Posts

Showing posts from May, 2023

#Natepute:धर्मवीर आनंद दिघे उद्यानासाठी दोन कोटी निधी सह विविध विकास कामांची हिवरकर पाटील यांची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  यांच्याकडे माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत  व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे नेते शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस  शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई मंत्रालयात जाऊन निवेदन देण्यात आले. निवेदनात नातेपुते नगरपंचायत हद्दीत धर्मवीर आनंद दिघे उद्यानासाठी २ कोटी रुपयांचा निधी, माळशिरस येथील तालुका कृषी  कार्यालय इमारत बांधण्यासाठी २ कोटी, फडतरी रोड कॅनॉल चौकी ते चिंधादेवी नातेपुते शिंगणापूर रस्ता  शंभू महादेव कावड रस्ता सुधारणा करणे ०-०० ते २किमी अंदाज रक्कम ८०  लक्ष, दहीगाव कुरबावी रस्ता ते ५२ चाळ ०० ते ३_००की .मी सुधारणा करणे अंदाजे रक्कम ६० लाख रुपये, नातेपुते फोंडशिरस रस्ता राऊत वस्ती फाटा क्रमांक ४६ लगतचा रस्ता सुधारणा करणे ०-० ते २-००किमी अंदाजीत रक्कम ४० लक्ष, दहिगाव फोंडशिरस रोड ते गोरे वस्ती रस्ता सुधारणा करणे ०-०ते १.५००कि मी.अंदाजे रक्कम २० लक्ष, नात

#Malshiras:तरंगफळ येथे विविध कार्यक्रमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्रामपंचायत मधील प्रतिमेला सरपंच सौ पदमीनी नारायण तरंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.        महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायत मधील दोन कर्तबगार सामाजिक महिला कार्यकर्त्यां यांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रधान करण्यात आले.       यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी श्री संतोष पानसरे भाऊसो, उपसरपंच पांडुरंग कांबळे, सदस्य जगुबाई जानकर, अश्विनी बोडरे, राघूबाई तरंगे, जयश्री तरंगे, भगवान तरंगे, रावसाहेब कांबळे, नारायण तरंगे,विक्रम बागाव, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर, कार्यावर नागनाथ साळवे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर अनेक नागरी सत्कार करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार     श्रीमती जगुबाई मारुती जानकर      श्रीमती मनीषा रामचंद्र गेंड ग्रामपंचायत व ग्रामस्थ या

#Natepute:डॉ.बा.ज. दाते प्रशाला व नातेपुते कनिष्ठ महाविद्यालय नातेपुते मध्ये २५ वर्षांनी भेटले जुने वर्गमित्र

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते येथील डाॅ.बाळकृष्ण जयंवंत दाते प्रशाला नातेपुते येथे शिक्षण घेतलेल्या तत्कालीन विद्यार्थ्यांचा अकरावी,बारावीचे, वर्ग 25वर्षांनी भरला. तत्कालीन शिक्षकांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थीही आठवणीत रममाण झाले. यावेळी दैवतासमान शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते  सन्मान करुन गौरविण्यात आले. कामाची पावती असल्याने भावना आले. शिक्षकांनी व्यक्त केली. मे महीन्याच्या सूट्टीमूळेच विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी २५ वर्षांनी विविध शहरातून सर्व जुने वर्गमित्र -मैत्रिणी ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेच्या प्रांगणामध्ये एकत्र आले होते. यावेळी खूप वर्षानी भेटल्याने काही चेहरे सूरूवातीला अनोळखी वाटले,परंती काही वेळाने ,जून्या आठवणीत सर्वजण रममाण झाले,हा माझा वर्ग,हा माझा बेंच,एकमेकासोबत एकञच खाल्लेवा जेवणाचा डबा,दंगा मस्ती,शिक्षकाॅनी केलेली शिक्षा, अशा आठवणीत दिवस कसा गेला समजले नाही. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली यावेळी प्राचार्य एम.बी. होळ सर तसेच सी. एल.

लोकमाता , राजमाता , विरांगना, पुण्यश्लोक , देवी , गंगाजल निर्मळ , मातोश्री , कुशल राज्यशासक - अहिल्या देवी होळकर .......

Image
राजामाता पुण्यश्लोक आहिल्या देवी   होळकर यांची ३१ मे रोजी जयंती आहे . या जयंती निमत्त विनम्र अभिवादन ! अहिल्यादेवी यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चौंडी ता - जामखेड जिल्हा अहमदनगर येथे झाला . त्याचा कार्यकाळ १ ७६७ ते १७९५ होता . त्या शुरवीर खंडेराव होळकर यांच्या पत्नी व सुभेदार मालेराव होळकर यांच्या मात्रोश्री होत्या . मुत्सद्दी अहिल्यादेवी म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होती . लोककल्याणकारी कार्य करत असताना त्यांनी प्रदेशाची मार्यादा न ठेवता संपूर्ण भारतात काम केले . त्याचे कर्तृत्व , काम, जनतेविषय आदर , सदभावना , प्रत्येक गरीबांना जास्तीत जास्त सुखाने जगता यावे ह्या साठी सतत तळमळ , धर्मनिरपेक्षता ' लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती, दया शमा शांती, या अजरामर कर्तृत्वासाठी जनतेने त्यांना लोकमाता , राजमाता, विरांगणा पुण्यश्लोक , देवी , गंगाजळ निर्मळ, कुशल प्रशासक राज्य शासक, मातोश्री ह्या पदव्या जनतेने दिल्या आहेत . कुठलाही पदवीदान समारंभ न घेता या पदव्या दोनशे वर्षे ठिकून आहेत . त्याच्या या जयंती निमित्त .त्याच्या कार्याचा स्मरण होऊन कृतीत उतरविणेसाठी त्यांच्य

#Natepute:रचना जाधव यांची अधिकारी पदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - धर्मपुरी ता.माळशिरस येथील रचना किशोर जाधव हिची राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतुन भूमि अभिलेख अधिकारी या पदावर निवड झाली आहे      रचना जाधव हिचे५ते१०वी चे शिक्षण नातेपुते येथील डाॅं.बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला येथे झाले असून प्रशालेत एक हूशार मूलगी म्हणून तिची ओळख होती तिला,इ.७वी स्काॅलरशिप मिळाली होती.           कोरोना काळातील दोन वर्ष वाया गेली होती,त्यामूळे राज्यसेवा परीक्षेचा निकाल उशिरा लागला असुन तिची भूमिअभिलेख पदावर निवड झाल्यामूळे  तिचे सर्वञ कौतूक होत आहे. तिच्या आई वडीलांनी प्रोत्साहान दिल्यामूळे तीने या पदावर गवसणी घातली.

#Baramati:आयुष्यात कष्टाला नेहमी चांगले फळ मिळते - किशोर कुमार शहा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड व सत्यमेव अकॅडमी बारामती यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या पोलीस भरती स्पर्धेच्या निकालानंतर बारामती तालुक्यातील विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांची पोलीस पदी निवड झाली आहे. अशा जवळपास 70 विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी एमआयडीसी शाखेत करण्यात आला. यावेळी श्री किशोर कुमार शहा बोलत होते.ते म्हणाले माणसाने आपल्या आयुष्यात योग्य दिशेने कष्ट घेतल्यास व जिद्दीने येणाऱ्या संकटांना सामोरे गेल्यास यश मिळतेच. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठीवर शाबासकीशी थाप देण्यासाठी बारामती  उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे हे देखील उपस्थित होते. यावेळी सदर कार्यक्रमासाठी सत्यमेव करिअर अकॅडमी चे संचालक श्री शरद नामदे,संतोष जगताप श्री गव्हाणे सौ सुळ मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी क्लस्टर मॅनेजर श्री दीपक वाबळे, अमोल पात्रे, कुमार राठोड, राहुल घोरपडे यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे नियोजन सागर मदने यांनी केले. सूत्रसंचालन व आभार धनंजय माने यांनी केले.

#Mumbai:नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या चौकशीचा अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाकडून नगर विकास विभागाकडे वर्ग

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते नगरपंचायत चे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची निवेदनात दिलेल्या मुद्द्यानुसार सखोल चौकशी करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव साहेब यांच्याकडे लेखी स्वरुपात केली होती. मुख्य सचिव साहेबांनी सदर प्रकरणाची त्वरित दखल घेणे अपेक्षित होते.परंतु तसे न झाल्याने माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागली.माननीय मुख्यमंत्री कार्यालयाने लगेचच दखल घेत नगर विकास विभागाकडे पुढील योग्य कार्यवाही साठी प्रकरण तात्काळ पाठवले.परंतु नगर विकास विभागाने याबाबत कोणतीच पुढील कारवाई न केल्यामुळे मा.मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे नगर विकास करत असलेली टाळाटाळ याबाबत कल्पना दिली असता.मा.मुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यालयाने नगर विकास विभागाला पुन्हा कारवाई बाबत सूचना केल्या आहेत. नातेपुते नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांची सखोल चौकशीतील मुद्दे  आदरणीय राज्यपालजी यांच्या आदेशांचे पालन व त्यानुसार अंमलबजावणी करताना नगरपंचायत चे मुख्याधिकारी दिसत नाहीत.नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी केंद्र व राज्य शासनाचे अ

#Yavat:थोरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरल्या तर पर्यावरणाच्या प्रदूषणास मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असे मत भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. भाऊसाहेब ढमढेरे ह्यांनी आज( २८)रोजी खुटबाव येथे व्यक्त केले. पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप देण्यात आला. ह्या निरोप समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते. ह्या उपक्रमाच्या संयोजिका प्रा. योगिता दिवेकर ह्यांनी कापडी पिशव्यांच्या वापराबाबतची संकल्पना स्पष्ट केली. वैष्णवी बंड, कीर्ती बधे, आकाश कोळपे, ओंकार सुतार, सूरज शेळके, कार्तिकेय कोंडे तसेच इतर अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला.         कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पल्लवी तांबोळी ह्यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जगदीश आवटे हे होते. सुकन्या अवचट व साई दीक्षित ह्यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. तेजस टेंगले ह्यांनी आभार मानले.

#Yavat:आठवडे बाजारला उन्हाचा फटका !

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत ,वरवंड येथील असणाऱ्या आठवडे बाजारात उन्हाचा तडका बस्तान दिसत आहे. यवत पुणे सोलापूर महामार्गावरील मोठे गाव आहे .या गावातील बऱ्याच वर्षापासून आठवडे बाजार हा भरत आहे परंतु वाढणाऱ्या तापमान मुळे  असणारा आडवडे बाजारात  नागरिकांची गर्दीत तुरळक दिसत आहे. नागरीक उन्हामुळे दुपारी घराबाहेर येत नाहीत त्यामुळे  बाजारलातील व्यापारी लोकांना फटका बसत आहे दुपारच्या उन्हामुळे नागरिक बाहेर पडत नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होते.आर्थिक उलाढाल मोठी  होत असते. काही जणांचे आठवड्यातचे व्यवहारीक गणित यावर अवलंबून असते . यवत परीसरत  हा मोठा भरणारा बाजार आहे.सांयकाळी ६ नंतर नागरिक बाहेर पडतात व ८ पर्यंत  थोडीफार गर्दी होत असते. यवत येथील बाजारातील भेळ सर्वत्र फेमस आहे परन्तु त्याना पण उन्हाचा फटका बसत आहे . फळ भाजी पाला व इतर दुकानांना  तापमान वाढीचा फटका बसत आहे.  जास्त ऊन सकाळी ११ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असते त्याचा परिणाम भाजी फळ कापड, ,धान्य , विक्रेते यांना यांना बसत आहे. असल्याने ,संध्याकाळपर्यन्त भाजी सुकतात त्या विकण्यासाठी विक

#Natepute:चला पंढरीसी जाऊ।जीवीच्या जिवलगा पाहू - ह .भ. प श्रीराम महाराज भगत नातेपुतेकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - आषाढाची चाहूल लागली की वारकऱ्याची अवस्था माझ्या  जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले !! खांद्यावर भगवी पताका घेत मुखात श्री विठ्ठलाचे नाम आणि ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माउली तुकाराम असा जयघोष करत विठ्ठल भक्तीचा चैतन्य सोहळा सुरु होतो,माऊली माऊली उच्चारणाने मनःशांतीचा लाभ होतो. पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे लाभलेले सांस्कृतिक ऐश्वर्य आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व इतरही राज्यातून भाविक वारकरी वारीमध्ये सहभागी होतात, वातावरणात चैतन्य निर्माण होते आ​णि प्रत्येक भाविकाला वेध लागतात ते पंढरपूरचे डोळ्यांपुढे विठूमाऊलींची मूर्ती उभी राहते अन् पाय आपोआप वारीच्या मार्गाकडे वळतात.पालखी प्रस्थान त्याआधीच वारकरी आपल्या गावातून रवाना झालेले असतात पिढ्यान् पिढ्या वारीत जाण्याची परंपरा आहे.लाखो विठ्ठलभक्त पंढरीचे विठ्ठल दर्शन हाच त्यांच्यासाठी वर्षातील सर्वोच्च सण आणि परमानंदाचा क्षण मानतात वारीच्या दिवसांत संसाराच्या सुखदुःखाच्या गोष्टींना विसरत संसार आणि व्यवहाराची काळजी गुंडाळून ठेवत हे भाविक पंढरीची वाट धरतात, हा आनंदाचा स

#Natepute:राजकुमार हिवरकर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नातेपुतेतील जुन्या पालखी मार्गासह विविध कामांना मंजुरी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते मधून जाणाऱ्या जुना पालखी मार्ग तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील  यांच्या कारकिर्दीत रस्त्याच्या मध्यभागापासून (डिव्हायडर) पासून उजव्या बाजूला ३० मीटर व डाव्या बाजूला ३० मीटर या पद्धतीने झाला होता सदर रस्ता त्याच पद्धतीने रुंदीने करावा याबाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून जुन्या पालखी मार्गाला मंजुरी सह विविध मागण्यांना यश आले असून जुन्या पालखी मार्गाचे लवकरच पहिल्यासारख्याच रुंदीने डांबरीकरण होणार असल्याचे माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी नातेपुते येथील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत सांगितले जुन्या पालखी मार्गासह विविध कामाच्या मागण्या मंजूर झाल्याबद्दल प्रोजेक्ट मॅनेजर किशोर घोडके यांचा तालुका शिवसेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. जुन्या पालखी मार्गासह ब्रिटिश कालीन जुना मांडवे रस्ता  बंद न करता त्याला सिग्नल लावून स्पीड ब्रेकर करून तो नागरिकांसाठी बायपास चौकातून खुला करण्यात आलेला आहे पुरंदावडे गावांमध्ये ग्रामीण रुग्णालयात जा

#Varvand:यवत ते वरवंड दरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर खड्डे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर    पुणे सोलापूर हा मार्ग राष्ट्रिय माहमार्ग  वर  सर्व प्रकारच्या लहान व मोठ्या  वाहनाची  वाहतूक जास्त प्रमाणात आहे. पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील सेवा मार्गावर यवत व वरवंड हदीत लहान मोठे खड्डे झाले आहेत. वरवंड या गावातील  दक्षिणेला हा मार्गवर  मोरी लागतच खड्डे आहेत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी काही दिवसाच्या अंतराने यवत, वरवंड  मुक्कामी या ठिकाणी येणार आहे व सेवा मार्ग असे खड्डे असताना वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे तरी प्रशासनाने  गोष्टीकडे लक्ष धवे . पाट्स येथील टोल कम्पनी  प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मागील काही दिवसात या खड्डयामुळे  दुचाकी स्वरांचे लहान अपघात झाले आहेत. यामुळे पुढील काळात या मार्गावरील खड्ड्यांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, टोल प्रशासन वार्षिक जमा खर्चात वर्षाकाठी महामार्ग देखभाल व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, पण महामार्गावरील दु

#Yavat:यवत परिसरामध्ये मराठा वनवास यात्रेचे उत्साहामध्ये जंगी स्वागत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुक्याच्या वतीने वनवास यात्रेचे स्वागत करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यवत सहभागी  सहभागी झाले . तत्पूर्वी २१रोजी. वरवंड, तालुका दौंड या गावात भव्य कॉर्नर सभा पार पडली. ५०% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण ही भूमिका समाजात सर्वमान्य होत आहे. मराठा समाजाला या एका मागणीवर एक मुखाने एकत्र आणण्यासाठी आम्ही वनवास यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या २४ तारखेला वानवडी येथे आणि २५ तारखेला लाल महाल येथे सभा याप्रमाणे मराठा वनवास यात्रा पुणे शहरात असेल.  रात्री एक ओबीसी नेते सभेत बोलले. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थन केले. पण ते ५०% च्या वरची भाषा बोलून गेले. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सर्वच नेत्यांना काही गोष्टी समजाऊन सांगण्याची संधी मिळाली यवत येथे दि २१ रोजी रात्री एक ओबीसी नेते सभेत बोलले. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थन केले. पण ते ५०% च्या वरची भाषा बोलून गेले. समस्त गावकऱ्यांच्या वतीने संध्याकाळी जेवणाचा कार्यक

#Chiplun:आमदार निकम यांच्यामुळे मिळाली आरती निराधार सेवा फाउंडेशनला आर्थिक मदत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम येथे आरती निराधार सेवा फॉउंडेशन दिव्यांग मुलांचे व वृद्धांचे वासतिगृह आहे. येथे निराधार मुलांचे व वृद्धांचे काळजीपूर्वक संगोपन केले जाते, राहण्याची उत्तम सोय तसेच आणि आधार दिला जातो. या फाऊंडेशन चे समाजकल्याणकारी कामाला आपल्या कडून मदतीचा हात मिळावा यासाठी ही बाब रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे व संचालक मंडळ यांच्या समोर मांडली. याचा विचार करुन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आरती निराधार सेवा फॉउंडेशन यांस रु. ५०,०००/- ची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी आरती फॉउंडेशन चे संस्थापक सौ. अनिता नारकर, श्री. आत्माराम नारकर, नाम जोशी, माजी प. स. सभापती , संगमेश्वर सुजित महाडीक, माजी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मीनल काणेकर, बँक कर्मचारी नरेश कदम, प्रतीक चव्हाण आदी उपस्थित होते.

#Chiplun:आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नाने विठ्ठल खरात यांना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक मदत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव खडपोली येथे १७  एप्रिल रोजी विठ्ठल खरात यांचे वास्तव्य असलेले घर व दोन गोठे आगीत जळून खाक झाले. यामध्ये विठ्ठल खरात यांचे खूप मोठे नुकसान झाले. विठ्ठल खरात यांच्या घराला  व गोठ्याला आग लागलेल्याची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी प्रत्यक्ष खडपोली गावात जाऊन पाहणी केली. झालेले नुकसान पाहता तात्काळ स्वतः मदतीचा हात दिला व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे आणि संचालक मंडळ यांना घटनेबद्दल सूचित केले व आज जिल्हा मध्यवर्ती बँक, रत्नागिरी यांच्या माध्यमातून १०,०००/- धनादेश आर्थिक मदत स्वरूपात विठ्ठल खरात यांना देण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मीनल काणेकर, बँकेचे कर्मचारी नरेंद्र कदम, प्रतीक चव्हाण, चिपळूण धनगर समाजाचे ग्रामस्थ शांताराम येडगे, शंकर खरात, महादेव खरात, सुरेश गोरे, कृष्णकांत गोरे, लक्ष्मण येडगे, खतीफ परकार, आदी उपस्थित होते.

#Yavat:विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावा तब्ब्ल २१ वर्षांनी भरला

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप माटोबा विद्यालय नाथाचीवाडी(ता.दौंड) च्या सण २००२ च्या दहावीच्या  विद्यार्थ्यांचा तब्ब्ल २१ वर्षांनी एकत्र येत स्नेह मेळावा मेहेर रिट्रीट खुटबाव याठिकाणी (दि.१९)रोजी पार पडला. सर्वप्रथम राष्ट्रगीताने वर्गाची सुरवात झाली. प्रार्थना म्हणत परिपाठ घेण्यात आला, त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यान्ची हजेरी घेण्यात आली. एकवीस वर्षांनी विद्यार्थी भेटत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला त्यानंतर सरस्वती प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विष्णूदास दरेकर म्हणाले की खरे तर आमच्यासाठी हा सुखद धक्का आहे विशेष म्हणजे आमच्या बरोबर उपस्थितामध्ये आमचे काही माजी विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत अनेक दिवसांनी एकत्र आल्याचा आनंद आहे.सर्वांसाठी हा क्षण आनंदाचा अविस्मरणीय क्षण आहे. यापुढे दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा व्ह्यावा असे वाटते. त्यानंतर शाळेच्या माजी विद्यार्थी वृषाली खंडाळे हिने चंद्रा गाण्यावरील लावणी सादर करत शाळेत १५ ऑगस्ट,२६ जानेवारीला अग्रक्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्त

#Yavat:खाण क्रेशर उद्योगास खोर ग्रामस्थांचा विरोध- सरपंच वैशाली अडसूळ

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप चविस्ट आणी मधुर अंजीर फळ उत्पादनासाठी तालुक्यासह जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या खोर येथे होऊ घातलेल्या खाण क्रेशर उद्योगास ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठरवाद्वारे प्रचंड विरोध झाल्याचे सरपंच वैशाली अडसूळ यांनी नमूद केले आहे. यासह खोर ग्रामपंचायत अस्तित्वात असे पर्यंत खोर गाव आणि परिसरात खाण  क्रेशर उद्योग ,वाळू ,मुरूम आणि माती उपसा हे अवैध धंदे गावात सुरू करू देणार नाही. असा विधायक ठराव यावेळी मंजूर करण्यात आला आहे. खोर ग्रामपंचायत सर्वसाधारण सभा सरपंच वैशाली अडसूळ यांचे उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत  खोर परिसरात आशिष अशोक  काळभोर यांना शेत जमीन गट नम्बर ७७८ मध्ये खाण क्रेशर, व मालवाहतूक व्यवसाय माजी सरपंच सुभाष चौधरी  यांचे कार्यकाळात २६ जानेवारी २०१८ च्या ग्रामसभेत एकमताने ठरवाद्वारे  महाराष्ट्र् प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी पुणे आणि तहसीलदार दौंड यांची रीतसर परवानगी घेऊन क्रेशर व्यवसाय सुरू करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे काळभोर यांनी कळविले होते. त्यानुसार काळभोर यांनी ग्रामपंचायत पत्राप्रमाणे रीतसर परवानग्या घेऊन खडी क्रॅशरचे क

#Chiplun:नमन व जाखडी सारख्या कलाप्रकारांना अनुदान व पेन्शन योजना लागू करावी - आ. शेखर निकम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव कोकणात प्रसिद्ध असणाऱ्या खेळे, नमन व जाखडी सारख्या कलाप्रकारांना उर्जितावस्था देण्यासाठी त्यांना अनुदान देण्यात यावे व कलाकारांना पेन्शन योजना सुरू करावी अशी मागणी कोकणचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी कला व सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली असून त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य) यांना प्रस्ताव सादर करावयास सांगितले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये लोककला अभिजात कलासंस्कृतीचे दर्शन अखिल जगाला घडवितात. त्या कला संपुष्टात येऊ नयेत, बदलत्या काळाशी संघर्ष करत त्यांना तग धरता यावा यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे.      राज्यातील सांस्कृतिक व पारंपारीक कलेची लोकांना माहिती व्हावी तसेच त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्यात नाट्यसंगीत, नाट्य, चित्रपट, तमाशा फड, हंगामी तमाशा फड, लावणी कलापथक, दशावतार मंडळ, खडीगंमत कलापथक व शाहीरी पथके इ. ना अनुदान दिले जाते. मात्र मध्य कोकणातील खेळे, नमन व जाखडी या कलाप्रकारांना अनुदानाचा लाभ मिळत नाही. खेळे, नमन व जाखडी हा कलाप्रकार कोक

#Natepute:Dr. Nitave’s ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची सी. बी. एस. ई. दहावीचा निकाल १०० टक्के

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मोरोची तालुका माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित Dr. Nitave’s “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची”. शाळेचा सी.बी.एस.ई. बोर्डाचा निकालशंभर टक्के लागला. सी.बी.एस.ई. बोर्डाची मार्च महिन्यात परिक्षा घेण्यात आली होती. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची या शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राहीली या वर्षीही इयत्ता दहावी चा १०० टक्के निकाल लागला. शाळेतील टॉप फाईव यशस्वी विद्यार्थी अनुक्रमे 1). आदित्य जयकुमार ढाळे 87.4 % 2). हर्ष विजय निकम      84.6% 3). दिपक संतोष कर्चे    73.6 % 4). सुजित विजय कर्चे    71.4 % 5). संस्कार दिपक कदम  71.2 % गुण मिळवले. संस्थेचे चेअरमन मा. डॉ.दत्तात्रय निटवे सर, सेक्रेटरी डॉ. योगिता निटवे मॅडम,  संस्थेचे संचालक , विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर उपप्राचार्य जीलानी आतार सर , वर्गशिक्षक गणेश राऊत सर व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मोरोची व परिसरातील लोकांकडून व पालकांकडून ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन तसेच सर्व शिक्षक यांनी चांगले लक्ष देऊन शाळेचा निकाल

#Yavat:हवेली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर, उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दि १७ रोजी लोणी काळभोर येथे मराठी पत्रकार परिषद, मुंबई व पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ संचलित हवेली तालुका पत्रकार संघाची नविन कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने हवेली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश निकाळजे तर उपाध्यक्षपदी स्वप्नील कदम यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस.एम. देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांच्या सुचनेनुसार विभागीय सचिव अरुण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नव्या कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली. हवेली पत्रकार संघाची कार्यकारिणीची नियुक्ती बुधवारी हॉटेल एस.फोर.जी. थेऊर फटा, सोलापूर हायवे येथे पार पडली. यावेळी रमेश निकाळजे यांची अध्यक्षपदी, तर स्वप्नील कदम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. त्याच बरोबर इतरही निवडी जाहीर करण्यात आल्या. कार्याध्यक्षपदी विकास काळभोर, कोषाध्यक्षपदी अक्षय दोमाले, पत्रकार हल्ला कृती समितीपदी दिगंबर जोगदंड यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनीत जैनजागडे, रुपालीताई काळभोर, मंगल बोरावके, मिलन

#Yavat:महेश पासलकर शिवसेना जिल्हाप्रमुख (ठाकरे गट) यांचा शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -   अक्षता हनमघर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाचे उपनेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत कुठेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने उद्धव ठाकरे गटाला एकही जागा दिली नाही. याउलट त्यांचे फोटो वापरून महाविकास आघाडीच्या नावाने निवडणुका लढल्या. या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकही जागा आपल्याला देण्यात आलेली नसताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराला येत होते. उद्धव ठाकरे गटाचे खच्चिकरण करून काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्याच्या या प्रकारामुळे व्यथित होऊन त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

#Bhor:२५ वर्षे मुलाप्रमाणे सांभाळलेल्या पाख-या बैलाचा तेरावा विधी केला थाटात

Image
गवडी (ता.भोर) येथे पाख-या बैलाच्या तेरावा विधी साठी जमलेले नातेवाईक आणि ग्रामस्थ महादरबार न्यूज नेटवर्क -  दिपक येडवे गवडी (ता.भोर) येथील प्रगतिशील शेतकरी बाजीराव रामभाऊ साळुंके यांच्या घरातील गाईचा बैल पाख- या  होता. बैलाने शेतीत केलेल्या काबाडकष्ट मुळे पाख- याचा तेरावा विधी थाटात करण्यात आला. बैलाचं आणि शेतकऱ्याचं अतुट नातं असतं शेतकरी आपल्या बैलांना जीवापाड जपतात.प्रेम करतात घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात, शेतकरी हा बैलांच्या भरोशावर शेती करतात. पण, तो बैलाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. पाख-या या लाडक्या बैलाचा माणसांप्रमाणे तेरावा विधी केला. २५ वर्षे मुलाप्रमाणे संभाळलेल्या कैलास बैलाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. विधिवत पूजा करून,१३ बैलजोडींना औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पुरणपोळी बैलांना खाऊ घातली.तसेच बैलांना मुरकी हा साज देण्यात आला,बैल मालकांना टाॅवेल टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तेराव्याला संपूर्ण गावाला   पुरणपोळीचे गाव जेवण देण्यात आलं. तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शे

#Malshiras:कै. नानासाहेब कर्णवर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -          गोरडवाडी (ता. माळशिरस)कै. नानासाहेब आबाजी कर्णवर-पाटील यांचे द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त कर्णवर परिवाराकडून भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर 17 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. एम. के. ईनामदार (M.D. MEDICINE) प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ यांच्या शुभहस्ते व  प्रमुख मा. डॉ. समीर बंडगर(MBBS, DNB, MEDICINE),मा..डॉ. शैलेश गायकवाड (MBBS, DNB, MEDICINE, मधुमेह तज्ञ), मा. डॉ. सोनाली वाघमोडे(बालरोग तज्ञ, कराड ),मा. डॉ. नितीन पाटील(नेत्ररोग तज्ञ, मानव सेवा हॉस्पीटल, पुणे) ,मा. डॉ. दत्तात्रय सर्जे (कान-नाक-घसा तज्ञ, माळशिरस) मा. डॉ. वर्षा रामचंद्र चौरे (पद्मा विश्वस्त व डेंटल सर्जन, मुंबई) मा. डॉ. आप्पासाहेब टेळे (नेत्ररोग तज्ञ, माळशिरस)मा. डॉ. सौ. दिपीका लेंभे(नेत्ररोग तज्ञ, मानव सेवा हॉस्पीटल, पुणे), मा. डॉ. अनिल पाटील, मा. डॉ. नितीन सिद ,मा. डॉ. नितिन वाघमोडे, मा. डॉ. पंकज नलवडे,मा. डॉ. मच्छिंद्र गोरड (MS),मा. डॉ. नितिन देवकाते,मा. डॉ. सचिन देशमुख मा. डॉ. बबन काळे (आयुर्वेदिक तज्ञ),मा. डॉ. सचिन केमकर,मा. डॉ.

Yavat:जागतिक परिचारिका दिन निमित्त यवत येथील पत्रकारांकडून परिचारकांचा सन्मान

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -   अक्षता हनमघर जागतिक परिचारिका दिना निमित्त यवत ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील परिचरिकांचा दौंड पत्रकार संघातर्फे शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय वैदकीय अधीक्षक   डॉ, बाळासाहेब कदम, डॉ,भूषण राक्षे , अधिपरिचरिका फरीन सयद, अंजली कदम, निलकमल कांबळे, हॉस्पिटल स्टाफ अंजुमन बागवान, अनुराधा जगताप, क्लार्क फुलचंद राख, कार्यलय अधिक्षक  शहाणे, नायर, भुजबळ, भोसले , खराडे, भानुसे, जेष्ठ पत्रकार एम, जी, शेलार, राहुल अवचट,  अनिल गायकवाड, मनोज खंडाले हे उपस्थित होते. एम,जी, शेलार यांनी सर्व परिचारिका याचा सत्कार करून वैदकीय क्षेत्रातील दीपस्तंभ फ्लॉरेन्स नाइन्टिंगल यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. स्वागत डॉ कदम यांनी तर आभार फुलचंद राख यांनी मानले. आमच्या नोकरी कालावधीत परिचारिका दिनी असा सत्कार पहिल्यांदाच होतोय याचा आनंद वाटत असल्याचे बागवान यांनी नमूद केले.

#Parbhani:मराठवाड्यातील जेष्ठ पत्रकार शेषेराव सोपने मामा,यांची पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा अध्यक्ष पदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क -            पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी, उत्कर्षांसाठी व न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन, उपोषण, निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून, या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कडून सोडवले आहेत. *जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना *राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी *यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती *राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता *प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा *पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना *अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे *पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे *पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे *खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी *पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर, पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून, अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून

#Natepute:गुरसाळे येथे महिला समितीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात

Image
नियोजनपूर्वक मिरवणुकीने तालुक्यात भीम कन्यांचे कौतुक महादरबार न्यूज नेटवर्क:- गुरसाळे (बौद्धनगर) ता. माळशिरस येथे  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती महिला एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन करून मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली २८  एप्रिल रोजी सुरू झालेली जयंती उत्सव ३० एप्रिलला भव्य मिरवणुकीने डॉल्बीच्या दणदणाटात भीमसैनिकांच्या जल्लोषात जयंती ची सांगता झाली . डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी महिला जयंती उत्सव समिती च्या वतीने  दि.२८ एप्रिल रोजी लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला २९ एप्रिल सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रमेश आढाव यांचे व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला व ३० एप्रिल रोजी सायंकाळी सात ते दहाच्या वेळेत सजवलेल्या रथामध्ये भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली डॉल्बीच्यॎ दणदणाटात भीमसैनिकांचा उत्साह ओसोंडून वाहत होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रिपाई चे ज्येष्ठ

#Yavat:अवयवदानाबाबत आघाडीवर जाऊया - प्रा. अक्षता थोरात

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप विविध प्रकारचे दान हे भारतीय संस्कृतीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असून आपल्या देशात आता अवयवदान ही संकल्पनासुद्धा लोकसंख्येप्रमाणेच प्रथम क्रमांकावर पोहचणे गरजेचे असल्याचे मत अवयवदान उपक्रमाच्या समन्वयक प्रा. अक्षता थोरात ह्यांनी खुटबाव येथे दि( ८) रोजी व्यक्त केले.  येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयातील अवयवदानविषयक जनजागृती सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रा. थोरात ह्यांनी ह्यावेळी अवयवदानाच्या बाबतीत भारतातील वास्तव परिस्थितीचा आढावा सादर केला. श्रीलंकेसारखा छोटा शेजारी देश नेत्रदानाच्या बाबतीत आघाडीवर असून शिल्लक असलेल्या डोळ्यांची जगात निर्यात करतो. परंतु आपल्या देशात मात्र अनेक गरजूंना नेत्रदानाअभावी ही सृष्टी पाहता येत नाही. त्यामुळेच जगातील सर्वात जास्त अंध व्यक्तींच्या संख्येत भारत आघाडीवर असल्याची खंतही त्यांनी ह्यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अवयवदानविषयक पोस्टर्सच्या प्रदर्शनाने अवयवदानविषयक जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ ह्यावेळी करण्यात आला. ह्या सप्ताहामध्ये पथनाट्य, नाटिका, घो

#Natepute:देवाच्या रूपाने आमदार राम सातपुते भेटले - बाजीराव राणे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस मतदारसंघातील पिंपरी येथील अंध बाजीराव राणे यांना  मूत्राशयाचा त्रास होत असल्याने त्यांना ऑपरेशन करणे गरजेचे होते. बाजीराव राणे हे डोळ्याने देखील पाहू शकत नव्हते. राणे हे माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार आरोग्य दूत राम सातपुते यांना भेटले. भेटल्यानंतर त्यांनी आमदार साहेबांना सर्व हकीकत सांगितली त्यानंतर आमदार साहेबांनी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सुमारे अडीच लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया मोफत करून दिली. सुमारे अडीच लाख खर्चाची शस्त्रक्रिया मोफत करून दिल्याने बाजीराव राणे हे खूप आनंदी झाले. त्यावेळी बाजीराव राणे म्हणाले की देवाच्या रूपाने आमदार राम सातपुते आम्हाला भेटले ते आमच्यासाठी देवच आहेत. माळशिरस तालुक्यातील पहिलाच आमदार जनतेची कामे प्रामाणिकपणे सामान्य माणसांपर्यंत पोहोचून करत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य दूत राम सातपुते हे गरीब गरजू कुटुंबीयांचे वैद्यकीय खर्च मोफत करत असल्याने त्यांचे पिंपरी सह माळशिरस तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

#Natepute:अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने बुद्धीजीवी वर्गाचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - राष्ट्रपिता महात्मा फुले,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,भगवान गौतम बुध्द व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे संयुक्त जयंती निमित्त व जनकल्याणकारी लोकराजा शाहु महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त हा बुध्दीजीवी वर्गाचा सन्मान  सोहळा व कार्यकर्ता प्रबोधन शिबीर अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.प्रस्ताविक  किसनराव ढोबळे सर यांनी केले आलेल्या पाहुण्यांचे स्वागत घनशामदादा ढोबळे व सुनिल ढोबळे यांनी केले .सर्व मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने होलार समाजामध्ये  असणारे डॉक्टर,वकील व प्राध्यापक यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जिवन गौरव पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले.तसेच अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून होलार समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले.अतिशय छान व नियोजनबध्द असे व्यवस्थापन अखिल भारतीय होलार समाज संघटना शहर शाखा-नातेपुते यांनी केले होते.त्यामुळे त्यांचे समाजामध्ये

#Chiplun:पेढांबे येथे ८ मे रोजी राज्यस्तरीय भव्य बैलगाडी स्पर्धेचा थरार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दि. ८ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तालुक्यातील पेढांबे भराडेवाडी येथे कोकण सह्याद्री हिंद केसरी, आमदार चषक २०२३ राज्यस्तरीय भव्य बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, चिपळूण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, युवक मेहनत घेत आहेत. तर चिपळूण गुहागर तालुका बैलगाडी शर्यत असोसिएशन व सर्व जमिन मालकांचे या स्पर्धेला सहकार्य लाभणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ५१ हजार रूपये, व्दितीय क्रमांकास ३१ हजार रूपये, तृतीय क्रमांकास २१ हजार रूपये, चतुर्थ क्रमांकास ११ हजार रूपये, पाचव्या क्रमांकास १० हजार रूपये पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. दि. ७ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धेचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी रोहित राणे ९०११५४५७५८, प्रज्योत पवार ७७७९४१७७८१, अमित जाधव ७७९८५४३४३७ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

#Yavat:नोकरीच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची संकल्पना गरजेचीच - प्रा. रेश्मा ताडगे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप कौटुंबिक गरजेपोटी लेकुरवाळ्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणाघराची संकल्पना अस्तित्वात आली, परंतु त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणी हिरकणी कक्षाचीसुद्धा तेवढीच गरज असल्याचे मत प्रा. रेश्मा ताडगे ह्यांनी  व्यक्त केले. खुटबाव येथील पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयातील हिरकणी कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आपल्या बाळासाठी रात्रीच्या वेळी बिकट अशा कड्यावरून उतरणाऱ्या हिरकणीचा छ. शिवाजी महाराजांनी योग्य असा सन्मान केला. तोच आदर्श समोर ठेवून आठवड्यातील किमान एक दिवस तरी नोकरीच्या ठिकाणी आपल्या बाळांसोबत थांबण्याची सोय प्रत्येक कार्यालयात करण्यात यावी, अशीही अपेक्षा त्यांनी ह्यावेळी व्यक्त केली.      प्रा. डॉ. मनीषा सोडनवर, प्रा. योगिता दिवेकर, प्रा. दीप्ती सातव तसेच प्रा. अर्चना मेमाणे ह्यांनी आपल्या बाळांच्या सोयीसाठी महाविद्यालयात हा कक्ष सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जगदीश आवटे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. सुनिता बनकर ह्यांनी ह्या उपक्रमाचे आयोजन केले. संस्थेचे  चेअरमन मा. रमेशआप्पा थोरात ह्यांनी हा

#Yavat:शाहू फुले आंबेडकरी विचाराने थोरात कुटुंबाची वाटचाल होत आहे, हे स्तुत्य आहे - धम्मा नदं

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप काल कथित भास्कर राव बाबुराव थोरात यांचे मुले आणि कुटुंबाची वाटचाल ही वडिलांच्या शिकवणुकीचा आदर्श घेऊन शा हु  फुले आंबेडकरी विचारानुसार चालू आहे, ही बाब स्तुत्य व परिवर्तनशील आहे, असे विचार भन्ते धम्मानदं यांनी गिरीम येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहेत. कथित भास्करराव  बाबुराव थोरात प्रतिष्ठान यांचे वतीने भास्करराव थोरात प्रथम स्मृतिदिन आणि यानिमित्त जेष्ठ पत्रकार एम. जी. शेलार यांना " जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम थोरात यांचे निवस्थानी आयोजित करण्यात आला होता. यावेंकी पूजा आणि बौद्ध धम्माची शिक्षण यावर भन्ते धम्मानन्द आणि विचार व्यक्त केले, परभणी येथील व्याख्याते नितीन सावन्त यांनी राष्टीय पुरुषांची शिकवण या विषयावर व्याख्यान दिले, सुरुवातीस बौद्ध मूर्ती आणि आंबेडकर प्रतिमेचे पूजन उपासक श्रीकृष्ण मोरे यांनी केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश थोरात, उपाध्यक्ष  मिलिंद थोरात,आणि सचिव नितीन थोरात यांनी जेष्ठ पत्रकार एम,जी, शेलार यांचा स्मृतिचिन्ह, शाल आणि महात्मा फुले यांचे पुस्तक देऊन सत्कार केला, यावेळी गिरीमचे माजी सर