारी यांच्यासोबत मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे व कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा विस्तारासाठी मी काम करेन व व्यवसाय जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही अमोल गावडे यांनी यावेळी सांगितले.

#Chiplun:आ.शेखर निकम यांनी चिपळूण व देवरुखसाठी आणला तब्बल ५ कोटीचा विकास निधी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  चिपळूण व देवरुख शहराच्या विकासासाठी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखर निकम यांनी कटिबद्ध नगरविकास ठोक तरतुदी अंतर्गत चिपळूण व संगमेश्वरसाठी तब्बल पाच कोटीचा भरीव निधी आणला आहे. यातील चिपळूण शहरासाठी  ३ कोटी ७० लाख व देवरुख शहरासाठी १ कोटी ३० लाखाचा निधी विकास कामांसाठी मंजूर झाला आहे. यावेळी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री, महसुलमंत्री (महाविकास आघाडी सरकार) यांचे आभार मानले आहेत. या निधीअतर्गत  चिपळूण नगरपरिषद हद्दीतील१) रामतीर्थ तलावाशेजारील जलतरण तलावाचे नुतनीकरण करणे – ७५ लाख, २)चिपळूण नगरपरिषदेचे कै. अण्णासाहेब खेडेकर क्रिडा संकुल इमारतीचे बॅटमिंटन कोर्ट तयार करणे तसेच इतर इनडुअर खेळासाठी सुविधा विकसित करणे – ५०लाख, ३)चिपळूण नगरपरिषद हद्दीतील आरक्षण क्र. १४३ खेळाचे मैदान विकसित करणे – २५ लाख, ४)चिपळूण नगरपरिषद हद्दीतील आरक्षण क्र. १४४. फुलपाखरु उद्यान विकसित करणे – २५लाख, ५) चिपळूण नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठ मधिल आरक्षण क्र. ४१ पार्किग क्षेत्र विकसित करणे – २५ लाख, ६) चिपळूण नगरपरिषद हद

#Chiplun:गोवंश वाहतूक तात्काळ थांबवा

Image
माखजन परिसरातील ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  संगमेश्वर तालुक्यातून अवैधरित्या होणारी गोवंशाची वाहतूक तात्काळ रोखा, यासाठी माखजन पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी,ग्रामस्थांनी संगमेश्वर चे पोलीस निरीक्षक उदय झावरे याना निवेदन दिले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात शासनाने सण २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला आहे.परंतु या कायद्यायची अंमलबजावणी संगमेश्वर तालुक्यात कोठेही केलेली दिसून येत नाही.असे स्पष्ट उल्लेख करत पोलीस खात्याकडून याबाबत दिरंगाई केली जात असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. रात्री,अपरात्री ,पहाटे शेकडो गोवंश अवैधरित्या वाहतूक करून कत्तलीसाठी नेले जातात,गोवंशाला कसाई लोक डांबून,दाटीवाटीने गाडीत भरून अमानुषपणे कत्तलीसाठी नेण्यासाठी वाहतूक करतात.हे सर्रास स्थानिकांच्या निदर्शनास येत आहेत,संबंधित गाड्या स्थानिक तर काही परजिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास येतअसल्याचे निवेदनात म्हटले आहे. याआधी संगमेश्वर तालुक्यातून अशा प्रकारे होणारी गोवंशाची अवैध वाहतूक अनेक ठिकाणी अडवण्यात आली आहे.परं

#Natepute:धर्मपुरी विकास सेवा सोसायटीच्या सर्व जागा मिळवत शेतकरी विकास पॅनल ने मिळवला ऐतिहासिक विजय

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे धर्मपुरी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक सन २०२१-२२ ते २०२६-२७ या निवडणुकीत  सत्ताधारी शेतकरी विकास गटाने, परिवर्तन विकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला विजय होऊ दिले नाही सर्वच्या सर्व तेरा जागेवरती सत्ताधारी गटाने विजय मिळवला आहे. या विकास सेवा सोसायटी च्या निवडणुकीमध्ये  परिवर्तन विकास आघाडी ला खातेही खोलता आले नाही. शेतकरी विकास पॅनल ने विजयकुमार तानाजीराव पाटोळे, दादा काटकर, उत्तम निगडे, संभाजी पाटील, बाजीराव सुदाम काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर परिवर्तन विकास आघाडी नितीन निगडे, नामदेव निटवे, संजय झेंडे, प्रदीप झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविली. विकास सोसायटी विजयी उमेदवार पुढील प्रमाणे - सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात-  संतोष धनपाल जैन , हरिश्‍चंद्र गणपत  काटकर, विष्णू प्रभू केंजळे ,  चंद्रकांत धोंडीबा मसुगडे , मोहन भानुदास  मोरे ,  महावीर रामचंद्र निगडे, नानासो बाळासो पाटील, संभाजी भिमराव पाटील. तर महिला राखीव गटात - शशिकला

#Malshiras:ज्ञानसेतू मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिकेचे मोठ्या दिमाखात उद्घाटन

Image
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या शुभहस्ते उद्घाटन महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय तालुक्यातच होण्यासाठी तालुक्यातील २८८ अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन निर्माण केलेल्या  ज्ञानसेतू या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका याचे उद्घाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते  यांच्या हस्ते हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले .  हे स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका आय पी एस  पोलीस उपायुक्त  वाहतूक विभाग ठाणे शहर बाळासाहेब वाघमोडे पाटील यांच्या संकल्पनेतुन सुरू करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख हेमंत कुमार सानप, अवर सचिव महसूल विभाग विनायक लवटे, उपजिल्हाधिकारी हरेश सुळ, उपसंचालक बॉयलर संदीप कुंभार, प्रांतअधिकारी आप्पासाहेब समिंदर, अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे,माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, अकलूजचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव ,गट विकास अधिकारी संतोष राऊत,गटविकास अधिकारी सचिन खुडे ,सहाय्यक विक्रीकर आयुक्त मन

#Malshiras:घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे अभिवादन

Image
   महादरबार न्यूज नेटवर्क - भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी अकलुज मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी माजी सरपंच पांडुरंग भाऊ देशमुख, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अशोकराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी अकलूज शहर अध्यक्ष सुरेश भाऊ गंभीरे, पंचायत समिती सदस्य अजय सकट, काँग्रेस कमिटीच्या प्रदेश संघटक ज्योतीताई कुंभार, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव रणजीत देशमुख, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग साजिद सय्यद, अकलूज शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जाकीर शेख, काँग्रेस कमिटीचे अकलुज शहराध्यक्ष नवनाथ साठे तसेच रविराज गायकवाड, मोहसिन बागवान, आदेश गोसावी, शैला गोसावी, नाना गुंड आदी पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

#Chiplun:आ.शेखर निकम यांच्या उपस्थितीत चिपळूण तालुक्यातील चिंचघरी येथील विविध विकास कामे उदघाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   चिपळूण  संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे  लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या प्रयत्नातून चिंचघरी येथील आग्रेवाडी येथे पाखाडी बांधणे आणि नळपाणी योजना दुरुस्ती,गावमंदिर ते  शंकरमंदिर रस्ता डांबरीकरण,गावमंदिर हनुमानवाडी येथे हायमॅक्स लाईट हनुमान मंदिर स्मशानभूमी रस्ता उदघाटन, कराडरोड ते रघुनाथ खेतले घर रस्ता गटार, भाग्योदय नगर येथे गटार बांधणे, विश्वनाथ कदम घराकडे रस्ता करणे, सती नाका येथे हायमॅक्स लाईट लावणे या कामाचे उदघाटन व भूमिपूजन करण्यात आली.  गेली १० वर्षांमध्ये जे कोणाला जमलं नाही ते आमदार शेखरजी निकम यांनी करून दाखवलं आहे असे डॉक्टर राकेश चाळके म्हणाले. सरपंच अमित आग्रे यांनी सुद्धा आमदार शेखर निकम यांच्या कामाचे कौतुक केले. आमदार शेखरजी निकम यांनी राकेश चाळके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले तसेच चिंचघरी गाव शहरांलगत असून भविष्यात अजून कामे केली जातील असाही शब्द दिला तसेच वाढदिनी शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, विधानसभा अध्यक्ष दादा साळवी, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खातते, माजी सभापती राजाभाऊ चाळके,माजी स

#Natepute:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या.जयंती निमित्त नातेपुते शहरात गेल्या १ एप्रिल पासून विविध कार्यक्रमांच्या द्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली. १४ एप्रिल रोजी सकाळी भीम रॅली चे आयोजन करण्यात आले होते. रॅली ला सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी निळा झेंडा दाखवून प्रारंभ केला.यात तरुणांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात सहभाग घेऊन ही रॅली पार पाडली. त्यानंतर  पंचशील ध्वजारोहण सहा.पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या हस्ते करून अभिवादन सभेला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बौद्धाचार्य  समीर सोरटे व प्रकाश साळवे यांनी बुद्धवंदना घेतली. यावेळी छोटा वक्ता विश्वरत्न प्रकाश साळवे याने बाबासाहेबांचा जीवनपट मांडला.यावेळी जयंती समितीचे सदस्य सौरभ सोरटे,मराठा सेवा संघाचे डॉ.थोरात,सहा.पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर,रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन के साळवे यांनी विचार व्यक्त केले.अध्यक्षीय भाषण जयंती समितीचे अध्यक्ष रणजित कसबे यांनी केले. यावेळी विचारपिठावर रिपाई जेष्ठ नेते युवराज वाघमारे,नगरसेवक सुरें

#Yavat:भारतीय संविधान हे जगातील सर्वात महान - प्रा.योगेश गदादे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप  " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान ही जगातील सर्वात  महान निर्मिती आहे.लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या या राज्यघटनेवर संपूर्ण भारताची न्यायव्यवस्था चालते ",असे प्रतिपादन राहू येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख सा. प्रा.योगेश  गदादे ह्यांनी केले. ते येथील भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयामध्ये झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १३१व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला  दि (१३)रोजी खुटबाव येथे  आयोजित करण्यात आलेल्या ' भारतीय संविधान '  ह्या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. याचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना, इतिहास विभाग आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे होते.यांनी मार्गदर्शन केले.ह्या व्याख्यानास भैरवनाथ शिक्षण मंडळाचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब ढमढेरे  व संचालक अरुण थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.        

#Natepute:हर हर महादेवच्या गजरात दुमदुमला मुंगी घाट

Image
भक्ती-शक्तीचे  लाखो भाविकांना घडले दर्शन    महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्रातील ऐतिहासिक व प्रसिध्द  भगवान शंकरांचे जागृत देवस्थान,म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू झाली असून १३ एप्रिल रोजी अवघड अश्या  मुंगी घाटातून महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या कावडी चढण्याचा सोहळा बघण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तांना भक्ती आणि शक्तीचे दर्शन घडले महाराष्ट्रातील आलेल्या कावडी मुंगी घाट चढल्यानंतर शेवटी मानाची असणारी पुरंदर तालुक्यातील संत तेल्या भुत्याच्या कावडीने सायंकाळी पाच वाजता मुंगी घाट सर करायला सुरुवात केली. सर्व भाविकांनी  ‘हर हर महादेवा’च्या जयघोषात, शिवभक्तीच्या प्रेरणेने बिगर दोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सर करीत पायी वारीने आणलेल्या पवित्र जलाने शिवभक्त भाविक भक्तांच्या हस्ते स्वयंभू ‘श्रींना धार घातली संत तेल्या भुत्याची कावड मुक्कामांच्या ठिकाणी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान  पोहचली.    मानाची तेल्या भुत्याची कावड दुपारी तीनच्या दरम्यान ढोलताशा,  वाजंत्री यांच्या गजरात,

#Solapur:डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  सोलापूर येथील डी. ए. व्ही. वेलणकर वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर येथे दि. ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा विभाग यांच्या मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.           यावेळी बोलताना महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. शिंदे सर म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी, समाजातील अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती वाईट परंपरा समूळ नष्ट करण्याचे कार्य केले. आज आपण त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांचा आदर्श आपल्या सर्वांसमोर असायला हवा.          यावेळी दयानंद वाणिज्य महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. शिंदे सर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. अमोल बोबडे सर , पटेल सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका , कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Yavat:पी.एम.पी.एम.एल ने ग्रामीण भागातील दैनंदिन व मासिक पास सेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पी.एम.पी.एम.एल. ने ग्रामीण भागातील प्रवाशाच्या सोयीसाठी असणारी दैनंदिन आणि मासिक पास सेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे शहर आणि उपनगरात कार्यवत असलेली पी.एम.पी.एम.एल बस सेवा पुणे शहराबाहेर दूर दूर पर्यंत सुरू करण्यात आलेली आहे. या बस सेवेचा मोठया प्रमाणात लाभ हा ग्रामीण भागातील प्रवाशांना होत असून यामुळे बसचे उत्पन्न ही वाढलेले आहे, कोरोना काळात रेल्वे आणि एस. टी. सेवा बंद केल्याने ग्रामीण प्रवाशांची कोंडी झालेली होती, कोरोना परिस्थिती शिथिल झाल्याने ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या  बस सेवेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. ग्रामीण प्रवाशांना दैनंदिन ७० रुपये व मासिक १४०० रूपये मासिक पाससेवा देत असल्याने प्रवासी संख्याही वाढलेली होती, दौंड तालुक्यातून हडपसर कुरकुंभ, पुणे स्टेशन  पारगाव, यवत सासवड आशा बससेवा आहेत, सर्व सुरळीत चालले असताना १ एप्रिल पासून दैनंदिन व मासिक पास सेवा अचानक बंद करण्यात आली आहे. पुणे शहर व उपनगरात ही पास सेवा पूर्ववत सुरू आहे, मग ग्रामीण भागात

#Phaltan:शेतपीके वाचवण्यासाठी फलटण तालुक्यातील मलवडी गावातील शेतक-यांची शिवसेना जनसंपर्क कार्यालयास भेट

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - गोविंद मोरे फलटण तालुक्यातील मलवडी येथील बिचुकले वस्ती डिपी मागील सहा दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने मलवडी येथील शेतक-यांनी दि.९/४/२०२२ रोजी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी सुरु केलेल्या फलटण येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन शेतपीकांच्या होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात येणार असल्याचे सांगितले.  त्यावर सातारा जिल्हा वीज महावितरणचे अधिक्षक गायकवाड, फलटण तालुका वीज महावितरणचे मुख्य अभियंता आवळेकर, सह मुख्य अभियंता जमाले व वाठार निंबाळकर वीज महावितरण विभागाचे अधिकारी कुंभार यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधून सदर समस्या दूर करण्यासाठी सांगितले असता काहींनी ऑईलचा सातारा जिल्ह्यात तुटवडा असुन ऑईल साठा शिल्लक नसल्याचे सांगितले. तर काहींनी ट्रान्सफाॅर्मर शिल्लक नसल्याचे सांगितले, तर काहींनी थोडेतरी वीजबील भरावे असे सांगितले. इत्यादी कारणांमुळे ट्रान्सफाॅर्मर देता येणार नाही असे वीज महावितरणच्या अधिकारी यांनी सांगितल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.  वीज महावित

#Natepute:महाराष्ट्रातील राजकीय वातावरण जाणीवपूर्वक अस्थिर करण्याचा प्रयत्न - पै अक्षय भांड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -  राष्ट्रीय नेते, मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुंबई शहरातील निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा माळशिरस तालुक्यात निषेध राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुक्याचे वतीने मुंबई याठिकाणी घडलेल्या घटने बद्दल  माळशिरस तहशिल कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अक्षय भांड यांनी निवदन दिले.   घडलेली घटना हि महाराष्ट्रा च्या राजकारणाला न शोभणारी आहे ज्या नेत्यांने या महाराष्ट्र साठी आपले आयुष्य झिजविले आहे,ज्या ज्या महाराष्ट्रा वर संकट आली त्या त्या वेळेस आदरणीय पवार साहेब हे सह्याद्री सारखे उभे राहिले हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. आणि त्यांच्या बाबत अशा घटना घडत असतील तर आम्ही गप्प बसणारी नाही अशा शब्दां मध्ये या घटनेचा निषेध भांड यांनी व्यक्त केला. यावेळी अक्षय चौगुले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस शुभम सोरटे, रियाज शेख,रवीराज बोत्रे,उद्य बरडकर, युवराज वाघमोडे,निलराज शिंदे,तुषार साळवे,सत्यजित सुरवसे,अदित्य लाळगे,अनिल वाघमोडे,शैलेश वाघमोडे हे उपस्थित होते.

#Chiplun:शरद पवारांच्या घरावर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा राष्ट्रवादीकडुन तीव्र निषेध

Image
                                              हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा छडा लावुन कठोर  कारवाई  करावी...चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखरजी निकम यांच्या आदेशा आनुसार चिपळूण येथे तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,भारत देशाचे माजी संरक्षणमंत्री आपल्या सर्वांची आदरणीय खा.मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब याच्या मुंबई येथील  सिल्व्हर ओक घरावरती शुक्रवार दि.८।०४।२०२२.राेजी भ्याड हल्ला करण्यात आला होता हा कट पूर्वनियोजित होता.राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत.मात्र तो यशस्वी झाला नाही.  या देशात असा प्रकार याआधी कधीच घडलेला नाही, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि त्यादिवशी पासून अनेक प्रकारे हे सरकार पाडण्याचे काहींचे मनसुबे आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे.  जो भ्याड हल्ला केला गेला त्याच्या मागे कोण आहे? याच्या त्या मागचा बोलविता धनी कोण आ

#Dound/Yavat:दौंड येथे किरीट सोमय्यांच्या विरोधात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

Image
   महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप किरीट सोमय्यांविरुद्ध  राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणेबाबत शिवसेना आक्रमक  युद्धनौका आयएनएस विक्रांत च्या नावावर लोकांकडून जमा केलेल्या पैशाचा अपहार प्रकरणी दौंड शिवसेना आक्रमक झाली असून, आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी माजी खासदार भाजपा नेता किरिट सोमय्या याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणेची मागणी दौंड शिवसेनेचे वतीने करण्यात आली.  याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी दौंड शिवसेनेच्या वतीने  पोलीस निरीक्षक दौंड यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेनेच्या वतीने दौंड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर  किरीट सोमय्या यांचे प्रतिमेला “ जोडे मारो “ आंदोलन करून  करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आयएनएस विक्रांत  नावे ५६ कोटी रुपये गोळा करून जनतेला आणि देशाला फसवणाऱ्या महाराष्ट्रद्रोही , देशद्रोही किरीट सोमय्या अटक करून तुरुंगात जाई पर्यंत शिवसैनिक गप्प  बसणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकाकडून देण्यात आला. आयएनएस विक्रांत भंगारात निघू नये, असं सांगत किरीट सोमय्या यांनी लोकांकडून माजी सैनिकांनीकडू

#Solapur:पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - सोलापूरच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार करण्यात आला पत्रकार सुरक्षा समितीच्या नूतन जिल्हाध्यक्ष सुवर्णा सुना व सोलापूर शहर कार्याध्यक्ष  (महिला विभाग )डॉक्टर अलका सोरटे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, प्रदेश सचिव डॉक्टर अशिष कुमार सुना, सोलापूर जिल्हाध्यक्ष वैजिनाथ बिराजदार, संघटक दत्तात्रय पवार, उपाध्यक्ष सादिक शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा, सचिव रिजवान शेख, सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे, उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा, शहर संपर्क प्रमुख खटावकर, शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद, विजय चव्हाण, बळीराम पवार, युनूस अत्तार, इम्तियाज अक्कलकोटकर, अशोक ढोणे  इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

#Chiplun:आंबव पोंक्षे ग्रापंचायतीमार्फत स्वच्छतापुरक गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे ग्रापंचायतीमार्फत प्रत्येक कुटुंबाला १५ व्या वित्त आयोगातील निधी खर्च करुन स्वच्छता पूरक अशा गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये ४३३ कुटुंबाना प्रत्येकी ५ वस्तू देण्यात आल्या.यामध्ये हॅन्डवॉश, सुपली,डसबिन,हारपीक, टूथपेस्ट आदीं वस्तूंचा समावेश आहे. या वाटपावेळी सरपंच सौ प्रिया सुवरे,उपसरपंच शेखर उकार्डे,ग्रामसेवक व्ही एम दडस,ग्रामपंचायत सदस्य मंगेश मांडवकर,विद्या पकडे,दीपाली कुडतडकर,स्मिता सुतार,संजय भुवड,निधी भायजे आदी तर गोविंद पकडे,संजय पकडे,शांताराम घडशी,बाळू भायजे,यशवंत घडशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.

#Satara:शिंगणापूर यात्रेत वीज वितरण विभागाचा खेळखंडोबा

Image
  नियोजनाचा अभाव महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा सुरू असतानाच वीज वितरण कडून दुरुस्ती व विजकनेक्शन देण्याच्या कारणास्तव वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वीज वितरण विभागाच्या नियोजनाअभावी शिंगणापूर यात्रेत वीजपुरठयाचा खेळखंडोबा होत असून भाविकांसह स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. शिंगणापूर यात्रेपूर्वी वीज वितरण विभागामार्फत यात्रापरिसरात सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी दुरुस्तीची कामे केली जातात. तसेच यात्रेसाठी येणाऱ्या स्टॉलधारकांना तात्पुरती विजकनेक्शन दिली जातात. त्यासाठी काहीवेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र यावर्षी विजवीतरणचे कर्मचारी विजकनेक्शन व दुरुस्तीच्या कारणास्तव वारंवार वीजपुरवठा बंद करत आहेत. व्यावसायिकांना विजकनेक्शन देताना सलग तीन-चार तास वीजपुरवठा खंडित करून एकाच वेळी वीज कनेक्शन देण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र  वीज  वितरण कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने यात्रा परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने यात्रेतील पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे, तर मं

#Yavat:माजी विद्यार्थ्यांकडून केलेल्या कामाचे नागेश्वर विद्यलयाला लोकार्पण

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप रयत शिक्षण संस्थेचे नागेश्वर विद्यालय व कै मधुकरराव गंगाजीराव शितोळे उच्च माध्य. विद्यालय पाटस मध्ये दहावी बॅच १९८८  ने ३ लाख रुपये खर्च करुन रविवार दि (३)रोजी ५०० स्क्वेअर फुट व्हरांडा बांधुन दिला या कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागिय अधिकारी किसन रत्नपारखी साहेब,संस्थेचे जनरल बॅाडी सदस्य नामदेवनाना शितोळे,स्कुल कमिटी सदस्य योगेंद्रबाबा शितोळे व सितारामतात्या भागवत,सरपंच सौ.अवंतिकाताई शितोळे,सत्वशिलभाऊ शितोळे,प्रशांततात्या शितोळे,छायाताई भागवत,मेमाणे सर आणि १९८८ बॅचचे सर्व माजी विद्यार्थी व रयत सेवक  बहुसंख्येने उपस्थित होते. संस्था पदाधिकारी,ग्रामस्थ,माजी विद्यार्थी,पालक व सर्व सेवक हीच प्रत्येक शाळेची सर्वात मोठी ताकद असते. हे १९८८ बॅचचे दाखवून दिले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  

#Yavat:यवत येथील पी. एम. पी.एल बस स्टॉप भर उन्हात

Image
  महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पुणे सोलापुर महामार्गावरील यवत ते हडपसर. सासवड. पुणे शहर देहू आळंदी पर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना यवत येथे बस स्थानकावर भर उन्हात उभे राहुन उन्हाचे चटके सहन   करतात.तर दुसरीकडे दैनिक पास ७० रुपये व मासिक.पास १४००.रु. चे पास बंद केले आहे दि.०१/०४/२०२२. पासुन बंद करण्याचा निर्णय घेऊन तिकिट दरात कि.मी. प्रमाणे वाढ करण्यात आली आहे.  यवत येथून हडपसर, पुणे शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना बस थांब्यावर सावली  करण्याची आवश्यकता आहे.  त्यामुळे प्रवाशांना उन्हात थांबावे लागत आहे. यवत, खोर खुटबाब, भांडगाव, उंडवडी   व यवत परिसरातील   प्रवासी नोकरी उद्योग व्यवसायासह इतर विविध कामांसाठी पुणे शहराकडे पी.एम.पी.एल. बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यां मुलांची संख्या देखील अधिक आहे. यवत येथे  पी एम पी एल बस स्टॉपवर सतत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे यवत  येथून दररोज जास्त  प्रवाशांची वाहतूक होते . त्यामुळे बसथांब्या जवळ प्रवाशांची गर्दी दिसून येते. या ठिकाणी पिण्याचे पाणी ची सोय व्हायला हवी असे प्रवासी वर्गाकडून मागणी होत आहे  इतर नाहक गाड्या

#Natepute:धर्मपुरी केंद्र शाळेत गुडी पाडवा-पट वाढवा मोहीमेअंतर्गत प्रवेशोत्सवाचे आयोजन..

Image
                महादरबार न्यूज नेटवर्क - विवेक खरात गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर केंद्र शाळा धर्मपुरी येथे सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी प्रवेशोत्सवाचे आयोजन केले होते.                                                नुकतेच शासनाने इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाळापूर्व तयारी चा सर्व शिक्षकांचा मेळावा घेऊन पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी चांगली व्हावी या हेतूने   सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविका यांना  प्रशिक्षण दिले होते.   या नियोजनबद्ध प्रशिक्षणाचे आयोजनही धर्मपुरी केंद्रात चांगले झाल्याचे दिसले.   गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर आपण गुडी उभारुन हा सण  साजरा करतो,शाळेत दाखल होणाऱ्या चिमुकल्या बालकांच्या आयुष्याच्या दृष्टीने त्यांना शाळेत दाखल करुन त्यांच्या शैक्षणिक प्रगती ची गुडी उभारण्याचा कार्यक्रम   या मुहूर्तावर शाळेत  अतिशय उत्साहात  पार पडला.                                                  या प्रवेशोत्सवात ६ वर्ष पूर्ण असणाऱ्या १६ बालकांनी पहिल्याच दिवशी प्रवेश घेतला.त्यांचे सोबत त्यांचे

#Chiplun:पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री स्कूल आॅफ आर्टला दिली सदिच्छा भेट

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव        चिपळूणमधील सावर्डे येथे  मा.युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या चिपळूणमधील सावर्डेतील सह्याद्री स्कुल ऑफ आर्टला भेट दिली. येथील विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संवाद साधला. तसेच स्व. माजी खासदार गोविंदरावजी निकम यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे लोकप्रिय आमदार शेखर निकम पर्यावरण मंत्री युवा नेते आदित्य ठाकरे साहेब यांचे स्वागत केले.यावेळी पालकमंत्री अनिल परब साहेब ,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत साहेब ,शिवसेना नेते लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव ,पवन जाधव ,बाळासाहेब कदम , सरपंच समीक्षा बागवे ,उपसरपंच जमीर मुल्लाजी, बाबू शेठ चव्हाण ,अजित कोकाटे बाळू शेठ मोहिरे ,संदीप सावंत,संदीप राणे आदी उपस्थित होते.

#Chiplun:चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Image
मौजे कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक व परिसर सुशोभिकरणासाठी  ५ कोटीचा निधी मंजूर महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव              चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील संगमेश्वर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते या पवित्र ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक स्मारक संग्रहालय व अभ्यासकेंद्र उभारण्याचे काम मागील कित्येक दिवस प्रस्तावित होते.  मध्यंतरीच्या काळात निधीअभावी हे काम रखडले होते. इमारतीची पूर्तता, बंदिस्तीकरण, आवार सुशोभिकरण, शिवकालीन वस्तू संग्रहित करुन त्यांचे जतन करणे, महाराजांच्या जीवनावरील महत्वाच्या प्रसंगांचे सादरीकरण तसेच महाराजांच्या जीवनावरील लेखन साहित्य संग्रही करुन ते अभ्यासकांसाठी उपलब्ध करणे, नवीन बदललेल्या राष्ट्रीय महामार्गापासून जोडरस्ता करणे इत्यादि कामांची पूर्तता करणे या सर्व कामासाठी निधीची आवश्यकता होती. हा निधी तातडीने उपलब्ध व्हावा अशी शिवप्रेमींची व ग्रामस्थाची सतत ची मागणी होती. त्यांच्या  मागणीनुसार आमदार शेखर निकम यांनी यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री यांचेकडे सतत