#Yavat:पत्रकार समाजाचा घटक असतांनाही त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद नाही - एस.एम.देशमुख
पत्रकारांबद्दल महाराष्ट्र सरकारच्या मनात अढी आहे काय? एस.एम.देशमुख महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना काहीना काही योजना दिल्या आहेत, विकासाची संधी दिली आहे असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पत्रकारांना तर काहीच दिलं नाही, का? पत्रकारही समाजाचा एक घटक आहे हे सरकारला माहिती नाही की, पत्रकारांबद्दल सरकारच्या मनात अढी आहे काय? असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी राज्य सरकारला विचारला आहे. एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, काय असेल ते असेल पण पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारनं कायम कानाडोळा केलेला आहे. हे संतापजनक वास्तव आहे. काय मागण्या आहेत पत्रकारांच्या ? सरकारनं ५० कोटी रूपये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले आहेत. त्याच्या व्याजातून सरकार पत्रकारांना पेन्शन देते, आरोग्याच्या सुविधा देते. व्याजातून येणारी रक्कम तुटपुंजी आहे. त्या रक्कमेतून पेन्शन योजनाही व्यवस्थित चालत नाही. त्यामुळं आतापर्यत केवळ १२६ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे. इतर असंख्य गरजू पत्रकार योजनेपासून वंचित आ