Posts

Showing posts from January, 2024

#Malshiras:आमदार रवींद्र धंगेकर यांची मनसे माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - आमदार रवींद्र धंगेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट यावेळी त्यांचा सत्कार तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे व नगरसेविका रेश्माताई टेळे यांनी केला. यावेळी उपस्थित मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, तालुका सचिव लक्ष्मण नरोटे, शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे, शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब टेळे, श्रीपती वाघमोडे निवृत्ती टेळे, राजाभाऊ काशीद, अनंत दोशी, रामभाऊ कर्चे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

#Malshiras:मुलांना शालेय जीवनात शिक्षणाबरोबर व्यवहारिक ज्ञान मिळणे ही आवश्यक - समाधान मिसाळ

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - सोलापूर जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त, मेडद येथील जि. प. प्राथ. शाळा, तुपेवस्ती येथे "ऑनलाईन ऑफलाईन बँकिंग व्यवहार" या विषयावर पत्रकार व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी क्लार्क मा. श्री. समाधान मिसाळ यांनी विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद साधला. यावेळी त्यांनी शालेय जीवनातच मुलांना व्यवहारिक तसेच पैशाचे व्यवस्थापन, पैशाची बचत करणे, अनावश्यक खर्च टाळणे, बचत खाते, चालू खाते, पैसे पाठविणे, पैसे काढणे, RTGS /NEFT द्वारे इतर बँकेशी व्यवहार कसे करावे यासंदर्भात बहुमोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील त्यास चांगला प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना श्री, समाधान मिसाळ सर म्हणाले की, हा अतिशय स्तुत्य उपक्रम शाळेने राबविला आहे. मुलांना याच वयात जर शालेय जीवनाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळाले तर भविष्यात त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तसेच आपल्या शाळेस भेट देऊन खरंच मन खूप भारावून गेलं. बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा बालपण यावं असं वाटलं. खरंच आपली शाळा खूप सुंदर आहे. मुले देखील खूपच हुशार आहेत.

#Yavat:राष्ट्रीय अन्न सुरक्षाअभियानांतर्गत यवत येथे शेती दिन साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने रब्बी हंगाम सन  मध्ये  यवत येथे  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ज्वारी सन् २०२३:२४ शेती दिन शेतकरी मल्हारी तात्याबा दोरगे व लहू देवराम दोरगे यांच्या शेतामध्ये आयोजित करण्यात आला होता. या ज्वारी प्रकल्पामध्ये यवत गावाची निवड करून शेतकऱ्यांना पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून निविष्ठांचे वाटप करण्यात आले होते. मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील बनकर व कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली  शेतकऱ्यांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याविषयी कृषी सहाय्यक अधिकारी विनायक जगताप यांच्या नियोजनाखाली पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी कुलदीप दोरगे यांनी सांगितले की आमचे ज्वारीचे  पीक खुप चांगले असुन नेहमीच्या पद्धतीपेक्षा आम्हाला ३०ते ४० टक्के उत्पादनामध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला. यावेळी कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ, कृषी सहाय्यक विनायक जगताप, श्रीनाथ शेतकरी गटाचे अध्यक्

#Mumbai:माखजन इंग्लिश स्कूलच्या 'स्पंदन' 2000- 2001 माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मुंबई येथे उत्साहात संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल, माखजन शाळेतील स्पंदन-2000-2001  माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच मुंबई येथे संपन्न झाला. सुरूवातीला सर्वांचे  गुलाब पुष्प  देवुन स्वागत करण्यात आले. सकाळी चहा नाष्टा झाल्यावर  विविध  मनोरंजन आणि गेम्स व प्रत्येकाची ओळख विविध क्षेत्रात काम करत असलेले उपलब्ध होणारे संधी यांची माहिती तसेच  शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात उपलब्ध होणारी संधीच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याच्या सुचना करण्यात आल्या. पुढील काळी शाळेच्या उपक्रमासाठी फंड्स  जमा करणे आणि शाळेच्या हस्तलिखित डिजिटल स्वरुपात मिळण्यासाठी आपण सर्वानीच  सहकार्य करावे याबद्दल चर्चा करण्यात आली. दुपारी सर्वजणा सोबत एकत्र स्नेह- भोजन करण्यात आले.एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत सध्या कोण काय करतोय यावर शालेय सवंगड्यांनी गप्पाटप्पा मारल्या. माखजन इंग्लिश स्कूलने आजवर त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान देऊन व सर्वगुणसंपन्न शिक्षण व संस्कार दिल्याने आज या शाळेतील विद्यार्थी मोठमोठ्या पदावर काम करत आहेत त्यामधील शाळेतच शिक

#Natepute:भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालूका अध्यक्षपदी मामासाहेब पांढरे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालूका अध्यक्षपदी मामासाहेब पांढरे यांची निवड करण्यात आली आहे.ते मोहीते पाटील समर्थक म्हणून ओळखले जातात.या निवडीबद्दल येथे मोठ्या प्रमाणात चौकात फटाक्याची आतेषबाजी करण्यात येऊन आनंदोत्सुव साजरा करण्यात आला. त्यांच्या मागे तरूंणाचे वलय असून त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांची निवड करण्यात आली असून सध्या ते  मार्केट कमिटी उपसभापती पदावर काम करीत आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी त्यांच्या निवडीचे पञ दिले असून भारतीय जनता पार्टीच्या अंत्योदय करण्याचा विचार घेऊन आगामी काळामध्ये जनसामान्यामध्ये जाऊन सर्वाना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक बांधणीसाठी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष मामासाहेब पांढरे यांनी सांगितले. या निवडीबद्दल माजी उपमूख्यमंञी विजयसिह मोहिते पाटील,आ.रणजितसिंह मोहीते पाटील,आ.राम सातपूते,धैर्यशील मोहिते पाटील,बाबाराजे देशमूख.यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

#Mumbai:ॲड. सचिन जोरे यांचा प्रजासत्ताकदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - शिवसेना शिंदे गटाचे नेते ॲड. सचिन जोरे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशाच्या वेळेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश सरचिटणीस रविकांत राठोड राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. सचिन जोरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे. ॲड. सचिन जोरे यांनी 2019 मध्ये माढा लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी ॲड. सचिन जोरे बोलताना म्हणाले शरदचंद्रजी पवार यांच्या विचारानुसार युवकांचे संघटन वाढवण्यासाठी काम करणार आहे. लोकांसाठी अनेक प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहेत. तरुणांना रोजगार मेळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं वर्चस्व आहे. मागील अनेक दिवसांपासून स्थानिक पातळीपर्यंत विस्तारण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जातोय. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग सुरु झाली आहे. आज माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, फलटण, माण या भागातील काही कार्यक

#Natepute:कारुंडे बंगला येथे अज्ञातांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची स्थापना

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - कारुंडे ता.माळशिरस हद्दीत महामार्ग नजिक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची स्थापना केली . रविवारी सकाळी सदर घटना नातेपुते परिसरात वार्यासारखी पसरली आणि तासाभरातच नातेपुते, कण्हेर, कारुंडे,कोथळे, धर्मपूरी, मोरोची, डोंबाळवाडी, एकशिव गावातील  धनगर समाजबांधव यावेळी  यळकोट यळकोट जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी नातेपुते, कण्हेर,कारुंडे,कोथळे, धर्मपूरी,मोरोची,डोंबाळवाडी, एकशिव या गावातील बहुसंख्य धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Natepute:भारतीय लोकशाहीचा आत्मा संविधान आहे - मुख्याधिकारी माधव खांडेकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - आपले सविंधान कसे आहे, संविधानाचे उद्दिष्ट काय आहे.कुठल्याही धर्माला महत्त्व देताना समान दर्जा देणे.व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे. कुणावरही अन्याय न होण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.सामाजिक ,लोकशाही,गणराज्य,व समता ह्या सर्व घटनेमध्ये सर्वांना समानतेची वागणूक दिली जाते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविंधानाने आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्याधिकारी खांडेकर बोलत होते. प्रस्ताविक समीर सोरटे यांनी केले.त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सविंधान अभ्यास वाचनाने कार्यक्रमला सुरुवात झाली.रिपाईचे तालुका सरचिटणीस रोहीत सोरटे,कार्यक्रमाचे अध्यक्ष एन के साळवे,नातेपुते पोलिस स्टेशनचे ए पी आय महारूद्र परजने साहेब या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे हार,फेठा,व गुलाबपुष्प या सत्काराला बगल देत सर्व मान्यवरांना सविंधान उद्दीषिकाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर

#Natepute:नातेपुतेसह परीसरात मराठा आरक्षण मिळाल्याने जल्लोष,फटाके फोडून,पेढे वाटुन केला आनंद साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराटी येथून सुरू झालेले आंदोलन मुंबईच्या वेशीवर थोपविण्याात राज्य सरकारला यश आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात काढलेल्या अध्यादेशात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुधारणा सुचविल्यानंतर सुधारित अध्यादेश रात्री काढण्यात आला.  याबद्दल मूबईला गेलेले  मोर्चेकरी नातेपुते येथे पोहचल्यावर त्यांचे शहरातील मराठा भगिनीनी औक्षण करण्यात आले,  शहरात सर्वञ मूख्यमंञी एकनाथ शिंदे,मनोज जरांगे बॅनर लक्ष वेधून घेत होते.तसेच शहरातील पूणे — पंढरपूर मार्गावरील मोठ्या प्रमाणात जेसीबीतून गूलालाची मूक्त उधळण करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले कित्येक महिने आंदोलन चालू आहे. मनोज जरांगे पाटलांसह राज्यभरातील असंख्य मराठा त्यासाठी एकवटले होते. मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी येथून उपोषण सुरू केले होते. त्यानंतर त्यांच्या या उपोषणाचे रुपांतर भव्य आंदोलनात झाले ! या यशाबद्दल नातेपुते येथील शिवाजी महाराज स्मारकासमोर डी.जे.दणदणाटात ,जेसीबीतून , गूलाल मूक्त उधळून,फटाकेची आतेषबाजी कर

#Chiplun:धामापूर जि. प.गटातील बुरंबाड गावातील विकासकामांची उद्घाटने व भूमीपुजने आ.शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

Image
विकास कामे करताना आपले कुंटुंब दुर्लक्षीत करु नका; मुलांना उच्च शिक्षित करा यासाठी माझे सहकार्य निश्चितच असेल - आ. शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गावच्या विकासासाठी लोकांच्या मागणीनुसार रस्ते, पाखाडी, संरक्षक भिंती, अंगणवाडी इमारत या गोष्टी विकास कामाच्या स्वरुपात करणे अत्यंत आवश्यक होते. त्याबाबतचा सततचा पाठपुरावा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचे सहकार्याने शासन स्तरावर करुन विविध योजनेद्वारे रु. 1 कोटी 10 हजाराचा निधी मंजूर करुन आणण्यात आला. या मंजूर कामाची उद्घाटने व भूमीपुजने असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडली. आमदार शेखर निकम यांनी भरघोस निधी मंजूर करुन आणल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले व त्यांचा सन्मानपुर्वक सत्कार केला व विकास कामांची गरज लक्षात घेता दाखवलेल्या तत्परतेचे कामाच्या कार्यपद्धती बद्दल समाधान  व्यक्त केले व खंबीरपणे पाठीशी आहोत विश्वास दिला. आमदार शेखर निकम यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामस्थांच्या उत्साह व उपस्थितीबद्दल समाधान

#Natepute:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे वस्ती (कारूंडे)शाळेत भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - कारूंडे ता.माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे वस्ती (कारूंडे)शाळेत भारताचा   ७५  वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संजय पाटील तर पाहुणे म्हणून सुबोध शिंदे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ ज्ञानदेव लोंढे बापू हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री लोंढे सर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर सामुदायिक कवायत ,देशभक्तीपर गीत आणि  गीताचे उत्कृष्टरित्या सादरीकरण करण्यात आले. दोन्हीही गीतासाठी मान्यवरांनी व पालकांनी शाळेस बक्षिसे दिली- अण्णासाहेब पवार, विजय मस्कर, जितेंद्र गायकवाड ,जगन्नाथ लोंढे बापू ,संजय पाटील, अनंता साळुंखे ,सुरेश लोंढे ,उमेश गोसावी, तुकाराम गोसावी ,तुकाराम हरी गोसावी ,सुबोध शिंदे, अशोक गोसावी ,सुनील लोंढे ,अशोक बापट मोरे ,अशोक मोतीराम गोसावी यांनी बक्षीसाच्या रूपात विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले आणि बक्षीस म्हणून शाळेला काही रक्कम देणगी म

#Yavat:यवत येथील ग्रामसभा कोरम अभावी रद्द

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप यवत येथील ग्रामसभा कोरम अभावी रद्द करण्याची वेळ पंचायत वर आली दि  (२६ जाने) ला  होत असलेल्या ग्रामसभेचे सकाळी ११ वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते परंतु सकाळी ११.३० सुमारास   कोरम अभावी ही ग्रामसभा रद्द केल्याचे  सांगितले २६ जाने ग्रामसभा असून देखील जिल्हा परिषद शाळेचे, मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे व मुख्याध्यापक शिंदे यांसह या ग्रामसभेसाठी सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य नाथदेव दोरगे व  खुटवड वगळता इतर सर्व सदस्यांनी व सर्वच शासकीय विभागांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली. यावेळी भांडगाव ग्रामपंचायतचा पदभार असल्याने यवत ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कदम हे देखील अनुपस्थित होते , १९  ते २० हजार  लोकसंख्या असलेल्या यवत येथील ग्रामसभेसाठी फक्त १५ च्या आसपास नागरिकच उपस्थित होते. याबाबत प्रशासनाने कडक नियम करून  नागरिक ग्रामसभेसाठी  उपस्थित राहतील असे प्रयत्न करावे . कोरम अभावी दानोळीत ग्रामसभा तहकूबदानोळी, ता. २६ येथे आज बोलावलेली ग्रामसभा कोरम अभावी तहकूब केली. नुकताच जलजीवन पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ केला आहे. गायरान

#Chiplun:संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गाव येथे प्रिमिअर लीग 2024 चे आयोजन

Image
उद्या रंगणार भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा थरार महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गावात जय हनुमान बुरंबाड आयोजित बुरंबाड प्रिमिअर लीग ( पर्व 1ले) या स्पर्धेचे आयोजन उद्या 26 जानेवारी ते 27 पर्यंत होणार असून मा.किरण सांमत ( भैया शेठ) यांच्या तर्फे करण्यात आले आहे. पहिल्यांदाच बुरंबाड गावी या आगळ्या-वेगळ्या  होणाऱ्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 22222/- तसेच व्दितीय पारितोषिक 15555/- व तृतीय पारितोषिक- 4444आणि चषक,चतुर्थ पारितोषिक 4444 आणि चषक असे ठेवण्यात आले आहे तसेच पुढील पारितोषिके प्रत्येक  टीम स्पॉन्सर करिता छ. शिवाजी महाराज यांची मुर्ती श्री गणेश हरेकर आणि दिनेश हरेकर यांच्या मार्फत भेट म्हणून देण्यात येणार आहेत. मॅन ऑफ दी सिरीज फुरिफायार आणि 2 ब्रास चिरा तसेच  बेस्ट  बॅट्समन यांना फॅन व टी शर्ट, बेस्ट बाॅलर मिक्सर, टीशर्ट.  बेस्ट विकेट किपर इस्त्री, बेस्ट फिल्टर इस्त्री असे अनेक पारितोषिकचे देण्यात येणार आहेत. हि स्पर्धा पंचक्रोशीत मर्यादित असुन आपल्या खेडेगावातून नवनवीन खेळाडू निर्माण व्हावे यासाठी ह्या स्पर्धेचे आय

#Natepute:हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती माळशिरस तालुक्याच्या पश्चिम विभागात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख श्री अनिल कोकीळ साहेब, शिवसेना उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड, शिवसेना प्रवक्ते प्रा.श्री लक्ष्मण हाके सर युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव श्री स्वप्निल भैय्या वाघमारे, तालुका प्रमुख संतोष भैय्या राऊत शिवसेना नेते श्री अमोल उराडे यांचे मार्गदर्शनाखाली  शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री विजय रुपनवर यांनी ठिकठिकाणच्या जि.प.शाळांमध्ये अनेक उपक्रम राबवून स्व. बाळासाहेबांना अभिवादन केले. सकाळी 10:30 वाजता ग्रामपंचायत कारुंडे येथे सरपंच, उपसरपंच ग्रा.पं.चे सर्व सदस्य, ग्रामसेवक तलाठी सह बहुसंख्य गावकरी बंधूंच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करुन गावच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच सकाळी 11:00 वाजता जि.प.प्रा.शाळा कारुंडे येथे प्रतिमा पूजन करुन शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप केले यावेळी कारुंडे गावचे उपसरपंच श्री सुर्यकांत पाटील आणि उपतालुकाप्रमुख विजय रुपनवर यांनी हिंदूहृदयसम्राट स्व.बळासाहेब ठाकरे यांच्या जिवनपटावर उपस्थिता

#Chiplun:सुबोध चव्हाण संगमेश्वर तालुका सरचिटणीसपदी तर शैलेश चव्हाण यांची युवक तालुका उपाध्यक्षपदी निवड

Image
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगमेश्वर तालुक्यातील रा. शिवधामापुर गावातील पदाधिकारी "सुबोध चव्हाण" यांची संगमेश्वर तालुका सरचिटणीस पदी निवड व रा.शिवधामापूर तालुका संगमेश्वर युवक पदाधिकारी शैलेश चव्हाण  यांची युवक तालुका उपाध्यक्षपदी निवड,या निवड पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देतान व पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखरजी निकम सर, ज्येष्ठ नेते दादा साहेब साळवी, चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेशजी राणे, राजेंद्रजी पोमीडकर, रत्नागिरी जिल्हा बँक सदस्य राजेंद्रजी सुर्वे, प्रदेश सरचिटणीस जयंतशेठ खताते, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन उर्फ बाबूशेठ ठसाळे, चिपळूण तालुका युवक अध्यक्ष निलेश कदम, अमित कदम तसेच चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

#Mumbai:आ. शेखर निकम यांच्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील कोसुंब व कसबा जि.प. गटाचा मुंबईस्थित चाकरमानी मेळावा प्रचंड गर्दीने संपन्न

Image
चाकरमान्यांचा विश्वास व ग्रामस्थाची खंबीर साथ मतदार संघाच्या विकासासाठी मला प्रेरणादायी ठरतेय - आ. शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण संगमेश्वर मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद गटनिहाय मुंबईकर चाकरमान्यांचे मेळावे मुंबईत होत आहेत. आतापर्यंत झालेले ओझरे खुर्द, कडवई, मुचरी, धामापूर जिल्हापरिषद गट हे  मेळावे अलोट गर्दीने पार पडले त्याप्रमाणे कोसुंब व कसबा परिषद या गटातील मुंबईतील ग्रामस्थांचा मेळावा दादर येथे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट, श्रीकृष्ण मंदिर सभागृहात आमदार निकम यांच्या उपस्थितीत  अलोट गर्दीने पार पडला. आमदार निकम यांनी मतदार संघात करोडो रुपयांचा निधी मंजूर करुन आणत रस्ते, पाणी, तसेच इतर विकासात्मक कामाचा गावागावात विकास केला आहे. रखडलेले विविध प्रकल्प आणि पर्यटनदृष्टया विकासाच्या योजना यामुळे मतदारसंघात आकार घेऊ लागल्या आणि यातूनच गावात झालेली विकासकामे आणि मुंबईकर चाकरमान्यांच्या अपेक्षा यादृष्टीने आमदार निकम यांनी जिल्हा परिषद गटनिहाय मुंबईकरांचा मेळावे आयोजित करुन आढावा घेतला व चाकरमान्यांचा विश्वास संपादन केला. जनतेला आपलं सुख-दु:ख जाण

#Natepute:भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पैशाची व पाण्याची बचत करा - रणजितसिंह मोहिते पाटील

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भविष्यातील दूष्काळाची चाहूल लक्षात घेऊन व्यापारी, व्यावसायिक व शेतकरी यांनी काटकसर करून पैशाची व पाण्याची बचत करावी असे मत आमदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी नातेपुते येथील मामाश्री ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या उद्घाटना प्रसंगी व्यक्त केले पतसंस्थेचे  उद्दघाटन माजी उपमूख्यमंञी विजयसिंह मोहीते पाटील याच्या हस्ते करण्यात आले रणजीत सिंह मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले हवामान खात्याने पूढील वर्षीही पाऊसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे,त्यामूळे पूढील वर्षीचे नियोजन आजच करा दूष्काळी परीस्थिती लक्षात घेऊन जून महिन्यापर्यंत  चारा डेपो,चारा छावणी,पाण्याच्या टॅंकरची मागणीनूसार तरदूत करण्यात आली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अॅड शिवाजीराव पिसाळ यांनी  सस्थेचा थोडक्यात आढावा घेऊन भविष्यातील योजनाची माहीती सांगितली.संचालक मोहीत जाधव यांनी आलेल्या पाहूण्याचे स्वागत केले यावेळी माजी आमदार रामहरी रूपनवर,आ.राम सातपुते, माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख यांनी आपले मनोगत व्यक्त केले

Natepute:नातेपुते येथील बेघर लोकांना चादर वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते ता- माळशिरस येथे भारतीय मातंग युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व जैन विचार मंच निमंत्रक जेष्ठ साहित्यीक श्री. विठ्ठल साठे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथील बस स्टॉपवरती झोपणारे व बेघर लोकांना वाढदिवसानिमित्त मोफत चादरीचे वाटप करण्यात आले. यावेळेस भारतीय मातंग युवक संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख केतन यादव म्हणाले की, विठ्ठल साठे साहेब यांच्या वाढदिवसाला आम्ही हार फेटे याला खर्च न करता. माळशिरस तालुक्यातील प्रत्येक बस स्टॉप व इतरत्र उघड्यावर झोपणाऱ्या बेघर लोकांना चादर वाटप करून आम्ही साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत. यावेळी भारतीय मातंग युवक संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री. केतन यादव व अमित लांडगे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळेस ओम पवार,अदित्य पाटोळे,सोहम कांबळे, कृष्णा नायकनवरे आदी उपस्थित होते.

#Chiplun:धामापुर तर्फे संगमेश्वर येथे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपुजन संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर गावातील आमदार शेखर निकम यांच्या विकास निधीतील जिल्हा वार्षिक योजना, 2515 योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, बजेट या योजनांतून मंजूर केलेल्या माखजन आंबेट मावलंगे रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे-60लाख, माखजन बौद्ध विहार शेजारी संरक्षण भिंत बांधणे, धामापूर तर्फे संगमेश्वर गोवळवाडी भायजेवाडी रस्ता डांबरीकरण करणे-50लाख, भडवलेवाडी रस्ता डांबरीकरण करणे -15लाख , रामनवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे -7 लाख,तांबडवाडी रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख, ढोपरखोल वाडी रस्ता डांबरीकरण करणे -20लाख, धनावडेवाडी रस्ता डांबरीकरण करणे - 8लाख, धनावडेवाडी  शाळा नं.6 नवीन वर्ग खोली बांधणे -10 लाख या कामांचे भुमिपुजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. धामापूर तर्फे संगमेश्वर गावचे सरपंच शांताराम भायजे व ग्रामस्थांच्या बहुसंख्य उपस्थितीत हा भुमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला. आमदार शेखर निकम यांनी गेली अनेक वर्षांपासून गावातील रस्त्यांची रखडलेली रस्त्यांची कामे होण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार निकमांकडे मागणी केली. या मागणीला

#Yavat:आयुष्यमान भारत कार्ड शिबिरात कासुर्डीत २७५ ग्रामस्थांचा सहभाग

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज कासुर्डी गावात विठ्ठल मंदिरात आयुष्यमान भारत कार्डचे शिबीर घेण्यात आले. यामध्ये कासुर्डी गाव,वाडी वस्ती सह 275 ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वांढेकर, दौंड तालुका संपर्कप्रमुख गणेश दिवेकर दौंड तालुका युवक उपाध्यक्ष प्रशांत ताडगे, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन तंटामुक्ती अध्यक्ष मा.सरपंच पांडुरंग आखाडे, मराठा महासंघ जिल्हा युवकअध्यक्ष मयूर सोळसकर,दौंड तालुका उपाध्यक्ष संतोष पोपट आखाडे, तालुका विद्यार्थी सचिव सुरज वसंत आखाडे,दौंड तालुका संपर्कप्रमुख चंद्रकांत आखाडे, दौंड तालुका व्यापार उद्योग आघाडी कार्याध्यक्ष अमोल चौंडकर यांनी केले होते. सदर कार्यक्रमाला कासुर्डी गावचे ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच व  सदस्य, कासुर्डी विकास सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन, संचालक आणि गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.  आयुष्यमान भारत योजना म्हणजे सामान्य जनतेचे आरोग्य कवच...

#Natepute:गावांची ओळख हि आर्थीक चारीञ्यावर अवलंबून असते - आमदार राम सातपुते

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - गावाची ओळख ही आर्थीक चारीञ्यावर अवलंबून असते,त्यामुळे बळीराजा पतसस्थेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांच्या मदतीस उतरून तसेच श्रीराम ठेव योजनेच्या माध्यमातून नातेपुते नवी ओळख निर्माण करेल असे मत आमदार राम सातपुते यांनी येथे व्यक्त केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 20 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता श्री राम ठेव योजनेचा शुभारंभ 20 जानेवारी 2024 रोजी आमदार राम सातपुते याच्या हस्ते करण्यात आला. नातेपुते येथे  बळीराजा पतसंस्थेचा तीन महिन्यापूर्वी शुभारंभ केलेला होता. संचालक मंडळ यांच्यावर विश्वास ठेवून संस्थेचे सभासद, खातेदार, हितचिंतक यांनी तीन महिन्यात एक कोटी पेक्षा जास्त ठेवींचा टप्पा पार केला असून कर्ज वाटपातसुद्धा कोटीचा टप्पा पूर्ण केलेला आहे. सध्या देशामध्ये श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध स्तरांवर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर श्रीराम ठेव योजना

#Malshiras:माळशिरस मराठी पत्रकार यांची दिनदर्शिका नागरिकांच्या पसंतीस

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस तालुका मराठी पत्रकार यांनी प्रकाशित केलेली २०२४ या वर्षाची दिनदर्शिका सूट सुटीत डिझाईन,आकर्षक कलर ,सुबक छपाई केल्याने हि दिनदर्शिका कार्यालयीन, व्यवसायिक तसेच घरगुती  ठिकाणी लावण्यासाठी अनेकांच्या पसंतीस आली असून त्याची मागणी वाढली आहे.माळशिरस तालुका मराठी पत्रकार यांचे दिनदर्शिका प्रकाशित करण्याचे पहिले वर्ष असल्याने  त्यांच्या 1 हजार प्रतिचे फक्त छपाई करण्यात आल्याने आणि मागणी वाढल्याने  तुटवडा भासत आहे. नुकतेच या दिनदर्शिकीचा प्रकाशन कार्यक्रम माळशिरस पंचायत समिती सभागृह मध्ये गटविकास अधिकारी विनायक गुळवे,निवाशी नायब तहसीलदार अमोल कदम,सह.गट विकास अधिकारी किरण मोरे, माळशिरस नगरपंचायतीचे मा.नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,बाळासाहेब सरगर,पांडुरंग वाघमोडे,विकास धाईंजे,सोमनाथ वाघमोडे,अजित बोरकर,बाबासाहेब माने,शिवराज पुकळे,अनंतलाल दोशी,महादेव कोळेकर,सचिन वावरे,नागेश वाघमोडे,सोमनाथ पिसे यांच्यासह माळशिरस तालुका मराठी पत्रकार बांधव स्वप्नील राउत,बंडू पालवे,तानाजी वाघमोडे,शोभा वाघमोडे,संजय हुलगे,हनुमंत माने,विलास भोसले, जाहिरातदार,हितचिंतक यांच्या

#Chiplun:कोसुंब जि. प. गट व कसबा पं. स. गणातील मुंबईकरांचा उद्या दादरला मेळावा

Image
संंगमेश्वर-चिपळूण लोकप्रिय आमदार शेखर निकम करणार मार्गदर्शन महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गट आणि कसबा पंचायत समिती गणातील मुंबईकरांचा मेळावा २१ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता दादर येथील महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या श्रीकृष्ण मंदिर सभागृहात आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.     आमदार शेखर निकम यांनी संगमेश्वर तालूक्यात गावागावातील विकासकामांसाठी मोठया प्रमाणात निधी वितरीत केल्याने तालुक्यातील विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे गावागावांत झालेल्या विकासकामांचा आढावा आणि सध्यस्थितीत सुरू असलेली तथा मंजूर असलेली विकासकामे आणि प्रस्तावित कामांसदर्भात मुंबईकर ग्रामस्थांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने आमदार निकम यांनी गेल्या गणेशोत्सवानंतर मुंबईत प्रत्येक जिल्हा परिषद गटा मेळावा घेण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यत ओझरे खुर्द, कडवई, मुचरी, धामापूर या जिल्हा परिषद गटांचा मेळावा विराट गर्दीत झाल्यानंतर आता कोसूंब जिल्हा परिषद गट आणि मतदारसंघात समाविष्ठ असलेला कसबा पंचायत समिती गणातील मुंबईकरांचा मेळावा रव

#Yavat:यवत येथील इरिगेशन व शाळे जवळच्या सर्विस रोडला डिव्हायडर करावा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पुणे सोलापूर महामार्ग वरील यवत येथील प्राथमिक शाळा व इरिकेशन कॉलनीच्या  मधून येणाऱ्या रस्ता पुणे सोलापूर सर्विस रोडला येतो . शाळेच्याजवळ येणाऱ्या रस्त्याला उतार खूप आहे तोच उतार पुणे सोलापूर रोड च्या सर्व्हीस ला येऊन मिळतो.या सर्व्हीस रस्त्यावर वर्दळ सारखी चालू असते. या सर्विस रोडवर अपघात होऊ शकतोय जवळ  प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा आहे विद्यार्थी ची वर्दळ असते  प्राथमिक शाळा व एरीकेशन कॉलनीच्या मध्ये एक रायकर मळा येथून येणारा रस्ता पुणे सोलापूर महामार्गावरील सर्विस रस्त्याला येत आहे परंतु या रस्त्याला उतार खूपच असल्याने दोन्ही बाजूने घरे व शाळा असल्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या व्यक्तीला  कोणते वाहन कुठून येते हे समजत नाही .तेथे उतार जास्त असल्याने  येथे अपघात होण्याची  शक्यता आहे सोलापूर रस्त्यावरील  सर्विस रस्त्यावर डिव्हायडर होणे करावा असे नागरिकां कडून मागणी होत  . ग्रामपंचायत ने  त्यांच्या रस्त्याच्या हद्दीत डांबरीकरण करावे असे नागरिकांचे मत आहे. याबाबत पाटस टोल अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले लवकरच सर्विस रस्त्याला

#Chiplun:आगवे गावातील विकास कामांची भूमीपुजन आ. शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न

Image
आगवे गावातील ग्रामस्थांनो  अडचणीच्या काळात कधीही मला हाक मारा आपली अडचण सोडवण्यास मी सदैव तत्पर असेन - आ. शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण तालुक्यातील आगवे गावातील विकास कामांच्या भूमीपुजन कार्यक्रमासाठी आमदार शेखर निकम सर यांची उपस्थिती लाभली  व मोठ्या उत्सहात बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमीपुजने संपन्न झाली. यावेळी ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचा सत्कार करुन त्यांचे मन:पुर्वक आभार मानले. आमदार शेखर निकम यांनी विविध योजनेतून मंजूर केलेली कामे मौजे आगवे हुमणेवाडी येथे  नविन अंगणवाडी  इमारत  बांधणे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. - (डोंगरी  विकास  कार्यक्रम योजना सन ) - 5 लाख, मौजे आगवे हुमणेवाडी रस्ता डांबरिकरण करणे, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी. - (25/15 योजना सन) - 5 लाख, मौजे आगवे हुमणेवाडी रस्ता डांबरीकरण करणे, ता. चिपळूण,  जि. रत्नागिरी. - (आमदार स्थानिक विकास कर्यक्रम )  - 3 लाख, मौजे आगवे बौद्धवाडी राणीमवाडी हुमणेवाडी शाखेसह रस्ता सा. क्र. 0/600 ते 2/00 (ग्रामा 88),  ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. – (30/54  ‘गट’ ब योजना ) - 10 लाख, मौजे आगवे बौद्

#Natepute:नातेपुते येथे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा आणि बानू यांच्या शुभविवाह सोहळ्याचे आयोजन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - येथील समस्त धनगर समाजाच्या वतीने  अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा आणि बानू ) यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त मित्ती पौष शु. १२ शालीवाहन शके १९४५, सोमवार दि. २२/१/२०२४ रोजी सायं. ६.१५ मि. या गोरज मुहुर्तावर  आयोजन करण्याचे योजिले आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे.सोमवार दि. २२/१/२०२४ रोजी पहाटे ५.०० वाजता.श्री गणेश पुजन , पहाटे ५.३० वाजता पुण्याहवाचन ,सकाळी ६.०० वाजता.अभिषेक दुपारी ४. ३० वा.हळदी समारंभ सायं. ६.१५ वा.विवाह सोहळा सायं. ६.३० वा. यासाठी लाडू प्रसाद वाटपाचे प्रायोजक : श्री. अमोल गजानन पाडसे यांनी केले आहे. .सायं. ७.१५ वा.साडं कार्यक्रम ,रात्री. ९.०० वा.जागरण गोंधळाचा कार्यक्रमाचे प्रायोजक : श्री. कुंडलिक गणपत उराडे (काका) यांनी केले आहे.सदर विवाह सोहळ्यास सर्वानी उपस्थित रहावे,अशी विनंती समस्त धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

#Malshiras:जाधववस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अशोक ज्ञानेश्वर जाधव तर उपाध्यक्षपदी वंदना इरकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन अध्यक्षपदी अशोक जाधव तर उपाध्यक्षपदी वंदना इरकर यांची निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष बाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती चे पुनर्गठन व अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड करण्यात आल्या. तसेच शिक्षणप्रेमी म्हणून संदिप  भैस व सचिव म्हणून शिक्षिका सुचित्रा रेड्डी यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून दिपक जाधव, युवराज पाटील, संदिप जाधव, बाबा फुले, बाजीराव जाधव, संतोष नवले, सरिता पिसे, दिपाली जाधव, सुप्रिया एकतपुरे यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी दत्तू  जाधव, शंकर जाधव, वसंत जाधव, भिमराव जाधव, सिध्देश्वर जाधव, रामचंद्र एकतपुरे, सुनिल पिसे यांसह पालक उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत व आभार शिक्षक चंद्रकांत धसाडे  यांनी मानले.

#Natepute:शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माळशिरस तालुका प्रमुख ग्रामीण परिक्षेत्राच्या निवडी जाहीर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथजी शिंद खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून  हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे , धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून आणि संवेदनशील मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे , खा. डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यअधिकारी मंगेश चिवटे  कक्ष प्रमुख  रामहरी राऊत व सह कक्ष प्रमुख माउली घुळगंडे, भूषण सुर्वे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली  माळशिरस तालुक्यातील माळशिरस तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समीर सलीम शेख (माळशिरस तालुका प्रमुख शहर परिक्षेत्र ) संजय तानाजी दणाने (माळशिरस तालुका उपप्रमुख ग्रामीण परिक्षेत्र) गणेश आनंदराव वाघमोडे (माळशिरस तालुका प्रमुख ग्रामीण परिक्षेत्र ) विशाल आप्पासाहेब लांडगे (नातेपुते शहर प्रमुख) राहुल विठ्ठल  आडगळे (नातेपुते शहर उपप्रमुख) संतोष नामदास मचाले (माळशिरस तालुका उपप्रमुख शहर परिक्षेत्र) यांच्या

#Yavat:यवत येथील पुणे सोलापूर रस्त्यावरील मोरीतील पथदिवे बंद

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पुणे सोलापूर या महामार्गावरील यवत येथील शाळेसमोर गावात जाण्यासाठी येण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाने एक मोरी तयार केलेली आहे. चुकीच्या ठिकाणी केलेली असताना लोकांना त्याचा सारखाच त्रास होतो यावर मुख्य चौकातील मोरी पाहिजे असताना  त्यांनी यवत शाळा पेट्रोल मशीन जवळ केलेली आहे. लोकांना जायला येण्यासाठी एकच असून प्रचंड वाहतुकीची शुक्रवारी गर्दी होत असते कारण शाळेत विद्यार्थी व पलीकडं यांना जाण्यासाठी याचाच वापर करावा लागतो. पश्चिमेला सोसायटी आहे  मलबारे , दोरगे वस्ती आहे या मोरीतून रात्री दिवस लोकांची सतत येजा चालू असते या मोरीत  लाईट असून ती मात्र रात्री बंद अवस्थेत असते हे बऱ्याच दिवसापासून लाईट नाहीये आणि संध्याकाळी लोकांना याचा त्रास होत असतो कारण काही नशा करणारे तिथे असतात जाणार येणार्‍या लोकांना  महिलांना त्याचा त्रास होत असतो परंतु राष्ट्रीय महामार्ग चे पाटस ते अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात का असे नागरिकातून मत व्यक्त करतात समोरच पीएमटी चा स्टॉप आहे परंतु सकाळी सकाळी लोक येत असतात चुकून तेथे लाईट नसते तर अनुचित प्रकार होऊ नये असे नागरिका

#Natepute:शिवसेनेच्या वतीने एकशिव येथे हरभरा डाळ व आटा सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले

Image
                महादरबार न्यूज नेटवर्क - शिवसेनेच्या वतीने एकशिव ता.माळशिरस येथे  सवलतीच्या दरात हरभरा व आटा वाटप करण्यात आले, महाराष्ट्र राज्याचे मूख्यमंञी एकनाथराव शिंदे,जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे व  माळशिरस तालूका प्रमुख  सतिश सपकाळ  याच्या मार्गदर्शनाने, सवलतीच्या दराने हरभरा डाळ एका आधार कार्डवरती ५किलो. ६०रू दराने तर आटा५ किलो.२७:५०दराने नागरीकांना उपलब्ध करू देण्यात आल्याने सर्व सामान्य नागरीकांनी  आनंद व्यक्त करून सणासूदीच्या पाश्वमूभीवर हरभरा डाळ व आटा मिळाल्याने गोरगरीब सर्व सामान्य लोकांना सण करता येईल अशी भावना अनेक नागरीकांनी यावेळी बोलून दाखवून शिंदे गटाचे कौतूक केले. यावेळी माळशिरस तालूका शिवसेना प्रमूख सतिश संपकाळ,शहर प्रमूख समीर शेख,संतोष गोरे,फोंडशिरस शाखा अध्यक्ष,अनिल दडस पिरळे विभाग प्रमूख,बापू क्षिरसागर वैद्यकिय मदत कक्ष प्रमूख,निखिल पलंगे नातेपुते शहर उपाध्यक्ष,अनिल माने,दादा गावडे,अजय खिलारे, आकाश सोरटे,अजय साळवे, देविदास अवघडे,तोष लोंखडे,कूंदत राऊत, अविनाश गायकवाड, नागेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

#Natepute:रिपाईं व होलार समाज संघटनेच्या वतीने जाहीर नागरिक सत्कार व सन्मान सोहळा संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया (आ) व अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त व प्रा ज्ञानेश्वर गुळीग यांची (मा विश्वासराव रणसिंग महाविद्याल कळंब कला, वाणिज्य आणि विज्ञान) येथे उपप्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल आणि पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.आलेल्या पाहुण्यांचे स्वागत या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष किसनराव ढोबळे यांनी केले..डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.रिपाईंचे ता सरचिटणीस रोहीत सोरटे यांनी प्रस्ताविक केले. व सुनिल ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच दलित पँथरचे अध्यक्ष श्रावण सोरटे व कारुंडे गावच्या नुतन सरपंच सौ नंदा नामदास यांचा सत्कार करण्यात आला. आलेल्या पत्रकारांचा रिपाई व अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज वाघमारे,प्रमुख मार्गदर्शक नंदकुमार केंगार(अ भा होलार समाज संघटना प्रदेशाध्यक्ष) नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशिल देशमुख,प्राचार

#Chiplun:चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील धामापूर जि.प.गटातील उबाठाच्या पदाधीकारी व कार्यकर्तेचा सावर्डे येथे आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश

Image
तुमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे पाठबळ विकास कामे करण्यासाठी बळ देते- आ. शेखर निकम महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील धामापूर जिल्हा परिषद गटातील जनसमुदाय सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकवटला होता. त्यामुळे एक नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व ग्रामस्थ निकम सर यांच्यावर कमालीचे खुश होते. त्यांचा संवाद, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन व गरज लक्षात घेऊन तातडीने सोडवण्याची पद्धत यासर्व गोष्टी आदर्शवत आहेत. हे सर्व ग्रामस्थांच्या डोळ्यात दिसत होते. आमदार शेखर निकम यांचे कार्यालयात आगमन होताच त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. अन पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उत्सहाच्या शिगेला पोचला आणि आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन धमापूर जि. प.  गटातील उबाठाचे पदाधीकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) मध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये धामापूर जि.प.गटातील उठबाचे तुकाराम मेस्त्री (शिवसेना शाखाप्रमुख),माजी सरपंच दत्ताराम भायजे,शाखाप्रमुख गांगाराम भायजे,पडयेवाडी गावकर

#Natepute:अभ्यास एके अभ्यास न करता पालकासह शिक्षकांनी मूलांच्या सर्वागीण विकासासाठी लक्ष द्यावे - संस्कृती राम सातपुते

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - अभ्यास एके अभ्यास न करता शिक्षकांसह पालकांनी मूलांचा सर्वागीण विकास घडविण्यासाठी लक्ष द्यावे असे मत ऊर्जा  फाऊडेशनच्या अध्यक्षा संस्कृती राम सातपुते यांनी व्यक्त केले. येथील चंद्रप्रभू इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमात त्या प्रमूख पाहूण्या म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी राजमहेंद्र दोशी होते. पूढे बोलताना त्या म्हणाल्या कि,स्नेहसंमेलनम्हटले कि घराघरात धूम चालू असते,मूलांच्या विकासासाठी सर्वजण झटत असतात हि शाळा मूलांच्या सर्वागीण विकासा बरोबरच देशाचा नागरीक सर्वगूण संपन्न असावा यासाठी संस्कारक्षम शिक्षणावर भर देत आहे.पालकांनी,शिक्षकांनी मूलांना वेगवेगळ्या क्षेञाची माहीती देऊन संकटाचा सामना करायला पाहीजे.अपयशाने खचून न जाता त्याला सामोरे कसे जायचे यांचे ज्ञान देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  यावेळी बालचमूंनी विविधरंगी वेशभूषा परिधान करून विविध गाण्यांच्या तालावर नृत्य केले. लहान मुलांनी उत्कृष्ट नृत्य व ऐतिहासिक प्रसंग सादर केले. प्रारंभी सरस्वती, सावित्रीबाई फ

#Natepute:प्रा.लक्ष्मण हाके यांचा वाढदिवस नातेपुते येथे साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री अनिल कोकीळ साहेब व शिवसेना उपनेत्या सौ.अस्मिताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना माळशिरस तालुका पश्चिम विभाग यांच्यावतीने माढा लोकसभेचे भावी खासदार तसेच शिवसेना प्रवक्ते मा.प्रा.श्री लक्ष्मण हाके साहेब यांचा वाढदिवस  शिवसेनेचे नूतन उपतालुकाप्रमुख  श्री विजय रुपनवर यांचे नेतृत्वाखाली नातेपुते येथे जल्लोषात साजरा करण्यात आला . यावेळी प्रा. लक्ष्मण हाके यांनी श्री विजय रुपनवर यांची तालुक्याच्या उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन उपस्थित शिवसैनिक आणि युवासैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना नातेपुते शहरप्रमुख सनी गवळी   युवासेना उप तालुका प्रमुख रूपेश लाळगे, युवासेना शहर प्रमुख अक्षय कुचेकर,अल्ताफ अत्तार, संतोष कुचेकर, अक्षय तरळकर, शुभम मोटे, रामजी लोंढे  शिवसैनिक युवासैनिक तसेच पत्रकार विलास भोसले,पत्रकार हनुमंत माने इ. उपस्थित होते.